February 14 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 14 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
वॅलेन्टाइन्स डे
14 फेब्रुवारी 1483 झहीर उद दिन मुहम्मद बाबर यांचा जन्म सध्याच्या उझबेकिस्तानमधील अंदिजान शहरात झाला.
14 फेब्रुवारी 1628 रोजी मुघल सम्राट शाहजहा आग्र्या च्या गादीवर बसला.
14 फेब्रुवारी 1709 रोजी औरंगजेबाचा पुत्र कामबक्ष हा त्याचा भाऊ शहा आलम ज्याने बहादूरशहा नावाने सिंहासनावर बसला होता. हैदराबादच्या जवळ लढाई करून आपल्या भावाचा म्हणजे कामबक्ष याचा पराभव करून मारला.
14 फेब्रुवारी 1876 रोजी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता.
14 फेब्रुवारी 1881 रोजी भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे स्थापना करण्यात आली होती. भारतातील हे सर्वात जुने होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. येथे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी आणि एमडी होमिओपॅथिक अभ्यासक्रम शिकवले जातात. हे महाविद्यालय आयुष मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त असून हे पश्चिम बंगाल आरोग्य विद्यापीठ विज्ञान विद्यापीठाची संलग्नित आहे. हे महाविद्यालय 2005 पासून राज्य मॉडेल होमिओपॅथिक संस्था म्हणून घोषित करण्यात आले.
X X
14 फेब्रुवारी 1899 रोजी अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
14 फेब्रुवारी 1908 मध्ये मिस क्लार्क होस्टेलची स्थापना राजर्षी शाहू महाराजांनी केली.
14 फेब्रुवारी 1920 रोजी अमेरिकेच्या शिकागो येथे महिला मतदारांच्या लीग ची स्थापना करण्यात आली.
14 फेब्रुवारी 1924 रोजी संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.
14 फेब्रुवारी 1945 रोजी चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
14 फेब्रुवारी 1945 रोजी दुसरे महायुद्ध चालू असताना रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.
14 फेब्रुवारी 1946 रोजी बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
X X
14 फेब्रुवारी 1946 रोजी पहिला संगणक "एनियाक" युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
14 फेब्रुवारी 1963 रोजी अणुक्रमांक 103 असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले. हे एक कृत्रिम रासायनिक घटक आहे त्याचे चिन्ह Lr पूर्वी Lw असे होते. त्याचा अनुक्रमांक हा 103 असून ते अनेक कृत्रिम किरणोत्सारी घटक शोधण्यासाठी वापरले जाणारे यंत्र सायकलोट्रोनचे शोधक अर्नेस्ट लॉरेन्स यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे.
14 फेब्रुवारी 1989 रोजी ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
14 फेब्रुवारी 1989 रोजी भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला 47,00,00,000 अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले. भोपाळ वायु दुर्घटना 3 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात घडली. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या 610 नंबरच्या जमिनीखालील टॅंक मधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाइड मिथाईल आयसोसायनाईट वायूच्या चाळीस टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली होती .यामध्ये जवळपास 20 हजार लोकांना या दुर्घटनेची निगडित आजारामुळे मृत्यू ओढवला. तर पाच लाख हून अधिक जण गंभीर अथवा अपंग झाले. हा प्रकल्प कंपनीचा 1970 च्या दशकामध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प होता . अमेरिकन मल्टी नॅशनल कंपनीची ही भारतातील सबसिडीयरी येथे सेवन कारभारीन या नावाने कीटकनाशक मिथाईल आयसोसायनाईट व इतर द्रव्य पासून बनवले जात असे. हा द्रव वायु स्वरूपात असेल तर अत्यंत विषारी असल्यामुळे त्याला जमिनीखाली थंड टाक्यांमध्ये द्रवरूपामध्ये साठवला जात असे या जमिनीखालील तीन टाक्यांमधून एका टाकीतून याचे गॅस मध्ये रूपांतर झाले. 16 डिसेंबर 1984 पासून ऑपरेशन फेथ हाती घेण्यात आले कंपनीपासून दूरवरच्या कॅम्पस मधून लोकांची व्यवस्था करण्यात आली. 22 डिसेंबर ला ऑपरेशन फेथ हे संपले. मिथाईल असो सायनेट असलेल्या टाकीत पाणी शिरले आणि ही दुर्घटना घडली ज्यामुळे रासायनिक अभिक्रिया सुरू झाली आणि त्यातून भरपूर कार्बन-डाय-ऑक्साइड तयार झाला त्यामुळे पाण्याच्या टाकीच्या आत मधले तापमान 200° पर्यंत वाढले. युनियन कार्बाइड कंपनीचे सीईओ वॉरेन अदर्सन यांच्यावर 1991 मध्ये मनुष्यवधाचा खटला भरण्यात आला. खटल्याच्या सुनावणी वेळेस तो न्यायालयात एक फेब्रुवारी 1992 रोजी हजर राहिला नसल्याने त्याला भरारी घोषित करून न्यायालयाने त्यांना अमेरिकेतून भारताकडे सुपूर्द करण्यात यावा अशा आदेश जारी केला. पण त्याला अटक होऊ शकली नाही आणि 29 सप्टेंबर 2014 मध्ये त्याचा मृत्यू झाला.
