Sanskar : Social Life in Post-Vedic Period
संस्कार : उत्तर वैदिक कालखंडातील समाजजीवन
प्राचीन काळी व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेच्या प्रसंगी काही विशिष्ट संस्कार केले जातात.
संस्काराच्या संख्येबद्दल मतभेद आहेत.गौतम धर्मसूत्रात 40 संस्कार सांगितले आहे. तर वेदव्यास स्मृतीत 16 संस्कार सांगितले आहेत.
धर्मशास्त्राप्रमाणे मनुष्य जेव्हा जन्मास येतो तेव्हा तो शूद्र असतो. पण संस्काराने त्यास महत्त्व प्राप्त होते.
ज्याप्रमाणे खाणीतून काढलेले हिरे ओबडधोबड असतात. पण त्यांना साफ करून पैलू पाडल्यावर तेच आकर्षक व चमकदार बनतात.
तसेच संस्कारांमुळे मनुष्य परिपक्व होतो. अशी धारणा होती. संस्कारामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्वही खुलते.
संस्कार हे दोन प्रकारचे आहेत.
1. अशुद्धता दूर करणारे
2. परिपूर्णता देणारे
संस्काराने अनुवंशिकतेमुळे निर्माण होणारे दोष दूर होतात. सूप्त मानवी गुण प्रकट होऊन विकास होतो. असा समज होता .
X X
सोळा संस्काराची माहिती खालील प्रमाणे आहे.
1. गर्भाधान
स्त्री-पुरुषाचे मिलन हे केवळ लैंगिक सुखासाठी नाही. तर ते सुप्रजानिर्मिती साठी असते . त्यांच्या मिलनाच्या वेळी मनात जे विचार प्रभावी असतात. त्यावरून संततिचा स्वभाव घडतो.
शुद्ध संतती होण्यासाठी माता-पित्यांवर हा संस्कार केला जाई.
2. पुंसवन
पुत्रप्राप्ति गर्भधारणेनंतर दुसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात हा संस्कार केला जातो . "लक्ष्मी "नावाच्या वृक्षाचे फळ, वडाची देठे यांचा रस पत्नीच्या उजव्या नाकपुडीत टाकल्यास पुत्रप्राप्ती होते असा त्यावेळी समज होता.
3. सिमंतोंन्नयन
गर्भवती स्त्रीला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून हा संस्कार केला जाई. प्रसुती क्रिया त्रासदायक न होता सुरक्षित व सहज व्हावी म्हणून विष्णूची प्रार्थना केली जाते.
4. जातकर्म
अपत्य जन्मानंतर लगेचच हा संस्कार केला जाई. अपत्य हे सर्वेइंद्रिययुक्त व तेजस्वी व्हावे व त्याला भरपूर आयुष्य मिळावे म्हणून हा समारंभ केला जातो .हा या संस्काराचा हेतू होता.
5. नामकर्म ( नामकरण )
नामकर्म म्हणजे मुलाच्या जन्मानंतर दहाव्या किंवा बाराव्या दिवशी त्याचे विधीपूर्वक नाव ठेवणे. बालकास दोन नावे असावीत. एक नाव फक्त आई-वडिलांस ठाऊक असावे तर दुसरे सार्वजनिक व्यवहाराचे नाव असावे.
6. निषक्रमन
मुलाच्या जन्मानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात होणारा हा संस्कार असे. जेव्हा बालकास प्रथम घराच्या बाहेर नेले जाई. तेव्हा हा संस्कार विधी करत असत.
7. अन्नप्राशन
मूल जन्मास आल्यानंतर सहा महिने ते एक वर्षाच्या काळात हा संस्कार केला जाई. मुलाला अन्न न देण्यास प्रारंभ करावयाचा समारंभ. विशिष्ट पक्ष्यांचे मांस खावयास दिले तर ते बालक बुद्धिमान होते. अंगी वक्तृत्व येते असा एक समज होता.
8. चुडाकर्म
वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकाचे केस काढत (जावळ काढणे ) तेव्हा संस्कार केला जाई.
9. कर्णवेध
सातव्या किंवा आठव्या महिन्यात बालकाचे कान टोचले जात तेव्हा हा संस्कार केला जाई. या संस्कारास "केशांत" हे नाव आहे. कान टोचने ही हिंदुत्वाची खूण आहे.
