Subscribe Us

header ads

Pandit Deendayal Upadhyaya: Sangha pracharak, President Jansangh

पंडित दीनदयाळ उपाध्याय : एकात्म मानवदर्शन प्रणेते, संघ प्रचारक, जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष.

Pandit Deendayal Upadhyaya: Sangha pracharak, President Jansangh, 

25 सप्टेंबर : जन्मदिन

11 फेब्रुवारी : स्मृतिदिन 


बालपण आणि शिक्षण 

भारत वर्षाच्या पावन भूमीत ब्रजवनस्थळी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस एका महान चिंतकाने लागला चंद्रभान या गावात जन्म घेतला. ही भूमी श्रीकृष्णाची जन्मभूमी म्हणून मथुरा या नावाने ओळखली जाते. भारताला एकात्म मानवतावाद म्हणजे इथून तिथून मनुष्य सारा एक हा संदेश पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी दिला. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 मध्ये पंडित भगवतीप्रसाद उपाध्याय यांच्या घरी झाला. पण वयाच्या सातव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे लहानपणापासून त्यांना संकटाशी सामना करावा लागला. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती वडील रेल्वेमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची आणि त्याचा परिणाम असा झाला की, नवीन रोज नवीन शाळा ही त्यांच्या वाट्याला नेहमी आले. पण सरस्वती माता त्यांच्यावर प्रसन्न असल्यामुळे ते प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक उत्तीर्ण होत असत. त्यांनी आपल्या मामांकडे चौथीपर्यंतचे शिक्षण गंगापूर सिटी राजस्थान या ठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर मामानी त्यांना पुढील शिक्षणासाठी कोटा राजस्थान या ठिकाणी ठेवले. त्यावेळी त्यांची व्यवस्था सेल्फ सपोर्टिंग हाऊस मध्ये केली. 12 ऑगस्ट 1926 रोजी पाचव्या वर्गात त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांनी तेथे सातवीपर्यंत शिक्षण घेतले. ते ज्या ठिकाणी राहत असत तेथील विद्यार्थी तसेच त्यांचा मामेभाऊ बनवारीलाल रात्री झोपल्यानंतर त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास हे रात्री करायचे. त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होती. साक्षात त्यांच्या मेंदूमध्ये सरस्वती वास करत होती. आणि सरस्वतींची त्यांच्यावर अजन्म कृपा होती. त्यामुळे माध्यमिक शाळेत तर ते सर्वप्रथम आले आणि आठवी आणि नववी मध्येही सर्वप्रथम आले. त्यामुळे त्यांचे सर्वांना कौतुक वाटत असेल. राजगड हायस्कूलमध्ये असताना विद्यार्थ्याला विना पगडी येण्याचा मज्जाव असे. त्यामुळे सर्वजण पगडी घालून येत असेल. चांगली पक्की पगडी पंडितजींना घालता यायची नाही. तरी पण त्यांचे सर्व साथीदार त्यांचा आदर करत असाल. त्यांचे मामा श्री नारायण शुक्ल यांची बदली राजगडहून सिकर मध्ये 1934 मध्ये झाली. त्यामुळे सिकर मधील कल्याण हायस्कूलमध्ये त्यांना दहावीची परीक्षा द्यावी लागली. आणि त्यावेळेसच्या अजमेर बोर्डामध्ये ते सर्वात सर्वप्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यांचा भूमिती आणि गणिताचा पेपर इतका छान होता की, शाळेने तो पेपर अनेक वर्ष जपून ठेवला. त्यावेळेसचे अजमेर चे घनश्यामदास बिर्ला महाराजांनी त्यांना सत्कारासाठी बोलवले. तेव्हा महाराजांनी त्यांना आपणास काय पाहिजे असे विचारले. तर त्यांनी फक्त तुमचा आशीर्वाद द्या. असा महाराजांना म्हणले. त्यावर महाराजांनी खुश होऊन त्यांना 10 रुपये मासिक शिष्यवृत्ती प्रदान केली. तसेच एक सुवर्णपदक आणि शाळेच्या पुस्तकासाठीचा खर्च 250 रुपये सुद्धा दिला. आणि जोपर्यंत तुम्ही शिकाल तोपर्यंत चा खर्च आम्ही देऊ असे महाराजांनी त्यांना सांगितले. 