14 फेब्रुवारी 1998 रोजी कोइंबतूर शहरात 11 ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले. ज्यात 200 जण जखमी तर 58 मृत्यू पावले. या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार इस्लामिक कट्टरतावादी संघटना अल ऊमाचा संस्थापक एस ए बाषा हा सूत्रधार होता. भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवडणूक सभेचे लक्ष करण्यासाठी हा कट रचला गेला होता. 1992 मध्ये बाबरी मज्जिद पाडल्यानंतर तामिळनाडूमध्ये जिहाद कमिटी अलऊमा आणि इस्लामिक युनायटेड फ्रंट यासारख्या कट्टरवादी चळवळी सक्रिय झाल्या आणि ऑगस्ट 1993 मध्ये चेन्नई येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीत बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर ही संस्था इस्लामिक दहशतवादी संघटना म्हणून लोकप्रिय ठरली.
14 फेब्रुवारी 2000 रोजी अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
X X
14 फेब्रुवारी 2003 रोजी नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्या सरस्वती सन्मानासाठी निवड. "आत्मकथा" या त्यांच्या नाटकाला 1989 मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला.
नाशिक-कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे वर्षाआड देण्यात येणारा सन 2011 जनस्थान पुरस्कार, युगान्तला 2002चा साहित्य अकादमी पुरस्कार,
वाडा चिरेबंदी या नाटकाला राज्य सरकारचा 1987 उत्कृष्ट नाटक सन्मान, वैदर्भीय गुणवंत म्हणून नागपूर महापालिकेने दिलेला नागभूषण पुरस्कार- 2009,
2008 मध्ये पु.ल. देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा "पुलोत्सव सन्मान" प्राप्त. प्रिय जी.ए. पुरस्कार- (2017), 2003 मध्ये सरस्वती सन्मान, 2013 मध्ये मौनराग या ललित निबंधाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत शब्द पुरस्कार प्राप्त.
गो.नी. दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार-2016,
महाराष्ट्र सरकारचा 2018चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार- 2019, संगीत नाटक अकॅडेमी पुरस्कार- 1989, संगीत नाटक अकॅडेमी फेलोशिप -1993.
14 फेब्रुवारी 2005 रोजी म्हणजे आजच्या दिवशी यु ट्यूब ची स्थापना करण्यात आली. युट्युब ची स्थापना स्टीव्ह चेन, चाड हर्ले आणि जावेद करीम या तिघांनी केली. युट्युब हे गुगल अँड सेंड करून जाहिरात कमाईची कमाई यूट्यूब एक संकेत स्थळ आहे. यूट्यूब चा मालक संस्था मालक हा गुगल आहे. युट्युब ची मूळ कल्पना ही ऑनलाइन डेटिंग सेवेची व्हिडिओ आवडत होती. युट्युब लोगो लॉन्च झाल्यापासून 2007 पर्यंत वापरला गेला तो 2008 मध्ये परत आला आणि 2010 मध्ये पुन्हा काढला गेला या लोगोची दुसरी आवृत्ती त्याच्या ब्रॉडकास्ट युवरसेल्फ घोषणाशिवाय 2011 पर्यंत वापरली गेली. यूट्यूब चे सुरुवातीचे मुख्यालय सॅनमाटेओ कॅलिफोर्निया येथील पिझ्झेरिया आणि जपान रेस्टॉरंटच्या वर स्थित होते. कंपनीने फेब्रुवारी 2005 मध्ये www.youtube.com सक्रिय केले आणि पहिला व्हिडिओ 23 एप्रिल २००५ मध्ये अपलोड करण्यात आला. होता मी एट द झू त्याचे शीर्षक होते. त्याचा प्राणी संग्रहालयातील सह संस्थापक जावेद करीन दाखवले होते. 15 डिसेंबर 2005 रोजी ही साईट अधिकृतपणे लॉन्च झाली त्यावेळेस साईटला दिवसाला आठ दशलक्ष व्ह्यूज मिळत होते. युट्युब ही इंटरनेटवरील पहिली व्हिडिओ शेअरिंग साईट नव्हती. ही व्हिडिओ नोव्हेंबर 2004 मध्ये लॉन्च करण्यात आली. कंपनीने जुलै 2006 मध्ये जाहीर केले की दररोज 65 हजार हुन अधिक व्हिडिओ अपलोड केले जात आहेत आणि या साईटला 100 दशलक्ष व्हिडिओ दृश्य मिळत आहेत.
