Commerce - 12th. Passed)
Career path finder:
12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी
आपण इयत्ता 12 बारावी (कॉमर्स) वाणिज्य वर्गातील पास झालेले विद्यार्थी व त्यांना पुढील कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत .पदवी-पदव्युत्तर ,संशोधन ,डिप्लोमा कोर्स, सर्टिफिकेट कोर्स कोणत्या प्रकारचे करता येतात व ते पूर्ण केल्यानंतर पुढील भविष्यासाठी त्याचा फायदा काय होतो. नोकरीच्या संदर्भात असो किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या संबंधी असो हे आपण पाहणार आहोत.
X X
12 बारावी (कॉमर्स )उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत.
X X
1. इयत्ता 12 बारावी (कॉमर्स) पास झालेले मराठी किंवा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी बी कॉम (B.Com.)हा तीन वर्षाचा पदवी कोर्स पूर्ण करू शकतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शनल विषय चॉईस करून भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचा आहे त्याबद्दल नियोजन करता येते पदवी पूर्ण झाल्यानंतर एम कॉम(M.Com.) ही विशेष पदवी स्पेसिफिक विषयांमध्ये प्राप्त करून आपण बँकिंग क्षेत्रात किंवा अकाउंटन्सी क्षेत्रांमध्ये किंवा इकॉनोमिकल क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची जॉब मिळू शकतो पुढे सेट नेट किंवा पीएचडी करून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करता येते व पुढील विशेष विषयांमध्ये संशोधन करून एक चांगले मार्गदर्शक म्हणून काम करता येते.
X X
2. बी कॉम (B.Com.)तीन वर्षाची कॉमर्स पदवी कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण दोन वर्षाचा एम. बी .ए .(MBA) पदव्युत्तर कोर्स पूर्ण करून मोठ्या कंपन्यांमध्ये मार्केटिंग ,फायनान्स ,मटेरियल्स या शिक्षण क्षेत्रा मध्ये मॅनेजर किंवा बिझनेस मॅन म्हणून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. किंवा बँक सेक्टर मध्ये बँक प्रोबेशनरी ऑफिसर ,अकाउंट ऑफिसर ,इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठ्या पदावर आपल्याला नोकरी मिळू शकते.
X X
3. 12 बारावी (कॉमर्स) उत्तीर्ण झाल्यानंतर आपण पाच वर्षाचा एलएलबी(LLB) चा कोर्स पूर्ण करू शकतो. त्यानंतर एल एल एम (LLM)हा पदव्युत्तर कोर्स वकिली क्षेत्रातला पूर्ण करून आपण पुढील कालावधीत सरकारी वकील किंवा न्यायाधीश या पदावर विविध परीक्षेच्या माध्यमातून काम करू शकता. तसेच डी टी एल ((DTL)) हा एक ते दोन वर्षाचे कोर्स पूर्ण करून व्यवसाय सुद्धा करू शकता.
X X
4. 12 बारावी (कॉमर्स )उत्तीर्ण झाल्यानंतर आपण दोन वर्षाचा डीएड(D.Ed.) हा कोर्स करू शकतो ज्या माध्यमातून आपल्याला सरकारी नोकरी किंवा निम सरकारी नोकरी शिक्षकाची मिळू शकते.
5. 12 बारावी (कॉमर्स )उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षाचा संगणक अभ्यासक्रम बीसीए /बीसीएस (BCA/BCS)हा पदवी फोर्स फोर्स पूर्ण करून पुढे एम सी ए किंवा एम सी एस (MCA/MCS )पदव्युत्तर कोर्स करू शकता .जे विद्यार्थी बारावी कॉमर्स ला मॅथेमॅटिक्स आणि इंग्लिश हा विषय घेऊन पास झालेले असतील. हेच विषय घेऊन पास झालेले विद्यार्थी बी आर्क (B.Arch.) आर्किटेक्चर हा पदवी कोर्स पूर्ण करून व्यवसाय सुरू करू शकता.त्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर जॉब इत्यादी कोर्सेस करून आपणास जॉब मिळू शकतो.
