Subscribe Us

header ads

Annual Gathering- वार्षिक स्नेहसंमेलन (शिशिरोत्सव) 2025-26 दिनांक 26 जानेवारी 2026

वार्षिक स्नेहसंमेलन (शिशिरोत्सव) 2025-26

दिनांक 26 जानेवारी 2026

Annual Gathering

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव (कला, वाणिज्य व विज्ञान)
वार्षिक स्नेहसंमेलन (शिशिरोत्सव) 2025-26 दिनांक 26 जानेवारी 2026


 महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचा उद्देश —

1. विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये स्नेह वाढवणे
औपचारिक शिक्षणापलीकडे जाऊन आत्मीय संबंध निर्माण करणे.

2. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे
कला, क्रीडा, वक्तृत्व, नृत्य, नाट्य इत्यादी गुण सादर करण्याची संधी देणे.

3. सांस्कृतिक जडणघडण घडवणे
भारतीय संस्कृती, परंपरा व मूल्यांची जाणीव निर्माण करणे.

4. आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित करणे
मंचावर सादरीकरण करून आत्मविश्वास वाढवणे.

5. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे
शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला चालना देणे.

6. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करणे
शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रातील यशाबद्दल प्रोत्साहन देणे.

7. तणावमुक्त व आनंदी वातावरण निर्माण करणे
अभ्यासातील ताण कमी करून उत्साह व सकारात्मकता वाढवणे.

    वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त महाविद्यालयांमध्ये खालील स्पर्धांचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले.



क्रीडा स्पर्धा:

    महाविद्यालयात घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा त्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून संपन्न झाल्या. 

    क्रीडा विभाग प्रमुख डॉ. उमेश साडेगावकर आणि प्रा. गडदे सर.

   1. श्री सिद्धेश्वर महाविद्यालय स्नेहसंमेलन 2025-26 निमित्त क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या रनिंग स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी खेळाडूशी ओळख करून घेताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.मुकुंद देवर्षी सर खेळाडू व प्राध्यापक.





    2.श्री सिद्धेश्वर महाविद्यालय स्नेहसंमेलन 2025-26 क्रीडा विभागाच्या वतीने आज 5(पाच) किलोमीटर धावणे व 4×400 मिटर व 4×100 मिटर रिले स्पर्धा (मुलांच्या व मुलींच्या) घेण्यात आल्या तसेच महाविद्यालय मैदानावर हर्डल्स (अडथळा शर्यत),(मुलांच्या व मुलींच्या) घेण्यात आल्या.






   3. श्री सिद्धेश्वर महाविद्यालय स्नेहसंमेलन 2025-26 क्रीडा विभागाच्या वतीने आज मुलांच्या व मुलींच्या लांब उडी,गोळा फेक, थाळीफेक,भालाफेक या स्पर्धा घेण्यात आल्या.





   4. श्री सिद्धेश्वर महाविद्यालय स्नेहसंमेलन 2025-26 क्रीडा विभागाच्या वतीने आज वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबड्डी स्पर्धा (मुले व मुली) घेण्यात आल्या.यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव वार्षिक स्नेहसंमेलन 2025 - 26 निमित्त आज 16/01/2026 शुक्रवार रोजी महाविद्यालयांतर्गत मुलींच्या कबड्डी स्पर्धा.





   5. श्री सिद्धेश्वर महाविद्यालय स्नेहसंमेलन 2025-26 क्रीडा विभागाच्या वतीने आज, वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रोफेसर प्राचार्य मुकुंद देवर्षी सर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले



 ध्वजारोहण :- सकाळी .३० वाजता राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला मा. प्राचार्य प्रो. डॉ. मुकुंद देवर्षी यांनी ध्वजारोहण केले या कार्यक्रमासाठी प्रा. विद्यार्थी तसेच मा. संस्था पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.स्नेहसंमेलनाची सुरुवात सकाळी ७.४५ वाजता संस्था ध्वजारोहणाने करण्यात आली. मा. एकनाथरावजी जाधव महाविद्यालयीन अर्थ समिती  अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. मा. संस्था पदाधिकारी व मा.प्राचार्य या ध्वजारोहणासाठी उपस्थित होते.

 महाविद्यालयामध्ये ई कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन मा. संस्था पदाधिकारी व मा .प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले.

स्नेहसंमेलनात मान्यवरांच्या हस्ते संस्था ध्वजारोहण करण्यात आले.

