Subscribe Us

header ads

May 6 - Day of Special (Dinvishesh)

May 6 - Day of Special (Dinvishesh)

मे 6 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

6 मे 1529 रोजी घाघरा येथील युद्धात मुघल सम्राट बाबर यांनी बंगाल आणि बिहारच्या शासकांचा पराभव केला.

6 मे 1536 रोजी इंग्लंडचे राजा हेनरी अष्टम यांनी प्रत्येक गीरीजाघरात बाईबल हे धार्मिक पुस्तक ठेवण्यास सांगितले.

6 मे 1542 रोजी सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.

6 मे 1632 रोजी शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.

6 मे 1818 रोजी [वैशाख शु. 1 शके 1740] राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.

6 मे 1835 रोजी अमेरिकन वर्तमानपत्र न्यूयॉर्क हेरॉल्ड चे प्रकाशण करण्यास सुरुवात झाली.


X X
6 मे 1840 रोजी एक पेनी किमतीचे ’पेनी ब्लॅक’ नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट इंग्लंडमध्ये विक्रीसाठी खुले झाले. हे तिकीट 1 मे 1840 रोजी जारी झाले होते.

6 मे 1889 रोजी पॅरिसमधील "आयफेल टॉवर" चे पर्यटकांसाठी खुले झाले.31 मार्च 1889 रोजी "आयफेल टॉवर" चे उद्‍घाटन झाले. हा बांधायला 2 वर्षे, 2 महिने व 2 दिवस लागले. आयफेल टॉवर हे पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे ही फ्रान्सची सर्वाधिक ओळखली जाणारी ऐतिहासिक वास्तू आहे. या टावरची उंची 324 मीटर म्हणजे 1063 फूट एवढी असून यामध्ये तीन मजले आहेत. गुस्तव्ह आयफेल या फ्रेंच वास्तू शास्त्रकाराला आयफेल टावर निर्मितीचे श्रेय जाते. त्याने याची रचना केली होती. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मृती प्रित्यर्थ 300 कामगारांनी 18038 अति शुद्ध लोखंडाचे भाग वापरून या आयफेल टॉवरची निर्मिती करण्यात आली हा पॅरिसमधील सर्वात उंच इमारत टावर आहे. 1889 ते 1930 या दरम्यान जगातील सर्वात उंच इमारत म्हणून याची लोकप्रियता पर्यटकांनी मध्ये होती आणि हे पर्यटकांचे एक आकर्षण केंद्र होते. याचे बांधकाम 1887 ते 1889 या काळामध्ये करण्यात आले. उद्घाटन 31 मार्च 1889 मध्ये झाले असून हातावर लोकांसाठी पर्यटना साठी 6 मे 1889 मध्ये खुला करण्यात आला. आयफेल टॉवर मधील धातूंचे वजन 7300 टन आहे.

             आयफेल टॉवर


6 मे 1910 रोजी ब्रिटीश शासक एडवर्ड सप्तम यांच्या निधनानंतर त्यांची गाद्दी त्यांचे पुत्र जॉर्ज पंचम यांनी सांभाळली.

6 मे 1944 रोजी पुणे येथील आगा खान पॅलेस मधून महात्मा गांधी यांची सुटका झाली.

6 मे 1949 रोजी ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.

6 मे 1954 रोजी रॉजर बॅनिस्टर हे 1 मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
X X
6 मे 1983 रोजी अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.

6 मे 1994 रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते इंग्लिश खाडीखालुन जाणार्‍या आणि इंग्लंड व फ्रान्स यांना जोडणार्‍या ’युरो टनेल’चे उद्‍घाटन झाले.

6 मे 1997 रोजी "बँक ऑफ इंग्लंड" ला स्वायत्तता देण्यात आली.

6 मे 1999 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना तीस टक्‍के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. अस निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

6 मे 2001 रोजी पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

6 मे 2002 रोजी भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे 31 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
X X
6 मे 2015 रोजी सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून 5 वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.


6 मे 1856 रोजी ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 सप्टेंबर 1939 मध्ये झाला.
               सिग्मंड फ्रॉईड 


6 मे 1861 रोजी भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू त्यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1931 मध्ये झाला.
 कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू


6 मे 1920 रोजी जुन्या पिढीतील संगीतकार व गायक बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी 24 मे 1993 मध्ये झाला.


6 मे 1940 रोजी प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म झाला.

6 मे 1943 रोजी लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म झाला.
X X
6 मे 1951 रोजी भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका आणि लेखिका. संगीत नाटक अकादमी आणि फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन त्यांचा जन्म झाला.
                  लीला सॅमसन


6 मे 1953 रोजी ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म झाला.

6 मे 1964 रोजी अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय जलतरणपटू खजान सिंह यांचा जन्म झाला.


6 मे 1579 रोजी अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन त्याचे निधन झाले. त्यांचा जन्म 1506 मध्ये झाला होता.


6 मे 1862 रोजी अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो यांच्या निधन झाले. त्यांचा जन्म 12 जुलै 1817 मध्ये झाला होता.


6 मे 1922 रोजी सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये झाला होता.

X X
6 मे 1952 रोजी इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञमारिया माँटेसरी त्यांचे निधन झाले. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1870 मध्ये झाला. 



6 मे 1946 रोजी भारतातील स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचे निधन झाले. 1931 मधे "गांधी-आयर्विन" कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. 1932 मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला होता. 
               भुलाभाई देसाई


6 मे 1966 रोजी भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्‍चायुक्त रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या निधन झाले.
16 फेब्रुवारी 1876 मध्ये भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्‍चायुक्त रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. 1894 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बीएससी पदवी प्राप्त केली. हिंदुस्तान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन ते इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यामध्ये त्यांनी गणित विषय घेऊन सर्वात कठीण परीक्षा ते प्रथम श्रेणीत पास होऊन ते प्रथम आले . त्यामुळे त्यांना सीनियर रँग्लर असे म्हणतात. रँग्लर परांजपे हे 1902 ते 1927 या काळात फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यानंतर ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. त्यानंतर 1921 साली तत्कालीन मुंबई सरकारने रँग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. 1927 मध्ये लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू पद रँग्लर यांनी सहा वर्ष भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या वकील भारतीय वकिलातीत उच्चयुक्त म्हणून 1944 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. 1956 मध्ये ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांचा मृत्यू 6 मे 1966 रोजी झाला.


6 मे 1995 रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी यांचे निधन झाले.

6 मे 1999 रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे यांचे निधन झाले.

X X
6 मे 2001 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यातील विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन झाले.

6 मे 2006 रोजी जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज टायटनिक च्या दुर्घटनेचे साक्षीदार अमेरिकन नागरिक लिलियन एस्प्लंट यांचे निधन झाले.
X X



https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2024/04/may-5-day-of-special-dinvishesh.html
👆
May 5 - Day of Special (Dinvishesh)

मे 5 : दिनविशेष

XX




👆
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज 

6 मे: स्मृतीदिन

👆
Visit 





X
X
View, Comments and share...

Post a Comment

0 Comments