September 24 - Day of Special (Dinvishesh)
सप्टेंबर 24 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
24 सप्टेंबर 1534 रोजी शिखांचे 4 थे गुरू राम दास यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 सप्टेंबर 1581 मध्ये झाला.
24 सप्टेंबर 1551 रोजी प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 जानेवारी 1616 रोजी झाला.
24 सप्टेंबर 1664 रोजी नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.
24 सप्टेंबर 1856 रोजी साली प्रख्यात भारतीय हिंदी निबंध लेखक व नाटककार प्रताप नारायण मिश्र यांचा जन्म झाला.
X X
24 सप्टेंबर 1861 रोजी भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म झाला. या परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. 1907 मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. त्यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1936 रोजी झाला.
24 सप्टेंबर 1870 रोजी नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 मे 1960 रोजी झाला.
24 सप्टेंबर 1873 रोजी धर्मभेदमुलक , विद्वेष , जातीभेदमूलक, उच्च-नीच भाव, स्त्रीदास्य , हिंदू धर्म संस्थेतील मूर्तीपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी" सत्यशोधक समाजाची" स्थापना पुण्यात केली.
24 सप्टेंबर 1889 रोजी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म झाला. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. त्यांचा मृत्यू 13 सप्टेंबर 1971 मुंबई येथे झाला.
X X
24 सप्टेंबर 1896 रोजी स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन झाले.त्यांचा जन्म 18 जुलै 1818 रोजी झाला होता.
24 सप्टेंबर 1915 रोजी चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म झाला. ’भारतवर्ष’, ’भगवानतिलक’, ’मृच्छकटिक’, ’वळवाचा पाऊस’, ’शारदा’ इ. अनेक नाटकांमधे त्यांनी भूमिका केल्या.
24 सप्टेंबर 1921 रोजी लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म झाला. त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ’गत शतक शोधताना’ आणि ’तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. धनंजय कीर यांच्या साहाय्याने त्यांनी ’महात्मा फुले समग्र वाङ्मय’ संपादित केले आहे. त्यांचा मृत्यू 7 जून 1992 मध्ये झाला.
24 सप्टेंबर 1922 रोजी संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे यांचा जन्म झाला.ते ‘सोबत’ साप्ताहिकाचे संस्थापक होते.त्यांचा मृत्यू 30 मार्च 1989 रोजी झाला.
X X
24 सप्टेंबर 1924 रोजी अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 मार्च 2004 रोजी झाला.
24 सप्टेंबर 1925 रोजी भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 डिसेंबर 2004 रोजी झाला.
24 सप्टेंबर 1932 रोजी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.
24 सप्टेंबर 1939 रोजी युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1867 रोजी झाला होता.
24 सप्टेंबर 1940 रोजी इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा याचा जन्म झाला. यांचा मृत्यू 23 ऑगस्ट 1994 रोजी झाला.
X X
24 सप्टेंबर 1946 रोजी हाँगकाँग येथे ’कॅथे पॅसिफिक एअरवेज’ची स्थापना झाली.
24 सप्टेंबर 1948 रोजी होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना झाली.
24 सप्टेंबर 1960 रोजी अणूशक्तीवर चालणार्या ’यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
24 सप्टेंबर 1963 रोजी साली भारतीय दूरदर्शन समालोचक आणि पत्रकार तसचं, गो न्यूज चॅनेलचे संस्थापक आणि मुख्य संस्थापक पंकज पचौरी यांचा जन्म झाला.
24 सप्टेंबर 1969 रोजी त्यावेळचे शिक्षणमंत्री डॉ. व्ही. के. आर. की. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरु केल्याची घोषणा केली. महात्मा गांधी विचारांना राबविण्यासाठी, पंडीत जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना राज्य सरकारच्या सहकार्याने सुरु करण्यात आली.
24 सप्टेंबर 1973 रोजी गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
24 सप्टेंबर 1975 रोजी साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बहुभाषिक लेखक, व चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अलूरी चक्रपाणी यांचे निधन झाले.
X X
24 सप्टेंबर 1990 रोजी साली शनि ग्रहावर पांढऱ्या रंगाचा डाग पाहण्यास मिळाला.
24 सप्टेंबर 1994 रोजी ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.
24 सप्टेंबर 1995 रोजी गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ’मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
24 सप्टेंबर 1998 रोजी बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक व कुशल संघटक वासूदेव पाळंदे यांचे निधन झाले. पुण्यातील ’प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’, ’महाराष्ट्रीय कलोपासक’, ’जागर’ इ. नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
24 सप्टेंबर 1999 रोजी कैगा अणूशक्ती प्रकल्पातील 220 मेगावॉट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
24 सप्टेंबर 2002 रोजी साली प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ तसचं, भारतातील रिमोट सेन्सिंगचे जनक पी. आर. पिशरोटी यांचे निधन झाले.
24 सप्टेंबर 2004 रोजी गुजरात मधील गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिर परिसरात दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला या 80 जण जखमी झाले तर 33 जणांचा मृत्यू झाला.
X X
24 सप्टेंबर 2007 रोजी भारताने महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली ‘टी 20 विश्वकरंडक’ जिंकला.
24 सप्टेंबर 2009 रोजी साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जाहीर केलं की, स्वदेशी निर्मित चंद्रयान 1 ने चंद्रावर पाणी असल्याचे नमूद केलं.
24 सप्टेंबर 2012 रोजी साली केरळ राज्य पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध ज्येष्ठ भारतीय मल्याळम भाषिक चित्रपट व रंगमंच अभिनेते के. सुरेंद्रनाथ थिलकन यांचे निधन झाले.
24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने मंगळावर यान पाठवलेले यान मंगळाच्या कक्षेत पोचले.
24 सप्टेंबर 2014 रोजी मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.
24 सप्टेंबर 2015 रोजी मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत 717 लोक ठार.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/september-23-day-of-special-dinvishesh.html
👆
September 23 - Day of Special (Dinvishesh)
सप्टेंबर 23 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/09/24.html
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/09/24.html
👆
NSS: National Service scheme
राष्ट्रीय सेवा योजना
24 सप्टेंबर: स्थापना दिवस
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/madam-bhikaji-rustum-kama.html
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/madam-bhikaji-rustum-kama.html
👆
Madam Bhikaji Rustum Cama:
मॅडम भिकाजी रुस्तुम कामा : भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ
जन्म दीन: 24 सप्टेंबर
XX
XX
View, Comments and Share...........


0 Comments