Mohandas Karamchand Gandhi: Indian lawyer, Anti-colonial Nationalist and Political ethicist
राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी
2 ऑक्टोबर :जयंती
2 ऑक्टोबर :जयंती
30 जानेवारी : पुण्यतिथी
बालपण आणि शिक्षण:
2 ऑक्टोबर 1869 राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.
पोरबंदर हे त्यांचे जन्मगाव. दिवाण म्हणून त्यांच्या पूर्वजांनी काठियावाड संस्थानच्या पदरी काम केले.
पारंपरिक समाजजीवनात विकसित झालेल्या त्यांच्या कुटुंबात धार्मिक प्रतनीचा सुंगध होता.
घरचे वातावरण हे तसे धार्मिक त्यातल्या त्यात मोहनदासची आई तर अधिक धार्मिक होती. ही माऊली पराकोटीची धार्मिक असल्याने मोहनदासवर आईचे संस्कार पडल्याशिवाय राहिले नाहीत. त्यांच्या मनावर अगदी बाल्यवस्थेपासूनच वैष्णव पंथाचे संस्कार झाले होते.
मोहनदासचे कुटुंब हे जरी वैष्णव पंथीय होते तरी इतर धार्मीयांना त्यांच्या घरात प्रवेश नव्हता असे मात्र नाही.
सर्व धर्मीयांना त्यांच्या कुटुंबात आदराचे स्थान असल्याने समाजजीवनावर या कुटुंबाचा एक वेगळा प्रभाव पडलेला होता.
सर्व धर्माबद्दलच्या सहिष्णुतेचे बाळकडू त्यांना पोरवयातच मिळाले होते. म्हणून ते इतर धर्मीयांबद्दल आदर बाळगून असायचे.
मोहनदास हे तसे जेमतेम बुद्धिमत्तेचे विद्यार्थी होते.
शालेय जीवनात त्यांच्याकडे कुणीही एक हुशार विद्यार्थी म्हणून बघितले नाही.
सगळे बालपण पोरबंदरात गेलेल्या मोहनदासांची शारीरिक प्रकृत्तीसुद्धा तशी किरकोळच होती.
प्रकृत्तीने नाजूक असणाऱ्या मोहनदासचा स्वभावही तसा कचखाऊच होता. मुळात खेळणे फारसे जमले नाही म्हणून त्यांना सवंगडीसुद्धा फारसे लाभले नाहीत.
शाळा सुटल्यावर ते सरळ घरी येत. घरात जास्तीत जास्त रमणाऱ्या मोहनदासांचा स्वभाव एकलकोंडा बनला होता.
शालेय शिक्षण जेमतेम प्रगती असणाऱ्या मोहनदासाला त्यांच्या बंधूंनी पुढील शिक्षणासाठी परदेशी म्हणजे विलायतेत पाठविले.
परदेशात गेल्यावर त्यांची ओळख दोन थिऑसॉफिस्ट विद्यार्थ्याबरोबर झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. या दोन्ही मित्रांच्या सहवासात त्यांचा वेळ जायचा या वेळेचा फायदा त्यांना झाल्याशिवाय राहिला नाही. कारण या दोन सहकारी मित्रांच सहवास त्यांच्या जीवनाला नवी दिशा दाखविण्यास कारणीभूत झाला.
या मित्रांच्या आग्रहाखातर मोहनदास गीताध्ययनास प्रवृत्त झाले. "कोठल्याशा शाळेत मला घातले होते. कसेबसे काही पाढे शिकलो.
दुसरे काही एक आठवत नाही. त्यावरून मी अनुमान करतो की माझी बुद्धी मंद असावी आणि स्मरणशक्ती कच्या पापडासारखी असावी" असे म्हणणाऱ्या मोहनदासांवर गोतेचा प्रभावी ठसा उमटला.
गीतेच्या दुसऱ्या अध्ययातील ज्या श्लोकांचा त्यांच्या मनावर उसा उमटला होता त्या श्लोकांचा मतितार्थ असा "विषयांचे चिंतन करणाऱ्याला प्रथम त्यांच्याबद्दल संग उत्पन्न होतो, संगापासून कामना उत्पन्न होते, कामनेच्या पाठोपाठ कोच घेतो, क्रोधातून संमोह, संमोहातून स्मृतिभ्रम आणि स्मृतिभ्रमातून बुद्धिनाश होतो आणि अखेरीस त्या पुरुषाचा स्वत:चा नाश होऊन जातो." त्यांच्या याच मित्रांनी बुद्धचरित्राशीही मोहनदास गांधींचा परिचय करून दिला.