6. 12 बारावी (कॉमर्स )उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीए किंवा सी एस (CA/CS )फाउंडेशन किंवा चा कोर्स करून खूप मोठी प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात .ज्या गोष्टीची इन्कम टॅक्स क्षेत्रासाठी खूप मोठी आवश्यकता आहे किंवा सरकारी नोकरी मध्ये सुधा ऑडिटर, अकाउंटट, सीए या पदावर आपणास नोकरी मिळू शकतो. तसेच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा या कोर्सच्या विद्यार्थ्यांना खूप मोठी मागणी आहे.
X X
7. 12 बारावी (कॉमर्स ) पास झालेले विद्यार्थी बीबीए (BBA) हा बिझनेस मॅनेजमेंट मॅनेजमेंट कोर्स पूर्ण करून एम बी ए(MBA) हा पदव्युत्तर कोर्स मार्केटिंग ,फायनान्स, मटेरियल या विषयात पूर्ण करून नोकरी मिळू शकतात
8.12 बारावी (कॉमर्स )उत्तीर्ण विद्यार्थी आयसीडब्ल्यूए(ICWA) हा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण करून मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळू शकतात.
9. 12 बारावी (कॉमर्स )झालेले विद्यार्थी बी. लिब. (B.Lib.) ग्रंथालय शास्त्राचे पदवी कोर्स एक वर्षाचा करूनपुढे दोन वर्षाचा एम. लिब.(M.Lib.) कोर्स पूर्ण करून ग्रंथालयात नोकरी मिळू शकतात.
10. 12 बारावी (कॉमर्स) झालेले विद्यार्थी बी कॉम, बीबीए, बीसीए (B.COM./BBA/BCA) इत्यादी पदवी कोर्स पूर्ण केल्यानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी करून चांगल्या मोठ्या अधिकारी पदावर सरकारी नोकरी मध्ये काम करू शकतात किंवा कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम करू शकतात सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना एमपीएससी ,यूपीएससी, एसएससी ,बी आर बी( MPSC/UPSC/SSC/BRB) बँक रेक्रूटमेंत बोर्ड मध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे.
X X
बीकॉम चे विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे काही आयटी मधले कोर्स करून सुद्धा आपलं करियर ची सुरुवात करता येते. हा एक खूप चांगला पर्याय आहे यामुळे निश्चितच आपल्या करिअरला फायदा होईल.
डिजीटल मार्केटिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Digital Marketing): डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग नंतर करिअरचे अनेक पर्याय आहेत. हा कोर्स 6 महिने ते 2 वर्षांचा असतो. या कोर्सनंतर तुम्हाला कंटेंट रायटिंग, एसइओ, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, लीड जनरेशन, ॲनालिटिक्स, ब्रँड मॅनेजमेंट यासारखे अनेक करिअर पर्याय मिळू शकतात. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता.
डिप्लोमा इन टॅली ईआरपी (Diploma in Tally ERP): या अभ्यासक्रमात टॅली शिकवली जाते. जर तुम्हाला अकाउंट्स आवडत असतील तर तुम्ही हा कोर्स करू शकता. यानंतर तुम्ही कोणत्याही खाते क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करू शकता. या कोर्सला चांगली डिमांड आहे.
डिप्लोमा इन मॅनेजमेंट (Diploma in Management): तुम्हाला कोणत्याही स्टीममधून मॅनेजमेंट करायचे असेल तर तुम्ही डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स करू शकता. या कोर्समधून तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळतील. या कोर्सनंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा स्टार्टअप सेट करता येऊ शकतो.
डिप्लोमा इन टॅली ईआरपी (Diploma in Tally ERP)
बी. कॉम इन कॉम्प्युटर ऍप्लिकेश (B.Com in Computer Application): हा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग कोर्स आहे, ज्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर शिकवले जातात. यामध्ये अर्थशास्त्र, वित्त, व्यवसाय, कायदा आदी विषय शिकवले जातात.
डिप्लोमा इन ई-कॉमर्स (Diploma in E-Commerce): हा शॉर्ट टर्म कोर्स आहे. ई-कॉमर्स कोर्सेसमध्ये तुम्हाला नेटवर्किंग आणि प्रोग्रामिंगबद्दल शिकवले जाते. यानंतर तुम्हाला कोणत्याही चांगल्या कंपनीत लाखो पगाराची नोकरी मिळू शकते.
