March 15 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 15 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
नियोजन दिन
जागतिक अपंगत्व दिन
15 मार्च 1493 रोजी भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
15 मार्च 1564 रोजी मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.
15 मार्च 1680 रोजी शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह
X X
15 मार्च 1820 रोजी मेन हे अमेरिकेचे 23 वे राज्य बनले.
15 मार्च 1827 मध्ये टोराटो विद्यापीठाची स्थापना झाली. 15 मार्च रोजी किंग जॉर्ज चतुर्थ यांनी औपचारिकपणे एक शाही सनद जारी करून विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली. कॅनडातील सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे जे क्वीन्स पार्क च्या सभोवतालच्या मैदानावरबां धण्यात आले. 1827 मध्ये रॉयल चार्ट द्वारे किंग्स कॉलेज अप्पर कॅनडामधील उच्च शिक्षणाची पहिली संस्था म्हणून त्याची स्थापना केली गेली. हे 1850 मध्ये विद्यापीठाने त्याचे सध्याचे नाव धारण केले. महाविद्यालये विद्यापीठ म्हणून यामध्ये 11 महाविद्यालय आहेत. टोरंटो विद्यापीठ 700 पेक्षा जास्त पदवी पूर्व आणि 200 पदवीधर कार्यक्रम ऑफर करते. शैक्षणिक दृष्ट्या टोरंटो विद्यापीठ हे साहित्यिक टीका आणि संप्रेषण सिद्धांतातील प्रभावशाली हालचाली आणि अभ्यासक्रमासाठी प्रख्यात आहे. हे विद्यापीठ इन्सुलिन आणि स्टेम सेल संशोधनाचे जन्मस्थान मानले जाते. पहिले कृत्रिम हृदय पेसमेकर आणि पहिल्या यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण आणि मज्जातंतू प्रत्यारोपणाचे ठिकाण आहे. या विद्यापीठामध्ये पहिले इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तयार करण्यात आले. जेम्स आणि लुईस टेमर्ती यांनी कॅनडाच्या इतिहासातली सर्वात मोठी विद्यापीठाला देणगी म्हणून 250 दशलक्ष डॉलर दिली. टोरंटो विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये कॅनडाचे पाच पंतप्रधान आहेत. कॅनडाचे तीन गव्हर्नर जनरल, नऊ परदेशी नेते आणि कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाचे 17 न्यायमूर्ती यांचा समावेश आहे. तसेच संशोधनामधील 12 नोबेल पारितोषिक विजेते. सहा त्यूरिंग पुरस्कार विजेते. 94 रोडस स्कॉलर आणि एक फिल्ड मेडलिस्ट विद्यापीठाची संलग्नित आहेत.
15 मार्च 1831 रोजी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.
15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत तिसरी शाळा महात्मा फुले यांनी पुण्यात सुरु केली.
15 मार्च 1946 रोजी भारताला लवकर स्वातंत्र्य देण्याची घोषणा क्लेमेंट आटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केली.
15 मार्च जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 15 मार्च 1962 मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन कनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकाराबद्दल भाषण केले. ग्राहक हक्काबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते होते. ग्राहकाची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक ग्राहक दिन हा आंतरराष्ट्रीय पातळीवर 15 मार्चला साजरा केला जातो. वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा. यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणत्याही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले. आहेत पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊन हा कायदा बनवला गेला. 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो आणि भारतामध्ये 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. जागतिक पातळीवर ग्राहक दिनानिमित्त दरवर्षी विविध वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणारी थीम निवडली जाते.
15 मार्च 1950 रोजी नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली.
X X
15 मार्च 1939 रोजी सिनसिनाटी रेड स्टॉकिंग्स प्रथम प्रो बेसबॉल संघ बनला.
15 मार्च 1877 रोजी इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
15 मार्च 1892 रोजी लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.