मुळातच भिडस्त स्वभाव असणाऱ्या मोहनदास गांधींना विलायतेत वेगवेगळ्या धर्माचे मित्र मिळाल्याने त्यांच्या समतोल विचारात वृद्धी होत गेली.
एका ख्रिश्चन मित्राशी दोस्ती वाढणे नि त्याने मोहनदास गांधींना बायबल वाचावयास सांगणे हा तसा योगायोगच घडून आला.
या मित्रामुळेच त्यांना बायबलच्या अंतरंगात प्रवेश करता आला.
येशूच्या गिरीप्रवचनांची त्यांच्यावर कमालीची छाप पडली. गीता आणि बायबल हे दोन्ही धर्म त्यांना जीवाभावाचे वाटू लागले. या दोन्ही ग्रंथांची त्यांनी परस्परांशी तुलना केली.
दोन्हींचा भर मानवतावादावर असल्याने मोहनदास गांधींच्या भावी जीवनात वा ग्रंथांच्या शिकवणीचा खूपच फायदा झाला. हा फायदा त्यांना सत्याग्रहाच्या चळवळीसाठी झाला होता.
एकिकडे वैचारिक जडणघडण होत असतानाच दुसरीकडे त्यांनी आपले शिक्षण बंद पडू न देता ते चालूच ठेवले असल्याने थोड्याच दिवसांत ते कायद्याचे पदवीधर झाले.
कायद्याची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी आपली वकिली सुरू केली.
काठियावाडला वकिली करीत असताना ते तेथे रमले नाहीत. मनाला काहीतरी वेगळ हव होत.
उदासी केव्हा जाईल या विचारात असतानाच त्यांना पोरबंदरच्या एका मेमण पेढीतर्फे दक्षिण आफ्रिकेत दावा चालविण्याची संधी चालून आली.
परदेशात जाण्याची ही दुसरी संधी होती. पहिल्यांदा गेले हे शिक्षणासाठी आणि आता जायचे होते ते व्यवसायाचे निमित्त म्हणून. मोहनदास गांधींनी ही संची सोडली नाही. ते आफ्रिकेत चालते झाले.
परदेशात गेल्यानंतर त्यांनी आपल्या वाचण्याच्या कक्षा व्यापक केल्या होत्या. काम आणि वाचन दोन्ही चालू होते.
X X
विचारवंतांचा प्रभाव:
टॉलस्टॉय, रस्किन आणि थोरो यांच्या विचारांचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा बसला.
एकंदरीत त्यांच्या जीवनावर, कार्यावर आणि तत्त्वज्ञानावर या तिन्ही विचारवंतांच्या विचारांचा खोल उस उमटला आणि पुढे तो कायमस्वरूपी टिकून राहिला.
मोहनदास गांधीवर 'अन टू घिस वाट या रस्किनच्या पुस्तकातील विचारांचा जबरदस्त प्रभाव पडला होता. ते या पुस्तकामुळे एवढे भारावून गेले की, त्यांनी 'सर्वोदय' या नावाने त्याचे गुजरातीत भाषांतर केले. ते भागात सर्वोदयाचे जे सिद्धांत मी समजलो असे ,
1) सर्वाच्या कल्याणात आपले कल्याण आहे.
2) वकील काय किंवा न्हावी काय, दोघांच्याही कामाची किंमत सारखीच असली पाहिजे. कारण पोटापाण्याचा हक्क दोघांनाही सारखाच आहे.
3) साधे, अंगमेहनतीचे, शेतकऱ्यांचे जीवन हेच खरे जीवन होय.
रस्किनच्या विचारांशी मोहनदास गांधी यांचे जरी आध्यात्मिक पातळीवरचे संबंध जोडले गेले असले तरी राजकीयदृष्टया या दोघांच्या विचारात खूपच तफावत होती.
लोकशाहीपेक्षा सुज्ञांच्या शासनाची तरफदारी करणारा रस्किन, मोहनदास गांधीला परवडत नव्हता. त्यांना रस्किनचे हे विचार पटणे शक्य नव्हते.
राज्याचे स्वरूप आणि कार्ये याबाबतीतसुद्धा त्या दोघात कमालीचे मतभेद होते.
राजकीय क्षेत्रात थोरोच्या विचारांचा मोहनदास गांधींवर प्रभाव पडला होता.
त्यांच्या असहकारविषयक मतांना थोरोच्या विचाराची पुष्टी मिळाली.
