Subscribe Us

header ads

Day of Special (Dinvishesh) -January 1 दिनविशेष: जानेवारी 1

Day of Special (Dinvishesh) -January 1 

दिनविशेष: जानेवारी 1

नववर्ष दिन


जागतिक शांतता दिन

जागतिक कौटुंबिक दिवस

महत्त्वाच्या घटना:

1 जानेवारी जागतिक धूम्रपान विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.

1 जानेवारी 1756 रोजी निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.

1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज सैन्य व मराठा सैन्य यांच्यात पुण्याजवळ भीमा कोरेगाव येथे लढाई झाली. ब्रिटिशांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री च्या तुकडीतील 500 महार एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली ब्रिटिशांच्या बाजूने लढले. यात पेशव्यांच्या 25000 सैन्याचा पराभव केला.पराभव झाला या लढाईत धारातीर्थी पडलेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव च्या युद्ध भूमीवर ब्रिटिशांनी जयस्तंभ उभारला. यात मृत्यू पावलेल्या सैनिकांची नावे विजयस्तंभावर कोरलेली आहेत.

1 जानेवारी 1827 पासून एल्फिन्स्टन यांनी तयार केलेली कायदा सहिता अमलात आली. 27 कायद्यांची एक संहिता त्याने तयार केली. या कायदे संहितेला " एलफिन्स्टनची कायदेसंहिता" म्हणून ओळखली जाते.

1 जानेवारी 1842 बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.

1 जानेवारी 1848 रोजी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. 

1 जानेवारी 1877 रोजी कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात "दिनबंधु" हे पत्र सुरू केले. त्यात शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, सावकारशाही चे दोष यावर त्यांनी यात लिखाण केले.

1 जानेवारी 1862 रोजी इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.

1 जानेवारी 1880 रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.

X X

1 जानेवारी 1884 रोजी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय ची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केली.

1 जानेवारी 1892 रोजी "1891 चा फॅक्टरी ॲक्ट " लागू केला. हा कायदा 1890 च्या बर्लिन परिषदेत स्त्रिया, बालकांच्या प्रश्नावर चर्चा होऊन भारतीय कापड गिरणी उद्योगात सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली.त्यानुसार मेजर लेथब्रीज यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने कमिशन नियुक्त केले व त्यांच्या अहवालाच्या आधारे "1891 चा फॅक्टरी ॲक्ट " करण्यात आला.

1 जानेवारी 1894 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 फेब्रुवारी 1974 रोजी झाला.

1 जानेवारी 1894 रोजी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला.

1 जानेवारी 1900 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.

1 जानेवारी 1900 रोजी आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 फेब्रुवारी 1974 रोजी झाला.

1 जानेवारी 1902 रोजी भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1971 रोजी झाला.

1 जानेवारी 1908 रोजी’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.

1 जानेवारी 1919 रोजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अंमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

1 जानेवारी 1920 रोजी शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. 'शंवाकिय' हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.

1 जानेवारी 1923 रोजी चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.

X X

1 जानेवारी 1928 रोजी लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 मे 1998 रोजी झाला.

1 जानेवारी 1931 रोजी एल. एन. हरदास यांनी नागपूरमध्ये "मध्य प्रांत व व-हाड बिडी कामगार संघा"ची स्थापना केली.

1 जानेवारी 1942 रोजी च्या संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी युनायटेड नेशन्स(United Nations) हे नाव दिले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पहिल्यांदा हे नाव जाहीरनाम्यात वापरले गेले.

1 जानेवारी 1943 रोजी शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म झाला.

1 जानेवारी 1944 रोजी दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 मार्च 1869 रोजी झाला होता.

1 जानेवारी 1947 रोजी बिदर या ठिकाणी स्टेट काँग्रेसची बंदी उठल्याबरोबर हैदराबाद संस्थानातील जहाल आणि मवाळ गटातील संघर्ष वाढत गेला व त्यातून स्टेट कॉंग्रेसच्या स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदी स्वामी रामानंद तीर्थ यांची निवड करण्यात आली.

1 जानेवारी 1955 रोजी भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन झाले.

