NSS: National Service scheme
राष्ट्रीय सेवा योजना
24 सप्टेंबर: स्थापना दिवस
भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव, सामाजिक बांधिलकी, समाजाबद्दल असणारी अस्था निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास विविध पैलूंनी घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली.
स्वावलंबन, चारित्र्यसंवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पध्दतीत घडवून आणण्यासाठी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे 24 सप्टेंबर 1969 मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येते.
डॉ. बाबासाहेव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 1970-71 पासुन राष्ट्रीय सेवा योजना सुरु असुन आज विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्हयात 23000 स्वयंसेवक व 250 कार्यक्रमाधिकारी 140 महाविद्यालयाद्वारे उत्कृष्टपणे सहभागी आहेत.
X X
राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास:
राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रारंभ करण्यासंबंधीची संकल्पना ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांची आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात देशातील तरुणांनी विशेषत: महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय युवकांनी देशातील लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहिजे.
भारत हा खेड्यांचा देश असल्या कारणाने खेड्यातील जनतेला स्वातंत्र्याची सर्व फळे उपभोगता आली पाहिजे. यासाठी त्यांना कार्यप्रवण केले पाहिजे.
1950 मध्ये विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी युगातील आदर्श शिक्षण क्षेत्रांत राबविण्यासाठी विचार विनिमय करण्याच्या हेतूने जानेवारी 1950 मध्ये एक बैठक आयोजित केली. त्या आधारे 1952 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत समाजसेवा आणि शारीरिक श्रम यावर अधिक भर देणारी विद्यार्थ्यांची शिबीरे आयोजित करण्याची योजना आखली.
1958 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करताना नऊ महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंत समाजसेवेचे ग्रामीण भागात कार्य करावे अशा प्रकारची एक योजना आखावी असे सुचविलेले होते.
1959 च्या शिक्षण मंत्र्यांच्या दिल्ली येथील येथील बैठकीत अशा प्रकारची योजना तयार करावी म्हणून एका समितीच स्थापना डॉ.सी.डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आली. या समितीने अतिशय महत्त्वाच्या शिफारशी केल्या.
1960 मध्ये प्रा. के. जी. सय्यदीन यांनी वेगवेगळ्य देशांचा अभ्यास करून नॅशनल सर्वीस फॉर द युथ हा अहवाल दिला.
1964 मध्ये भार सरकारच्या शिक्षण सुधारणा आयोगाचे अध्यक्ष डॉ. दौलतसिंह कोठारी यांनी आपल्या अहवालामध्ये विद्यार्थ्यांनी समाजसेवा करण्यासंबंधी कोणत्या प्रकारच्या योजना राबवाव्या यासंबंधीची शिफारस केली.
मे 1969 मध्ये कुलगुरूंच्या उपसमितीची बैठक होऊन राष्ट्रीय सेवा योजनेचा मसुदा तयार करण्यात आला आणि 24 सप्टेंबर 1969 रोजी त्यावेळचे शिक्षणमंत्री डॉ. व्ही. के. आर. की. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरु केल्याची घोषणा केली.
महात्मा गांधी विचारांना राबविण्यासाठी, पंडीत जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना राज्य सरकारच्या सहकार्याने सुरु करण्यात आली.
पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या योजनेमुळे महाविद्यालयीन विद्यापीठीय युवकांना राष्ट्रीय छात्र सेनेप्रमाणे समाजसेवा आणि राष्ट्रसेवा करण्याची नवी संधी मिळत आहे, असे म्हटलेले होते.
1969 मध्ये एक पायलट स्वरुपात देशातील केवळ 37 विद्यापीठांत आणि केवळ 40 हजार विद्यार्थ्यांसाठीच ही योजना होती. हळूहळू ही योजना विस्तारली.
