Subscribe Us

header ads

October 10 - Day of Special (Dinvishesh) ऑक्टोबर 10 : दिनविशेष

October 10 - Day of Special (Dinvishesh)

ऑक्टोबर 10 : दिनविशेष





महत्त्वाच्या घटना

जागतिक मृत्यूदंड निषेध दिन
राष्ट्रीय टपाल दिवस

10 ऑक्टोबर 1947 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी आपला "अमळनेरचे अमर हुतात्मे" हा पोवाडा पुण्यात जाहीरपणे गायल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. पुणे कारागृहातूनच त्यांनी या घटनेचा वृत्तांत 'मोरारजींच्या राज्यात गाण्याला बंदी' या शीर्षकाखाली वृत्तांत लिहिला होता.

15 ऑक्टोबर 1910 जेव्हा गामा पहेलवान जागतिक हेवीवेट चॅम्पियनशिपच्या भारतीय आवृत्तीचा विजेता बनला.

X X
10 ऑक्टोबर 1846 रोजी इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.

10 ऑक्टोबर 1911 रोजी चीनमध्ये किंग वंशाचा शेवट झाला.

10 ऑक्टोबर 1913 रोजी पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.

10 ऑक्टोबर 1942 रोजी सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

10 ऑक्टोबर 1944 रोजी दुसरे महायुद्ध – ज्यूंचे शिरकाण – 800 जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.

10 ऑक्टोबर 1954 रोजी आचार्य अत्रे निर्मित श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.
X X
10 ऑक्टोबर 1960 रोजी विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

10 ऑक्टोबर 1964 रोजी जपानमधील टोकियो येथे 18 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

10 ऑक्टोबर 1970 रोजी फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

10 ऑक्टोबर 1975 रोजी पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.

10 ऑक्टोबर 1992 रोजी साली पश्चिम बंगाल मधील हुगळी नदीवरील कोलकाता आणि हावडा शहरांना जोडणारा पूल विद्यासागर सेतु प्रवासाकरिता सुरु करण्यात आला.

10 ऑक्टोबर 1998 रोजी आदर्श सेन आनंद यांनी भारताचे 29 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

10 ऑक्टोबर 2014 रोजी पाकिस्तानी शालेय विद्यार्थिनी व महिला मानवाधिकार कार्यकर्ता मलाला युसुफ यांना नोबल पारितोषिक पुरस्कार बहाल करण्यात आला.

10 ऑक्टोबर 2014 रोजी साली थोर भारतीय समाजसुधारक कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबल पुरस्कार बहाल करण्यात आला.
X X
10 ऑक्टोबर 1731 रोजी हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1810)

10 ऑक्टोबर 1830 रोजी स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) यांचा जन्म झाला.

10 ऑक्टोबर 1844 रोजी बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 3 रे अध्यक्ष यांचा जन्म झाला.

10 ऑक्टोबर 1871 रोजी शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचा जन्म झाला. मृत्यू: 23 एप्रिल 1958)

10 ऑक्टोबर 1877 रोजी मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म झाला. (मृत्यू: 22 ऑगस्ट 1963)

10 ऑक्टोबर 1899 रोजी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोविएत संघराज्यातर्फे ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ सन्मान प्रदान करण्यात आला. (मृत्यू: 22 मे 1991)

10 ऑक्टोबर 1902 रोजी के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत यांचा जन्म झाला. मृत्यू: 9 डिसेंबर 1997)
X X
10 ऑक्टोबर 1906 रोजी रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक यांचा जन्म झाला. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (1954), पद्मविभूषण (2001), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (1980) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. ’द गाईड’, ’द वर्ल्ड ऑफ नागराज’, ’वेटिंग फॉर महात्मा’ इ. कादंबर्‍या, तसेच ’मालगुडी डेज’, ’ए हॉर्स अँड टू गोट्‌स’ इ. कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले. (मृत्यू: 13 मे 2001)

10 ऑक्टोबर 1909 रोजी क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचा जन्म झाला. मृत्यू: 11 सप्टेंबर 1998 – पुणे, महाराष्ट्र)

10 ऑक्टोबर 1910 रोजी डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक यांचा जन्म झाला. मृत्यू: 9 डिसेंबर 1942)

10 ऑक्टोबर 1912 रोजी भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म झाला. (मृत्यू: 30 मे 2000)

10 ऑक्टोबर 196 रोजी डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक यांचा जन्म झाला. मृत्यू: 20 मे 1992)

10 ऑक्टोबर 1954 रोजी रेखा – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म झाला.

10 ऑक्टोबर 1998 रोजी मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते यांचे निधन झाले.(जन्म: 26 सप्टेंबर 1858)
X X
10 ऑक्टोबर 1964 रोजी वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचे निधन झाले.. त्यांचे ‘चौदहवी का चांद‘, ‘कागज के फूल‘, ‘सीआयडी‘, ‘मि. अंड मिसेस 55‘, ‘आरपार‘ आणि ‘प्यासा‘ इ. चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. (जन्म: 9 जुलै 1925)

10 ऑक्टोबर 1983 रोजी रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे टोपणनाव पडले, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या (1973) यांचे निधन झाले.

10 ऑक्टोबर 2000 रोजी सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या 6 व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान यांचे निधन झाले. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे ’सिलोन’ हे नाव बदलून ’श्रीलंका’ केले. खाजगी शाळा, तेलकंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले. (जन्म: 17 एप्रिल 1916)

10 ऑक्टोबर 2005 रोजी युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन झाले.

10 ऑक्टोबर 2006 रोजी सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका यांचे निधन झाले. (जन्म: 4 आक्टोबर 1913)

10 ऑक्टोबर 2008 रोजी रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका यांचे निधन झाले. जन्म: 14 नोव्हेंबर 1924)

10 ऑक्टोबर 2011 रोजी जगजीतसिंग – गझलगायक यांचे निधन झाले. जन्म: 8 फेब्रुवारी 1941)


X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/october-9-day-of-special-dinvishesh-9.html
👆
October 9 - Day of Special (Dinvishesh)

ऑक्टोबर 9 : दिनविशेष
X X

X X







View, Comments and Share...........






 

Post a Comment

1 Comments