अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
जयंती: 1आगस्ट
स्मृतिदिन: 18 जुलै
भाग-1
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वालुबाई यांच्या पावनकुशीत वाटेगाव तालुका वाळवे जिल्हा सांगली या ठिकाणी झाला.
त्या काळाच्या जातीप्रथेनुसार अण्णाभाऊ हे मांग जातीचे होते. मंग हा समाज महाराष्ट्रातील सर्वात मागास आणि दलित असा समाज म्हणून ओळखला जात असे.
अण्णाभाऊंची जात ही शूद्र जाती पैकी एक होती त्या जातीतील लोकांना उत्पन्नाचे कुठलेही खात्रीशीर साधन नव्हते ब्रिटिश सरकारच्या नोंदीनुसार मांग ही जात एक गुन्हेगार जात म्हणून ओळखली जात असे.
अण्णाभाऊंचे पूर्वज त्यांचे पंजोबा राघोबा हे 1818 ते 1872 या कालखंडात वाटेगाव येथे राहत होते.
भाऊ हे शिदोजींचे पुत्र हेच अण्णाभाऊ यांचे वडील अण्णांच्या आईचे नाव वालुबाई असे होते त्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधल्या काळसंडे गावाच्या अण्णा मांगच्या कन्या होत्या.
X X
अण्णाभाऊंच्या आई-वडिलांचा विवाह 1912 च्या सुमारास झाला त्यांना एकूण पाच अपत्य झाली. भागुबाई, तुकाराम म्हणजेच अण्णाभाऊ साठे, शंकर बालपणीच वारला म्हणून चौथ्या मुलाचे नाव शंकर ठेवले आणि पाचवी जाईबाई.
अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम हे होते तुकाराम हा कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र असल्याने कुटुंबातील लोक त्याला आदराने व प्रेमाने अण्णा म्हणून हाक मारत .त्यामुळे त्यांचे मूळ नाव तुकाराम हे मागे पडून अण्णा हेच नाव कायमचे प्रचलित झाले.
अण्णाभाऊंचे बालपण अतिशय गरीबीत गेले त्यांचे वडील श्री भाऊ साठे यांच्या मालकीची फक्त वीस गुंठे जमीन होती. निकषपणामुळे आणि दुष्काळामुळे त्या जमिनीतून येणारे पीक साठे कुटुंबीयांना वर्षातील दोनेक महिनेच पुरत असे.
फकीरा हे अण्णाभाऊंचे मामा होते त्यांनी ब्रिटिशाविरूद्ध बंड केले होते. 1925 मध्ये गुन्हेगार जमातीच्या वसाहतींचा कायदा पास झाला व तो अण्णाभाऊंच्या समाजावर लादण्यात आला. फकीरा यांच्या बंडात साठे कुटुंबीय सुद्धा सहभागी असल्याने त्यांच्या मागे ही ब्रिटिश सरकारचा ससे मेरा होताच.
त्यामुळे कुठेही एकदा चोरी किंवा खून झाला तरी साठे यांच्या घराची झडती घेतली जाईल त्यामुळे कधी कधी सगळ्या कुटुंबांना उपाशी राहावं लागत असे.
अशा जीवनाचा उब आल्याने अण्णांचे वडील हे आपल्या कुटुंबीयांना वाटेगाव येथे ठेवून एकटे मुंबईला नोकरीसाठी गेले त्या ठिकाणी त्यांनी बगीचा काम, झाडांना पाणी घालणे, माळी काम म्हणून करत होते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होऊ लागली.
माळी काम करत असताना मुंबईतील उच्चवर्गीय उच्चशिक्षित समाजाचे जीवन त्यांनी जवळून अनुभवले त्यामुळे आपल्याही मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे व आपले जीवन समृद्ध जगावे असे त्यांना वाटत होते.
त्यासाठी ते गावाकडे पाच ते दहा रुपये मनी ऑर्डर करून पाठवीत व तुकाराम यास गावच्या शाळेत घालावे असे पत्नीलाही ते पत्राद्वारे कळवत होते.
X X
अण्णाभाऊंचे शिक्षण व बालपण
अण्णाभाऊ दीड दिवसाच्या प्राथमिक शाळेत त्यांची सुरुवात 1930 मध्ये झाली पण अण्णाभाऊ चे शिक्षण कुठपर्यंत झाले याबद्दल मतभेद आहेत .