सध्या देशातील 180 विद्यापीठांतील 9 हजार महाविद्यालयांतील 25 लाखाहून अधिक विद्यार्थी या योजनेत सक्रियपणे सहभागी झाले आहेत. यावरुन या योजनेची विद्यार्थी वर्गातील आत्मियता लक्षात येते.
राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे:
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवा करणे, आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून घेऊन रचनात्मक कार्य करणे, समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे. या उद्देशाने ही योजना सुरू झाली.
प्रमुख उद्दिष्टे :
1) ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाला समजून घेणे.
2) स्वत:ला संबंधित समाजाला समजून घेण्यासाठी पात्र बनविणे.
3) समाजाच्या गरजांची माहिती करून घेणे, त्याच्या अडचणी समजून घेणे. व त्या दूर करणे की, ज्यामुळे तो समाज सक्रिय बनेल.
4) आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करून तिचा विकास करणे.
5) आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत किंवा सामाजिक अडचणी दूर करून त्यावर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी करणे.
6) समाजात मिसळण्यासाठी ज्या गुणांची गरज आहे, त्या गुणांचा आपल्यामध्ये विकास करणे.
7) नेतृत्व गुण धारण करून लोकशाही प्रवृत्तीचा विकास करणे.
8) साक्षर व निरक्षर यांच्यातील दरी कमी करणे.
9) राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व विकास करणे.
10) समाजातील गरीववर्गाची सेवा करण्याची इच्छा मनात जागृत करणे.
X X
राष्ट्रीय सेवा योजनेचा बिल्ला:
राष्ट्रीय सेवा योजनेच्या चिन्हावर आधारितच स्वयंसेवकांसाठी बिल्ला तयार केला आहे.
स्वयंसेवक समाजात वेगवेगळे काम करताना किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेताना हा बिल्ला आपल्या छातीवर लावतात.
बिल्ल्याचा मथितार्थ :
बिल्ल्याच्या मध्यभागी चाक असून त्या चाकात आठ आरे आहेत. ते 24 तासांचे प्रतिनिधित्व करतात (अष्टौप्रहर म्हणजे 24 तास), जी व्यक्ती हा बिल्ला लावते, तिला हा बिल्ला जाणीव करून देतो की, तो रात्रदिवस 24 तास राष्ट्रसेवेसाठी तत्पर आहे.
बिल्ल्यामधील लाल रंग हे तरूणांच्या उसळत्या रक्ताचे प्रतिक आहे. त्यातून उत्साह, जोम किंवा जोश प्रतीत होतो. त्यातून जीवंतपणा दर्शविला जातो.
निळा रंग हा आकाशाचे प्रतिनिधित्व करतो. अथांग आकाशातील एक अंश म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. हा बिल्ला लावला म्हणजे स्वयंसेवक आपला थोडा वेळ मानव कल्याणासाठी देण्यास तयार होतो.
राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य व चिन्ह:
"माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी"
NOT ME BUT YOU
'माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी' हे ह्या योजनेचे बोधवाक्य आहे. ते आपणाला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. निःस्वार्थ सेवेची गरज दाखवून देते. या बोधवाक्यात दुसऱ्या व्यक्तिचा दृष्टीकोण विचारात घेतला पाहिजे. हे सूचित होते तसेच, मानवप्राण्याबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे. व्यक्तिगत कल्याणामधून समाजाचे कल्याण होत असते. समाज हा अनेक व्यक्तींचा मिळून बनलेला असतो.
राष्ट्रीय सेवा योजनेचे चिन्ह हे ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या रथाच्या चाकावर आधिरित आहे. चक्र हे गतीचे प्रतीक आहे. गतीमुळे सामाजिक परिवर्तन होऊ शकते व त्यासाठी आजच्या महाविद्यायीन युवक-युवतींना राष्ट्रीय सेवा योजना हे माध्यम आहे. त्या माध्यमातून परिवर्तन करण्यासाठी हे चिन्ह घेतले आहे.
