Satish Dhawan: Indian Airospace Scientist
सतीश धवन:
अनुकरणीय गणितज्ञ आणि एरोस्पेस अभियंता भारतातील द्रव गतिशीलता (fluid dynamics) संशोधनाचे जनक
जन्मदिन: 25 सप्टेंबर
स्मृतीदिन: 3 जानेवारी
बालपण आणि शिक्षण:
भारतीय गणितज्ञ अभियंता आणि भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक प्रा.सतिश धवन यांचा जन्म 25 सप्टेंबर 1920 रोजी श्रीनगर , जम्मू आणि काश्मीर ब्रिटिश भारत येथे अविभाजित भारताच्या नागरी सेवकाकडे जन्मलेले, प्रा. सतीश धवन यांच्याकडे विविध शैक्षणिक पात्रता होती.
प्रा.सतीश धवन यांनी लाहोरमधील पंजाब विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि गणित आणि यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी (बी.ई.) प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी (बी.ए.,एम.ए.) देखील घेतली होती. त्यानंतर पुढील अभ्यासासाठी ते अमेरिकेत गेले.
मिनेसोटा विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स अंतर्गतएरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये व एरोनॉटिकल इंजिनीअरिंग कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून केले. नंतर त्यानी दुहेरी पीएच.डी. गणित आणि एरोस्पेस अभियांत्रिकी मध्ये मिळवली.
X X
संशोधन: एक संशोधक
1951 मध्ये, धवन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरूमध्ये एक प्राध्यापक सदस्य म्हणून सामील झाले आणि 1962 मध्ये त्याचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
IISc मध्ये त्यांच्या कार्याची प्रशंसा करताना इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणाले, "प्रा. सतीश धवन यांच्या दीर्घ कार्यकाळातच IISc ने खरोखर त्याची प्रतिष्ठा मजबूत केली आणि संपूर्ण आशियातील वैज्ञानिक संशोधनाचे उत्कृष्ट केंद्र म्हणून त्याचे स्थान सुरक्षित केले."
ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले.
त्यांच्या अथक प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे यशस्वी प्रकल्प केले.
X X
इस्रोमधील सतीश धवन यांची कारकीर्द :
भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला यशाकडे नेण्यासाठी ते सर्वात प्रसिद्ध आहेत.
विक्रम साराभाई यांच्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्षपद 1972 मध्ये भूषवले. ते अंतराळ विभागात भारत सरकारचे सचिव देखील होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला.
प्रा. सतीश धवन यांना उपग्रह तंत्रज्ञान कृषी आणि अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांसाठी उपयुक्त माहिती गोळा करण्याची आणि दुर्गम भागात दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हवे होते.
प्रा. सतीश धवन यांनी रिमोट सेन्सिंग व उपग्रह संप्रेषणांचे केलेले प्रयोग ग्रामीण भागातील शिक्षणासाठी अतीशय उपयोगी होते.
हया कार्यामुळे दूरसंचार उपग्रह INSAT, इंडियन रिमोट सेन्सिंग उपग्रह व ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन विकसित करण्यात मोलाची मदत झाली.
त्यांनी सीमा स्तर सिद्धांत नावाचे पुस्तक लिहिले. IISC मध्ये भारता पहिला सुपरसोनिक पवन बोगदा उभारण्यात त्यांचा मोल होता.
भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते.
इस्रो, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद येथे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आणि प्रकल्प संचालक डॉ. रवी जाधव म्हणतात, "ते एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि एक उत्कृष्ट नेते होते. ते आमच्याबरोबर सक्रिय फील्डवर्क करण्यासाठीही येत असत. मला आठवते प्राध्यापक सतीश धवन 1975 मध्ये पटियाला ग्रामीण कृषी क्षेत्रात फील्डवर्क करण्यासाठी आले होते,"
स्पेस टेक्नॉलॉजीद्वारे "रिमोट सेन्सिंग” ची क्षमता प्राप्त करणे ही इस्रोची एक मोठी कामगिरी आहे आणि डॉ धवन त्यासाठी योग्य आहेत.