काही जणांच्या मते ते दुसरीपर्यंत शिकले तर काहीजण सातवीपर्यंत शिकले असावेत असा अंदाज लावतात.
1932 ते 36 या कालखंडात अण्णाभाऊंच्या आवडीमध्ये काही भर पडली त्यात लोकगीते, सवणे, पोवाडे पाठ करणे ते आवाजाच्या वरच्या पट्टीत गाणे सहस कथा, शिकार कथा, लोककथा, दंतकथा ,भूतकथा ऐकणे व त्या इतरांना सांगणे त्यामुळे त्यांच्याभोवती समान्य व समवयस्क असे काही मित्र जमा होत असत.
X X
अण्णाभाऊ वर झालेला पहिला संस्कार
अण्णाभाऊ आपल्या एका मावस भावाच्या तमाशा पार्टी बरोबर जत्रात जात असतात.
एकदा रेटरे गावच्या जत्रेत रात्री तमाशाचा खेळ चालू असताना अनपेक्षित पणे तिथे क्रांतिसिंह नाना पाटील आले व त्यांचे भाषणही त्या व्यक्तिमत्व इतकेच प्रेरणादायी होते हे ऐकून आपल्या आयुष्यात प्रथमच इतके ओजस्वी व जोरदार भाषण ऐकले आणि या भाषणाचा परिणाम होऊन अण्णाभाऊंनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. या लढ्यात सहभागी असल्याने ते अधून मधून भूमिगत होत असत.
अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील जीवन व कामगार चळवळीतील सहभाग
साठे कुटुंब मुंबईत आल्यानंतर भायखळा या उपनगरात येऊन चांदबिबी चाळ या चाळीत खालच्या जिन्याखाली एका खोलीमध्ये ते राहत असत.
मुंबईच्या कामगार वस्त्यांमधील संप, बंद, मोर्चे यांचे 14- 15 वर्षे वयाच्या अण्णाभाऊवर काही नकारात्मक तर काही सकारात्मक असे परिणाम होत होते.
मुंबईत आल्यानंतर साठे कुटुंबियाची जीवनाला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. अनेक छोटे-मोठे कामे करून ते आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने भागवत होते.
मुंबईत अण्णाभाऊ साठे यांच्या जडणघडणीमध्ये वैचारिक दृष्ट्या मुंबईतील विविध ठिकाणी राष्ट्रीय, राजकीय,सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर होणाऱ्या चर्चा ऐकण्यात त्यांना गोडी वाटू लागली. त्यामुळे त्यांच्यावर दोन गोष्टी गोष्टींनी त्यांना आकर्षित केले एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि त्या काळचे मुख चित्रपट यात अण्णा वाढत आणि घडत गेले.
एखाद्या विचाराकडे व्यक्तीची सामाजिक आर्थिक व कौटुंबिक पार्श्वभूमी नुसार आकर्षित होते. काही माणसे कार्ल मार्क्सच्या विचारांकडे आकर्षित होतात अण्णाभाऊंच्या बाबतीतही तेच घडले अण्णाभाऊंनी मार्क्सच्या साम्यवादी विचार प्रणालीचे अनुचर व समर्थक बनले. त्यामुळे ते मुंबईतील कम्युनिस्ट विचारसरणीच्या तरुणांमध्ये वेगाने लोकप्रिय झाले.
अण्णाभाऊ :एक कलाकार
अण्णाभाऊंच्या अंगी तमाशासाठी आवश्यक असे गुण असल्याने त्यांनी बापू साठे या आपल्या नात्यातील एका व्यक्तीच्या मालकीच्या तमाशा पार्टीमध्ये काम करायला सुरुवात केली.
अण्णाभाऊ हे त्याच परंपरेचे प्रतिनिधी व पाईक होते त्यांच्या अंगी काही जन्मजात गुण होते एखाद्या भूमिकेचे ताबडतोब अचूक आणि सखोल आकलन त्यांना होत असे.
अण्णाभाऊंनी नंतर तमाशा कलेला लोकनाट्यात रूपांतरित करून नवजीवन दिले. तमाशा कलेला लोकप्रियता आदर परिणामकारकता आणि समृद्धी मिळण्यामध्ये महत्त्वाचे महत्त्वाचे योगदान दिले ते अण्णाभाऊंनीच.