राष्ट्रीय सेवा योजना दिवस:
राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून प्रत्येक वर्षी “24 सप्टेंबर" मानावा असे ठरविण्यात आले. त्या दिवशी विद्यापीठ पातळीवर तसेच महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करावेत. (रक्तदान, नेत्रदान, आरोग्य शिबिर, गलिच्छ वस्ती निर्मूलन, वृक्षारोपण इ.) विशेष करून राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करताना स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे.
आज संपूर्ण भारतात विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना दिवस हा 24 सप्टेंबर साजरा केला जातो.
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरुप:
राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे दोन प्रकारचे कार्यक्रम विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर राबविले जातात.
1. राष्ट्रीय सेवा योजनेचे नियमित कार्यक्रम :
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षात 120 तास समाजसेवेचे काम महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या झोपडपट्टी किंवा ग्रामीण परिसरामध्ये करणे आवश्यक असते. या कार्यक्रमांतर्गत रोगप्रतिबंधक लसीकरण, एड्स रोगप्रतिबंधक मार्गदर्शन, मोफत रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, रोग निदान शिबीर, ग्रामसफाई, साक्षरता, पर्यावरण, सामाजिक सामंजस्य, राष्ट्रीय एकात्मता इ. समाज जीवनाशी निगडीत कार्यक्षेत्रात कार्य करण्यात येते.
2. राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर कार्यक्रम :
प्रत्येक घटक महाविद्यालयातर्फे वर्षातून एकदा दहा/सात दिवसांचे निवासी विशेष शिबीर कार्यक्रम महाविद्यालयांनी दत्तक घेतलेल्या गावी आयोजित करण्यात येते.
या शिबिरामध्ये प्राध्यापक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसफाई, जलसंधारण, वृक्षारोपण, सर्वेक्षण, कच्चा रस्ता दुरुस्ती, शोषखड्डे, सोपा संडास, आरोग्य शिबीर, व्यसनमुक्ती, ग्रामीण भागातील बचत गटांना मार्गदर्शन, योग शिबिर, शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक मार्गदर्शन, बेरोजगारांसाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे प्रकल्प तयार करणे,सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर ग्रामस्थांचे उद्बोधन इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
X X
अंमलबजावणी:
1) महाविद्यालयीन स्तर :
प्रत्येक महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या दर 100 विद्यार्थ्यांमागे एका प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमणूक करण्यात येते. त्यास कार्यक्रम अधिकारी म्हणून संबोधण्यात येते. त्याला त्याच्या नियमित कामाव्यतिरिक्त हे जादाचे काम करावे लागते. त्यासाठी त्याला वेगळे कोणतेही वेतन देण्यात येत नाही.
प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रभावीपणे कार्यक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असलेली एक सल्लागार समिती स्थापन करण्यात येते.
2) विद्यापीठ स्तर :
विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे `उपक्रम केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुव्यवस्थितपणे सुरु आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर रा.से. यो. कक्ष स्थापन करण्यात येतो. या कक्षामध्ये विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील एका प्राध्यापकाची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात येते. यास कार्यक्रम समन्वयक म्हणून संबोधण्यात येते.
3) कार्यक्रम अधिकाऱ्यांना प्रशिक्षण :
राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकाऱ्यांना समाज कार्य व इतर अनुषंगिक बाबींबाबत टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई तसेच अहमदनगर महाविद्यालयातील प्रशिक्षण केंद्र, यांचेद्वारे प्रशिक्षण व उजळणी वर्गामध्ये मार्गदर्शन करण्यात येते. यावर होणारा संपूर्ण खर्च केंद्र शासन करीत असते. हे प्रशिक्षण पुर्ण करणे सर्व नियुक्त प्राध्यापकांना बंधनकारक असते.