15 मार्च 1906 रोजी रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली. ब्रिटन मधली ही कंपनी आहे. कंपनीचे नोंदणी करत कार्यालय लंडनमधील किंग्स क्रॉस जवळ किंग्स प्लेस येथे आहे. 1884 मध्ये हेन्री रॉयस या अभियंत्याने अभियांत्रिकी व्यवसायातून रोल्स राईस ची वाढ केली. दहा वर्षानंतर त्याने डायनामो आणि इलेक्ट्रिक क्रेन तयार करण्यास सुरुवात केली. 1904 च्या नंतर त्याने वेगवेगळ्या कार विकसित केल्या. आणि 1906 मध्ये कंपनीचे नाव रोल्स राईस लिमिटेड या नावाने स्थापन झाले. सध्या ब्रिटिश मधील ही एक बहुराष्ट्रीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. ही कंपनी आज विमान वाहतूक आणि इतर उद्योगांसाठी पावर सिस्टीमची रचना निर्मिती आणि वितरण करते. रोल्स राईस ही विमान इंजिनची जगातली जनरल इलेक्ट्रिक नंतरची सर्वात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
15 मार्च 1919 रोजी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन
15 मार्च 1937 रोजी अमेरिकेत पहली ब्लड बैंक सुरु झाली.
15 मार्च 1939 रोजी दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
15 मार्च 1946 रोजी भारताला पूर्ण स्वातंत्र्य अर्पण करण्याची घोषणा क्लेमेंट एटली द्वारे करण्यात आली.
15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना
X X
15 मार्च 1956 रोजी ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे "माय फेअर लेडी" चा पहिला प्रयोग झाला.
15 मार्च 1959 रोजी मुंबईमध्ये लिज्जत पापड़ या महिला गृह उद्योग ची स्थापना झाली.
15 मार्च 1961 रोजी ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
15 मार्च 1985 रोजी symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.
15 मार्च 1990 रोजी सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
15 मार्च 2001 रोजी भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात 281 धावा काढल्या.
15 मार्च 2003 रोजी हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी
15 मार्च 1767 रोजी अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 8 जून 1845 मध्ये झाला.
15 मार्च 1860 रोजी डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा जन्म झाला. ते प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 26 ऑक्टोबर 1930 मध्ये झाला.
15 मार्च 1866 रोजी पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 मार्च 1910 रोजी झाला.
X X
15 मार्च 1901 रोजी भारतातील सुप्रसिद्ध पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजय पाल यादव तथा गुरु हनुमान यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 मे 1999 मध्ये झाला. हनुमान गुरु यांचा जन्म राजस्थान राज्यातील चिरावा या ठिकाणी झाला. ते शाळेत गेले नाही. लहानपणापासूनच गावातील आखाड्यात कुस्ती खेळून लागले. 1919 मध्ये ते दिल्लीला गेले आणि सब्जी मडी येथे बिर्ला मिल जवळ एक दुकान थाटले. पण त्यांना कुस्तीची आवड असल्यामुळे त्यांची लोकप्रियता कुस्ती पटू म्हणून मैदानातच होती. भारतीय उद्योगपती के क बिर्ला यांनी मलखाजगंज सब्जी मंडी जुनी दिल्ली या ठिकाणी आखाडा उभा करण्यासाठी जमीन दिली. त्यांनी बिर्ला मिल्स व्यायाम शाळा 1925 मध्ये सुरू केली. त्या व्यायाम शाळेचे नंतरचे नाव गुरु हनुमान आखाडा असे झाले. ते स्वतः कुस्तीपटू आणि प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यांची एक भारतीय कुस्ती शैली परंपरा त्यांनी निर्माण केली. ज्यामुळे भारतातील जवळपास सर्व फ्रीस्टाईल आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंना त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यांचे शिष्य सुदेश कुमार आणि प्रेमनाथ यांनी 1958 मध्ये कार्डिफ कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकले. सतपाल आणि करतार सिंग यांनी 1982 आणि 1986 मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकली. त्यांनी ज्या शिष्यांना प्रशिक्षण दिले त्या आठ शिष्यांना सर्वोच्च भारतीय क्रीडा सन्मान अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरु हनुमान हे बॅचलर आणि लॅक्टो व्हेजिटेरियन होते म्हणजे त्यांच्या शाकाहारामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असेल. 1984 मध्ये गुरु हनुमान यांनी भारतीय कुस्ती या मासिकात आपल्या लेखाद्वारे शाकाहार आहार एक मजबूत शरीर बनवू शकते असे स्पष्ट केले होते. ते हरिद्वारला जात असताना नेट जवळ 24 मे 1999 रोजी त्यांचा कार अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. उत्तर दिल्लीतील रोशन बागेजवळ शक्ती नगर मध्ये गुरु हनुमान आखाडा हे भारतीय कुस्तीचे केंद्र झाले. या आखाड्यात दारासिंग, हंसराम गुरु सतपाल सुभाष वर्मा यासारखे कुस्तीपटू तयार केले. भारत सरकारने 2014 मध्ये या अकादमीची राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार साठी निवड केली.
