Subscribe Us

header ads

September 28 - Day of Special (Dinvishesh) सप्टेंबर 28 : दिनविशेष

September 28 - Day of Special (Dinvishesh)

सप्टेंबर 28 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


Green Consumer Day
आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन
28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.

28 सप्टेंबर 1803 रोजी फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचा जन्म झाला होता.त्यांचा मृत्यू 23 सप्टेंबर 1870 रोजी झाला.
X X
28 सप्टेंबर 1836 रोजी बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म झाला होता.त्यांचा मृत्यू 27 जानेवारी 1910 रोजी झाला.

28 सप्टेंबर 1837 रोजी साली अंतिम भारतीय मुघल सम्राट बहादूर शहा द्वितीय दिल्ली येथील सम्राट बनले.

28 सप्टेंबर 1837 रोजी साली भारतातील शेवटचे मुघल शासक बादशहा अकबर द्वितीय यांचे निधन झाले.

28 सप्टेंबर 1895 रोजी फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मायक्रोबायोलॉजीचे जनक,पाश्चारायझेशन प्रकिया,रेबीज व अँथ्रॅक्स रोगांवर प्रतिबंधक लशींचे जनक असलेल्या लुई पाश्चर अनेक माणसांचे प्राण वाचवणाऱ्या या महान संशोधकाचे निधन वयाच्या 72 व्या वर्षी मर्निस ला कॉकेट ( Marnes-la-Coquette) फ्रान्स येथे झाले.

X X
28 सप्टेंबर 1898 रोजी स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, हिंदू महसभेचे अध्यक्ष शंकर रामचंद्र तथा मामाराव दातेयांचा जन्म झाला होता. देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता.

28 सप्टेंबर 1907 रोजी ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे, बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले तरी अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर असलेल्या थोर, वीर क्रांतिकारक भगतसिंगांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 मार्च 1931 रोजी झाला कारण त्यांना इंग्रजांनी फाशी दिले.

28 सप्टेंबर 1909 रोजी मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (1980) अभिनेते पी. जयराज यांचा जन्म झाला होता.त्यांचा मृत्यू 11 ऑगस्ट 2000 रोजी झाला.
X X

28 सप्टेंबर 1924 रोजी पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

28 सप्टेंबर 1925 रोजी अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म झाला होता.

28 सप्टेंबर 1928 रोजी सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.

28 सप्टेंबर 1929 रोजी सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्‍न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण लता मंगेशकर यांचा जन्म झाला होता.

28 सप्टेंबर 1935 रोजी कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन यांचे निधन. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1860 रोजी झाला होता.

28 सप्टेंबर 1939 रोजी दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

28 सप्टेंबर 1947 रोजी बांगलादेशच्या 10 व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म झाला होता.

28 सप्टेंबर 1949 रोजी साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी 40वे सरन्यायाधीश राजेंद्रमल लोढा यांचा जन्म झाला होता.

28 सप्टेंबर 1950 रोजी इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
X X
28 सप्टेंबर 1953 रोजी संयुक्त महाराष्ट्राची मागणी सर्व समावेशक आणि व्यापक दृष्टीने व्यक्त करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या तिन्ही भागातील प्रमुख नेते नागपूरला एकत्र आले व नागपूर करार झाला. यामध्ये भाऊसाहेब हिरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

28 सप्टेंबर 1953 रोजी अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता.

28 सप्टेंबर 1956 रोजी विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 1 आक्टोबर 1881 रोजी झाला होता.

28 सप्टेंबर 1958 रोजी साली फ्रांस देशांत संविधान आमलात आणण्यास मंजुरी देण्यात आली.

28 सप्टेंबर 1960 रोजी माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

28 सप्टेंबर 1970 रोजी इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे निधन झाले.
X X
28 सप्टेंबर 1982 रोजी ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म झाला होता.

28 सप्टेंबर 1992 रोजी पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निधन झाले.

28 सप्टेंबर 1994 रोजी भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1917 रोजी झाला होता.

28 सप्टेंबर 1999 रोजी महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर

28 सप्टेंबर 2000 रोजी विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

28 सप्टेंबर 2000 रोजी श्रीधरपंत दाते – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते यांचे निधन झाले.

28 सप्टेंबर 2002 रोजी सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात 1 मृत्यू तर 4 गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.
X X
28 सप्टेंबर 2004 रोजी लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1905 रोजी झाला होता.

28 सप्टेंबर 2007 रोजी नासाचे व्यवस्थापक मायकल डी. ग्रिफिन यांनी सांगितले की 2037 पर्यंत मंगळावर माणूस उतरवण्याचे नासाचे ध्येय आहे.

28 सप्टेंबर 2007 रोजी पासून जागतिक रेबीज दिन पाळला जातो. रेबिजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत. रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी ( जसे की, कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा हा रोग आहे. रेबिजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने होतो. या भयानक रोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्याचे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी 'एकच औषध' उपलब्ध असावे, या हेतूने हा दिवस पाळला जातो.

28 सप्टेंबर 2008 रोजी साली स्पेसएक्स कंपनीने बनविलेले फाल्कन 1 हे यान पृथ्वीच्या कक्षेत जाणारे पहिले खासगी-विकसित द्रव-इंधन प्रक्षेपण वाहन बनले.

28 सप्टेंबर 2012 रोजी ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे निधन झाले.त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1928 रोजी झाला होता.
X X
28 सप्टेंबर 2012 रोजी माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक (शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल, सागर, चमत्कार), फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले – 1975)यांचे निधन झाले.

28 सप्टेंबर 2015 रोजी साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, शैक्षणिक आणि पत्रकार वीरेन डंगवाल यांचे निधन झाले.


28 सप्टेंबर 2023 रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक (India Green Revolution) म्हणून ओळखले जाणारे डाॅ. एम. एस. स्वामिनाथन (M. S. Swaminathan) यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. स्वामिनाथन यांना 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. अनेक पुरस्कारांव्यतिरिक्त, स्वामिनाथन हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार (1971) आणि अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार (1986) प्राप्तकर्ते आहेत.

28 सप्टेंबर 2022 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ वकील आर वेंकटरमणी हे भारताचे सोळावे महान्यायवादी attorney general of India म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांची ही नियुक्ती केके वेणुगोपाल यांच्या जागी करण्यात आली. कार्यकाल हा तीन वर्षाचा असतो. ते 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2010 मध्ये ते विधी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते तसेच 2001 मध्ये जेव्हा येथे संयुक्त राष्ट्राचे मानव अधिकार उच्चायुक्त आणि न्यायवैद्यकांचा आंतरराष्ट्रीय आयोग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. न्यायमूर्ती एम एन व्यंकट चालय्या यांच्या अध्यक्षतेखाली संविधान पुनरावलोकन आयोगातही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले.

XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/september-27-day-of-special-dinvishesh.html
👆
September 27 - Day of Special (Dinvishesh)

सप्टेंबर 27 : दिनविशेष

X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/09/louis-pasteur-28-louis-pasteur.html
👆
Louis Pasteur : Father of Microbiology 

लुई पाश्चर( Louis Pasteur ) : मायक्रोबायोलॉजीचे जनक,पाश्चारायझेशन प्रकिया,रेबीज व अँथ्रॅक्स रोगांवर प्रतिबंधक लशींचे जनक 

28 सप्टेंबर : स्मृतिदिन
X X





View, Comments and Share...........


Post a Comment

1 Comments

  1. चांगली माहिती मिळली

    ReplyDelete