Subscribe Us

header ads

July 1 - Day of Special (Dinvishesh) जुलै 1 : दिनविशेष

 July 1 - Day of Special (Dinvishesh)

जुलै 1 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना


महाराष्ट्र कृषी दिन

प्रजासत्ताक दिन: घाना.
केटी कोटी (मुक्ती दिन): सुरिनाम.
राष्ट्रीय डॉक्टर दिन
भारतीय स्टेट बैंक स्थापना दिवस


1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो.( पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधन चंद्र रॉय यांचा हा स्मृतिदिन आहे.

1 जुलै 1866 रोजी विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी नेटिव्ह ओपिनियन हे पत्र मराठी भाषेतून सुरू केले. या पत्राच्या एका पानावर हायकोर्टाचे निवाडे देण्यात येत असत.

1 जुलै 1913 रोजी गहुली ता. पुसद जि. यवतमाळ येथे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म झाला. यांचा जन्मदिन हा महाराष्ट्र राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.



1 जुलै 2016 रोजी पुणे येथे लोकसंस्कृती व लोककलेचे प्रसिद्ध संशोधक आणि अभ्यासक डॉ. रामचंद्र चिंतामण ऊर्फ रा. ची . ढेरे यांचे 85 व्या वर्षी निधन झाले .त्यांच्या "श्री विठ्ठल :एक महासमन्वय" एक या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.

X X
1 जुलै 1933 मध्ये उत्तर प्रदेशातील गाजीपुर जिल्ह्यात अब्दुल हमीद नावाचे परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैन्य दलातील सैनिक यांचा जन्म झाला. ते सैन्यामध्ये लान्स नायक म्हणून कार्यरत होते त्यांनी 1954 मध्ये चार ग्रेनेडियार्स मध्ये प्रवेश केला. त्यांनी गाजवलेल्या शौर्यासाठी भारत सरकारने त्यांना परमवीर चक्र, सैन्य सेवा पदक, द समर सेवा पदक आणि रक्षा पदक प्रदान केले. हा सन्मान त्यांना 1965 मध्ये पाकिस्तान भारत पाकिस्तान युद्धातील ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले. पाकिस्तानला अमेरिकेने दिलेले 7 पॅटन रणगाडे अब्दुल हमीद जीप वरील मशीन गणे त्यांनी 9 सप्टेंबर 1965 रोजी उध्वस्त केले. या युद्धात त्यांनी असामान्य शौर्य दाखवले. पण पाकिस्तान सैन्याने फेकलेल्या एका बॉम्ब हल्ल्यांमध्ये ते जखमी होऊन शहीद झाले.

1 जुलै 1964 मध्ये आयडीबीआय IDBI बँकेची स्थापना झाली.

1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली .आदिवासींचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यात आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.

1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला.


1 जुलै 2015 रोजी भारत सरकारने"डिजिटल इंडिया मिशन योजना" ची सुरुवात केली.

X X
1 जुलै 1693 रोजी संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.

1 जुलै 1837 रोजी जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.

1 जुलै 1874 रोजी टंकलेखक (टाईपरायटर) – पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.

1 जुलै 1879 रोजी भारतात पोस्टकार्ड बाजारात विक्रीस उपलब्ध झाली.

1 जुलै 1881 रोजी कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.
X X
1 जुलै 1903 रोजी टूर दी फ्रान्स – पहिल्या सायकल रेसची सुरवात झाली.

1 जुलै 1908 रोजी एसओएस (SOS) – हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.

1 जुलै 1909 रोजी क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.

1 जुलै 1919 रोजी कै. बाबूराव ठाकूर यांच्या ’तरुण भारत’ (बेळगाव) या वृत्तपत्राची सुरूवात झाली.

1 जुलै 1933 रोजी नाट्यमन्वंतर संस्थेच्या ’आंधळ्यांची शाळा’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

1 जुलै 1934 रोजी मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
X X
1 जुलै 1947 रोजी फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.