गुरु हनुमान आखाडा
15 मार्च 1934 मध्ये भारतीय राजकारणी बहुजन समाज पक्ष त्यांनी स्थापन केला असे कांशीराम यांचा जन्म पंजाब मधील रोपण जिल्ह्यातील खवासपूर या गावी दलित चांभार जमातीतील कुटुंबात झाला. त्यांनी 1995 मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुका जिंकल्या आणि मायावतीच्या नेतृत्वाखाली नव्हे शासन स्थापन केले. पंजाब मधील रोपण येथील शासकीय महाविद्यालयात ते बी एस सी चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांनी पुण्यातील उच्च उर्जा पदार्थ संशोधन प्रयोग शाळेमध्ये ते दाखल झाले. तेव्हापासून त्यांच्या राजकीय जीवनातील चळवळींना सुरुवात झाली. 1978 मध्ये कांशीराम यांनी बामसेफ (बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशन) नावाची संघ ची स्थापना केली. हा संघ बिगर राजकीय आणि बिगर धार्मिक स्वरूपाचा होता. 1984 मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्ष स्थापन केला. लोकसभेसाठी ते होशियारपुर मधून 1991 ला दहाव्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर 1996 मध्ये पुन्हा ते ही निवडणूक जिंकून पुन्हा खासदार झाले. 9 ऑक्टोबर 2006 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
15 मार्च 1947 रोजी भारतीय पूर्व हॉकी खेळाडू अजित पाल सिंग यांचा जन्म झाला.
15 मार्च 1985 रोजी भारतीय भारतीय रॅपर, संगीत निर्माता, गायक आणि चित्रपट अभिनेता हिरदेशसिंग तथा हनी सिंग यांचा जन्म झाला.
15 मार्च 44 रोजी ख्रिस्त पूर्व 44 रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या केली.
15 मार्च 1266 रोजी विश्व प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह यांचे निधन झाले.
15 मार्च 1937 रोजी व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक त्यांचे निधन झाले.
15 मार्च 1985 रोजी भारतीय इतिहासकार व लेखक राधा कृष्ण चौधरी यांचे निधन.
15 मार्च 1992 रोजी भारतातील एक सुप्रसिद्ध भारतीय उर्दू आणि हिंदी कवी आणि लेखक तसेच बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गीतकार राही मासूम रजा यांचे निधन झाले. ते मिली, लम्हे आणि 1998 च्या महाभारत टीव्ही मालिकेच्या पटकथा आणि संवादासाठी प्रसिद्ध आहेत.1979 मध्ये मै तुलसी तेरे आंगन की या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील गाजीपुर जिल्ह्यातील गंगावली गावात झाला. त्यांनी आपले शिक्षण अलिगड मुस्लिम विद्यापीठात उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आलात च्या आणि दुनिया या उर्दू मासिकासाठी शाहिद आखतर या टोपण नावाने कादंबऱ्या लिहिल्या. ते अलिगड मुस्लिम विद्यापीठात उर्दूचे व्याख्याते म्हणून काही वर्ष काम केले आणि त्यानंतर ते मुंबईला आले. त्यांनी हा कदंबऱ्यांचे लिखाण केले चार कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांचे आत्मचरित्र "छोटे आदमी की बडी कहानी" म्हणजे 'छोट्या माणसाची मोठी कहाणी' या शीर्षकाखाली लिहिले. त्यांनी नीम का पेड, खिस से ना कहना, मै तुलसी तेरे आंगन की, डिस्को डान्सर, महाभारत या चित्रपटाने टीव्हीवरील मालिकांसाठी लिखाण केले. त्यांनी आलाप ,जुदाई, हम पाच, बात बन जाये, नाचे मयुरी, लम्हे, परंपरा, आईना या चित्रपटातील संवाद लिहिले आहेत. आलाप, देश मे निकला होगा चांद या चित्रपटातील गीते त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1927 मध्ये संयुक्त प्रांत गंगोली या ठिकाणी झाला.