थोरोच्या विचारांचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला होता हे त्यांनी स्पष्टपणे कथन केले आहे. ते म्हणतात, "दक्षिण अफ्रिकेत मी जे कार्य आरंभिले होते त्याला थोरोलिखित 'ड्युटी ऑफ सिविल डिसओबिडियन्स या निबंधामुळे शास्त्रीय दृढता प्राप्त झाली आहे."
टॉलस्टॉय, रस्किन आणि थोरो या महान विचारवंतांचा मोहनदास गांधीवर जबरदस्त प्रभाव पडला असला तरी राजकीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात थोरो रस्किन या दोघांच्यापेक्षा टॉलस्टॉय यांचाच त्यांच्यावर अधिक परिणामकारक प्रभाव पडलेला दिसून येतो.
कारण आपल्या आयुष्यातील बऱ्याच घटनाप्रसंगाचे श्रेय ते टॉलस्टॉय यांना देतात. स्वतःला त्यांनी टॉलस्टॉयचा निस्सीम उपासक म्हणवून घेतले आहे.
टॉलस्टॉयच्या 'किंग्डम ऑफ गॉड' या ग्रंथामधील 'ईश्वराचे साम्राज्य तुमच्यात आहे' या संदेशामुळे मोहनदास गांधी अक्षरश: भारावून गेले होते.
त्यांच्या संदेहवादाला कायमची मूठमाती मिळाली. ते अहिंसेचे पुजारी बनले गेले.
“आपल्या लेखनाची जी नायिका आहे व जी नितांत सुंदर असून आपले जिच्यावर प्रेम आहे तिचे नाव 'सत्य' हे आहे" असे टॉलस्टॉयचे म्हणणे होते.
त्यांच्या विचाराने मोहनदास गांधी अक्षरश: भारावून गेले होते. म्हणूनच त्यानी आपल्या तत्त्वज्ञानात टॉलस्टॉय यांचाच 'दार्शनिक अराज्यवाद' (फिलॉसॉफी अनाकींझम) उतरविला आहे.
टॉलस्टॉय आणि म. गांधी यांनी पाश्चिमात्य व युरोपीय संस्कृतीच्या सभ्यतेवर सारख्याच पातव्यैक्कन टीका केली आहे.
म. गांधी हे टॉलस्टॉयच्या विचारांचे उपासकच बनले होते.
टॉलस्टॉयच्या विचारांचा त्यानी असा अर्थ काढला की, विश्वप्रेम हे माणसाला कोठवर घेऊन जाऊ शकेल. याची कल्पनाही करवत नाही. म्हणूनच त्यांनी 'टॉलस्टॉय फार्म' ची स्थापना करून त्यां विचारांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
प्रतिकाराचे मार्ग व तत्त्वज्ञान या प्रयोगांची ती प्रयोगशाळा व्हावी अशी म. गांधींची मनापासूनची इच्छा होती.
ट्रान्सवालम म. गांधींचे कार्य कमालीचे मौलिक स्वरूपाचे होते. त्या कार्याची दखल टॉलस्टॉय घेतली होती.
“गांधींचे हे येथील कार्य अत्यंत महत्त्वाचे व मौलिक स्वरूपाचे असून संपूर्ण जगालाच ते उपकारक ठरेल असे त्यांनी महात्मा गांधींना पत्राद्वारे कळविले होते बाह्यतः असे जाणवते की महात्मा गांधी हे पक्के टॉलस्टॉयवादी होते परंतु वस्तुस्थिती वेगळी होती ते कधीच पूर्णपणे टॉलस्टॉयवादी बनले नाहीत.
टॉलस्टॉयच्या विचारांचा त्यांच्या मनावर गरीब जबरदस्त प्रभाव पडला आणि त्यांनी त्या दिशेने कार्य सुरू केले असे तरी महात्मा गांधी हे महात्मा गांधी होते.
पूर्णपणे कोणाच्याही विचारांचे शतशः अनुकरण करणारे नव्हते, म्हणजे म गांधी हे पूर्णत: टॉलस्टॉयला माणनारे होते असे नव्हे. त्यांच्या विचारांचा प्रभाव माधवर होता ही वस्तुस्थिती असली तर त्याची सत्याग्रह कल्पना टॉलस्टॉय यांच्या सविनय कापेक्षा निराळी आहे.
किंबहुना ती तशी आहे. म्हणून सविनय प्रतिकार ऐवजी 'सत्याग्रह' अशी नवी संज्ञा गांधीनी अमलात आणली.