प्रा. सतीश धवनने ग्रामीण शिक्षण, रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन्समध्ये अग्रगण्य संशोधन केले. त्याच्या प्रयत्नांमुळे इनसॅट या दूरसंचार उपग्रहासारखी कार्यप्रणाली निर्माण झाली.
X X
IRS, भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रह आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV), स्पेस तंत्रज्ञानामध्ये अभिमानाची कारकीर्द भारताची ठेवून देशाला एका सशक्त सशक्त राष्ट्रांच्या श्रेणीमध्ये एक भक्कम स्थान निर्माण करून देण्यामध्ये त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
X X
भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष:
भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे 1972 साली अध्यक्ष झाले.
त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamics च्या संशोधनाचे जनक मानले जाते.
X X
उपग्रह प्रक्षेपण मोहीमेतील खरे नेतृत्व :
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे त्यांच्या टीममध्ये काम करणारे तरुण वैज्ञानिक होते.
एका घटनेची आठवण करून देताना, अंतराळ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणाले की, जेव्हा ते (कलाम) उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे संचालक होते, डॉ. ए.पी.जे. स्पष्ट करतात की 1979 मध्ये उपग्रह प्रक्षेपण वाहन (एसएलव्ही) कार्यक्रमांतर्गत उपग्रह कक्षेत सोडण्याचे मिशन अयशस्वी झाले. इस्रोचे अध्यक्ष म्हणून या सर्व अपयशाचे दोष त्यांनी स्वतःकडे घेतला व पुढील कामकाज यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन देऊन 1980 मध्ये हे मिशन तयार करण्यात आले व यशस्वी करण्यात आले त्यावेळेला त्यांनी सर्व काम करणाऱ्या संघाला बोलवून त्यांचे कौतुक केले. या संपूर्ण यशाचं मानकरी हा संघ आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा स्वतः सांगितले.
सतीश धवन यांनी नवीन तरुणांना या कामांमध्ये खूप मोठी संधी दिली त्यावेळेस तरुणांची भरती केली त्यात गाडगीळ नावाचे एक तरुण यांनी क्षेत्र आधारित पर्यावरणीय संशोधनाची प्रथम श्रेणी शाळा स्थापन केली.
सतीश धवन यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी योग्य तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या इलेक्ट्रो केमिस्ट ए.के. एन रेड्डी यांना समर्थन देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
एस्ट्रा नावाच्या या केंद्राने तेव्हापासून कमी किमतीच्या घरांच्या आणि नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या जाहिरातीत अग्रेसर काम केले आहे.
X X
ग्रंथ संपदा:
प्रा.सतिश धवन यांनी " सीमा स्तर सिद्धांत" नावाचे पुस्तक लिहिले.
X X
सन्मान व पुरस्कार:
1. प्रा.सतिश धवन यांनी विक्रम साराभाई यांच्यानंतर वयाच्या 52 व्या वर्षी, 1972 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्षपद भूषवले. ते अंतराळ विभागात भारत सरकारचे सचिव देखील होते.सतीश धवन 1972-1984 पर्यंत इस्रोचे अध्यक्ष होते.
2. भारत सरकारने प्रा.सतिश धवन यांना 1971 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1981 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
3. प्रा. सतीश धवन हे शिकलेल्या दोन्ही संस्था, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी विज्ञान जादूगार सतीश धवन यांना विशिष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान केले.
X X
निधन:
भारतीय गणितज्ञ अभियंता आणि भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक प्रा.सतिश धवन यांचे 3 जानेवारी 2002 रोजी बंगलोर येथे निधन 81 व्या वर्षी झाले.
X X
प्रा.सतिश धवन यांच्या स्मरणार्थ:
प्रा.सतिश धवन त्यांच्या मृत्यूनंतर चेन्नईपासून सुमारे 100 कि.मी. उत्तरेला असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्राचे नाव बदलून सतीश धवन अंतराळ केंद्र असे करण्यात आले.
View, comments and Share........
1 Comments
👍👍
ReplyDelete