Subscribe Us

header ads

नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर: उत्कृष्ट अभिनेता आणि सामाजिक जाणवेचा कार्यकर्ता

नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर:  उत्कृष्ट अभिनेता आणि सामाजिक जाणिवेचा कार्यकर्ता 


नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गोव्यामध्ये त्यांच्या डोना पावला येथील निवासस्थानी 8 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री पाच वाजून वीस मिनिटांनी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी पुण्यातील डोंगजे गावात त्यांच्या फार्म हाऊसवर 8 ऑक्टोबर 2026 रोजी शासकीय इतमामात करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा लपेटण्यात आला होता. त्यांचा मुलगा मल्हार यांनी त्यांना त्यांच्या फार्म हाऊस वर पार्थिवाला अग्नीदहा दिला. नाना पाटेकरांनी आपल्या मृत्यूनंतर मी गोळा केलेली बारा मन वाळलेली लाकडे आहेत त्यामध्येच माझा अंत्यविधी करा असे अगोदरच सांगून ठेवले होते. त्यांचे मूळ गाव हे रायगड जिल्ह्यातील आहे. त्यांचा जन्म एक जानेवारी 1951 मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा या गावी झाला. त्यांचे वडील दीनानाथ पाटेकर हे चित्रकार होते. नाना पाटेकर पोस्टर रंगवण्याचे काम केले होते. मनापासूनच त्यांनी अभिनयाची सुरुवात शाळेतच केली होती पुढे त्यांनी सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेतले आणि काही काळात जाहिरात संस्थेमध्ये काम केले. चित्रपटसृष्टीत येण्याचा अगोदर त्यांचा खूप संघर्षमय कार्यकाळ गेला होता पण अभियानाची जिद्द त्यांनी सोडली नाही. नाना पाटेकर यांचा विवाह 1978 मध्ये निलकांती या अभिनेत्री सोबत झाला. नीलकंठी ह्या मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री होत्या त्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ही अभिनेत्री होत्या यांना दोन मुलं झाली. त्यातील दुर्वास हा लहान वयातच मरण पावला तर मल्हार पाटेकर हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांनी त्यांना अंतिम समयी मुखाग्नी दिला.







मराठी नाट्य रंगभूमीवरील कारकीर्द :


नाना पाटेकर यांनी कॉलेजमध्ये असताना सुहास आणि अरविंद देशपांडे यांच्या अविष्कार या नाट्यसंस्थेची जोडून घेतले रंगकर्मी विजयाबाई मेहता सोबत रंगमंचावर काम केले. नानांनी आपली सुरुवात मराठी रंगभूमीवरून नाटक स्वरूपामध्ये सुरुवात केली त्यामध्ये हमिदाबाईची कोठी नाटकात सत्तारची किरकोळ भूमिका ही त्यांनी केलेली प्रचंड ताकतीने साकारून आपल्या बुलंद अभिनयाची द्वारे देणारे नाना डोळ्यासमोर उभे राहिले पुरुष नाटकातील मगरू राजकारणी गुलाबराव साकारणारे नाना पाटेकर पाठवून अनेकांच्या अंगावर पुन्हा एकदा शहारे आले. पाहिजे जातीचे नाटकातील बबन्या अतिशय उत्कृष्टपणे भूमिका साकारला. 


मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील भूमिका: 


नाना पाटेकरांनी 1978 मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या राघू मैना या मराठी चित्रपटातून नानांना महत्त्वाची भूमिका मिळाली. अकोल्याचे दिवंगत निर्माते डॅडी देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती तर दिग्दर्शक राजवट यांचे होते. नाना पाटेकर हे दिग्दर्शक राजदत्त यांना आपले गुरु माणिक असत. संघर्षाच्या काळात विदर्भातील निर्मात्याने दिलेली ही संधी त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर 1979 सिंहासन १९८० मध्ये भारत यासारखे मराठी चित्रपटात पासून त्यांची मराठी चित्रपट सृष्टीतील प्रवास पुढे सरकला सावित्री गड जेजुरी जेजुरी अंकुश प्रतिघात अंधा युद्ध सलाम बॉम्बे माफीचा साक्षीदार अशा भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांच्या परिंदा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