1 जानेवारी 1965 रोजी भारत सरकारने भारतीय अन्नधान्य महामंडळाची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत, अन्नधान्याचा साठा, धान्याचे वितरण व धान्य व्यापारावर सरकारचे नियंत्रण राहावे. यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली

1 जानेवारी 1966 पासून भारत सरकारने इंदिरा आवास योजनेला स्वतंत्र दर्जा देण्यात आला. ही योजना 1985 -86 मध्ये सुरू करण्यात आली होती व एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहरलाल रोजगार योजनेचा भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली होती.

1 जानेवारी 1975 रोजी उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1891रोजी झाला होता.

1 जानेवारी 1980 पासून आंतरराष्ट्रीय दुग्ध व्यवसाय करार अमलात आणला. विकसनशील देशांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगती करिता मदत करणे आणि दुग्ध व्यवसाय आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे यासाठी प्रयत्न केले जातात.

1 जानेवारी 1980 मध्ये आंतरराष्ट्रीय गोवंश मांस करार अमलात आणला मांस व पशु यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार उदारीकरण आणि स्थैर्य यात वाढ करणे व आंतरराष्ट्रीय मांस मंडळ मांससाठी जागतिक पुरवठा व मागणी यांच्या स्थिती परिस्थितीचे मूल्यमापन करते.

1 जानेवारी 1981 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कारकीर्दीत कुलाबा जिल्ह्याचे रायगड नामकरण असे करण्यात आले.

1 जानेवारी 1982 मध्ये EXIM बँक ची स्थापना झाली.

1 जानेवारी 1992 रोजी वाणिज्य मंत्रालयाद्वारे कंपनी कायदा 1956 च्या अंतर्गत "भारतीय व्यापार वृद्धि संघटना" ( Indian Trede Promotion Organization) ची स्थापना झाली. देशाच्या बाहेर व्यापार वाढवण्यासाठी भारत सरकारची ही एक महत्त्वपूर्ण संस्था आहे.

X X

1 जानेवारी 1995 रोजी जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे " जागतिक व्यापार संघटना " ( WorldTradeOrganisation ) ची स्थापना झाली. याचे एकूण सदस्य देश 159 , जागतिक व्यापार संघटनेचा व्यापार करारांची अंमलबजावणी करणे ही मुख्य कार्य आहे. 1 जानेवारी 1996 पासून जागतिक व्यापार संघटनेचा हा करार प्रभावी झाला.

1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेचा शेती विषयक करार एग्रीमेंट ऑन एग्रीकल्चर (AOA ) अस्तित्वात आला. शेती क्षेत्रातील व्यापाराच्या उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली शेती क्षेत्रातील व्यापाराला उत्तेजन व चालना देण्यासाठी हा शेतीविषयक करार सुरू करण्यात आला.

1 जानेवारी 1999 साली जगातील चलनाच्या बाजारात युरो चा प्रवेश झाला. ब्रिटन,स्वीडन आणि डेन्मार्क यांचा अपवाद वगळता युरोपीय संघाच्या सगळ्या देशांमध्ये यूरो चा वापर सुरू झाला. युरोप संघातील युरो हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारलेल्या देशांच्या भौगोलिक आणि आर्थिक प्रदेशास युरोझोन म्हणून संबोधतात.

1 जानेवारी 2000 रोजी ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.

X X

1 जानेवारी 2013 रोजी 208 लाख मोटार वाहने (दर लाख लोकसंख्येमागे 18014) वाहने वापरत होती ती मागील वर्षाच्या तुलनेत दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. याच कालावधीत राज्यातील रेल्वेची लांबी पाच हजार 984 किलोमीटर इतकी होती.

1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाचा ठराव मंजूर झाला. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी 12 वी पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्यानंतर सुरू झाली. म्हणजे 16 फेब्रुवारी 2015 पासून नीती आयोगाचे काम सुरू झाले. निती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात व त्यांच्याकडून उपाध्यक्ष यांची नियुक्ती होते. पूर्णवेळ पाच सदस्य आणि अर्धा वेळ दोन सदस्यांची नियुक्ती होते.

1 जानेवारी 2016 पासून ब्रिक्स बँकेचे पहिले अधिकृत अध्यक्षपद भारतीय अर्थतज्ञ के. व्ही. कामत यांनी स्वीकारले.

1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी " निती आयोगा" ची ( National institution for transforming India ) भारत सरकारने स्थापना केली. निती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा "विचार गट" म्हणून काम करणे व सरकारला दिशादर्शक व धोरणात्मक सल्ले देणे हा आहे. यासाठी मार्च 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन आयोगाची स्थापना केली होती.

