Jagannath Shankarsheth Murkute alias Nana Shankarsheth : Indian Philanthropist and Educationalist
जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ : मुंबईचे शिल्पकार,मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती
10 फेब्रुवारी: जयंती
31 जुलै : स्मृतीदिन
बालपण आणि शिक्षण:
"जस्टिस ऑफ द पीस", "मुंबईचा अनभिषिक्त सम्राट", "मुंबईचे शिल्पकार" जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबई जवळील मुरबाड या ठिकाणी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव शंकरशेठ तर आईचे नाव भवानीबाई हे होते. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली.
नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली.
नानांचे घराणे दैवज्ञ ब्राम्हण (सोनार) होते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे आडनाव मुरकुटे असे होते. त्यांचे वडील शंकरशेठ यांनी व्यापारात अमाप संपत्ती कमावली होती. त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले.
नानांचे वडील 1822 मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली.
व्यापारधंद्याचा प्रचंड व्याप असताना सुद्धा त्यांना सार्वजनिक कार्याची अत्यंत आवड होती.
नानांचा त्या काळातील अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थाशी निकटचा संबंध होता.
त्यापैकी बऱ्याच संस्थांची उभारणी त्यांच्याच प्रयत्नाने व पुढाकाराने झाली होती.
त्यांच्या या कार्यामुळेच 'आधुनिक मुंबईचे निर्माते' किंवा 'मुंबईचे शिल्पकार' असे त्यांना ओळखले जाते.
X X
आधुनिक मुंबईचे निर्माते:
नाना शंकरशेट यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला.
महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या.
गॅंस कंपनी सुरू केली. धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.
X X
शैक्षणिक संस्थांची स्थापना:
हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे यासाठी एल्फिन्स्टनने 1822 मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते.
ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली.
पुढे हिचे 1824 मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले.
नानांनी बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवपंत छत्रे इत्यादींच्या सहकार्याने मुंबईत 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' या शिक्षण संस्थेच्या विद्यमाने त्यांनी मुंबई शहरात व मुंबईबाहेरही अनेक शाळा व कॉलेज उघडले गेले.
या संस्थेचे एल्फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (1837) तिला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले.
शिक्षण प्रसारासाठी मुंबईत एका भारतीयाने स्थापन केलेली ही पहिलीच संस्था होती.
दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत 'स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी' ही संस्था 1845 मध्ये स्थापन केली.
नानांनी या संस्थेला सर्वतोपरी मदत केली. भारतीय समाजात 'विद्येचा व ज्ञानाचा प्रचार व्हावा आणि येथील युवकांत सार्वजनिक कार्याची आवड उत्पन्न व्हावी हा संस्था स्थापनेचा उद्देश होता.
मुंबई विभागाचे गव्हर्नर माऊंट एल्फिन्स्टन यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांच्या निवृत्तीनंतर स्मारक उभारण्यासाठी नानांनी पुढाकार घेऊन एक फंड जमविला.
या फंडातून मुंबईत 'एल्फिन्स्टन कॉलेज' ची स्थापना त्यांनी केली.
तसेच रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरच्या स्मरणार्थ मुंबईत ' ग्रँट मेडिकल कॉलेज' ची स्थापना करण्यात नानांचा पुढाकार होता.
X X
उल्लेखनीय सामाजिक कार्य:
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले.
या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
लॉर्ड विल्यम बेटिंग याने सतीची चाल बंद करणारा कायदा 1829 मध्ये केला. या कायद्याला भारतातील सनातनी लोकांनी विरोध केला.
या कायद्यामुळे भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला.
अशा वेळी नानांनी महाराष्ट्रात या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले.
सरकारने सोनापूरची स्मशानभूमी 1836 मध्ये शिवडीला हलविण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे जनतेच्या अनेक गैरसोयी होणार होत्या. जनता या निर्णयाविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत होती.
जनतेच्या भावना लक्षात घेऊन नानांनी लोकांच्या गैरसोयी गव्हर्नरांना पटवून दिल्या. शेवटी गव्हर्नरांनी तो निर्णय रद्द केला.