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पिलानी या ठिकाणी त्यांनी महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी ठरवले व त्यांनी 1935 मध्ये आपल्या उच्च शिक्षणाला सुरुवात केली. मामाने त्यांच्या मुलाला बनवायला सुद्धा त्यांच्यासोबत पाठवणे जवळपास तीन वर्षे ते एकत्र शिक्षण घेत होते. 1936 मध्ये पिलानी या ठिकाणी सुद्धा ते वर्गात सर्वप्रथम आले. 

संघ कार्यात सहभाग :

1937 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी प्रवेश केला. सुंदर सिंह भंडारींनी संघाच्या विशिष्ट तेची ओळख त्यांना करून दिली आणि त्यांना शाखेमध्ये बरोबर घेऊन जाऊ लागले आणि त्यांची संघ कार्यात वरचेवर आवड निर्माण होत गेली. रोज अध्यापनाबरोबरच संघ कार्यात लक्ष घालून लागले. कानपूरला असताना नवाबगंज या ठिकाणी ते राहत होते. त्याच ठिकाणी संघाची शाखा लागत होती. 1936 मध्ये त्यांनी संघ शिक्षा वर्गाचे पहिले वर्ष पूर्ण केले. 1942 मध्ये द्वितीय वर्ष पूर्ण केले आणि सरळ संघ विस्तारकाच्या ते कामाला लागले. त्यांचे अभ्यास प्रवृत्ती प्रेम जिव्हाळा आणि परिश्रम करण्याची वृत्ती आणि कुशाग्र बुद्धी यामुळे संघटन कौशल्यात त्यांनी खूप मोठी जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण उत्तर प्रदेश संघकार्याच्या सहप्रांत प्रचारकांची जबाबदारी ही स्वप्नात आली. ती सुद्धा त्यांनी अतिशय कौशल्याने पूर्णत्वास नेली. 

यादरम्यान महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर या हत्येचा आरोप म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी करण्यात आली. त्या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाची भूमिका उत्तर प्रदेश मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर देण्यात आली. त्यांनी कुशाग्र बुद्धीने कुठलीही गालबोट न लावता किंवा हिंसक वळण न येऊ देता कुशाग्र बुद्धीने ती जबाबदारी पार पाडली. त्यावेळी त्यांचे वय फक्त 32 वर्षाचे होते आणि काही काळानंतर संघावरील बंदी उठवण्यात आली आणि आटक केलेल्या स्वयंसेवकांना जेलमधून सोडण्यात आले. त्याचे सुद्धा संचालन पंडितजींनी आपल्या लेखणीतून सुद्धा चालूच ठेवले होते. सतत संघासाठी उद्बोधन वर्ग नेहमी ते घेत असत. आपल्या लेखणीतून पंचजन्य मासिकामधून प्रबोधन करत असत. त्यामुळे सरकारने पंचजन्येवर सुद्धा बंदी आणली. त्याचे प्रकाशन रोखले गेले. त्यामुळे पंडितजींनी हिमालय नावाचे मासिक काढले. त्यावरही सरकारने बंदी आणली त्यानंतर त्यांनी राष्ट्रधर्म मासिक काढले. पण त्यांची लेखणी सतत नियमित चालत असे.


पंडितजींचे मित्रांसोबत अभ्यास तंत्र :

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे ते दुसऱ्याची काळजी घेत असत. त्यांच्या अभ्यासाची वेळ रात्री दहा वाजे नंतर असायची ते सकाळी चार वाजेपर्यंत ते अभ्यास कंदीलाच्या मदतीने करत असत. सकाळी चार वाजता झोपून नंतर आठ वाजता उठायचे. त्यांच्याकडे त्यांचे बरोबर शिकणारे काही मित्र अभ्यासासंबंधी काही विचारणा करण्यासाठी यायचे त्यावर त्यांनी एक उपाय काढला. "झिरो असोसिएशन" नावाची त्यांनी एक विद्यार्थी जीवनातच एक संघटना निर्माण केली. वाचन लेखन अभ्यास चिंतन हा त्यांचा मूळ छंद होता वाचनाला वेळ मिळावा म्हणून ते पॅसेंजरने प्रवास करत असत. अर्थशास्त्रावरील 500 तरी किमान पुस्तके त्यांनी वाचली असावी. हे विद्वाना बरोबर विद्वान आणि सामान्य बरोबर सामान्य असा त्यांचा मूळ स्वभाव होता.