1 जानेवारी 2015 रोजी संपूर्ण देशात गॅस सबसिडी थेट लाभ हस्तांतरण योजना लागू करण्यात आली.

1 जानेवारी 1756 रोजी निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना 'न्यू डेन्मार्क' असे नाव देण्यात आले.

1 जानेवारी 1785 मध्ये डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.

X X

1 जानेवारी 1808 मध्ये यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

1 जानेवारी 1842 मध्ये बाबा पद्मनजी यांचे 'ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.

1 जानेवारी 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.

1 जानेवारी 1862 मध्ये इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.

1 जानेवारी 1882 मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे  'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना केली.

1 जानेवारी 1899 मध्ये क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.

1 जानेवारी 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.

1 जानेवारी 1908 मध्ये 'संगीतसूर्य' केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.

1 जानेवारी 1912 या दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.

1 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.

1 जानेवारी 1919 मध्ये भारतात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

X X

1 जानेवारी 1932 मध्ये महाराष्ट्रात डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.

1 जानेवारी 1964 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.

1 जानेवारी 1972 मध्ये भारत सरकारने वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.

1 जानेवारी 1973 मध्ये भारतीय सैन्य दलातील मानेकशॉ यांना भारत सरकारने फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.

1 जानेवारी 1995 रोजी जागतिक स्तरावर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ची ( WTO ) ची स्थापना झाली.

1 जानेवारी 2000 या वर्षापासून ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.

1 जानेवारी 2001 मध्ये पश्चिम बंगालमधील राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाणारे कलकत्ता अधिकृत रित्या कोलकत्ता या नावाने ओळखल्या जाऊ लागले.

1 जानेवारी 2004 मध्ये चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1 जानेवारी 1662 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 12 एप्रिल 1720 मध्ये झाला.

1 जानेवारी 1884 मध्ये ९४ मध्ये सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 4 फेब्रुवारी 1974 मध्ये झाला.

X X

1 जानेवारी 1900 मध्ये सुप्रसिद्ध आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 14 फेब्रुवारी 1974 मध्ये झाला .

1 जानेवारी 1902 मध्ये भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1971 रोजी झाला.

1 जानेवारी 1918 रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 9 ऑगस्ट 2002 मध्ये झाला.

1 जानेवारी 1928 रोजी सुप्रसिद्ध लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 22 मे 1998 रोजी झाला.

1 जानेवारी 1943 रोजी भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण रघुनाथ माशेलकर यांचा जन्म झाला.

1 जानेवारी 1950 रोजी भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म झाला.

1 जानेवारी 1961 मध्ये भारतातील पूर्वांचलातील मणिपूर राज्याचे माजी मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचा जन्म झाला.

1 जानेवारी 1748 रोजी प्रसिद्ध स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचे निधन झाले त्यांचा जन्म 27 जुलै 1667 मध्ये झाला होता. 

1 जानेवारी 1894 मध्ये एक सुप्रसिद्ध जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन झाले त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला होता.

X X

1 जानेवारी 1944 रोजी दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 मार्च 1869 रोजी झाला होता. 

1 जानेवारी 1955 रोजी भारतातील एक सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचे निधन झाले त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला होता.

1 जानेवारी 1975 रोजी भारतातील शंकरराव वासुदेव किर्लोस्कर एक प्रसिद्ध उद्योजक, साहित्यिक व चित्रकार यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1891 रोजी झाला होता. 

1 जानेवारी 1983 रोजी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन झाले.

1 जानेवारी 2023 पासून एक वर्षासाठी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय भारत सरकारने अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत घेतला आहे.


https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/december-31-day-of-special-dinvishesh.html

👆

Day of Special (Dinvishesh) -December 31 

डिसेंबर 31 : दिनविशेष



X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/12/raghunath-anant-mashelkar-indian.html

👆

Raghunath Anant Mashelkar: 

Indian Chemical Engineer, Former Director General of the Council of Scientific and Industrial Research

माशेलकर रघुनाथ अनंत: रसायनशास्त्रज्ञ,वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेचे महासंचालक

1 जानेवारी: जन्मदिन


XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/january-2-day-of-special-dinvishesh.html

👆

Day of Special (Dinvishesh)- January 2 


दिनविशेष: जानेवारी 2


View, comments and share..





Post a Comment

1 Comments