October 28 - Day of Special (Dinvishesh)
ऑक्टोबर 28 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
28 ऑक्टोबर 1969 रोजी तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.
तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र28 ऑक्टोबर 1940 रोजी दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
28 ऑक्टोबर 1922 रोजी बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
28 ऑक्टोबर 1904 रोजी पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
28 ऑक्टोबर 1886 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
X X
28 ऑक्टोबर 1636 रोजी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना करण्यात आली. हार्वर्ड विद्यापीठ अमेरिका या देशाच्या माचेच्युसेट्स राज्यातील केंब्रिज या शहरांमध्ये एक खाजगी संशोधन विद्यापीठ म्हणून सुप्रसिद्ध आहे. अमेरिकेतले हे सर्वात जुने उच्च शिक्षणासाठी स्थापन केलेले विद्यापीठ आहे. अमेरिकेतील यादवी युद्धानंतर अध्यक्ष चार्ल्स एलियट यांच्या अथक प्रयत्नामुळे हार्वर्ड हे जगातील सर्वोत्तम संशोधन शैक्षणिक विद्यापीठ संस्था झाली.या विद्यापीठाची सुमारे 32.3 अब्ज डॉलर एवढी संपत्ती असून हे जगातील सर्वात श्रीमंत विद्यापीठ आणि प्रतिष्ठित विद्यापीठ मानले जाते.हे विद्यापीठ बोस्टन शहराच्या वायव्येस चार्ल्स नदीच्या काठावर 209 एकर जागेवर स्थित आहे. आज पर्यंत या विद्यापीठांमध्ये अमेरिकेतील आठ अमेरिकन अध्यक्षांनी या विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. या विद्यापीठाचे संशोधनातील अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे इथल्या संशोधन करणाऱ्या संशोधकांना जवळपास 150 संशोधक त्यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की-मून हे या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. या विद्यापीठामध्ये जगातले सर्वात मोठे व्यावसायिक मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स सुद्धा याच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर फेसबुकचे निर्माते मार्क झुकेरबर्ग यांनी सुद्धा या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेले आहे.
हार्वर्ड विद्यापीठ28 ऑक्टोबर 1958 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि खाणकाममंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलतज्ञ म्हणून ओळखले जाणारे शंकरराव चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 5 डिसेंबर रोजी त्यांची निवड करून आठ डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2009 मध्ये ते महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. 1987 च्या लोकसभा पोट निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले होते. 1992 मध्ये ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. 1993 मध्ये विधान परिषदेचे सदस्य म्हणून ते निवडून आले होते. 1999 मध्ये मुदखेड मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून गेले आणि महसूल आणि परिवहन मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2014 मध्ये लोकसभेचे सदस्य म्हणून ते निवडून आले. फेब्रुवारी 2024 मध्ये काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तसेच आमदारकी चा राजीनामा देऊन दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते राज्यसभेचे खासदार 2024 मध्ये निवडून आले. त्यांचा लोकसभेतील कार्यकाळ सहा मे 2014 ते 23 मे 2019 आणि दुसऱ्यांदा 1987 ते 1989 पर्यंत. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये 1972 ते 2024 पर्यंत काम केले आणि 14 फेब्रुवारी 2024 पासून भारतीय जनता पक्षाचे ते सक्रिय सदस्य तथा खासदार म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आठ डिसेंबर 2008 ते 11 नोव्हेंबर 2010 पर्यंत कामकाज केले. 2010 मध्ये त्यांना आदर्श हाऊसिंग सोसायटी या कारगिल मधील हुतात्म्यांच्या वारसांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल झाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदा चा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केलेल्या कामाचा आढावा त्यामध्ये 1984 मध्ये त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आणि महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे ते त्यावेळी सरचिटणीस झाले. मार्च 1987 मध्ये नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून गेले. 1992 मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये माननीय शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा उस्मानाबाद आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडले. फेब्रुवारी 1993 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती झाली. ऑक्टोबर 1999 मध्ये सुमारे 35 हजार मताधिक्क्याने मुदखेड विधानसभेतून ते विजयी झाले. दोन नोव्हेंबर 1999 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी परिवहन मंत्री म्हणून काम केले. सप्टेंबर 2003 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी काम केले. 2004 मध्ये मुदखेड मतदारसंघातून 70 हजार मतांनी विजयी झाले आणि उद्योग खात्याचे मंत्री म्हणून त्यांची निवड झाली. 2018 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि 2009 मध्ये भोकर मतदारसंघातून एक लाख मताधिक्याने निवडणूक जिंकले. नोव्हेंबर 2009 मध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची धुरा महाराष्ट्र राज्याची सांभाळणे. 2010 मध्ये आदर्श घोटाळ्याचा आरोप त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 2014 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून 82 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. जानेवारी 2017 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी त्यांचे निवड झाली. ऑक्टोबर 2009 2019 मध्ये भोकर मधून 97 हजार 500 मताधिक्याने निवडणूक जिंकली आणि डिसेंबर 1919 मध्ये महाविकास आघाडीत सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केले. 2022 मध्ये शिंदे गटाने बंडकरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यांचे मंत्रिपद गेले. फेब्रुवारी 2024 मध्ये काँग्रेस पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि सध्या ते राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत.