जे विद्यार्थी अभ्यासात कच्चे होते. त्यांना फक्त पास व्हावे असे वाटायचे त्यांना पंडित जी अभ्यासासाठी मदत करत असत आणि त्यांचे विद्यार्थी मित्र आभार मानत असत .पंडितजी 1937 मध्ये इंटर बोर्डच्या परीक्षेला बसले आणि बोर्डात सर्वप्रथम आले. त्यांनी घेतलेल्या बिर्ला कॉलेजमध्ये अशा प्रकारचे मार्क कोणीही घेतले नव्हते. त्यामुळे त्यांचे घनश्यामदास बिर्ला यांनी सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला. पिलानी या ठिकाणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बीएपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी कानपूरला गेले. तेथे त्यांनी एच डी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि वस्तीग्रह मध्ये ते राहत असत. त्यांच्या वर्गमित्रांमध्ये बलवंत महाशिंदे म्हणजेच सुंदर सिंह भंडारी हे प्रमुख होते. त्यांनी आग्रा येथील सेंट जॉर्ज कॉलेजमध्ये एम ए ला प्रवेश घेऊन पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केली. त्या ठिकाणी त्यांना नानाजी देशमुख आणि भाऊ जुनादे यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि संघ कार्याची सुरुवात झाली.


संघ प्रचारक ते जनसंघाची स्थापना:

1939 मध्ये ते सनातन धर्म कॉलेजमध्ये बी ए मध्ये प्रथम श्रेणीत पास झाले. याच कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. 1942 मध्ये त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार म्हणून लखिंपुर येथे नियुक्ती झाली. त्यांनी 1951 पर्यंत प्रचारक म्हणून संघामध्ये काम केले. पण त्यानंतर परमपूज्य गोळवलकर गुरुजींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी त्यांना राजकारणात पाठवले. पंडितजींनी 21 सप्टेंबर 1951 मध्ये लखनऊ या ठिकाणी प्रादेशिक संमेलन बोलावून जनसंघाची स्थापना केली. त्यालाच त्यांनी अखिल भारतीय रूप देण्याचा प्रस्ताव दिला आणि तो सर्व संमत झाला. एका महिन्याच्या आतच त्यांनी 21 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय अधिवेशन बोलून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघाला अखिल भारतीय पक्षाचे स्वरूप प्राप्त केले आणि तेथे त्यांच्यावर महामंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी मामाच्या आग्रहास्तव प्रशासनिक सेवेत परीक्षेत बसले आणि ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झाले. पण त्यांना नोकरी करायची नव्हती. मामांची परवानगी घेऊन ते बी टी करण्यासाठी प्रयाग येथे गेले आणि तेथून त्यांनी वसतिगृहात राहून संघ कार्य नियमितपणे सुरू केले.

संघ प्रशिक्षण घेऊन त्यांनी संघ कार्यासाठी आपले जीवन वाहून घेतले. उत्तर प्रदेशातील लखिंपुर खिरी जिल्ह्यामध्ये प्रचारक म्हणून त्यांना पाठवण्यात आले. हे कुशल कार्यकर्ता म्हणून 1942 पासून संघ कार्यात मन लावून ते काम करत होते. संघ दौरा आटोपून लखिंपुरला आल्यानंतर त्यांनी एका स्वयंसेवकाला आपली शिक्षणाची सर्व कागदपत्रे जाळून टाक असा आदेश दिला. जेव्हा त्या स्वयंसेवकाने विचारले हे तर आपले फार महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. तेव्हा त्यांना पंडितजी म्हणाले," मी म्हणतो ना जाळून टाक, कारण मातृभूमीच्या सेवेसाठी जेव्हा जीवनदान देण्याचा निश्चय झाला आहे. तर नोकरीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांचा लोभ कशासाठी ! जाळून टाक. त्यांना असे सांगितले. किती राष्ट्रभक्ती किती देशभक्ती हे त्यातून दिसते. कारण त्यांनी आपले जीवनच राष्ट्र कार्यासाठी अर्पण केले. तिथे कागदपत्रांची काय गत. ती कागदपत्र जळताना त्यांनी स्वतःच्या आत्म्यावर मोहावर प्रलोभनावर विजय मिळवला होता. ते हसत होते आणि ते हसणे त्यांचे विजयाचे होते.