भिवंडी येथे अज्ञात इसमांनी विठ्ठलाची मूर्ती 1837 मध्ये फोडली. त्यामुळे जातीय दंगल झाली.
हिंदूंनी मुस्लिमांच्या विरुद्ध कोर्टात फिर्याद दाखल केली. निकाल हिंदूंच्या विरुद्ध लागला. लोक नानांकडे गेले. नानांनी गव्हर्नरांची भेट घेऊन खटल्याची फेरतपासणी करविली.
दंगखोरांना कडक शिक्षा होऊन त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला.
X X
स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते:
जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा 1849 मध्ये या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या. 1857 मध्ये "द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल" सुरू केले.
1855 मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची 1845 मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली.
अॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेट होते.
X X
बॉम्बे असोसिएशनची स्थापना:
जगन्नाथ शंकरशेठ व दादाभाई नौरोजी यांनी 'बॉम्बे असोसिएशन' या संस्थेची स्थापना 1852 मध्ये केली.
'बॉम्बे असोसिएशन' ही आधुनिक काळातील भारतातील राजकीय स्वरुपाची पहिलीच संस्था होय, असे म्हणता येईल.
पुरस्कार व सन्मान:
1) संस्थापक अध्यक्ष - बॉंम्बे असोसिएशन
2) सभासद - बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी
3) उपाध्यक्ष -स्कुल ऑफ इंडस्ट्रीज
4) अध्यक्ष - डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट
5) सदस्य - सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल), 1846 मध्ये मुंबईच्या म्युनिसिपल कमिशनवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
6) सदस्य - बोर्ड ऑफ एज्युकेशन , 1840 मध्ये मुंबई विभागातील शिक्षणव्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी सरकारने 'बोर्ड ऑफ एज्युकेशन' ची स्थापना केली होती. हे बोर्ड अस्तित्वात असेपर्यंत म्हणजे 1840 पासून ते 1856 पर्यंत नाना त्याचे सदस्य राहिले होते.
7) सदस्य- नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी
8) विश्वस्त - एल्फिन्स्टन फंड.
9) अध्यक्ष - पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती )
10) संस्थापक - जगन्नाथ शंकरशेठ स्कुल
11) संस्थापक सभासद - जे. जे. आर्टस् कॉलेज
12) सदस्य - मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ
13) फेलो -मुंबई विद्यापीठ , 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यावर या विद्यापीठाचे फेलो म्हणून नांनांची नियुक्ती करण्यात आली.
14) अध्यक्ष - हॉर्टिकल्चर सोसायटी
15) अध्यक्ष - जिओग्राफिकल सोसायटी
16) डायरेक्टर - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी
17) ट्रस्टी - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी
18) सदस्य - द इनलॅंड रेल्वे असोसिएशन
19) संचालक /सदस्य - ग्रेट ईस्टर्न रेल्वे
20) आद्य संचालक - रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने)
21) संचालक - बँक ऑफ वेस्टर्न इंडिया
22) संचालक - कमर्शिअयल बँक ऑफ इंडिया
23) संस्थापक - द मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया
24) संचालक/अध्यक्ष - बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना )
25) अध्यक्ष - बादशाही नाट्यगृह
26) पहिले देशी मॅजिस्ट्रेट
27)1835 मध्ये नानांना 'जस्टिस ऑफ द पीस' चा बहुमान प्राप्त झाला होता.
X X
जगन्नाथ शंकरशेठ यांची विशेषता:
जगन्नाथ शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचे निर्माते म्हणून संबोधतात.
नानांना मुंबईचे शिल्पकार सुद्धा म्हणतात.
मुंबईचा अनभिषिक्त सम्राट - असे आचार्य अत्रे म्हणतात.
निधन:
"जस्टिस ऑफ द पीस", "मुंबईचा अनभिषिक्त सम्राट", "मुंबईचे शिल्पकार" नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे 31 जुलै 1865 रोजी मुंबई या ठिकाणी निधन झाले.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/01/february-10-day-of-special-dinvishesh.html
👆
February 10 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 10: दिनविशेष
View, Comments and share......
X X
5 Comments
Very nice
ReplyDelete👍
ReplyDeleteVery nice
ReplyDelete👍
ReplyDelete👍
ReplyDelete