सत्याग्रहाचे प्रयोग: दक्षिण आफ्रिका
सत्याग्रहाचा हा मार्ग म. गांधींना दक्षिण आफ्रिकेत गवसला. येथे बरेचसे भारतीय स्टोक होते. त्यांच्यावर अनेक प्रकारचे अन्याय होत होते. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी म. गांधीनी सत्याग्रहाचे प्रयोग सुरू केले.
केवळ एका वर्षासाठी गेलेले म. गांधी पुढे तब्बल बीस वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिले.
येथे त्यांनी गोऱ्या सरकारविरुद्ध अहिंसात्मक लढा सुरू केला 'आत्मा' हे त्यांचे शस्त्र होते.
या शस्त्राने त्यांनी जुलमाशी टक्कर दिली. विशेष म्हणजे यात ते यशस्वीसुद्धा झाले. ही त्यांची यशस्विता पुढे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी उपयोगाला आली.
वीस वर्षे आफ्रिकेत राहून त्यांनी रंजल्या-गांजल्यावर होणाऱ्या जुलमाचा प्रतिकार केला नि त्यात काही अंशी यश पदरात पाडून घेऊन ते भारतात परत आले.
X X
भारताच्या राजकारणात सत्याग्रहाचे प्रयोग:
भारताच्या राजकारणात जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा पहिले महायुद्ध समाप्तीच्या काड्रावर येऊन पोहोचले होते. त्या वेळी स्वातंत्र्याच्या चळवळीची अवस्था द्विधावस्थेत होती.
मवाळ आणि नेमस्त असे दोन गट पडले होते. या दोन्ही गटातील संबंध दुरावले होते. तथापि, म. गांधीबद्दल मात्र या दोन्ही गटांना सारखाच आदर होता ही विशेष लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
म. गांधीना गोखले गुरुस्थानी होते. अर्थात, हे जरी सत्य असले तरी त्यांच्या विचारांची बैठक, राजकीयदृष्ट्या आणि साधनशुचितेचा आग्रह आणि राजकारणाचे अध्यात्मीकरण इत्यादी संकल्पना त्यांनी गोखल्यांपासून उचलल्या असल्या तरी असहकारादी त्यांचे मार्ग मात्र गोखल्यांपेक्षा टिळकांशीच साधर्म्य स्पष्ट करतात असे जाणवते.
पाश्चात्य सभ्यतेच्या बाबतीत गोखले आणि गांधी यांच्या विचारात खूपच मोठी तफावत होती.
गोखले - टिळक यांची स्वातंत्र्यविषयक चळवळीच्या विचारसरणीत तफावत होती म्हणून त्यांच्या विचाराने ठळक स्वरूपाचे दोन प्रकारचे मार्ग दिसत होते.
म. गांधी यांनी तिसराच मार्ग निर्माण केला. हा मार्ग एवढा अभिजात होता की, पुढे गोखले- टिळकांच्या नंतर तो सर्वमान्य झाल्य सनदशीर व शांततामय आणि बेसनदशीर व हिंसक या संकल्पनांची जागा म. गांधींच्या अहिंसक युद्ध वा शतितामय क्रांती या संकल्पनांनी घेतली. हे शब्द यापूर्वी कोणाच्याही कानावरून गेलेले नव्हते.
म. गांधींनी मात्र प्रथमच जी सनदशीर असेल वा नसेलही; पण शांततापूर्ण असेलच अशी कमालीची अभिनव चळवळ लोकांसमोर अदा केली.
टिळकांचा अस्त आणि महात्मा गांधींचा राजकिय उदय हा एक योगायोग आहे.
रौलेट कायदा आणि जालियनवाला जालियनवाला बाग या या प्रकरणावरून म. गांधीनी ब्रिटिश सरकारविरुद असहकार अहिंसात्मक पातळीवरचा होता.
या अहिंसात्मक आंदोलनाने देशात नव चैतन्याची जबरदस्त लाट उसळली होती. चौरा-चौरी येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने गांधीनी असहकार मागे घेतला.
कारण केवळ सत्य-अहिंसा या नैतिकतेच्या बळावरच त्यांना आपली चळवळ चालवायची होती. परंतु थोडेसे आलेले हे अपयश त्याच्या विचारांना कलाटणी देणारे ठरले.