अभिनेते नाना पाटेकर हे गणपतीचे निशिम भक्त होते गणेश वर्षाच्या दिवसात ते जगात कुठेही असले तरी उत्सवापूर्वी माटुंगा आणि माहीम स्थानकादरम्यान असलेल्या आपल्या जुन्या निवासस्थानी आवर्जून उपस्थित होत असत आणि संपूर्ण उत्सव तेथे मुक्काम करून सहभागी होत आणि बाप्पाची आरती स्वतःच्या हाताने ताज्या फुलांनी ते करत असत.


नानांनी क्रांतिवीर मधील प्रताप टिळक परिंदा मधील विकसित अण्णासेठ प्रहार मधील मेजर प्रताप चव्हाण तिरंगा मधील शिवाजीराव वागळे खामोशी मधील कर्णबधिर जोसेफ माफीचा साक्षीदार मधील क्रूर राजेंद्र जगल आज की आवाज मधील थंड रक्ताचा खलनायक जगमोहनदास वजूद मध्ये माधुरी दीक्षित साठी कैसे बताओ मेरे लिये तुम कौन हो ही कविता खर्जात म्हणणारा मल्हार अग्निहोत्री अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा अंकुश मधील रवी केळकर यशवंत मध्ये साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है असा पल्लेदार संवाद गोळीबंद आवाजात मनात रुपेरी पडदा फाडून टाकणारा इन्स्पेक्टर यशवंत लोहार अशी नानांचे विविध रूपे तरळून गेली. 2016 मध्ये नटसम्राट गणपतराव बेलवलकर उर्फ आप्पांच्या भूमिकेत त्यांनी पुन्हा सिद्ध केले की अभिनयासाठी चेहऱ्यापेक्षा अनुभव आणि आत्मा महत्त्वाचा असतो. राजकीय नेत्यांनी नानांना राष्ट्रभक्त क्रांतिवीर सीने जगताने अभिनयातील सरकार अशी उपाधी दिली शेतकरी म्हणाले आमचे मायबाप आम्हाला कसे का सोडून गेले तर सैन्यदातील अधिकाऱ्यांनी असा कठोर शिस्तीवाला पुन्हा होणे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 



सामाजिक कार्याची आवड :


1999 चा कारगिल युद्धाच्या धगधगत्या रणभूमीत कुप वड्याच्या सीमेवर तोफांचा मारा सुरू असताना अभिनेते नाना पाटेकर चहाची किटली घेऊन जवानांच्या भेटीला आले होते त्यांनी जवानांसोबत प्रत्यक्ष आठ दिवस घालवत सर्वांना मोठा आधार दिला. पडद्यावरचा नायक रणभूमीत जवानांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिल्या त्या प्रेरणादायी आठवणींना आजही उजाळा मिळतो. 





नाम फाउंडेशन च्या माध्यमातून कार्य: 


ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी 2015 मध्ये नाम फाउंडेशन ची स्थापना केली संस्था महाराष्ट्रातील दुष्काळ पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर या संस्थेचे काम सुरू केले. आत्तापर्यंत 4940 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली असून 1900 विद्वान नाही या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे.

दुष्काळ कर्जबाजारीपणा शेतातील संकटामुळे खचलेल्या मराठवाड्यातील हजारो कुटुंबांना अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनने मदतीचा हात दिला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रत्येकी शंभर याप्रमाणे 800 नाले 800 तलावातील गाळ उपसा त्यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करून दिला. त्यामुळे जलसंधारणा सोबत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता पाण्यासाठीचा पाया तयार त्यांनी केला. शेतकऱ्यांना केवळ पाणीच नव्हे तर उत्पादनासाठी आवश्यक साधनेही उपलब्ध झाली. प्रत्येक जिल्ह्यातील 3000 याप्रमाणे 24000 शेतकऱ्यांना बियाणे व धान्याचे किट त्यांनी या माध्यमातून देण्यात आले. त्यामुळे अनेक कुटुंबांना शेतीत राबवण्यासाठीचा आधार मिळाला. अण्णा हजारे यांच्या बद्दल म्हणतात पाणी आडवा आणि पाणी जिरवा हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले नाम फाउंडेशनचे काम मोठे असून ते समाजाला दिशादर्शक आहे.





महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 500 महिलांना शिलाई मशीन देऊन उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मुला मुलींना शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम कॉलेजमध्ये दरवर्षी सहा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. बीडचे गौतम खटोड यांच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना कृषी अवजारे उपलब्ध करून दिले. त्यामुळे नाम फाउंडेशन ची मदत केवळ तात्पुरती नसून शेतीत पाणी अवजारे रोजगार आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनाला पुन्हा दिशा मिळाली. 


आत्महत्याग्रस्तांच्या मुलांसाठी वसतिगृह योजना :


अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यातील आर्वी तालुका शिरूर कासार येथे शांतीवन सामाजिक प्रकल्पात आत्म्यावर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दोनशे विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करताना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात आल्यानंतर शांतीवन करत असलेल्या कामाला नाम फाउंडेशनच्या माध्यमातून बळ देण्यात नाना पाटेकर यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे दोनशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या इमारतीचे बांधकाम नाम फाउंडेशन करून करण्यात आले. त्यासाठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे हे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शांतीवन आला भेट देऊन त्या कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. बीड जिल्ह्यात पाण्याची अडचण लक्षात घेऊन शेततळे व जलसंधारणाचे कामे करण्याचा निर्णय नानांनी घेतला आणि शांतीवनला दोन पोकलेन उपलब्ध करून दिले त्या माध्यमातून शेतकऱ्यांची कामे केली गेली आणि परिसरात जलसंधारणाचे कार्य भरपूर प्रमाणामध्ये झाले. नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून 2015 पासून बीडची नाते जोडलेले आहे. त्यामुळे या जलसंधारणाच्या कामाचा बीड जिल्ह्यातील 125 गावांना व त्यातील 10000 हजार हेक्टर शेतीला फायदा झाला आणि 500 हून अधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत झाली. शेकडो महिलांना शिलाई मशीन पिठाची गिरणी देत जगण्याचे बळ मिळाले त्यामुळे नानांचा बीडच्या वेदनाशी खूप जवळचा संबंध होता. 

2015 मध्ये जेव्हा बीडमध्ये पहिला कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळाला. 230 महिलांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत दिली. आतापर्यंत 500 पेक्षा जास्त कुटुंबियांना नाम फाउंडेशनच्या द्वारे मदत मिळाली.



शेतकऱ्यांसाठीच्या हेल्पलाइनचा विचार राहिलेले स्वप्न :


ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळात आर्थिक संकटासोबत मानसिक तणावही वाढतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करू नये यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा विचार ते करत होते आत्महत्येच्या विचारात असलेल्या व्यक्तीशी संवाद साधून त्यांचे मन परिवर्तन करणे त्यांना आवश्यक मदत पोहोचणे आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे या उद्देशाने हेल्पलाइन सुरू करण्याचा विचार ते करत होते पण त्यांच्या अकाली जाण्याने हा विचार तसाच राहून गेला. 











निधन :

अभिनयाचा नटसम्राट ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर यांचा मृत्यू गोव्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने 8 ऑक्टोबर 2026 रोजी झाला. मृत्यूच्या समयी त्यांचे वय वर्ष 75 होते. त्यांचे अंत्यसंस्कार महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील त्यांच्या डोणजे गावातील फार्म हाऊस वर रात्री 11:30 वाजता शासकीय इतममात करण्यात आले.








View, comment and share......

Post a Comment

1 Comments

  1. खूप छान लिहिले आहेत सर जी 🙏

    ReplyDelete