सकाळी ८.१० वाजता सर्व विद्यार्थी, प्रा. यांना सजग नागरीक संविधान शपथ देण्यात आली. यानंतर महाविद्यालयामध्ये वन मिनिट शो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष अभयजी कोकड. अर्थ समितीचे अध्यक्ष मा. एकनाथरावजी जाधव,प्राचार्य प्रो. डॉ. मुकुंदजी देवर्षी, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डॉ . कमलकिशोर लड्डा, सहप्रमुख प्रा. शंकर राठोड यांच्या हस्ते वन मिनिट शो या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

सकाळी ९.३० वाजता आनंद नगरी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष मा. अभयजी कोकड, मा.प्राचार्य मुकुंदजी देवर्षी, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ . कमलकिशोर लड्डा, सहप्रमुख प्रा. शंकर राठोड हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, केळी, वडापाव, गुलाब जामुन, शाही खीर, पोहे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मेजवानी दिली. अतिशय उत्साहामध्ये हा आनंद नगरीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. सर्वांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला.

स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.



स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर सर्व प्रमुख पाहुणे संस्था पदाधिकारी.

उद्घाटन सत्र:- कार्यक्रम सकाळी ११.००  वाजता घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री ॲड. विश्वासजी जोशी कार्यवाह श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल माजलगाव, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ . दासू वैद्य प्रसिद्ध साहित्यिक छत्रपती संभाजीनगर. मा. श्री अमरनाथजी खुर्पे केंद्रीय कार्यकारणी सदस्य भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाई, मा. श्री अभयजी कोकड अध्यक्ष महाविद्यालय  विकास समिती, मा. श्री एकनाथजी जाधव अध्यक्ष अर्थ समिती श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव. मा. श्री रविंद्रजी कानडे. मा. प्रो. प्राचार्य मुकुंदजी देवर्षी, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ . कमलकिशोर लड्डा, सहप्रमुख प्रा. शंकर राठोड हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात श्री कुणाल कुलकर्णी यांनी समाज जीवन भारुनी टाकू या पद्याने केली .


स्नेहसंमेलनात उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना मंगलनाथ मल्टी स्टेट चे संचालक श्री रवींद्र कानडे.

विद्यार्थ्यांच्या आत्मशोधाची पहिली पायरी म्हणजे स्नेहसंमेलन होय. असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रो. दासू वैद्य यांनी केले. ते श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

         पुढे बोलताना ते म्हणाले की, शिशिरोत्सव हे या वार्षिक स्नेहसंमेलनाला दिलेले नाव हे अतिशय सुंदर असे आहे. कारण सध्या निसर्गामध्ये शिशिर ऋतू सुरू आहे आणि या ऋतुमानानुसार महाविद्यालयात आयोजित केलेले हे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे असे आहे. जसा शिशिर ऋतूमध्ये निसर्गामध्ये नवनिर्मिती होती होते तशी या स्नेहसंमेलना मधून देखील आपण नवनिर्मितीचा ध्यास घ्यायला हवा. या माध्यमातून आपण आपली भाषा, संवाद, प्रभावीपणे व्यक्त होण्याचे हे एक व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे विविध कौशल्य व क्षमता वाढवण्याचा हा जणू एक उत्सवच आहे. तरी या स्नेहसंमेलनाचा आनंद घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आपण सर्वांगीण विकास करावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. नव्या युगाची प्रार्थना व अशा काही प्रकारच्या काही कविता सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रवींद्र कानडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह वाढवण्याचे हे एक माध्यम आहे. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपल्या विविध कलागुणांना वाव दिले जातात व त्यांचा विकास या माध्यमातून होतो. मलाही माझे महाविद्यालयीन जीवन आठवते अशाच प्रकारे आम्ही तुमच्या सारखा महाविद्यालयीन जीवनामध्ये स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला त्यामुळेच आज आम्ही जीवनात काही प्रगती करू शकलो असे ते म्हणाले.

        याप्रसंगी शुभेच्छापर मानोगत व्यक्त करताना केंद्रीय कार्यकारणी सदस्य अमरनाथजी खुर्पे म्हणाले की, मित्र-मैत्रिणीमध्ये रमण्याचा हा आजचा आनंदाचा दिवस आहे. अशा दिवसातील गोड आठवणी जपून आपण आयुष्यात यापुढे मार्गक्रमण करावे व आपल्या आयुष्याची दिशा ठरवावी असे ते म्हणाले.

         याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना स्थानिक संकुलाचे कार्यवाह अँड. विश्वासजी  जोशी म्हणाले की, अशा या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपण आपली भाषा, देश आणि संस्कृती समजावून घेतली तरच आपणाला भविष्यात मार्गक्रमण करता येईल. हे स्नेहसंमेलन तुमच्या भविष्यातील दिशा ठरवणारे एक माध्यमच असेल म्हणून याचा सदुपयोग तुम्ही आपल्या जीवनात करावा आणि आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुकुंद देवर्षी यांनी केले त्यामध्ये त्यांनी स्नेहसंमेलन आयोजित करण्यामागचा उद्देश आणि भूमिका स्पष्ट केली. तसेच या वर्षभरातील विविध घडामोडींचा अहवाल महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.मोहिनी पायघन हिने मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मीकांत सोन्नर व डॉ. रमेश गटकळ यांनी केले तर आभार स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. कमलकिशोर लड्डा यांनी मांडले या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेलापागोटा:-महाविद्यालयातील अतिशय आनंदाचा व आवडीचा कार्यक्रम म्हणजे शेलापागोटा होय.हा कार्यक्रम दुपारी १.०० मा.अमरनाथजी खुर्पे व मा.प्राचार्य मुकुंद देवर्षी यांनी शेलापागोटा वाचन करून उद्घाटन केले.या कार्यक्रमात साधा व संगीत शेलापागोटा असा भरगच्च कार्यक्रम होता. शेलापागोटा प्रा. डॉ.रमेश गटकळ, प्रा.डॉ. शिवशंकर मिटकर,प्रा. डॉ.साधना घडसिंग, प्रा. लक्ष्मिकांत सोन्नर,प्रा. डॉ.युवराज मुळे, प्रा. प्रतिभा जाधव, प्रा. अंकुश साबळे, प्रा. राजाराम जाधव यांनी शेलापागोटा वाचन केले .

स्नेहभोजन :-स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व विद्यार्थी प्राध्यापक मा. संस्था पदाधिकारी या सर्वांनी मिळून एका पंक्तीमध्ये स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. जवळपास  1000 विद्यार्थी  याप्रसंगी उपस्थित होते.


स्नेहसंमेलनामध्ये भारतीय पंगतीत बसून विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

समारोप सत्र :-

    युवकांनो जीवनाकडे खेळ म्हणून पाहू नका असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिविंगचे सेलू येथील वरिष्ठ प्रशिक्षक भास्कर भैय्या मर यांनी केले.ते श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी स्थानिक शैक्षणिक संकुलाचे पालक तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाश दुगड तर मंचावर स्थानिक उपस्थित होतेतर मंचावर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.कमलकिशोर लड्डा, सहप्रमुख प्राशंकर राठोड उपस्थित होते. 

    पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी आर्ट ऑफ लिविंग आपणास जीवन जगण्याची कला शिकवते. श्री. श्री. रविशंकर यांचे विचार हे जीवनाला दिशा देणारे आहेत. मन, शरीर हे शरीराच्या सोबत मन सतत असेल तर जीवन जगण्यास आपण लायक आहोत. म्हणून या जीवनाच्या वळणावर आपण अशा कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन मोठे झाले पाहिजे. ज्या वाईट गोष्टींचे परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतात त्या गोष्टी आत्ताच आपण टाळल्या पाहिजेत. रोज प्रत्येक दिवशी आपल्याला झोकून देऊन काम करायला हवे. तुम्ही जीवनात यश निर्माण केले तर ते तुमच्या आई-वडिलांचे  शिक्षकांचे नाव उज्वल कराल. जीवनाकडे खेळ म्हणून पाहू नका. आयुष्यात अनेक संकट आणि अडचणी येतात पण त्यावर मात करून तुम्ही तुमचे जर जीवन जगत राहिला तर तुम्ही नक्कीच आनंदी आणि उत्साही जीवन जगू पहाल. असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.

   या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना स्थानिक संकुलाचे पालक तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाशभाऊ दुगड म्हणाले की, विद्यार्थ्यांचे मन, मेंदू, आणि मनगट  बळकट करण्यासाठी क्रीडा विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आयोजित केल्या होत्या. फक्त विद्यार्थी चार भिंतीच्या आतमध्ये शिकत असताना तो फक्त अभ्यासातच  प्रगत  होता वेगवेगळ्या कलागुणांना त्यांच्या वाव मिळावा म्हणून हे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. या माध्यमातून तुमचे नेतृत्व गुण विकसित होतात शरीर  प्रकृती उत्तम राहते. म्हणून तुम्ही या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून ज्या ज्या तुमच्या उपजत कला होत्या त्या तुम्ही या माध्यमातून विकसित करून पुढील आयुष्यात त्या कलागुणांच्या जीवावरच आपले आयुष्य उज्वल करताल अशा शुभेच्छा त्यांनी याप्रसंगी दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. कमलकिशोर लड्डा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर गवते  डॉ. विकास बोरगावकर यांनी केले. तर आभार स्नेहसंमेलन सहप्रमुख प्रा.शंकर राठोड यांनी मानले. हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

 


उद्घाटन सत्र वर्तमानपत्र प्रसिद्धी - 






                        डॉमुकुंद देवर्षी

                                प्राचार्य 



डॉ.कमलकिशोर लड्डा   

स्नेहसंमेलन प्रमुख 



प्रा.शंकर राठोड                              

स्नेहसंमेलन सहप्रमुख            


                             

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Post a Comment

0 Comments