14 फेब्रुवारी 2006 रोजी सद्दाम हुसेन न्यायधीशांच्या विरोधात उपोषणावर बसले.
14 फेब्रुवारी 2009 रोजी सानिया मिर्झा चा आजच्या दिवशी पट्टाया ओपन टेनिस च्या अंतिम फेरीत प्रवेश.
14 फेब्रुवारी 2013 मध्ये 1960 च्या महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या कायद्याला 97 व्या घटना दुरुस्ती अंतर्गत काही नवीन दुरुस्त्या सुचविल्या आहेत.
X X
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय बलाच्या सैनिकांची वाहतूक करणाऱ्या ताफ्यावर बॉम्बस्फोट घडवून आणला. दुपारी 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या महिंद्रा स्कार्पियो वाहनाने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली आणि लष्करी ताफा उडवला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यापैकी हा एक हल्ला मानला जातो. त्यामध्ये 40 सैनिक शहीद झाले. या ताब्यात 78 वाहने आणि सुमारे 2500 पेक्षा जास्त सैनिक होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील इस्लामिक गट जैश ए मोहम्मदने स्वीकारली होती. आदिल अहमद गादी टेकरवाला कमांडो या आत्महत्या हल्लेखोराचे नाव होते. या आत्महतघातकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेला एम एफ एन मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतल. हा हल्ला जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेखापोरा या अवंती पोराजवळ झाला.

14 फेब्रुवारी 1483 रोजी पहिला मुघल सम्राट हिंदुस्तान यातील मुगल सत्तेचा संस्थापक बाबर याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 26 डिसेंबर 1530 मध्ये झाला.
14 फेब्रुवारी 1925 रोजी भारत सरकार मध्ये केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारीया यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. महाराष्ट्रातील वनराई या संस्थेचे संस्थापक होते. त्यांचे शिक्षण पुणे या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यांचा मृत्यू 1 देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोक सेना नावाची त्यांनी संस्था सुरू केली. शेकडो तरुणांना याच्या माध्यमातून संघटित केले त्यानंतर त्यांनी पुण्यात नॅशनल लेबर सेंटरची स्थापना केली. 4 ऑक्टोबर 2013 मध्ये महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी झाला.
14 फेब्रुवारी 1933 मध्ये भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी उर्फ मधुबाला हिचा जन्म झाला. तिचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1969 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला.
मधुबाला
14 फेब्रुवारी 1950 रोजी भारतातील सुप्रसिद्ध वकील व केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचा जन्म झाला.
14 फेब्रुवारी 1952 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला राजनीति तज्ञ तसेच भारतीय केंद्रीय मंडळातील कॅबिनेट मंत्री राहिलेल्या सुषमा स्वराज यांचा जन्म अंबाला या ठिकाणी झाला. त्यांचा विवाह 1975 मध्ये स्वराज कौशल यांच्या सोबत झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे आई-वडिलांचे शर्मा हे आडनाव होते.त्यांच्याकडे परराष्ट्रमंत्री पद 2014 ते 2019 पर्यंत होते. संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा त्या निवडून आल्या वयाच्या पंचविशव्या वर्षी म्हणजे 1977 मध्ये त्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. 13 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998 पर्यंत दिल्लीच्या पाचव्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्या अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री, दूरसंचार मंत्री आरोग्य मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्री पदे सांभाळली. डिसेंबर २००९ ते मे 2014 या दरम्यान त्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या. 26 मे 2014 मध्ये त्या केबिन केंद्रीय कॅबिनेट मंत्री ते परराष्ट्रमंत्री राहिल्या. अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट या जर्णलने स्वराज यांना भारताच्या आवडत्या राजकारणी म्हणून निवडले होते. 6 ऑक्टोबर एकूण 2019 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. भारत सरकारने त्यांना 2020 चा पुरस्कार 8 नोव्हेंबर 2021 रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना मरणोत्तर पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले.

14 फेब्रुवारी 1960 रोजी भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले निरंजनानंद सरस्वती यांचा जन्म झाला.
14 फेब्रुवारी 1405 मध्ये मंगोलियन राजा तैमूर लंग याचा मृत्यू झाला. त्याचा जन्म 8 एप्रिल 1336 मध्ये झाला होता.