अण्णाभाऊंचे वडील वारल्यानंतर त्यांनी कालगाव तालुका पाटण जिल्हा सातारा येथील कोंडुबाई नावाच्या एका मुलीशी विवाह केला व त्याना 1942 मध्ये एक मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी मधुकर असे ठेवले.
अण्णाभाऊ व भारत छोडो चळवळ
महात्मा गांधींनी ब्रिटिशांना "चले जाव "असा आसा नारा दिला होता त्यामुळे भारतात सर्वत्र लोक स्वातंत्र्य मिळवण्याच्या इच्छेने झपाटलेले होते.
त्यामुळे ब्रिटिशांनी नागरिकांना अटक करणे अमानुष अत्याचार करणे सुरू केले या कालावधीत वाटेगाव भागात अनेक तरुणांनी बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली टेलिफोन्स लाईन्स कापून टाकल्या होत्या. त्यात अण्णाभाऊनीं ही भाग घेतला होता. त्यामुळे अण्णाभाऊवर अटकवारंट ब्रिटिश सरकारने सोडले होते. ते टाळण्यासाठी अण्णाभाऊ डोंगरदर्यात लपून राहिले होते.
त्यानंतर त्यांनी मुंबईला येऊन कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करण्याचा निर्धार केला आणि मग कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करण्यासाठी एक कलापथक सुरू करावं असा विचार अण्णाभाऊ, अमर शेख व द.ना. गव्हाणकर यांच्या मनात आला आणि त्यांनी 1944 मध्ये "लाल बावटा कलापथक" याची स्थापना केली.
अण्णाभाऊ :एक शाहीर
कलापथकाच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने लोकांपुढे हा कलाकार झाला व याच्यातील कलाकार शिस्त ,समाधान आणि प्रसिद्धीही मिळाली.
त्यामुळे त्यांनी लोकनाट्य लिहायला सुरुवात केली एकूण पंधरा लोकनाट्य त्यांनी लिहिली त्यानंतर पोवाडे व नाट्य लेखनही सुरू केले म्हणून ते महाराष्ट्रातील कम्युनिस्ट वर्तुळामध्ये शाहीर आण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाऊ लागले.
पक्ष कार्यासाठी ते 1943 -44 मध्ये पुणे येथे आले व त्यांची भेट जयवंताबाई नावाच्या एका तरुण विवाहित महिलेची ओळख झाली. त्यांना शांता आणि शकुंतला अशा दोन कन्या होत्या. पतीला सोडून त्या काकांकडे पुण्यात राहत होत्या.
पुढे मुंबई येथे 1945 मध्ये जयंताबाई अण्णाभाऊ साठे सोबत आल्या व त्यांनी नोंदणी पद्धतीने अण्णाभाऊंशी विवाह केला.
अण्णाभाऊंच्या आयुष्यातील जयंताबाईच्या प्रवेशाने अंतर्बाह्य बदल घडून आणला ते स्थिर झाले आणि अनुकूलता लाभली आणि याच कालखंडात अण्णाभाऊंनी आपल्या महत्त्वाच्या साहित्यकृती लिहिण्याची थोर कामगिरी पार पाडली.
पण थोड्याच कालावधीमध्ये अण्णा भाऊंना जयवंताबाई सोडून त्यांच्या मुलीकडे राहण्यासाठी गेल्या आणि या घटनेने अण्णाभाऊंना खूप मोठा धक्का बसला त्यामुळे त्यांना त्यांचे मद्यपान प्रमाणाबाहेर वाढले आणि त्यामुळे त्यांचा 18 जुलै 1969 रोजी मृत्यू झाला.
अण्णाभाऊ :कादंबऱ्यांची निर्मिती
अण्णाभाऊंनी एकंदर 30-40 कादंबऱ्या लिहिल्या. असे नोंदीवरून सांगितले जाते.
अण्णाभाऊंच्या कादंबऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केल्या गेले.
1. सहसाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या
1. "वारणेच्या खोऱ्यात"( 1951) ही कादंबरी या कादंबरीला "मंगला" असेही शीर्षक आहे. ही कथा अण्णाभाऊंनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनात हुतात्मे पत्करणारा तरुण स्वातंत्र्यसैनिक हिंदुराव उर्फ राजाराम पांडुरंग पाटील जावळेकर आणि त्याची प्रेयसी मंगला यांच्या शोकांतिकेची कथा सांगितली आहे.