4) राज्य स्तर :
विद्यापीठ व महाविद्यालयांद्वारे राज्यामध्ये रासेयोचे उपक्रम प्रभावीपणे व सुव्यवस्थितपणे सुरु ठेवण्यासाठी तसेच शासनातील विविध विभागांचे शासकीय कार्यक्रम रासेयोच्या माध्यमातून राबविणे आणि त्यामध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य स्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंत्रालयामध्ये एक कक्ष स्थापना करण्यात आला आहे. या कक्षावर होणारा प्रशासकीय खर्च (वेतन/कार्यालयीन खर्च इ. व येणारा संपूर्ण खर्च) केंद्र शासन करीत असते. या कक्ष प्रमुखास राज्य संपर्क अधिकारी असे संबोधिले जाते. राज्य स्तरावर या कार्यक्रमासंबंधी निर्णय घेण्यासाठी मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्यापीठामधील कुलगुरु आणि काही संबंधीत विभागांचे सचिव असलेली राज्य सल्लागार समिती असते.
रासेयो अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची सूची:
1) नियमित कार्यक्रम :
दत्तक वस्ती / गाव व महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येणारे
कार्यक्रम :
1) नेतृत्व गुण विकास शिबीर
2) नियोजन सत्र
3) आरोग्य तपासणी शिबीर
4) शाळा दत्तक योजना
5) स्वच्छता अभियान
6) राष्ट्रीय एकात्मता व सद्भावना कार्यक्रम
7) लैगिंक समानता व महिलांसाठी विविध कार्यक्रम
8) मतदार जनजागृती
9) गुटखा तंबाखू विरोध व कर्करोग जाणीव जागृती कार्यक्रम
10) वर्षभरातील महत्वाच्या दिवसांचे कार्यक्रम
11) मूल्यामापन सत्र
2) विशेष शिबीर:
कार्यक्रम दहा दिवसाच्या शिबीरात दत्तक गाव / वस्ती मध्ये घेण्यात येणारे उपक्रम खालीलप्रमाणे
1) सामाजिक विषयांवर जनजागृती (हुंडाविरोधी कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन,बालविवाह, लोकसंख्या इ.)
2) आरोग्य विषयक कार्यक्रम (एड्स, क्षयरोगाबद्दल जनजागरण, आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शिवीर, रक्तदान शिबीर इ.)
3) पर्यावरण (वृक्षारोपण, जलसंवर्धन, बंधारे बांधणी, रस्ते बांधणी)
4) साक्षरता अभियान
5) स्त्रियांचे सक्षमीकरण व स्वयंरोजगार, कायदेविषयक सल्ला
6) आपत्कालीन सेवा
7) राष्ट्रीय एकात्मता व सद्भावना कार्यक्रम
X X
राष्ट्रीय स्तरीय :
1) राष्ट्रीय एकात्मता शिबीर (कालावधी 7 दिवस)
2) दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभाग
3) राष्ट्रीय युवा महोत्सव
4) आंतरराष्ट्रीय, आंतरराज्य, आंतर विद्यापीठ, युवा प्रत्यार्पण कार्यक्रम (youth exchange programme)
5) नेतृत्व विकास शिबिरे
6) राष्ट्रीय कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी संशोधन पर कार्यक्रम
7)कॉमन वेल्थ कार्यक्रमात सहभाग
राज्य स्तरीय:
2) आंतरजिल्हा, आंतर महाविद्यालयीन, जिल्हा स्तरीय, युवा प्रत्यार्पण कार्यक्रम
3) पुर्व प्रजासत्ताक दिन संचलन प्रशिक्षण शिबीर
4) मुंबई येथील प्रजासताक दिन संचलनात सहभाग
X X
पुरस्कार:
अ) राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार:
भारत सरकारच्या क्रिडा व युवा कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात येणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार
1.सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, समन्वयक, कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक
2.कॉमनवेल्थ सर्वोत्कृष्ट युवा पुरस्कार
राज्यस्तरीय पुरस्कार:
1) सर्वोत्कृष्ट विद्यापीठ (एक)
2) सर्वोत्कृष्ट समन्वयक (एक)
3) सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी (चार)
विद्यापीठस्तरीय पुरस्कार :
विद्यापीठातर्फे देण्यात येणारे पुरस्कार.
