Human rights: Characteristics of human rights
मानव अधिकारांची वैशिष्ट्ये
मानव अधिकारांची काही ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत की मानवाधिकार इतर अधिकारापेक्षा वेगळे मानले जातात. त्यातील खालील काही वैशिष्ट्ये.
1. वैश्विकता ( Universality)
मानव अधिकार हे विशिष्ट व्यक्ती किंवा समाजापुरते मर्यादित नाहीत तर ते या विश्वातील प्रत्येक व्यक्तीला माणूस या नात्याने प्राप्त झालेले आहेत.
हे अधिकार व्यक्तीला राज्याने किंवा समाजाने बहाल केलेले नाहीत तर ते व्यक्तीला जन्मानेच प्राप्त झालेले आहेत.
सर्व काळ आणि परिस्थितीमध्ये सर्वांना प्राप्त झालेले ( Rights of all people at all times and in all situations) असे हे अधिकार आहेत. यावरून या अधिकारांची वैश्विकता स्पष्ट होते.
x x
2. व्यक्तिनिष्ठ ( Individualistic)
मानव अधिकार हे व्यक्तिनिष्ठ अधिकार आहेत. कारण हे अधिकार व्यक्तीस्वातंत्र्य, विचार, भाषण स्वातंत्र्यावर आधारित आहेत.
प्रत्येक व्यक्ती हा जन्माने स्वतंत्र असून त्याला स्वतंत्रपणे विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा, सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे.
हे स्वातंत्र्य मानव अधिकारांमध्ये अंतर्भूत आहे. ज्या ठिकाणी ही स्वातंत्र्ये व्यक्तीला नाकारली जातात तिथे मानव अधिकारांचा संकोच होतो.
मानव अधिकारांमध्ये अंतर्भूत असणारी ही स्वातंत्र्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अपरिहार्य आहेत. म्हणूनच मानव अधिकारांचे स्वरूप व्यक्तिनिष्ठ बनले आहे.
3. परमोच्चता ( Paramountcy)
व्यक्तीला जगण्यासाठी मानव अधिकार आवश्यक आहेत. त्याशिवाय व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अशक्य आहे.
परिणामी या अधिकारांची तुलना इतर अधिकारांशी करता येत नाही. मानव अधिकार हे परमोच्च अधिकार आहेत.
जोपर्यंत व्यक्तीकडून देशातील प्रस्थापित कायद्याचा भंग होत नाही तोपर्यंत हे अधिकार काढून घेण्याचा शासनाला अधिकार नाही.
मानव अधिकार हे परमोच्च आणि पवित्र असणारे असे स्वातंत्र्य आहे की, ज्याची पायमल्ली करण्याचा किंवा संकोच करण्याचा शासनाला अधिकार नाही.
x x
4. व्यवहारीकता ( Practicability)
मानव अधिकार हे व्यवहारिक आहेत. कारण हे अधिकार व्यक्तीला उपभोगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे शासनासाठी अवघड नाही.
शासन सार्वजनिक हितासाठी कायदे करून देखील व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकते.
समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करणे जरी शासनाला शक्य नसले तरी व्यक्तीला जगण्यासाठी आवश्यक किमान सुविधा शासन निश्चितच पुरवू शकते.
या अधिकारांचे स्वरूप व्यवहारिक असल्यामुळे त्यांना संरक्षण देणे शासनाला अवघड नाही.
x x
5. अंमलबजावणी ( Enforceable )
मानव अधिकार हे व्यक्तीला इतर व्यक्तीपासून राज्याच्या अधिकारांपासून, हिंसाचारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्राप्त झालेले संरक्षक कवच आहे. हे अधिकार अंमलात आणण्यासाठी राज्यांमध्ये कायद्याचे अधिराज्य ( Rule of Law ) प्रस्थापित होणे आवश्यक आहे.
देशाची कायदेव्यवस्था ही मानव अधिकारांना संरक्षण देणारी आणि हे अधिकार व्यक्तीला उपभोगण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविणारी असायला हवी.
त्यामुळे कायद्याचे अधिराज्य आवश्यक आहे. कायद्याच्या अधिराज्याशिवाय मानवाधिकारांचे कायदे व्यक्तीला आपल्या विकासासाठी करून घेता येणार नाहीत.
Comment and share
6 Comments
Very nice information
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteअत्यंत उपयुक्त माहिती मिळाली आहे👌👍
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice information
ReplyDelete