Subscribe Us

header ads

Rajwade Vishwanath Kashinath: Historian

Rajwade Vishwanath Kashinath: Historian

राजवाडे विश्वनाथ काशिनाथ: इतिहासाचार्य

जन्मदिन :12 जुलै

स्मृतिदिन: 31 डिसेंबर


बालपण आणि शिक्षण:

इतिहासाचार्य राजवाडे यांचे संपूर्ण नाव विश्वनाथ काशिनाथ राजवाडे असे होते. त्यांचा जन्म 12 जुलै 1964 मध्ये कोकणात वरसई येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. 1882 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे 1890 मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. तत्पूर्वीच 1888 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.

X X

कार्य:

बी. ए. ची पदवी संपादन केल्यावर राजवाडे यांनी दोन-तीन वर्षे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. याच काळात त्यांची पत्नी निवर्तली. तेव्हा त्यानंतर संसार व नोकरी यांच्या बंधनात न पडता त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य सुरू केले.

1895 मध्ये राजवाडे यांनी 'भाषांतर' हे मासिक सुरू केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून ते 'भाषांतर' या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध करू लागले. त्यांनी प्लेटोच्या 'रिपब्लिक' चे मराठीत भाषांतर करून ते मासिकात छापले. 1896 मध्ये ऐतिहासिक कागदपत्रांचा अमूल्य ठेवा त्यांच्या हाती पडला व त्याची वृत्ती इतिहास संशोधनाकडे वळली.

महाराष्ट्राचा इतिहास शोधून काढण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर तहानभूक झोप-विश्रांती पैसा-प्रसिद्धी ह्यांचा जराही न विचार करता ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची कागदपत्रे अविश्रांत परिश्रम घेऊन गोळा केली. 1998 मध्ये 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या नावाने पहिला खंड प्रसिद्ध झाला, अशा प्रकारे 1998 ते 20 या काळात राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे एकूण बावीस प्रसिद्ध केले. तरीदेखील त्यांच्याकडील अनेक कागदपत्रे आर्थिक अडचणीमुळे अप्रकाशि राहिली. वास्तविक त्या काळी इंग्रजीतून ग्रंथ लिहिणे प्रतिष्ठेचे मानले जाई. तसे लेखन करणे राजवाड्यांना सहज शक्य होते पण स्वत्व व मातृभाषेचा अभिमान यामुळे त्यांनी सर्व लेखन मराठीतून केले.

संत एकनाथांच्या अगोदर म्हणजे सोळाव्या शतकाच्या अगोदर जी ज्ञाने तयार झाली ती राजवाड्यांना सापडली. ती छापून त्यांनी प्रसिद्ध केली. महानुभाव पंथियांच्या सांकेतिक भाषेचा उलगडा करून त्या पंथाच्या वाङ्मयाचे दालन लोकांना त्यांनी खुले केले. ऐतिहासिक कागदपत्रांच्या संकलनाबरोबर राजवाडे यांनी काही ताम्रपट व शिलालेखही मिळविले होते.

महाराष्ट्रात इतिहास संशोधनाला पद्धतशीर चालना मिळावी म्हणून त्यांनी 1910 मध्ये पुण्यात 'भारत इतिहास संशोधन मंडळ' स्थापन केले. या मंडळाच्या इतिवृत्तांतून राजवाड्यांचे अनेक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले.

X X

ग्रंथसंपदा:

1. महिकावतीची बखर

2. राधामाधवविलासचंपू ज्ञानेश्वरी आणि तिचे व्याकरण 

3. मराठी धातुकोश


 विशेषता:

इतिहासाचार्य

इतिहास संशोधकाचे अग्रणी


मृत्यू:

इतिहासाचार्य राजवाडे यांचे 31 डिसेंबर 1926 रोजी धुळे येथे निधन झाले.







View, Comments and share 

Post a Comment

1 Comments