2. "फकीरा" (1959) या कादंबरीला 1961 ला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट कादंबरी चा राज्य साहित्य पुरस्कार मिळाला ती डॉ. बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस यांनी अर्पण केली. फकीरा ही कथा अण्णाभाऊंचे खऱ्या आयुष्यातील मामा श्री फकीरा राणोजी मांग यांची जीवनकथा आहे.
3. "वारणेचा वाघ"या कादंबरीत अण्णाभाऊंनी पिळवणूक करणारे देशी सावकार जमीनदार व परकीय ब्रिटिश राज्यकर्ते यांच्याविरुद्ध लढणाऱ्या नायकाचे चित्रण उभे केले आहे. ही कथा सांगली जिल्ह्यातील उमज खेड्यातल्या दत्तू भोसले याची आहे.
4. "मास्तर" याच कादंबरीला "धुंद" असेही शीर्षक आहे . या कादंबरीत संपूर्ण श्रद्धेने व त्यागी वृत्तीने स्वातंत्र्यलढ्यात उडी घेणाऱ्या देवगावच्या एका बंडखोर शिक्षकाचे जीवन अण्णाभाऊंनी चित्रीत केले आहे.
5. "अग्नीदिव्य"ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापव गुजर यांच्या उदात्त जीवनाचे आणि पराक्रमाचे चित्रण करणारी ऐतिहासिक कादंबरी आहे. शिवाजीराजांचा शत्रु विजापूरचा आदिलशहा यांचा सेनापती बहेलोखान याच्याशी प्रतापरावांनी कशी झुंज देऊन त्याला पराभूत केले आणि या प्रयत्नात ते कसे हौतात्म्य पत्करतात याचे वर्णन व चित्रण अण्णांनी या कादंबरीत केलेले आहे.
X X
2.महिलांच्या समस्यांचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या
अण्णाभाऊंनी महिलांच्या समस्या वरील कादंबऱ्या लिहिल्या त्यात,
1."चित्रा" (1951) ही कादंबरी 1945-46 च्या मुंबईसारख्या शहराच्या औद्योगीकरणाचे दोष व त्यांचे लोकांच्या लैंगिक निमिमत्तेवर होणारे परिणाम दाखवते. औद्योगीकरणाच्या वाढीबरोबर शरीरविक्रयाचा व्यवसायही कसा वाढला आणि अशा कशा प्रकारे हजारो निष्पाप स्त्रियांना दलालांकडून बळी बनवण्यात आले याचे चित्रण ही कादंबरी दर्शवते.
2."वैजयंता"तमाशातील महिला कलावंतांचे कशाप्रकारे लैंगिक, सामाजिक ,आर्थिक आणि भावनिक शोषण केले जाते आणि कशाप्रकारे बऱ्याचशा कलावती या व्यवसायात केवळ नाईलाजामुळे येतात याचे चित्रण या कादंबरीत करण्यात आलेले आहे.
3." चंदन"या कादंबरीत अण्णांनी मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या कामकरी स्त्रीचे सहास चित्रीत केले आहे .आपला पती मृत्यू पावल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यासाठी टपलेल्या दृष्ट प्रवृत्तीच्या लोकाविरुद्ध तिने आपले शिलरक्षण करण्यासाठी जो लढा दिला त्यात या स्त्रीचे वर्णन केले आहे.
4."चिखलातील कमळ" या कादंबरीत महाराष्ट्रातील पाली ,जेजुरी आणि कर्नाटकातील सौंदत्ती या गावांमध्ये मुली खंडोबा या दैवताला अर्पण करण्याच्या धार्मिक प्रथेचे दुष्परिणाम आणि अन्याय यांचे चित्रण अण्णाभाऊंनी या कादंबरीत केले आहे. मुली खंडोबाला संतुष्ट करण्यासाठी त्याला वाहिल्या जातात आणि त्यांचे खंडोबाशी लग्न झाले असे समजले जाते. अशा मुलींना मुरळी म्हणून ओळखले जाते.
5."फुलपाखरू" ही कादंबरी सुधारगृहातील मुलांची आणि त्यांच्या गुन्हेगारी जीवनाची कथा आहे. दिलीप आणि ग्यान ही सुधारगृहातील दोन मुले रोहिणी या एका गावाकडील मुलीला सोनेरी भविष्याचे, नोकरीचे आमिश दाखवून फसवून मुंबईला आणतात. पण मुंबईला आल्यावर मात्र तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी कथा आहे.
