Subscribe Us

header ads

Sarojini Naidu : Indian political activist, feminist and poet.

Sarojini Naidu (Chattopadhyay): Indian political activist, feminist and poet.

"Nightingale of India" "Bharat Kokila"

सरोजिनी नायडू : भारताची कोकिळा, प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी

 जन्मदीन: 13 फेब्रुवारी

 स्मृतिदिन: 2 मार्च


बालपण आणि शिक्षण:

भारताची कोकिळा या विशेष नावाने ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू चट्टोपाध्याय यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये हैदराबाद या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. अघोरनाथ चट्टोपाध्याय व आईचे नाव वरदसुंदरी चट्टोपाध्याय हे होते. त्यांच्या वडिलांचे मूळ गाव ब्राह्मणगाव विक्रमपूर ढाका बंगाल प्रांत, सध्याचे बांगलादेश. 

त्यांचे वडील बंगाली ब्राह्मण होते व ते हैदराबाद कॉलेजचे प्राचार्य होते जे नंतर निजाम कॉलेज झाले. त्यांच्या वडिलांनी एडीनवर्ग विद्यापीठातून "डॉक्टर ऑफ सायन्स" मिळवलेली होती. व त्यांची आई ही बंगालीत खूप सुंदर कविता लिहीत असत कदाचित आईचा गुण हा कवयित्रीचा त्यांच्यामध्ये आलेला असावा.

सरोजिनी वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे 1891 मध्ये मद्रास इलाख्यात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाल्या. त्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या परंतु पदवी न मिळताच त्या भारतात परत आल्या. 

इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर जिथे त्यांनी मताधिकारवाधिका म्हणून काम केलं त्या ब्रिटिश राजवटी पासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीकडे आकर्षित झाल्या. त्या भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा एक भाग बनल्या, महात्मा गांधी आणि त्यांच्या स्वराज्याच्या कल्पनेच्या अनुयायी झाल्या.

सरोजिनी यांचा विवाह डॉ. मुत्तयल्ला गोविंदा नायडू यांच्यासोबत आंतरजातीय पद्धतीने 1898 मध्ये संपन्न झाला. त्यांना जयसूर्या ,पद्मजा, रणधीर, लीलामनी ही अपत्य झाली होती.

X X

कवयत्री सरोजिनी नायडू:

भारतीय जनता सर्वजणी नायडू यांना भारताची कोकिळा या विशेष नावाने ओळखतात. ही त्यांची ओळख म्हणजे त्यांच्या कविता त्यांच्या कवितेतील रंग गुणात्मक दर्जा प्रतिमा आणि गीतात्मक गुणवत्ता हे होय. त्यांची आई बंगाली कवयित्री होती. कदाचित कवितेची प्रतिभा त्यांनी त्यांच्या आईकडून आत्मसात केली असावी.

सरोजिनी नायडू यांच्या कवितेत लहान मुलांच्या कविता आणि देशभक्तीपर कविता तसेच प्रणय आणि शोकांतिका यासह अनेक गंभीर विषयावर लिहिलेल्या कवितांचा समावेश आहे. 

एका हिंदी महिलेने अतिशय सुरेख इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टीकोन आणि प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण होत्या.

1912 मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा लोकप्रिय कविता "इन द बाजारस ऑफ हैदराबाद" ही होती.


सरोजिनी नायडू यांचे कार्य:

सरोजिनी नायडू यांनी बालपणी वयाच्या तेराव्या वर्षी बाराशे ओळींचे "लेडी ऑफ द लेक" नावाचे एक खूप मोठे खंड काव्य लिहिले होते. त्या लहानपणी अतिशय तल्लत बुद्धीच्या होत्या त्यांना 1918 मध्ये मद्रास्रांतीय संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवावे असे तेथील लोकांना वाटले व ते त्यांनी भूषविले.

सरोजिनी नायडू अखिल भारतीय होमरूल लीगच्या प्रतिनिधी मंडळातील एक सदस्य या नात्याने 1919 मध्ये त्या इंग्लंडचा दौरा करून भारतात परत आल्या. त्यांनी 1925 मध्ये कानपूर येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष स्थान भूषविले होते. आत्तापर्यंतच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांमध्ये महिला अध्यक्ष म्हणून त्यांना पहिल्यांदा सन्मान मिळाला होता. होमरूल लीग चळवळीत ॲनी बेझंट आणि सीपी रामस्वामी अय्यर यांच्याबरोबर भारतभर फिरल्या.

महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली गुजरात मधील धारासन येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी 1930 मध्ये खूप धैर्याने आणि हिमतीने केले. 

6 एप्रिल 1930 रोजी दांडी यात्रेत गांधीजींना अटक करण्यात आली तेव्हा सरोजिनी नायडू यांची त्या मोहिमेच्या नव्याने त्या म्हणून नियुक्ती झाली होती. पुढे गांधी आयर्विन कराराच्या पार्श्वभूमीवर व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी सरोजिनी नायडू यांना 1932 मध्ये तुरुंगात टाकले.


1942 मध्ये झालेल्या चलेजाव चळवळीत त त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला व त्यामुळे त्यांना 21 महिने तुरुंगवास भोगाव लागला होता. नायडू यांनी गोखले यांना गुरुस्थानी मानले होते आणि महात्मा गांधींचे नेतृत्व स्वीकारून संपूर्ण चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले होते.

देशात दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेचे अध्यक्ष स्थान सरोजिनी नायडू यांनी 1947 मध्ये भूषविले होते.

X X

अहिंसा चळवळ:

1917 नंतर सरोजिनी नायडू गांधीजींच्या ब्रिटिश राजवटीविरुद्ध अहिंसक प्रतिकाराच्या सत्याग्रह चळवळीत सामील झाल्या. ब्रिटिश राजवटी पासून मुक्त होण्याच्या त्यांच्या यात प्रयत्नांना एक भाग म्हणून ऑल इंडिया होमरूल लीगचा एक भाग म्हणून नायडू 1919 मध्ये लंडनला गेल्या पुढल्या वर्षी त्यांनी भारतातील असहकार चळवळीत भाग घेतला.

सरोजिनी नायडू यांनी आपले वास्तव्य हैदराबाद मधून मुंबईत हलविले मुंबईत आल्यानंतर त्या महानगरपालिकेमध्ये सभासद मधून म्हणून निवडूनही आल्या पुढे त्या प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्ष 1921 मध्ये झाल्या. काँग्रेसच्या सर्व ध्येयधोरणात त्या हिरीरीने भाग घेत असत कलकत्ता येथे भरलेल्या 1907 च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

1908 मध्ये विधवा विवाह परिषदेत सरोजिनी नायडू यांनी स्त्रियांच्या चळवळींचा पाया घातला आणि त्या ठिकाणापासून स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.

सरोजिनी नायडू यांनी 1924 मध्ये पूर्व आफ्रिकन इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. सरोजिनी 1927 मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेच्या त्या संस्थापक सदस्य होत्या.






राज्यपाल म्हणून कार्य:

भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती 1947 मध्ये करण्यात आली होती. 

स्वतंत्र भारतातील महिला राज्यपाल होण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला. राज्यपाल पदावर त्या 1949 पर्यंत कार्यरत होत्या.


ग्रंथसंपदा/कवितासंग्रह:

1. दि गोल्डन थ्रोशोल्ड

2. द बर्ड ऑफ टाईम (1912)

3. द ब्रोकेन विंग (1917)

इत्यादी त्यांची कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.

4. "लेडी ऑफ द लेक"

X X

पुरस्कार व सन्मान:

1. 1947 मध्ये स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल म्हणून निवड.

2. 1918 मद्रास प्रांतीय संमेलनाचे अध्यक्षपद.

3. 1925 मध्ये कानपूर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद.

1908 मध्ये भारत सरकार तर्फे "कैसर ए हिंद" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना पूर निवारणासाठीच्या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे प्राप्त झाला पण हा पुरस्कार 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांड यांच्या निषेधार्थ परत केला.


सरोजिनी नायडूंच्या विशेषता:

भारतीय जनता सर्वजणी नायडू यांना "भारताची कोकिळा" या विशेष नावाने ओळखतात. ही त्यांची ओळख म्हणजे त्यांच्या कविता त्यांच्या कवितेतील रंग गुणात्मक दर्जा प्रतिमा आणि गीतात्मक गुणवत्ता हे होय.

पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष होण्याचा बहुमान.

पहिली भारतीय महिला राज्यपाल होण्याचा मान सन्मान.


निधन:

भारताच्या कोकिळा भारतातील पहिल्या राज्यपाल महिला सरोजिनी नायडू यांचे निधन 2 मार्च 1949 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या ठिकाणी झाले.












View, Comments and share.......

Post a Comment

1 Comments