त्यांनी संयमाने नि सूत्रबद्ध पद्धतीने चळवळ उभी केली नि त्यात पुढे त्यांना यश ही येत गेले. त्यांनी रचनात्मक कार्यावर लक्ष केंद्रित करून खादी ग्रामोद्योगास प्रोत्साहन दिले.
'यंग इंडिया' नावाचे एक मासिक काढून त्याद्वारे त्यांन वेगवेगळ्या विषयांवर प्रचंड लिखाण केले.
यानंतर म. गांधीनी 'हरिजन' नावाचे बहुभाषिय नियतकालिक ही सुरू केले होते. तर काँग्रेस मध्ये त्यांनी पूर्ण स्वराज्याचे ध्येय जहीर करून जनतेस प्रचंड प्रमाणात दिलासा दिला.
1921 नंतर पुन्हा एकदा 1930 मध्ये त्यांनी अहिंसात्मक आंदोलन सुरू केले.
त्यानी सर्व भारतीयांना सविनय कायदेभंगाचा आदेश दिला. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली.
तथापि, कायदेभंगाचे अहिंसात्मक आंदोलन मागे हटले नाही.
लंडनच्या गोलमेज परिषदेसही ते उपस्थित राहिले. येथे जातीय समस्येवर तोडगा निघू न शकल्याने त्यांनी पुन्हा सत्याग्रह सुरू केला.
हा सत्याग्रह 1934चालला होता. म. गांधी त्यावेळेस भारताचे एकमेव नेते होते. एवढ्या प्रचंड मोठ्या देशातील विराट चळवळींचे ते एकमेव नेते असणे हा जगाच्या इतिहासातील पहिला प्रसंग होता.
दुसऱ्या महायुद्धात भारताला सामील केले गेले म्हणून काँग्रेसी मंडळांनी राजीनामे दिले आणि म. गांधीच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह उभा केला.
पुढे 1942 च्या प्रेरणाने 'चले जाव' ची चळवळ सुरू झाली म्हणून त्याना अटक झाली.
मग त्यांनी 21 दिवस कारागृहातच उपोषण केले.
पुढे त्यांना 1944 साली सोडण्यात आले. जेव्हा सोडण्यात आले तेव्हा बॅ. जीनांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या मागणीने मूळ धरले होते.
जीनांचा 'द्विराष्ट सिद्धांत' म. गांधींना मान्य नव्हता. देशाच्या फाळणीला त्यांचा कसून विरोध होता.
अस्पृश्योद्वाराइतकेच हिंदू-मुस्लिम ऐक्यसुद्धा त्याना कमालीचे प्रिय होते. जीनाना त्यांनी सर्वतोपरीने समजावून पाहिले; परंतु पालथ्या घागरीवर पाणी पडले.
माऊंटबॅटन योजनेनुसार भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हे नवे राष्ट्र इ.स. 1947 साली ब्रिटिश सत्तेचा अस्त होऊन दोन्ही देश स्वतंत्र झाले देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्यांना आनंद झाला होता नाही असे नाही; परंतु त्याचबरोबर त्यांच्या मनाविरुद्ध हिंदुस्थान दुभंगला होता याचे त्यांना अतिव दु:ख झाले होते.
देशाच्या स्वातंत्र्याच्या जल्लोषात सहभागी न होता ते फाळणीमुळे भडकलेल्या ज्वालामध्ये होरपळून निषेणाऱ्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी नोखालीत जाऊन पोहोचले होते.
XX
मृत्यु:
हिंदुस्थानच्या फाळणीला विरोध होता म्हणून 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेच्या माध्यमातून म.गांधींना जीवनातून उठविण्यात आले. त्यांना मारून त्यांची शिकवण मारता येईल अशी स्वप्न पाहणाऱ्यांची निराशा झाली. कारण त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा विचार दुप्पट जोमाने उसळी मारून वर आला. मृत्युने त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले.
महात्मा गांधी यांचा जन्मदिन आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/january-30-day-of-special-dinvishesh.html
👆
January 30 - Day of Special (Dinvishesh)
जानेवारी 30: दिनविशेष
View, comments and Share .



5 Comments
👍
ReplyDeleteसविनय अवज्ञा ही संकल्पना कुठून आली त्याचबरोबर, सत्याग्रह आणि टॉलस्टॉयचा सविनय प्रतिकार याबाबींचा साधा उल्लेख सहज कुठेचं दिसणार नाही..तो या ब्लॉगमध्ये पहायला मिळतो.... उत्कृष्ट मांडणी
ReplyDeleteNice
ReplyDelete👍
ReplyDelete👍
ReplyDelete