6."टिळा लावते मी रक्ताचा"( हीच कादंबरी "आवडी" या शीर्षकाने ही प्रकाशित झाली.) ही कादंबरी जातीभेद मानणाऱ्या पूर्वीच्या महाराष्ट्रात धनाजी रामोशी या आपल्यापेक्षा हलक्या जातीच्या तरुणा बरोबर राहण्याचे धाडस करणाऱ्या आवडी चौगुले या वरच्या जातीतील मुलीची ही कथा आहे.
7. "रत्ना"देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पत्नीचे जीवन कसे असुरक्षित असते याचे वर्णन या कादंबरीत केले आहे.
X X
3.प्रेमाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या
अण्णांनी काही प्रेम कथा व प्रेमाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या त्यात "अलगुज" (1962) ,"रानगंगा"," अहंकार ","आग ","रूपा ","आघात"," गुलाम ","मयुरा" आणि "मूर्ती" इत्यादी कादंबऱ्या अण्णांनी लिहिल्या.
1."अलगुज" ही कादंबरी रंगू आणि तिचा प्रियकर बापू खरवटे यांच्या प्रेमाची कहाणी आहे . रंगूला बापूचे अलगूज वाजवण्यातले कौशल्य खूप आवडते. त्यामुळे ती तिच्या प्रेमात पडते. अण्णाभाऊ म्हणतात "ज्यांचा शेवट गोड ते सारेच गोड" असे सुचवणाऱ्या भाऊंच्या सुखांत कादंबऱ्यापैकी ही पहिली कादंबरी.
2."रानगंगा" ही कादंबरी कान्हेरी व करंगळी या दोन गावांमधून वाहणाऱ्या रानगंगा या नदीवरून नाव देण्यात आले. या कादंबरीची नायिका आणि नायक हे एकमेकांशी वैर असलेल्या दोन व्यक्तींची मुले असतात. त्यांच्या प्रेमामुळे वैर कुटुंबाचा पुन्हा समेट कसा होतो यात दाखवला आहे.
3."संघर्ष" ही कादंबरी सुलभा आणि तिचा प्रियकर आनंद यांच्यामधील दुर्दैवी प्रेमाची कथा आहे.
4."अहंकार" ही कादंबरी अवाजवी अहंकार एखाद्या स्त्रीचे आयुष्य कसे नष्ट करू शकतो हे दाखविलेले आहे. या कादंबरीची नायिका अवंतिका ही अहंकाराची बळी ठरते.
5."रूपा" या कादंबरीत एखाद्या चित्रपटात असतो तसा नेहमीचा त्रिकोण आहे रूपा (नायीका) दिनकर (नायक) आणि गजा नांगर (खलनायक) यांच्याशिवाय माथीबाई एक व्यक्तिरेखा आहे ती बाजू बदलणारी आहे. असे दर्शविलेले आहे.
6."आग" ही कादंबरी म्हणजे अनंत चव्हाण हा भावनाशील व प्रसिद्ध लेखक एका तरुणीच्या प्रेमात पडल्यामुळे कसा उध्वस्त होतो. यांची ही अधुरी प्रेमाची कहाणी वर्णन केली आहे.
7."आघात" ही कादंबरी फ्लॅशबॅक तंत्राने लिहिलेली आहे. श्याम आणि रोझी यांच्या प्रेमाची ही कथा त्यांच्या नोंदणी विवाहापाशी संपते.
8."गुलाम" ही कादंबरी एका जमीनदाराच्या पदरी असलेल्या वासू या वेठबिगारी करणाऱ्या मजुराबद्दल आहे. त्या जमीनदाराच्या मुलीला वाटत असलेल्या प्रेमामुळे त्या मजुराची गुलामगिरी कशी संपते याचे वर्णन केले आहे.
9."मयुरा" ही आणखी एक कादंबरी साधी सरळ आणि साचेबंद प्रेम कथा आहे. एक गरीब तरुण आणि श्रीमंत घरची मुलगी यांची भेट होऊन त्यांचे प्रेमात रूपांतर होऊन ते दोघे लग्न करतात अशी ही कथा आहे.
10."मूर्ती" या कादंबरीत तरुणांनी जातिभेदाच्या भिंती नष्ट कराव्यात व आंतरजातीय विवाह करावेत या मतांचे समर्थन अण्णाभाऊंनी या कादंबरीत केले आहे.