त्यांनी कधीही लग्न केले नाही. कारण संसार न करण्यामागे त्यांच्या मनात एकच भावना होती. एकच लक्ष होते. समाजाची सेवा निस्वार्थपणे करण्यास मिळावी. लहानपणापासूनच त्यांची सेवा भक्ती होते. ते निर्विकार भावनेने राष्ट्रसेवा करत. स्वतःचे जीवनध्ये अनिष्ट आणि आदर्शवादी बनवून घालवावे असे त्यांचे मत होते. लोकांना फक्त उपदेश नको तर सर्वसामान्य आचरण करून लोकांसमोर उदाहरण ठेवण्यास व त्यांचा विश्वास होता.


स्वतंत्र भारत आणि राजकीय प्रवास :

भारत स्वतंत्र झाला आणि देशाचे दोन तुकडे पडले पाकिस्तानची निर्मिती झाली आणि तेथून हिंदूंचे लोंढेच्या लोंढे घरदार सोडून भारतात परत आले. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पैसा प्राण या ची खूप मोठी हानी झाली. म्हणून हिंदू हितासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला पाहिजे असे विचारवंत लोकांना वाटू लागले. त्यामुळे तत्कालीन विरोधी पक्षाचे संसद सदस्य डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पुढाकार घेतला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वर संगचालक परमपूज्य गोळवळकर गुरुजी यांना भेटले. त्या भेटीमध्ये डॉ. मुखर्जींना पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी मुखर्जींना मदत करावी असे सांगितले. संघ कार्याव्यतिरिक्त पंडितजींना कोणताच राजकीय अनुभव नव्हता. पण संघाने काम सोपवले आहे. प्राणपणाने सातत्याने करायचे अशी जिद्द त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे सर्व संघसह त्यांना राजकीय पक्षाची गरज वाटू लागली आणि जनसंघाची स्थापना झाली. 

स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत जनसंघाला केवळ तीन जागा मिळाल्या. पण मतांच्या टक्केवारी त्यास अखिल भारतीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. ही गोष्ट सामान्य नव्हती त्यामध्ये दीनदयालजींचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळेस डॉ. मुखर्जी म्हणाले की," आणखी दीनदयाळ सारखे दोन कार्यकर्ते मिळाले तर मी देशाचा नकाशा बदलून टाकेल." त्याकाळी भारत मैत्री समितीच्या निमंत्रणावरून पंडितजींना अमेरिकेला जाण्याचा व्याख्याने देण्याचा योग आला. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना कोट पॅन्ट बूट टाई ची व्यवस्था केली. एरवी ते संपूर्ण भारतीय धोती कुडता पायजमा तोही खादीचा असा घालत असत. पण त्यांनी अभ्यासपूर्ण परदेशामध्ये व्याख्याने दिली आणि ती तेथील श्रोत्यांना भाषणे खूप आवडली आणि भारतातील वर्तमानपत्रांनी तर या वैशिष्ट्यपूर्ण नेत्याची दखलच घेतली. पत्रकारांनी त्यांना परिवाराबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले संघ माझा परिवार आहे. 