1 जुलै 1948 रोजी बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना

1 जुलै 1948 रोजी ’कायदेआझम’ मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते ’स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्‍घाटन झाले.

1 जुलै 1949 रोजी त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.

1 जुलै 1955 रोजी ’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट 1955’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.

1 जुलै 1960 रोजी रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.

1 जुलै 1961 रोजी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू झाले.

1 जुलै 1962 रोजी सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.

1 जुलै 1963 रोजी झिप कोड – अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.

1 जुलै 1964 रोजी न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.

1 जुलै 1964 रोजी भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली.
X X
1 जुलै 1966 रोजी कॅनडा – देशात पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण सुरु झाले.

1 जुलै 1975 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली.

1 जुलै 1979 रोजी वॉल्कमन – सोनी कंपनीने हा मुसिक प्लेअर प्रकाशित केला.

1 जुलै 1980 रोजी ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.

1 जुलै 1991 रोजी सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला ’वॉर्सा करार’ संपुष्टात आला. परस्पर संरक्षणाचा हा करार ’नाटो करारा’ला प्रतिशह देण्यासाठी 14 मे 1955 रोजी करण्यात आला होता.

1 जुलै 1997 रोजी शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.

1 जुलै 2001 रोजी फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील 50 वे विजेतेपद पटकावले.

1 जुलै 2002 रोजी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय – स्थापना झाली.

1 जुलै 2007 रोजी इंग्लंड – देशात सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.

1 जुलै 2015 रोजी डिजिटल इंडिया – या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

1 जुलै 2017 रोजी देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण सुधारणा म्हणून वस्तू व सेवाकर (जीएसटी) संपूर्ण भारतात लागू करण्यात आला.

1 जुलै 1646 रोजी प्रख्यात जर्मन गणितज्ञ व तर्कशास्त्र विद्वान गाटफ्रीड विलहेल्म लाइबनिज(Gottfried Wilhelm Leibniz) यांचा जन्म झाला.

X X

1 जुलै 1938 रोजी प्रख्यात भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील महान बासुरी वादक, संगीत दिग्दर्शक आणि थोर शास्त्रीय कलाकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म झाला.

1 जुलै 1949 रोजी वेंकय्या नायडू – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारताचे 13वे उपराष्ट्रपती यांचा जन्म झाला.


1 जुलै 1966 रोजी उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म झाला.

1 जुलै 1968 रोजी पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदुस्थानी संगीत परंपरेतील रामपूर-साहसवान घराण्यातील शास्त्रीय संगीतकार उस्ताद रशीद खान यांचा जन्म झाला.

1 जुलै 1973 रोजी साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तसचं, उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव यांचा जन्म झाला.


1 जुलै 1860 रोजी चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1800 मध्ये झाला होता.

X X
1 जुलै 1938 रोजी गणेश श्रीकृष्ण तथा ‘दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्‍हाडचे नबाब’ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 आगस्ट 1854 मध्ये झाला होता.


1 जुलै 1941 रोजी सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1880 मध्ये आंध्र प्रदेशातील विजयनगरम या ठिकाणी झाला.


1 जुलै 1962 रोजी पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982 रोजी झाला.

1 जुलै 1962 रोजी डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (1961), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी पाटणा, बिहार येथे झाला.

1 जुलै 1971 रोजी सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग (ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता, ) यांचे निधन झाले.

1 जुलै 1989 रोजी प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ यांचे निधन झाले. ’माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ’देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ’डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत.

1 जुलै 1984 रोजी राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक यांचे निधन झाले.

1 जुलै 1999 रोजी एम अँड एम चे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 मार्च 1904 रोजी झाला.

X X

X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/june-30-day-of-special-dinvishesh.html
👆
June 30 - Day of Special (Dinvishesh)

जुन 30 : दिनविशेष




X X

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html

👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X



View, Comments and share

Post a Comment

0 Comments