X X
4. ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या
अण्णाभाऊंनी लिहिलेल्या एकूण कादंबऱ्यापैकी ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कादंबऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण जीवनाचे विविध पैलू अतिशय समर्थ, प्रामाणित चित्रण या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य आहे.
यात "माकडीचा माळ" " वैर " (1964)," डोळे मोडीत राधा चाले" " रानबोका" " कुरूप" ," पाझर "आणि "केवड्याचे कणीस" ह्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आहेत.
1."माकडीचा माळ" ही कादंबरी अण्णाभाऊंची सर्वोत्तम कादंबरी पैकी एक आहे . टेकडीवर किंवा माळावर सुगीच्या दिवसात खेड्यामध्ये पाले उभारून त्यांच्यामध्ये राहणाऱ्या भटक्या जाती-जमातींचे अत्यंत प्रामाणिक, समर्थ आणि जिवंत चित्रण या कादंबरीत करण्यात आलेले आहे.
2."वैर "ही कादंबरी एकंदर भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जमीनदारी पद्धत सामान्य माणसांची पिळवणूक आणि जमीनदारांची जुलुमजबरदस्ती यांच्या बद्दल आहे.
"डोळे मोडीत राधा चाले" ही कादंबरी महाराष्ट्रातील संत एकनाथ यांच्या 'वारीयाने कुंडल हाले l डोळे मोडीत राधा चाले ' या प्रसिद्ध गवळणीच्या ध्रुवपदातून घेण्यात आले आहे. स्त्रीच्या वागणुकीतील मनमोकळेपणाचा ग्रामीण भागातील खल प्रवृत्तीच्या लोकांकडून कसा विपरीत अर्थ लावला जातो आणि त्यामुळे अनेकांच्या जीवनात दुःखद घटना कशा घडतात याचे चित्रण या कादंबरीत करण्यात आले आहे.
X X
3."रानबोका" या कादंबरीतील सुरळ गावातील काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा कोंबड्या, कोंबडे व त्यांच्यासारखेच निष्पाप पक्षी- प्राणी मारणाऱ्या रानबोक्यासारख्या स्वभावाच्या असतात. ज्या रानबोक्यांचा उपद्रव काही लोकांना होतो ते लोक कधी कधी अशा रानबोक्यांना घृणास्पद गुन्ह्यासाठी मारून टाकतात अशी कथा आहे.
4."कुरूप" कादंबरीत महाराष्ट्रातील दोन पाटील परिवारामधील नेहमीच दिसणाऱ्या स्पर्धेची पारंपारिक व साचेबंद कथा आहे. यातील एक व्यक्तिरेखा चांगल्याचे प्रतिनिधित्व करते तर दुसरी व्यक्तीरेखा वाईटाचे प्रतिनिधित्व करते. (या ठिकाणी या कथेचे शीर्षक "चिघळलेली जखम" असाही अण्णाभाऊंनी सांगितला आहे.)
5."पाझर "या कादंबरीत अण्णाभाऊंनी आकुबा आणि तुकोबा या गावगुंडांच्या गुंडगिरीमुळे पारगाव नावाच्या खेड्यातील मायेचा पाझर कसा आटतो .या गुंडांचा शेवटी पराभव कसा होतो आणि गावातील मायेचा पाझर पुन्हा कसा वाहू लागतो याचे चित्रण करण्यात आलेले आहे.
6." केवड्याचे कणीस" ही कादंबरी गुंड्या नावाचा एक पहिलवान आणि त्याचे साथीदार यांच्या मूर्खपणाची एक सामान्य कथा आहे.
7."तारा" या कादंबरीत अण्णाभाऊंनी एखाद्या स्त्रीचा काही खलपुरुषाकडून पाठलाग होत असतो आणि तिचे प्रेम दुसऱ्याच कुणापुरुषावर असते. शेवटी त्या खलपुरुषांना या ना त्या प्रकारे मार्गातून हटवून नायीका आपल्या प्रियकरांशी लग्न करते अशी कथा आहे. तारा ही नायीका डाकू अनिल पाटील याच्यासाठी हेर, मदतनीस आणि खबरी म्हणून काम करत असते.
क्रमशः......
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/2.html
👆
अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
स्मृतिदिन: 18 जुलै
लघुकथा (भाग 2 )
View, Comment and share.
X X
7 Comments
Nice
ReplyDeleteछान लेख
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice sirji
ReplyDeleteछान माहिती
ReplyDelete