पंडितजींनी लखनऊ येथे राष्ट्रधर्म मासिकाची स्थापना केली. त्या वेळेला श्री भाऊसाहेब देवरस उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय सभेचे संघाचे प्रांत प्रचारक होते. त्यांच्याच प्रेरणेने सुरुवात झाली. त्याचवेळी साप्ताहिक पांचजन्य आणि दैनिक स्वदेशीचे सुद्धा देखील प्रकाशन करण्यात आले. त्यावेळेस त्यांचे सहकारी म्हणून अटल बिहारी वाजपेयी नानाजी देशमुख हे काम करत असत. ही प्रकाशने त्यांच्या कठोर कामाचे फळ होते. या प्रकाशनाची त्यांनी संचालकच नव्हते तर संपादक कंपोजर यंत्रचालक आणि वितरक असे अनेक प्रकारचे काम ते करत असत. जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे प्रत्येक कामगाराचे सुद्धा ते काम करत असतात. म्हणूनच लोक त्यांची प्रेरणा घेत होते. श्रमाची उपासना करण्यावर त्यांचा भर होता आणि त्यांचा त्यावर विश्वासही होता. संघकार्य हीच त्यांच्या जीवनाची एकमेव प्रबळ प्रेरणा होती. त्यांच्या जगण्यामागील तोच एक पवित्र हेतू होता. त्यामुळे संघ कार्यासाठी आवश्यक अशा उपयुक्त कामाची जबाबदारी दीनदयालजिकडे येत गेली. आता फक्त ध्येय सागरात स्वतःला झोपून देऊन फक्त पोहोच राहायचे पैलतिरा वरील यशो मंदिराकडे जाण्याची भावना त्यांच्यामध्ये रुजत होती. पंडित जी 1943 ते 1963 असे सुमारे पंधरा वर्षे त्या अखिल भारतीय संघटनेचे महामंत्री होते. ज्या संघटनेचे स्थान 1942 ते 1957 मध्ये नगण्य होते. तेच त्यांनी 1962 ते 67 या काळात दुसऱ्या स्थानावर आणून ठेवले. 1967 मध्ये दीनदयाळजींनी अविरत साधनेने आणि अखंडप्रयासाने राजकारणाला एक नवीन मार्ग दाखवला. आणि तोच मार्ग एकात्म मानववाद या रूपात जीवनदर्शनाचा मार्ग ठरला.


लोकसभेची निवडणूक :

1963 मध्ये जोनपुर मधून लोकसभेची निवडणूक पंडितजींनी लढवावी असा आग्रह प्रांत प्रचारक माननीय भाऊराव देवरस यांनी धरला. पंडितजी त्यासाठी तयार नव्हते. पण लोकसभेत जनसंघाचे नेतृत्व करण्याची गरज होती ही आज्ञा मानून दीनदयालजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले. त्या पक्षाची ताकद फार मोठी नव्हती. त्यामुळे ते पडले आणि दुसरे दिवशी दीनदयाची हसतमुखाने संघ शिक्षा वर्गाला हजर राहिले.


पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि सावरकर :

स्वातंत्र्यवीर सावरकर कानपूर येथील बी एन एचडी कॉलेजमध्ये भाषण देण्यासाठी सायंकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळेला पंडित दीनदयालयाची सुद्धा त्या कार्यक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते. सावरकरांचे भाषण झाल्यानंतर पंडितजींनी त्यांना भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेला सावरकरांकडे वेळ नसल्यामुळे कारण त्यांना सकाळी सात वाजता गाडी होती. पण रात्रीची वेळ नसली तरी सकाळी पाच वाजताची वेळ तरी तुम्ही आम्हाला द्यावी. सावरकरांना आश्चर्य वाटले सकाळी पाच वाजता पण पंडितजींनी सर्व सेवा सेवकांना रात्रीच कळवले की उद्या सकाळी संघ शाखेवर पाच वाजता सावरकरांची भेट होणार आहे. तरी सर्वांनी वेळेच्या पूर्वी उपस्थित राहावे आणि तब्बल 28 स्वयंसेवक आणि आजूबाजूचे काही व्यक्ती सकाळी पाच वाजता संघ शाखेवर उपस्थित राहिले. सावरकरांनी ते सकाळी दृश्य पाच वाजता चे पाहिले आणि पंडितजींचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ. हेडगेवार यांचे खरंच खूप कौतुक केले. एवढ्या कमी वेळामध्ये सर्वांचे एकत्रिकरण शिस्त ही कार्य राष्ट्राला शक्तिमान बनवेल हे संपूर्ण देशात फैलावेल असा विश्वासही त्यांना वाटला. 


