Concepts about freedom: Negative freedom
स्वातंत्र्याविषयीच्या संकल्पना: नकारात्मक स्वातंत्र्य
काला नुसार स्वातंत्र्याविषयीच्या संकल्पनेत स्थित्यंतरे निर्माण झाली. या स्थित्यंतरातून स्वातंत्र्याच्या संकल्पनेचे दोन प्रकार विकसित झाले.
1. नकारात्मक स्वातंत्र्य
Negative Liberty
2. सकारात्मक स्वातंत्र्य
Positive Liberty
X X
1. नकारात्मक स्वातंत्र्य
Negative Liberty
अकराव्या आणि बाराव्या शतकात उदारमतवादाच्या (Liberalism) सुरुवातीच्या पुरस्कर्त्यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली.
जॉन लॉक, डेव्हिड ह्यूम, ॲडम स्मिथ, थॉमस पेन, हर्बर्ट स्पेन्सर, बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल या सुरुवातीच्या उदारमतवादी विचारवंतांच्या विचारांमधून नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना विकसित झाली.
विसाव्या शतकातही या संकल्पनेचे अनेक पुरस्कर्ते आहेत. त्यामध्ये इसाय बर्लिन, रॉबर्ट नाओझिक्, एम. ए. हाएक, मिल्टन फ्रीडमन, मायकेल ओकशॉट हे विचारवंत प्रमुख आहेत.
नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना ही व्यक्तीवादाच्या तत्त्वज्ञानाशी (Philosophy of Individualism) निगडित आहे. व्यक्तिवादी तत्त्वज्ञानाप्रमाणे व्यक्ती हा एक स्वयंपूर्ण घटक आहे.
समाज अशा अनेक स्वयंपूर्ण घटकांपासून बनलेला आहे. व्यक्तीला आपल्या हिताची, चांगल्या -वाईटाची जाणीव असते. एखाद्या बाह्य शक्तीने व्यक्तीला हे सांगण्याची आवश्यकता नाही.
व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा त्याच्या क्षमतांच्या विकासाशी निगडित आहे. कोणत्याही बाह्य बंधनाशिवाय व्यक्तीला आपल्या क्षमतांचा विकास करता आला पाहिजे. याच व्यक्तिवादी विचारसरणीच्या अंगाने स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा अर्थ उदारमतवादी विचारवंतांनी लावला.
X X
स्वातंत्र्य म्हणजे निर्बंधांचा (Absence of Restraints) अभाव असा अर्थ नकारात्मक स्वातंतत्र्यामध्ये अभिप्रेत आहे. व्यक्तीवर आर्थिक, राजकीय, धार्मिक, नैतिक अशा कोणत्याही प्रकारची बंधने नसणे म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ इथे गृहीत धरला गेला आहे.
नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये राज्याची भूमिका ही अतिशय मर्यादित ठेवण्यात आली आहे . राज्याकडे कायदा आणि सुव्यवस्था टिकविणे, बाह्य आक्रमणापासून राज्याचे संरक्षण करणे, व्यक्तीबरोबर झालेल्या करारांचे पावित्र्य राखणे एवढ्याच भूमिका देण्यात आल्या आहेत.
व्यक्तिगत व्यवहारात, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करण्याचा, त्यावर निर्बंध घालण्याचा राज्याला अधिकार नाही.
व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले जावे आणि त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्याला नसावा असे नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे मानतात.
अशाप्रकारे नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना ही व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य आणि अधिकार बहाल करणारी आणि राज्याची भूमिका मर्यादित करणारी आहे.
नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
1. जॉन लॉक :
सतराव्या शतकातील ब्रिटिश विचारवंत. यांचा कार्यकाल 1632 ते 1704,
यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा, "टू ट्रिटिझ ऑफ गव्हर्नमेंट," , "एन एसे कंसर्निग ह्युमन अंडरस्टँडिंग".
2. ॲडम स्मिथ :
18 व्या शतकातील प्रसिद्ध स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ. यांचा कार्यकाल 17 ते 1790 .
यांनी लिहिलेली ग्रंथ "दी थेरी ऑफ मॉरल सेंटीमेंटस", " दी वेल्थ ऑफ नेशन्स."
X X
3. हर्बर्ट स्पेन्सर :
19 व्या शतकातील महत्त्वपूर्ण ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ. यांचा कार्यकाळ 1820 ते 1895 यांनी "सामाजिक उत्क्रांतिवादाचा महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला."
4. जेरेमी बेंथम :
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ब्रिटिश तत्त्ववेत्ता यांचा कार्यकाळ 1748 ते 1832, "राज्यशास्त्रातील प्रसिद्ध उपयुक्ततावादाच्या सिद्धांताचा बेंथम पुरस्कर्ता होता."
"फ्रागमेंट ऑफ गव्हर्नमेंट" आणिि
" प्रिन्सिपल ऑफ मोरल्स अँड लेगीसलेशन" या ग्रंथाचा लेखक.
5. जॉन स्टुअर्ट मिल :
एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ. "उपयुक्ततावादी सिद्धांताचा पुरस्कर्ता" जेम्स मिल चा जॉन मिल मुलगा, "
" ऑन लिबर्टी", " कन्सिडरेशन ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्मेंट," " दी सब्जेक्शन ऑफ वुमेन" हे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले आहेत.
Comment and share
6 Comments
Useful Information
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteNice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice information
ReplyDelete