Subscribe Us

header ads

Types of duty कर्तव्याचे प्रकार

Types of duty

कर्तव्याचे प्रकार




 कर्तव्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत.

1.  नैतिक कर्तव्य 

2. कायदेशीर किंवा वैधानिक कर्तव्य 

x x

1.  नैतिक कर्तव्य 

माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीवर आणि नैतिक जागृती वर आधारित कर्तव्यांना नैतिक कर्तव्ये म्हणतात. 

ही कर्तव्ये पार पाडण्यासाठी व्यक्तीवर कायद्याचे बंधन नसते. ही कर्तव्ये पार पाडण्यात जर व्यक्ती अयशस्वी ठरली तर व्यक्तीला शिक्षा ही होत नाही.

ही कर्तव्य समाजाच्या नैतिक नियमावर आधारित असतात. नैतिक कार्य पालनातून व्यक्तीला आत्मिक सुखाची अनुभूती येते.

 आत्मसमाधानासाठी व्यक्ती नैतिक कर्तव्ये पार पाडते. नैतिक कर्तव्ये पार पाडण्याची बंधने किंवा सक्ती व्यक्तीवर नसते.

 ही कर्तव्ये उस्फूर्तपणे व्यक्तीकडून पार पाडली जातात. नैतिक कर्तव्ये याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.

 पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेणे, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष देणे.

 तरुणांनी आपल्या वृद्ध मातापित्यांची काळजी घेणे. आदी उदाहरणे नैतिक कर्तव्याची सांगता येतील.

 या कर्तव्याचे पालन करण्यात व्यक्ती अपयशी ठरला तरी त्यासाठी व्यक्तीला शिक्षा होत नाही.

x x

2. कायदेशीर किंवा वैधानिक कर्तव्य 

कायदेशीर कर्तव्ये म्हणजे अशी कर्तव्ये की ज्यांना कायद्याचे पाठबळ मिळाले आहे आणि अशा कर्तव्य पालनात व्यक्तीला अपयश आल्यास त्याला शिक्षा होऊ शकते.

 कायदेशीर कर्तव्यांचे पालन करणे प्रत्येक नागरिकावर बंधनकारक असते. अशा कर्तव्याचे पालन करण्यास व्यक्तीने नकार दिल्यास किंवा अपयशी ठरल्यास त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा केली जावी याची स्पष्ट तरतूद कायद्यामध्ये असते. 

कायदेशीर कर्तव्या मध्ये, कर भरणे, कायद्याचे पालन करणे, राज्याशी प्रामाणिक राहणे, देशांतर्गत शांतता आणि सुरक्षितता राखण्यात शासनाला मदत करणे, इत्यादी कर्तव्यांचा समावेश होतो. 

ही सर्व कर्तव्ये व्यक्तीवर बंधनकारक असतात.


भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेली नागरिकांची मूलभूत कर्तव्य

x x

भारतीय राज्यघटनेमध्ये 1976 साली 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला.

 सन 1978 पर्यंत नागरिकांची कर्तव्ये ही गृहीत धरण्यात आली होती. पण 42 व्या घटनादुरुस्तीने दहा कर्तव्यांच्या यादीचा समावेश घटनेत केला.

 हा समावेश घटनेच्या चौथ्या भागातील कलम 51 ( अ ) मध्ये करण्यात आला आहे. या कर्तव्याच्या यादीत, 

राष्ट्रध्वजाचा आदर राखणे, 

राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि एकात्मतेचे रक्षण करणे, 

राष्ट्र सेवेसाठी तयार असणे, 

संस्कृतीचा वारसा जपणे, 

पर्यावरणाचे संतुलन राखणे, 

सामाजिक मालमत्तेचे रक्षण करणे, 

आदी कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.








Comment and share

Post a Comment

4 Comments