डिप्लोमा इ बँकिंग (Diploma in Banking): या कोर्समध्ये तुम्हाला बँकिंगशी संबंधित विषय शिकवले जातात. जर तुम्हाला फायनान्स आवडत असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. यामध्ये डिप्लोमा इन बँकिंगसारखे अनेक कोर्सेस आहेत. यामध्ये तुम्हाला बँकिंग कायद्याशी संबंधित विषय शिकवले जातील.
डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट कोर्स (Diploma in Retail Management): आजच्या काळात या कोर्सचे अनेक फायदे आहेत. या कोर्समध्ये तुम्हाला बँड, स्ट्रेटजी आणि ग्राहकांना कसे आकर्षित करावे याबद्दल शिकवले जाते. रिटेल मॅनेजमेंट कोर्समधील करिअरबद्दल बोलायचे झाल्यास दररोज मोठे मॉल्स, मल्टी स्टोअर्स आणि शॉपिंग सेंटर्स उघडत आहेत आणि तुम्हाला 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत कुठेही नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
बीकॉम अकाउंटिंग आणि टॅक्सेशन (BCom Accounting and Taxation): बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीकॉम अकाउंटिंग आणि टॅक्सेशनला प्रवेश घ्यावा. या अभ्यासक्रमात भारतीय कर प्रणाली, वित्तीय लेखा, मूल्यवर्धित कर आणि केंद्रीय कर प्रक्रिया, वित्तीय लेखा, व्यवस्थापनाची तत्त्वे आणि व्यवसाय संप्रेषण या विषयांचा समावेश असतो.
बीकॉम स्टॅटिस्टिक्स (BCom Statistics): बीकॉम स्टॅटिस्टिक्स हा आर्थिक संशोधन आणि विश्लेषणासंबंधीत कोर्स आहे. सिव्हिल सर्व्हिसेस, डेटा ॲनालिटिक्स, एज्युकेशन, कन्सल्टिंग आणि सरकारी संस्था या क्षेत्रात हे ज्ञान असेलेल्यांची मोठी मागणी आहे. अभ्यासक्रमामध्ये अप्लाइड इन्फॉर्मेशन इकॉनॉमिक्स, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स, बायोस्टॅटिस्टिक्स, बिझनेस स्टॅटिस्टिक्स, डेटा ॲनालिसिस आणि डेमोग्राफी इत्यादींचा समावेश आहे.
बीकॉम पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन (BCom Tourism & Travel Management): बीकॉम पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन हे पर्यटन उद्योगासाठीचे कोर्सेस आहेत. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उद्योगातील सैद्धांतिक आणि व्यावहारिक पैलूंचे प्रशिक्षण देतो. यात व्यवसाय ऑपरेशन आणि इतर मुख्य वाणिज्य विषयांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना पर्यटनाची आर्थिक प्रासंगिकता, जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, पर्यावरणीय कायदे आणि नियम, ग्राहक सेवा आणि सेवा, आंतरराष्ट्रीय प्रवासी कायदे आणि पर्यटन व्यवस्थापन शिकवलेजाते.
वरील प्रमाणे सर्व कोर्सेस ची माहिती दिलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी पूर्णपणे विचार करून आपल्या करिअरसाठी कोणता कोर्स आपल्याला उपयुक्त आहे .त्याच शिक्षण प्रवाहात व कोर्स मध्ये आपण सहभागी व्हावे व तो पूर्ण करून आपलं करिअर घडवावे .ज्यामुळे आपला आपल्याला भविष्यात निश्चितच फायदा होईल.
X X
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या उक्तीप्रमाणे आपण आपल्या भविष्यासाठी योग्य ती निवड करावी.
आपणास आवडल्यास कॉमेंट करून शेअर करावी माहिती..
X X
View, Comments and share


22 Comments
खरोखरच ज्ञान देणारे लेख.
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteNice
ReplyDelete👍👍
ReplyDeleteVery Useful information.... Also take admition for Hotel Management, Hospitality Manegement 👍
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice information
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteVery good information
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteUseful Information
ReplyDeleteVery Nice
ReplyDeleteVery Useful Information
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteVery good
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice sir thank you 👍🏻
ReplyDeleteVery nice sir Thank you
ReplyDelete