Subscribe Us

header ads

April 6 - Day of Special (Dinvishesh)

April 6 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 6 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


6 एप्रिल 1896 रोजी एका पावसाळी सकाळी ग्रीसमधील अथेन्स येथे तोफांची सलामी दिली गेली. कबुतरे उडवण्यात आली आणि टाळ्यांच्या कडकडाटात यांच्या गजरात सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धा "ऑलिंपिक गेम्स" चे पुनरुज्जीवन झाले. रोमन सम्राटाने इ. स. 393 मध्ये विझवलेली ज्योत पुन्हा एकदा पेटविण्यात आली. त्याचे मुख्य श्रेय फ्रान्सच्या बॉरन पियर द क्युबरटीन या थोर व्यक्तीला जाते. ह्या स्पर्धा 1500 वर्षाच्या खंडानंतर या स्पर्धा सुरू करण्याचे श्रेय त्याला मिळाले.

6 एप्रिल 1896 रोजी पहिल्या आधुनिक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा येथे घेण्यात आल्या ते ग्रीक राजा जॉर्ज याने 60000 लोकांच्या उपस्थितीत या स्पर्धांचे उद्घाटन केले. तेव्हापासून दर चार वर्षांनी या स्पर्धा भरविण्यात येतात. या स्पर्धेचा सन्मान देशांना न देता शहरांना दिला जातो.
6 एप्रिल 1930 ला महात्मा गांधींनी समारंभपूर्वक मिठाचा कायदा मोडला.
X X
6 एप्रिल 1656 रोजी शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला. [चैत्र व. 7]

6 एप्रिल 1656 रोजी
चंद्रराव मोरे याचा शिवाजी महाराजांनी पराभव करुन रायगड किल्ला सर केला व आपली राजधानी केली.

6 एप्रिल 1896 रोजी
आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे 1500 वर्षे हे खेळ बंद होते.

6 एप्रिल 1917 रोजी
पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

6 एप्रिल 1919 रोजी
रौलेट अ‍ॅक्टविरुध्द हरताळ पाळण्यात आला.

6 एप्रिल 1930 रोजी
प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.12 मार्च 1930 या काळात गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती ते दांडी हे 240 मैलाचे अंतर आपल्या अनुयायासह पायी चालून सुरू केले व ते 6 एप्रिल 1930 रोजी पूर्ण केले. या दांडीयात्रे चाळीसगावे लागली. ठिकठिकाणी गांधीजींच्या सभा झाल्या. गांधीजी सोबत पहिल्या दिवशी निवडक 78 स्त्री पुरुष सोबत होते. मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडीयात्रेने झाली. ही यात्रा साबरमती आश्रमापासून ते दांडी पर्यंत होती. या यात्रेत सरोजिनी नायडू, इला भट यांचा देखील समावेश होता. ही दांडीयात्रा 24 दिवस चालली आणि तिच्यात लोक वाढतच गेले. ती एकूण 385 किलोमीटर लोक पायी चालले. जेव्हा सकाळी साडेसहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवात होती. त्यानंतर गांधीजी मीठ बनवत आणि भाषणे करत. समुद्र किनाऱ्यावर ने दक्षिणेकडे 25 मैल वर असलेल्या धारासना या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वी चार ते पाच मे 1930 च्या दरम्यान रात्री गांधीजींना अटक करण्यात आली. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधीजींनी त्यानिमित्ताने लोकसंघटन आणि लोकजागृती करण्यासाठी हा सत्याग्रह केला होता. हे आंदोलन पुढे वर्षभर राहिले. गांधीजींची तुरुंगातून सुटका झाली आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन थांबवले. या आंदोलनात 60000 हून अधिक भारतीय लोक तुरुंगात गेले.
X X

6 एप्रिल 1965 रोजी व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला "अर्ली बर्ड" हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला. या उपग्रहामुळे माहिती व करमणुकीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली.

6 एप्रिल 1966 रोजी भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली. इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या त्यांनी पार केल्या होत्या.

6 एप्रिल 1980 रोजी
भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. यानंतर 1984 मध्ये झालेल्या 8व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या!

6 एप्रिल 1998 रोजी
स्तनांचा कर्करोग बरा करणार्‍या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
X X

6 एप्रिल 1998 रोजी भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.

6 एप्रिल 1998 रोजी पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.

