Subscribe Us

header ads

May 15 - Day of Special (Dinvishesh)

May 15 - Day of Special (Dinvishesh)

मे 15 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

15 मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो.

सेना दिन : स्लोव्हेकिया

शिक्षक दिन : मेक्सिको, दक्षिण कोरिया


15 मे 1718 रोजी जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

15 मे 1730 रोजी रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
X X
15 मे 1811 रोजी पॅराग्वेला (स्पेनकडून) स्वातंत्र्य मिळाले.

15 मे 1836 रोजी सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या "बेलीज बीड्‌स"चे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.

15 मे 1905 रोजी अमेरिकेतील नेवाडा राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वेगास शहराची स्थापना करण्यात आली.


15 मे 1928 रोजी मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.

15 मे 1935 रोजी मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

15 मे 1940 रोजी सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे "मॅक्डोनाल्डस" (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
X X
15 मे 1940 रोजी दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.


15 मे 1958 रोजी सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 3 चे प्रक्षेपण केले.

                  स्पुतनिक 3 

15 मे 1960 रोजी सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 4 चे प्रक्षेपण केले.


15 मे 1961 रोजी पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू

15 मे 1980 रोजी संपूर्ण भारतीय बनावटीच्या गोदावरी या पाणबुडीचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण.


15 मे 1993 रोजी संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिवार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.


15 मे 2000 रोजी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह 5 जण ठार
X X


15 मे 1817 रोजी देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक यांचा जन्म झाला.

15 मे 1859 रोजी पिएर क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रधान करण्यात आले होते.

                  पिएर क्युरी

15 मे 1892 रोजी भारतीय वकील व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राजकारणी तसचं, भारतीय लोकसभा मतदार संघाचे सदस्य आणि मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल हरि विनायक पाटसकर यांचा जन्म झाला.

          हरि विनायक पाटसकर

15 मे 1903 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रा. श्री. जोग साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 फेब्रुवारी 1977 मध्ये झाला.



15 मे 1907 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक "सुखदेव" थापर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 मार्च 1931 मध्ये झाला.


15 मे 1914 रोजी तेनसिंग नोर्गे, एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणार्‍या एडमंड हिलरी यांचे सहकारी यांचा जन्म झाला.

15 मे 1926 रोजीमाजी भारतीय नौदल अधिकारी महेंद्रनाथ मुल्ला यांचा जन्म झाला. यांचा जन्म झाला.
X X
15 मे 1937 रोजी माधुरी दिक्षीत-नेने – अभिनेत्री यांचा जन्म झाला.

15 मे 1350 रोजी संत जनाबाई यांचे निधन झाले.जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील,
“माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||”
या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले.संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते.‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे.‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे 350 अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत.



15 मे 1729 रोजी वैशाख व. 14, शके 1651 मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन झाले.

15 मे 1958 रोजी मुगल राजघराण्यातील प्रमुख भारतीय इतिहासकार यदुनाथ सरकार यांचे निधन झाले.


15 मे 1993 रोजी फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख 28 जानेवारी 1899 रोजी भारतातील सैन्य दलातील "फिल्ड मार्शल" म्हणून कार्यरत असलेले हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख के एम करिअप्पा म्हणून ज्यांनी काम केले त्यांचा जन्म कर्नाटकातील कुर्ग येथे झाला. त्यांनी 1947 मधील भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान पश्चिम भागाचे नेतृत्व केले होते. 1949 मध्ये त्यांना भारतीय सेना प्रमुख या पदावर नियुक्त केले एक मे 1945 मध्ये करिअर यांना ब्रिगेडियर या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा मृत्यू 15 मे 1993 रोजी कर्नाटकातील बेंगलुरु या ठिकाणी झाला.


15 मे 1994 रोजी पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता यांचे निधन झाले.

15 मे 1994 रोजी ओम अग्रवाल – जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता यांचे निधन झाले.
X X
15 मे 2000 रोजी सज्जन – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते यांचे निधन झाले. त्यांचा तलाक (1958), बीस साल बाद (1962) चित्रपट सुप्रसिद्ध झाले होते.

15 मे 2003 रोजी अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका जून कार्टर यांचे निधन झाले.


15 मे 2007 रोजी लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1933 मध्ये झाला होता.


15 मे 2010 रोजी भारताचे 11 वे उपराष्ट्रपती व राजस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांचे निधन झाले.

X X

👆
May 14- Day of Special (Dinvishesh)

मे 14 : दिनविशेष


X X

 https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

XX

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

XX

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी



X X

👆
क्यूरीज आणि रेडिओॲक्टिव्हिटी

XX

https://www.insearchofknowledge.org/2022/04/10-ssc.html
👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

----------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

Career path finder:       

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

Career path finder:

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी





XX
View, Comments and share 

Post a Comment

0 Comments