अशोक चव्हाण28 ऑक्टोबर 1956 रोजी ईराणचे 6 वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांचा जन्म झाला.
X X
28 ऑक्टोबर 1955 रोजी जगातील सर्वात श्रेष्ठ संगणक क्षेत्रामध्ये असणारी सुप्रसिद्ध अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस यांचा जन्म झाला. जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालक असून ते दानशूर म्हणून सुद्धा जगामध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म सियालट वाशिंग्टन डीसी या ठिकाणी झाला त्यांचे वडील एक वकील होते. बिल गेट्स यांनी पॉल अलन् या सहकार्याला सोबत घेऊन मायक्रोस्कॉपे कंपनीची स्थापना केली. आणि ही जगातील सर्वात मोठी व्यक्तिगत संगनक सॉफ्टवेअर कंपनी मधली. 2009 मध्ये ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली. 2011 मध्ये जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये त्यांचे दुसरे स्थान आणि अमेरिकेच्या श्रीमंत लोकांची यादीमध्ये त्यांचे पहिले स्थान राहिलेले आहे.
बिल गेट्स
28 ऑक्टोबर 1955 रोजी भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म झाला.
28 ऑक्टोबर 1930 रोजी भारतातील हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 सप्टेंबर 1997 मध्ये झाला.
28 ऑक्टोबर 1993 रोजी महाराष्ट्रातील मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 डिसेंबर 1973 मध्ये झाला.
28 ऑक्टोबर 1867 रोजी स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ यांचा जन्म झाला. त्या मूळच्या आयरिश होत्या. 25 मार्च 1898 रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले.भगिनी निवेदिता यांचे संपूर्ण नाव मागरिट एलिजाबेथ सॅम्युअल नोबल आहे. त्यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1867 रोजी डंगनॉन टायरान (आयर्लंड) या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युअल रिचमंड नोबल आणि आईचे नाव मेरी इसाबेल नोबल होते. हॅलीफेंक्स महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या.शिक्षिका म्हणून इ. स. 1884 मध्ये त्यांनी नोकरी धरली आणि अध्यापनाचे कार्य करू लागल्या. इ. स. 1892 मध्ये त्यांनी विम्बल्डन येथे 'रस्किन स्कूल' या नावाने शाळेची स्थापना केली. तेथे नवीन शिक्षण पद्धतीप्रमाणे शिक्षण मिळत असे. स्वामी विवेकानंद इ. स. 1895 मध्ये इंग्लंडला गेले असता त्यांच्या सखोल्ल चिंतनाने व नव्या युगाला अत्यंत उपयुक्त अशा विचारांनी भरलेल्या व्याख्यानांनी मागरिट नोबल प्रभावित झाल्या. 28 जानेवारी 1898 रोजी मागरिट नोबल भारतात आल्या. पुढे 25 माच् 1898 रोजी स्वामी विवेकानंदानी त्यांना विधिपूर्वक 'ब्रह्मचारिणी' व्रताची दीक्ष देऊन त्यांचे नाव 'निवेदिता' (निवेदिता म्हणजे जिने आपले जीवन समर्पित केल आहे अशी) असे ठेवले आणि ते पुढे चालून मागरिट नोबल यांनी आपले बदलल नाव खरे करून दाखविले. याच वर्षी कलकत्ता येथे 'निवेदिता बालिका विद्यालया'ची स्थापना त्यांनी केली.कलकत्त्यात उद्भवलेल्या इ. स. 1899 मध्ये प्लेगच्या साथीत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांची सेवा केली. रामकृष्ण मिशनला मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांचा दौरा केला. इ. स. 1902 मध्ये पुण्यास जाऊन देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या चाफेकर बंधुंच्या आईच्या चरणांना स्पर्श करून तिच्या चरणाची धूळ त्यांनी आपल्या मस्तकी लावली. इ. स.1905 मध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला. त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा-1. द मदर, 2. हिंट्स ऑन नॅशनल एज्युकेशन इन इंडिया, 3. वेब ऑफ द इंडियन लाईफ, 4. रिलीजिएन ॲण्ड धर्मा, 5. सिव्हिल ॲण्ड नॅशनल आइडियल्स ,13 ऑक्टोबर 1911 रोजी दार्जिलिंग (पं. बंगाल) येथे त्यांचे निधन झाले.
भगिनी निवेदिता
28 ऑक्टोबर 1944 रोजी अमेरिकेतील डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट हिचा मृत्यू झाला. तिचा जन्म 28 नोव्हेंबर 1853 मध्ये झाला होता.
X X
28 ऑक्टोबर 1900 रोजी जर्मन विचारवंत मॅक्समुल्लर याचा मृत्यू झाला त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1823 मध्ये झाला होता.
28 ऑक्टोबर 1811 रोजी हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 3 डसेंबर 1776 मध्ये झाला होता .
28 ऑक्टोबर 1627 रोजी मुघल सम्राट जहांगीर – 4 था याचे निधन झाले. त्याचा जन्म 30 ऑगस्ट 1569 मध्ये झाला होता.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/09/october-27-day-of-special-dinvishesh-27.html
👆
October 27 - Day of Special (Dinvishesh)
ऑक्टोबर 27 : दिनविशेष
X X
X X
X X
View, Comments and Share...........








0 Comments