10. उपनयन ( मुंज )
वर्णव्यवस्थेनुसार उपनयन संस्काराचे वय निश्चित झालेले असे.
ब्राह्मणांचे उपनयन आठव्या वर्षी ,क्षत्रियांचे उपनयन अकराव्या वर्षी व वैश्यांचे उपनयन बाराव्या वर्षी होत असे. या संस्कारात "मौजीबंधन" असेही नाव आहे. त्याच्या गळ्यात जानवे घालण्यात येऊन त्याला विद्यार्जनासाठी गुरूच्या स्वाधीन करण्यात येत असे. या संस्कारामुळे शिक्षणाचा अधिकार प्राप्त होत असे.
पूर्वीचे वेदविद्याविहीन स्वरूप बदलून गुरुगृही तो वेदविद्याविशारद असे नवरूप धारण करीत असल्यामुळे त्याचा दुसऱ्यांदा जन्म झाला म्हणून त्यास " द्विज" असे समजण्यात येत होते. त्यामुळे या संस्कारास महत्त्वाचे स्थान होते .
प्रारंभी आर्यांच्या स्त्री-पुरूषांना उपनयनाचा अधिकार होता. पण नंतर मात्र स्त्रियांना त्या अधिकारापासून वंचित ठेवले. ब्राह्मण जातीत आजही हा संस्कार केला जातो.
X X
11. वेदारम्भ
वेदांच्या शिक्षणाचा आरंभ करताना हा संस्कार केला जाई.
12. केशांत
मुलगा सोळा वर्षाचा झाला की त्याच्या डोक्यावरचे सर्व केस काढून टाकत तेव्हा हा संस्कार केला जाई. या संस्काराच्या वेळी ब्राह्मणास गोदान करीत.
13. समावर्तन
शिक्षण संपल्यानंतर मुलगा गुरूच्या संमतिने स्वतःच्या घरी परत जाण्यास निघे तेव्हा ब्रह्मचर्याश्रमातील ब्रह्मचारी गुरुचा निरोप घेऊन स्वगृही परत जाताना हा संस्कार केला जाई. आधुनिक पदवीदान समारंभा सारखाच हा समारंभ होता. या संस्काराच्या वेळी शिष्य आपल्या कुवतीप्रमाणे गुरुला गुरुदक्षिणा देत असत. पण त्याबाबत सक्ती नव्हती.
14. विवाह
समावर्तन विधीनंतर विद्यार्थी जेव्हा घरी येईल तेव्हा त्यास गृहस्थाश्रमात प्रवेश करावा लागे. म्हणजेच त्यास विवाह करावा लागे. विवाहाच्या वेळी कन्यादान, विवाहहोम, पाणीग्रहण, अग्निपरिनयन, अश्मारोहन, लाजाहोम , सप्तपदी आदी विधी अग्नीस साक्षी ठेवून करावे लागत असत.
X X
15. अग्निपरिग्रह ( पंचमहायजन )
विवाहानंतर गृहस्थाश्रमी व्यक्तीने देव,दानव, पूर्वज ,अतिथी व ब्राह्मण यांची कुटुंब प्रमुखाने आपल्या घरी "अग्निहोत्र " तयार करून अग्नीची दररोज उपासना करावी असा हा विधी आहे. या धर्मविधी "पंचमहायज्ञ" असेही म्हणतात.
16. अंत्येष्टी ( अंत्यसंस्कार )
मृत्यूनंतर प्रेतावर काही संस्कार केले जातात व नंतर प्रेत स्मशानात नेऊन तेथे विधीपूर्वक त्याचे दहन केले जाई.
संन्याशी व दोन वर्षाखालील मुले यांचे मात्र मृत्यूनंतर दहन न करता दफन केले जाई. त्यानंतर मृताच्या नातेवाइकांनी दहा दिवस सुतक पाळले जावे असा नियम होता तो आजही पाळला जातो.
मृत व्यक्तीला सद्गती व आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा विधी केला जाई. दरवर्षी श्राद्ध करून मृत आत्म्यास सद्गती मिळो अशी इच्छा व्यक्त केली जाई.
मृत्यूनंतर एक वर्षानंतर " सपिंडीकरण" नावाचा विधी केला जाई व या विधीनंतर मृताला इतर पितरांमध्ये जागा मिळते अशी एक समजूत होती.
Comment and share....
9 Comments
Nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteGood job
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice..
ReplyDeleteKheti Prem