राही मासूम रजा
15 मार्च 2000 रोजी लेडी राणू मुखर्जी ह्या भारतातील थोर विचारवंत आणि कलासमीक्षक, रविंद्रनाथ टागोर यांच्या जवळच्या सहकारी यांचे निधन झाले.
15 मार्च 2003 रोजी मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन झाले.
15 मार्च 2008 मध्ये भारतातील विमान उडविणारी पहिली भारतीय महिला सरला ठकराल यांचे निधन झाले. त्यांचा जन्म नवी दिल्ली या ठिकाणी 1994 मध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी दिल्लीतील फ्लाईंग क्लबमधून विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले व विमान चालकाचे लायसन्स मिळवले. त्यानंतर त्यांनी एक जिप्सी मोथ जातीचे विमान सोलो उडवले. पायलट चे लायसन्स मिळवल्यानंतर त्यांनी लाहोर फ्लाईंग क्लबमधून एक विमान खरेदी केले. त्या विमानांमधून एक हजार तासाचे उड्डाण पूर्ण केले त्यानंतर त्यांना ए लायसन्स मिळाले. 1936 मध्ये त्यांनी पहिल्यांदा साडी नेसून विमान उडवले. सोळा वर्षाच्या असताना त्यांनी पि. डी. शर्मा यांच्याशी ओळख झाली व त्या दोघांनी विवाह केला. विमान उडवण्याचे प्रोत्साहन त्यांना त्यांच्या पतीकडून मिळाले. दुर्दैवाने कॅप्टन शर्मा यांचे 1939 मध्ये विमान अपघातात निधन झाले. सरला ह्या आर्य समाजाच्या होत्या. त्यामुळे पुनर्विवाह करण्यास अनुमती मिळाल्याने 1948 मध्ये त्यांनी आर पी ठकराल यांच्याशी पुनर्विवाह केला.
15 मार्च 2013 मध्ये कल्लम अंजी रेड्डी यांचे निधन आंध्र प्रदेशातील हैदराबाद या ठिकाणी झाले. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील विजयवाडा जिल्ह्यातील ताडेपिल्ली या ठिकाणी 10 ऑगस्ट 1941 मध्ये झाला. ते औषध उद्योगातील भारतीय उद्योजक होते. त्यांनी 1984 मध्ये स्थापन केलेल्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी चे सस्थापक अध्यक्ष आणि कार्पोरेट सोशल डॉ. रेड्डीज फाउंडेशन चे ते अध्यक्ष होते. त्यांचे शालेय शिक्षण हिंदू हायस्कूल विजयवाडा येथे झाले. त्यानंतर रेड्डी यांनी गुंटूर मधून 1958 मध्ये ए सी कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठाचे केमिकल टेक्नॉलॉजी मधून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि 1969 मध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथून एल के दोराई स्वामी यांच्या नेतृत्वाखाली रासायनिक अभियांत्रिकी मध्ये पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना भारतीय औषध उद्योगातील योगदानाबद्दल भारत सरकारने 2001 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
कल्लम अंजी रेड्डी
15 मार्च 2015 रोजी भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी झाला.
https://www.insearchofknowledge.org/2023/12/blog-post.html
👆
जन्म - मार्च 15
डॉ. वाल्डेमर हाफकिन
डॉ. वाल्देमार मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन: रशियन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/03/march-14-day-of-special-dinvishesh.html
👆
March 14 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 14 : दिनविशेष
X X
View, Comments and share.....












0 Comments