जुन 5 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
जागतिक पर्यावरण दिन
डेन्मार्क या देशात संविधान दिन साजरा केला जातो.
5 जून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
5 जून 1972 रोजी स्टॉकहोम येथे जागतिक पर्यावरण परिषद सुरू झाली. 16 जून 1972 ला निरोप समारंभ पार पडला.5 जून 1974 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो.
5 जून 1507 रोजी इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांनी व्यापार करारावर आपली सहमती दर्शविली.
5 जून 1659 रोजी मुघल बादशाहा औरंगजेब यांनी दिल्ली येथे राज्याभिषेक केला.
X X
5 जून 1849 रोजी डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.
5 जून 1864 रोजी अमेरिकन यादवी युद्ध-पीडमॉंटची लढाई – दक्षिणेचा पराभव.
5 जून 1907 रोजी स्वामीनारायण पंथाची स्थापना करण्यात आली.
5 जून 1915 रोजी डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
5 जून 1924 रोजी अर्न्स्ट अलेक्झांडरसनने पहिला फॅक्स संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.
X X
5 जून 1952 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.
5 जून 1959 रोजी सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
5 जून 1968 रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील दिवशी केनेडी मरण पावले.
5 जून 1975 रोजी 1967 पासून आठ वर्षे वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुवेझ कालवा’ पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
सुवेझ कालवा
5 जून 1980 रोजी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
X X
5 जून 1984 रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
5 जून 1989 रोजी चीनची राजधानी बिजींगच्या तियेनआनमेन चौकातील चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा मानबिंदू ठरले.
5 जून 1994 रोजी ब्रायन लारा – यांनी नाबाद 501 धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
5 जून 2003 रोजी पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान 50 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
X X
5 जून 1723 रोजी स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अॅडॅम स्मिथ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 जुलै 1790 मध्ये झाला.
5 जून 1879 रोजी नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक यांचा जन्म झाला.
5 जून 1881 रोजी हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 ऑक्टोबर 1955 मध्ये झाला.
X X
5 जून 1883 रोजी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 1946 मध्ये झाला.
5 जून 1900 रोजी डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता याचा जन्म झाला.
5 जून 1908 रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू साथ सप्टेंबर 1991 मध्ये झाला.
5 जून 1945 रोजी अंबर रॉय, भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध खेळाडू याचा जन्म झाला.
5 जून 1946 रोजी विल्यम्स एफ-1 टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म झाला.
5 जून 1950 रोजी हरिश्चंद्र माधव बिराजदार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी पहिलवानी कुस्तीगीर यांचा जन्म झाला.
X X
5 जून 1961 रोजी भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म झाला.
5 जून 1972 रोजी भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला.
5 जून 1910 रोजी अमेरिकन लघुकथा लेखक ओ. हेनरी यांचे निधन झाले.
5 जून 1916 रोजी लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटीश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय याचे निधन झाले.
5 जून 1942 रोजी स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रतिभाशाली गझल आणि गीत गायक मास्टर मदन यांचे निधन झाले.
5 जून 1940 रोजी कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 2011 रोजी झाला होता.
5 जून 1973 रोजी मा. स. गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक यांचे निधन झाले.19 फेब्रुवारी 1906 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव कोकणातील गोळवल हे आहे. नागपूर मधील हीलॉप्स कॉलेज येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते बनारस येथे बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी बी एस सी आणि एम एस सी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा पास होऊन 1933 मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठात प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तीन वर्षासाठी त्यांची नेमणूक झाली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार संघाचे पहिले सरसंघचालक त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये केली. त्यांच्या संपर्कामध्ये श्री गुरुजी आले व त्यांनी गुरुजींच्या खांद्यावर द्वितीय सरसंघचालक म्हणून जबाबदारी दिली. 1940 ते 1973 पर्यंत त्यांनी सलग 33 वर्षे ही जबाबदारी अत्यंत छान पद्धतीने पार पाडली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचारांचा प्रचार आणि प्रसार देशात आणि परदेशात त्याच्याबद्दलचा विस्तार हिंदुत्ववादी विचारसरणीचे पोषण आणि संवर्धन त्यांनी केले. विचार सूत्ररूपाने त्यांनी सांगितले गुरुजीचे जीवन म्हणजे एक अलौकिक व ऋषितुल्य होते. खऱ्या अर्थाने ते एक राष्ट्रपुरुष होते . त्यांचा मृत्यू 5 जून 1973 रोजी झाला.
5 जून 1987 रोजी ग. ह. खरे, इतिहासतज्ज्ञ यांचे निधन झाले.
X X
5 जून 1996 रोजी भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 26 मार्च 1933 मध्ये झाला होता.
5 जून 1999 रोजी राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन झाले.
5 जून 2004 रोजी अभिनेते आणि अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1911 मध्ये झाला होता.
5 जून 2016 रोजी एलिनॉर झेलियट अमेरिकन लेखिका आणि इतिहासकार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1926 मध्ये झाला होता.
5 जून 2017 रोजी भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून सर्वात जास्त जड वजनी “जीएसएलव्ही मार्क -3 डी -1” रॉकेट् चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.
जीएसएलव्ही मार्क -3 डी -1
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/june-4-day-of-special-dinvishesh.html
👆
June 4 - Day of Special (Dinvishesh)
जुन 4 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधीX X
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/hindi-language-cos-and-pos.html
👆
पर्यावरण आणि माझी भूमिका
(5 जुन जागतिक पर्यावरण दिना निमित्त)
Environment and my role: World Environment day -5 June
X X
View, Comments and share
0 Comments