6 एप्रिल 2000 रोजी
"मीर" या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले "सोयूझ" हे अंतराळयान 'मीर' ला भेटले.


6 एप्रिल 1773 रोजी जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 23 जून 1836 मध्ये झाला.


6 एप्रिल 1864 रोजी
सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 23 जानेवारी 1934 मध्ये झाला.


6 एप्रिल 1886 रोजी
ब्रिटीश कालीन भारतातील सर्वात मोठी रियासत हैदराबाद येथील निजाम संस्थेचे शेवटचे शासक निजाम उस्मान अली खान यांचा जन्म झाला.
X X

6 एप्रिल 1890 रोजी अली सिकंदर ऊर्फ "जिगर मोरादाबादी" भारतातील सुप्रसिद्ध उर्दू कवी व शायर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 सप्टेंबर 1960 मध्ये झाला.

6 एप्रिल 1890 रोजी फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 डिसेंबर 1939 मध्ये झाला.


6 एप्रिल 1892 रोजी
डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस यांकॅह जन्म झाला . त्यांचा मृत्यू एक फेब्रुवारी 1981 मध्ये झाला.


6 एप्रिल 1909 रोजी
जी. एन. जोशी हे भारतातील सुप्रसिद्ध भावगीतगायक व संगीतकार. एच. एम. व्ही. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1994 रोजी झाला.


6 एप्रिल 1917 रोजी
"काव्यतीर्थ" हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 18 नोव्हेंबर 2006 मध्ये झाला.


6 एप्रिल 1919 रोजी
रघुनाथ विष्णू पंडित हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोंकणी कवी यांचा जन्म झाला.


6 एप्रिल 1927 रोजी
विष्णू महेश्वर ऊर्फ "व्ही. एम." तथा दादासाहेब जोग हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उद्योजक असून त्यांचा मृत्यू 28 जून 2000 मध्ये झाला.


X X

6 एप्रिल 1928 रोजी जेम्स वॉटसन – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक (1962) विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ

6 एप्रिल 1931 रोजी रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू पश्चिम बंगालमधील कोलकत्ता या ठिकाणी 17 जानेवारी 2014 मध्ये झाला.


6 एप्रिल 1956 रोजी
दिलीप वेंगसरकर हे भारतातील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व प्रबंधक आहेत त्यांचा जन्म झाला.


6 एप्रिल 1955 रोजी
धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन झाले.

6 एप्रिल 1973 रोजी
भारतीय केरळ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निबंध लेखक मल्याळम साहित्य समिक्षक कारिककट्ट मराठू कुट्टीकृष्ण मारार यांचे निधन झाले.
X X

6 एप्रिल 1981 रोजी शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर – मानवधर्माचे उपासक यांचे निधन झाले. विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय, कोल्हापूरचा ग्रामसेवाश्रम व कोरगावकर धर्मादाय संस्था, वरोड्याचे आनंदवन, माधानचे कस्तुरबाधाम, नागपूरचा मातृसेवासंघ, देवरुखचे मातृमंदिर इ. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

6 एप्रिल 1983 रोजी जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (1962 – 1966), हैदराबादचे लष्करी प्रशासक (1948 – 1949) व भारताचे कॅनडातील राजदूत यांचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना पद्‌मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचा जन्म 7 जून 1908 मध्ये झाला होता.


6 एप्रिल 1989 रोजी
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन झाले. चारशेहून अधिक कथांचे 25 संग्रह, 32 कादंबर्‍या, 5 नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. त्यांचा जन्म 7 मे 1912 रोजी मांडली, डुंगरपूर, राजस्थान येथे झाला.
X X

6 एप्रिल 1990 रोजी माकप नेते व राजकारणी तसचं कामगार संघटनेचे नेते भालचंद्र त्र्यंबक रणदिवे यांचे निधन झाले.

6 एप्रिल 1992 रोजी आयझॅक असिमॉव्ह हे सुप्रसिद्ध अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1920 मध्ये झाला.


6 एप्रिल 2001 रोजी
भारताचे माजी 6 वे उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचे निधन झाले.
X X






https://www.insearchofknowledge.org/2024/04/april-5-day-of-special-dinvishesh.html
👆
April 5 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 5 : दिनविशेष









X X

View, Comments and share..

Post a Comment

0 Comments