पंडितजी आणि स्वदेशी वस्तूंचा वापर :

पंडित दीनदयाळजींचा स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यास फार मोठा आग्रह असे. ते आपल्या स्वयंसेवकांना स्वदेशी वस्तूंची खरेदी करा, वापरा आणि ती उपयोगात आणा असा उद्देश नेहमी करत असत. जोपर्यंत आपण स्वतः त्याचे आचरण करणार नाही तोपर्यंत आपल्या सांगण्याचा काही प्रभाव पडणार नाही असा सल्ला ते नेहमी देशी वस्तूंचा वापर करण्यासाठी विशेष रूपाने प्रयत्नशील असत. 


पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि त्यांचा कौटुंबिक परिवार :

पंडित दीनदयाळ उपाध्याय जेव्हा जनसंघाचे महामंत्री होते. संघ प्रचारक होते. त्या काळामध्ये ते मथुरेला आपल्या आजीला भेटायला गेले. त्यातच त्यांचे मामा यांचे निधन झाले. त्या ठिकाणी ते मामाच्या तेराव्यापर्यंत थांबून स्वतः एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा त्यांनी सर्व कामे स्वतः केली. त्यापूर्वी त्यांच्या मामांची शेवटची इच्छा होती की द्वारकेला जाण्याची ती सुद्धा 1960 मध्ये त्यांनी आपल्या मामा-मामी आजींना घेऊन द्वारकेस गेले. पंडित जी एक साधारण परिवारातील सदस्य होते. त्यांचे जीवन सरळ साधे आणि उदार होते. त्यांचा स्वभाव अत्यंत सरळ व नम्र सेवाभावी वृत्तीचा होता.


पंडितजींचा एकात्म मानववाद :

पंडित दीनदयालजींनी एकात्म मानवादाच्या आधारावर गावच्या आर्थिक विकासासाठी विकेंद्रीत अर्थव्यवस्था केली. प्रत्येक हाताला काम प्रत्येक शेतीला पाणी उद्योगाचे विकेंद्रीकरण आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन यंत्रसामग्रीचा उपयोग पण त्या वापरण्यावर मर्यादा श्रमाची उपयुक्तता पशुधनाचा विकास रासायनिक खता ऐवजी शेणखत बैलाचा उपयोग करणे, आवश्यक असेल तेथे ट्रॅक्टर वापरावे असे वाटत होते. भारत शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतीसाठी शेणखताची खूप आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन गोसंवर्धन रक्षण पूजन यावर जास्त लक्ष केंद्रित केले आणि गोधनाचा विकास केला. ज्यामुळे पिण्यासाठी दूध दही तूप नांगर चालवण्यासाठी बैल शेतीसाठी गोमूत्र आणि हाडे पादत्राणासाठी चामडे इत्यादी मिळते. त्यांनी मजुरांची दयनीय स्थिती सहन होत नव्हती. त्यासाठी त्यांनी मजुरांसाठी आंदोलन केले त्यांच्यासाठी रोजी रोटी वाढवून घेतली. 


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे साहित्य :

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्रहितासाठी समाजासाठी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले आणि त्यासाठी त्यांनी काही पुस्तकांची साहित्याची निर्मिती केली. त्यामध्ये "जगद्गुरु शंकराचार्य यांचे चरित्र" लिहिले . "सम्राट चंद्रगुप्तांची भारतातील अर्थनीती" हे पुस्तक लिहिले. " विकास की एक दिशा" " राष्ट्र जीवन की समस्या" " हमारा कश्मीर अखंड भारत" " टॅक्स की लूट" इत्यादी. अतिशय चांगली साहित्य निर्मिती करून लोकांना ती उपलब्ध करून दिली. कारण ते म्हणत असत शिक्षणाची व्याप्ती जेवढी जास्त तेवढाच समाज प्रगल्भ होईल. शिक्षणात जे चांगले आहे ते घ्यावे नवीन चांगले घ्यावे त्यांचा आग्रह होता आणि शिक्षण हे मात्र भाषेतच असावे शिक्षणाने मनुष्याचा चौफेर विकास होतो. अशी शिक्षण पद्धती जी माणसाला भावेल जीवन जगण्याच्या पद्धतीचे भान असणे परम आवश्यक आहे. संस्कार अध्यापन स्वाध्याय हे ज्ञान मिळवण्यासाठी ही माध्यमे आहेत.


जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय :

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाचे सारथी या नात्याने भारतीय जनसंघाचा रथ खराब रस्त्यावरून चांगल्या मार्गावर आणला लोकांचा विश्वास वाटावा म्हणून त्यांनी 15 ऑगस्ट 1965 मध्ये जनसंघाच्या विराट स्वरूपाचे दर्शन देशाला दाखवून दिले. सुमारे पाच लाख लोक हातात टेंबे आणि भगवा ध्वज घेऊन घोषणा करत दिल्लीच्या रस्त्यावरून लोकसभेत पोहोचले होते. त्यावेळेस त्यांचा नारा होता "कच्छ समझोता तोड दो, वरणा गद्दी छोड दो" आणि तो दिवस भारतीय जनसंघाच्या इतिहासात सर्वाधिक महत्त्वाचा होता. जेव्हा डिसेंबर 1965 मध्ये या सार्थ्याला अध्यक्ष म्हणून रथावर बसवण्यात आले. ते विराट दर्शन दाखवणारा महापुरुष भारताच्या दक्षिणेकडे पावन संदेश देण्यासाठी निघाला. त्यावेळेस कलिकतच्या सडकांना फुलांनी भरून दिसत होत्या आणि त्यांचा जय जयकार गगनात उठत होता. सर्व विश्वातील संपादकांनी यांची प्रशंसा केली. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की, हिंसावादी शक्ती देशात आश्चर्यचकित झाल्या आणि त्यांनी आपली ताकद या उभारत्या राष्ट्रीय शक्तीचा विध्वंस करण्यासाठी षड्यंत्र आणि या षडयंत्राचे ते शिकार झाले.


पंडितजींचे निधन: 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन 11 फेब्रुवारी 1968 मध्ये झाले. 10 फेब्रुवारी रोजी लखनऊ होऊन पाटण्याला जाणार होते. त्यांना निरोप देण्यासाठी उत्तर प्रदेशचे तत्कालीन उपमुख्यमंत्री जनसंघाचे पितांबरदास निरोप द्यायला आले होते . पंडितजींना त्यांनी निरोप दिला आणि गाडीने लखनऊ सोडले. वाटेत बाराच्या सुमारास जोतपूर स्टेशन आले.तेथील राजेसाहेबांचे खाजगी सचिव श्री कन्हैया जी राजे साहेबांचे पत्र घेऊन स्टेशनवर भेटण्यासाठी आले होते. त्यांचे बोलणे होते ना होते तोच गाडी सुटली ती मुगलसराईकडे निघाली आणि रात्री दोन पंधरा वाजता प्लॅटफॉर्मवर पोचली. पुढे दिनदयालजींची बोगी पाटण्याला जाणाऱ्या गाडीला जोडण्यात आली. याच दरम्यान रात्री गुढ अंधारात काळ पुरुषाने विचित्र विकृत हालचाल केली.रात्रीच्या अंधारात वेगवान रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेच्या डब्यातच स्वार्थी आतंकवादी शक्तीने त्यांना आपल्या खुनी पंजा आणि प्राणघातक हल्ला करून ठार केले. आणि मुघल सराय रेल्वे स्टेशन पासून 150 गज अंतरावर खांब क्रमांक 1276 जवळ लाईनच्या बाजूला गिट्टीवर त्यांचे प्रेत आढळले. दीनदयालजींच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश दुःख सागरात बुडाला. दीनदयालजींनी जनसंघाची शक्ती वाढवली हे विरोधकांना सहन झाले नसावे. नानाजी देशमुख यांनी चौकशी आयोग नेमून चिकाटीने छडा लावण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. पंडित दीनदयालजींना आयुष्य कमी लाभले. पण ते कर्तुत्ववान होते. संघाचे प्रचार, जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष, उच्चशिक्षित, पत्रकार, ग्रंथकार एकात्म मानवादाचे निर्माते, जीवन मार्गावरील असे अनेक टप्पे त्यांनी एक का मागून एक जलद गतीने पार पाडले होते.









View, Comments and share..... 

Post a Comment

0 Comments