14 फेब्रुवारी 1964 मध्ये भारतातील भारतीय प्रशासन अधिकारी वी टी कृष्णमाचार यांचे निधन झाले.
14 फेब्रुवारी 1974 रोजी भारतातील आग्रा घराण्याचे गायक तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरु श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक जानेवारी 1900 मध्ये झाला होता.
14 फेब्रुवारी 1975 रोजी सुप्रसिद्ध ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचे निधन झाले. हक्सले यांनी 1934 मध्ये निसर्गवादी रोनाल्ड लोकली यांच्याबरोबर अलेक्झांडर कोरडा यांच्यासाठी जगातील पहिला नैसर्गिक इतिहास पट बनवला तो तो स्वतः दिग्दर्शित केला "द प्रायव्हेट लाईफ ऑफ द गणेट्स "यासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचा जन्म 22 जून 1887 रोजी झाला होता. हे एक ब्रिटिश उत्क्रांती वादी जीव शास्त्रज्ञ होते. 1935 ते 1942 मध्ये लंडनच्या झूलॉजिकल सोसायटी चे सचिव होते. युनेस्को चे पहिले संचालक, जागतिक वन्य जीव निधीचे संस्थापक सदस्य आणि ब्रिटिश युजेनिक्स सोसायटीचे ते अध्यक्ष 1959 ते 1962 पर्यंत होते . आणि ब्रिटिशांचे पहिले अध्यक्ष होते. 1953 मध्ये विज्ञानाच्या लोकप्रियतेबद्दल त्यांना युनोस्कोचे कलिंग पुरस्कार प्राप्त झाला. 1956 मध्ये रॉयल सोसायटीचे डार्विन पदक त्यांना प्राप्त झाले .1958 मध्ये लिनियन सोसायटीचे डार्विन वालेस पदक प्रदान करण्यात आले. 1958 मध्ये त्यांना नाईट हा किताब प्रदान करण्यात आला. चार्ल्स डार्विन आणि अल्फ्रेड रसेल वालेस यांनी नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीचा सिद्धांत जाहीर केल्यानंतर शंभर वर्षांनी 1956 मध्ये त्यांना लास्कर फाउंडेशन कडून नियोजित पालकत्व जागतिक लोकसंख्या श्रेणीमध्ये विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्यूलियन हक्सले
14 फेब्रुवारी 1995 रोजी इंग्लिश सुप्रसिद्ध लेखक पी जी उड हाऊस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1881 मध्ये झाला होता.
14 फेब्रुवारी 2005 रोजी भारतातील हिंदी साहित्याचे सुप्रसिद्ध साहित्यकार तसेच सुप्रसिद्ध लेखक विद्यानिवास मिश्र यांचे निधन झाले. हिंदीमधील ते सुप्रसिद्ध साहित्यिक होते त्यांचे दोन डझन पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित आहेत त्यामध्ये "महाभारत का काव्यर्थ" आणि "भारतीय भाषा दर्शन की पिठी का" हे मुख्य त्यांचे साहित्य आहे ललित निबंधामध्ये त्यांचे "तुम चंदन हम पाणी" 1957 मध्ये प्रसिद्ध झाले आणि "वसंत आ गया पर कोई उत्कंठा नही" हे 1972 मध्ये प्रसिद्ध झालेले साहित्य आहे. त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री 1999 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना मूर्ती देवी पुरस्कार 1989 मध्ये तर विश्वभारती सन्मान 1996 मध्ये प्राप्त झाला. हिंदीमधील उत्कृष्ट साहित्य बद्दल त्यांना साहित्य अकादमी का महत्व सदस्यता सन्मान 1996 आणि मंगलाप्रसाद पारितोषिक हे 2000 मध्ये प्राप्त झाले.

14 फेब्रुवारी 2007 मध्ये भारतातील मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री शामाचरण शुक्ल यांचे निधन झाले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. तसेच मध्य प्रदेश मध्ये ते तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या पदावर काम केले. मार्च 1969 ते जानेवारी 1972 हा प्रथम कालावधी .त्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री चा कालावधी डिसेंबर 1975 ते एप्रिल 1977 त्यानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ते डिसेंबर 1989 ते 1990 या दरम्यान राहिले. शुक्ल हे 1999 मध्ये महा समुंदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी 1925 मध्ये रायपूर या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील रविशंकर शुक्ला हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकीय नेते होते तसेच ते मध्य प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत.
X X
👆
February 13- Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 13 : दिनविशेष
👆
February 15 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 15 : दिनविशेष
XX
View, Comments and share......

.svg.png)

0 Comments