1) जीवन गौरव पुरस्कार (एक)
2) सर्वोत्कृष्ट रासेयो एकक महाविद्यालय (जिल्हानिहाय) (चार)
3) सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी (जिल्हानिहाय) (चार)
4) सर्वोत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक - (जिल्हानिहाय) (चार)
रासेयो वैयक्तिक स्तरावरील फायदे :
1.स्वयंसेवकाचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो.
2.स्वयंसेवकाला सामाजिक समस्यांची जाणीव होते व त्यांचे निराकरण करण्याचे कौशल्य प्राप्त होते.
3.विविध सामाजिक संस्थाशी परिचय होतो.
4.स्वयंसेवकाला स्वयंरोजगाराची दिशा मिळते.
5.विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण व प्रमाणपत्र मिळते.
सामाजिक स्तरावरील फायदे:
1) जनजागृती
2) शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचते.
3) मानवी हक्क व लोकाधिकारांची माहिती समाजापर्यंत पोहोचते.
4) वैयक्तिक व सामाजिक समस्या सोडविण्यात स्वयंसेवकाचा मोठ्या प्रमाणावर हातभार.
5) स्वयंसेवकाद्वारे समाजात रचनात्मक कार्य केली जातात. उदा. घर, स्वच्छतागृह,रस्ते, बंधारे यांची उभारणी, वृक्षारोपण व संवर्धन.
6) आरोग्य विषयक सवलती.
X X
शासकीय स्तरावरील फायदे:
1) शासनाची धोरणे लोकांपर्यंत पोहचविणे.
2) मनुष्य बळाची उपलब्धता.
3) शासनाने दिलेल्या अनुदानाच्या अधिक संख्यात्मक व गुणात्मक फायदा शासनाला करून देणे.
THE NATIONAL INTEGRATION PLEDGE
"I solemnly pledge to work with dedication to preserve and strengthen the freedom and integrity of the nation."
I further affirm that I shall never resort to violence and that all differences and disputes, relating to religion, language, region or other political or economic grievance should be settled by peaceful and constitutional means.
X X
लक्ष्य गीत
राष्ट्रीय सेवा योजना
जगें स्वराष्ट्र के लिए जगें-जगें
स्वयं सजें वसुन्धरा संवार दे - २
हम बढ़ेंगे अपने आप साथियों
जमी पे आसमां को उतार दे - २
स्वयं सजें वसुन्धरा संवार दे - २
गांव और शहर की दुरियों को पाटते चलें
ज्ञान को प्रचार दें प्रसाद दें
स्वयं सजें वसुन्धरा संवार दे - २
हरे भरे वनों की शाल ओढती रहे धारा
तरक्कियों की एन नई कतार दें - २
स्वयं सजें वसुन्धरा संवार दे - २
बढाएं बेल प्रेम की अखंडता की चाह की
भावनां से ये चमन निखार दे
सद्भावना से ये चमन निखार दें - २
स्वयं सजे वसुन्धरा संवार दें - २
जगें स्वराष्ट्र के लिए जगें-जगें
स्वयं सजें वसुन्धरा संवार दे - २
View, comments and Share...
10 Comments
Nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteलोगो चा अर्थ, बोधवाक्य इथपासून पार्श्वभूमी कार्य इत्यादी, details सुटसूटीत पध्दतीने मांडण्याची ब्लॉगर ची कला प्रशंसनीय आहे!
ReplyDeleteअतिशय साध्या भाषेमध्ये आपण राष्ट्रीय सेवा योजना बद्दल माहिती मिळवून धन्यवाद
ReplyDeleteबहुत बढ़िया जानकारी।
ReplyDelete👍👍
ReplyDeleteबहुत बढ़िया जानकारी दी गई है 🙏
ReplyDelete👍👍
ReplyDeleteNice information sir
ReplyDelete