July 5 - Day of Special (Dinvishesh)
जुलै 5 : दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार)
'आझाद हिंद सेने'चा आज स्थापनादिन
स्वातंत्र्य दिन: अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.
5 जुलै 1658 रोजी मुघल शासक बादशाहा औरंगजेब यांनी आपल्या मोठा भाऊ मुघल मुराद बख्श यांना बंदी बनवलं.
5 जुलै 1687 रोजी सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
5 जुलै 1811 रोजी व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
5 जुलै 1830 रोजी फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
X X
5 जुलै 1841 रोजी थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
5 जुलै 1867 रोजी अँड्य्रू इलिकॉट डग्लस अमेरिकन अंतराळ विज्ञान अभ्यासक यांचा जन्म उच्चशिक्षित कुटुंबात झाला. वृक्षाच्या खोडामधील वाढचक्रांचा सौरडागांशी संबंध असल्याचे, त्यांनी सर्वप्रथम सिद्ध केले. वाढचक्रांच्या संख्येवरून वृक्षाचे वय मोजताना डग्लस यांच्या या गोष्टी लक्षात आल्या आणि यातूनच ‘डेंड्रोक्रोनॉलॉजी’ या आधुनिक विज्ञान शाखेचा जन्म झाला, म्हणूनच त्यांना या शास्त्राचे पितामह म्हणतात.
5 जुलै 1884 रोजी जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
5 जुलै 1905 रोजी लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
5 जुलै 1913 रोजी किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.
5 जुलै 1946 रोजी फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु केली.
5 जुलै 1950 रोजी इस्रायेलच्या क्वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
X X
5 जुलै 1954 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
5 जुलै 1954 रोजी बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
5 जुलै 1962 रोजी अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
5 जुलै 1975 रोजी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.
5 जुलै 1975 रोजी ’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.
5 जुलै 1975 रोजी ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
5 जुलै 1977 रोजी पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात रवानगी केली.
5 जुलै 1980 रोजी स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.
5 जुलै 1986 रोजी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर
5 जुलै 1997 रोजी स्वित्झर्लंडच्या अवघ्या 16 वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. हे तिच्या कारकिर्दितील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते.
X X
5 जुलै 1998 रोजी साली तामिळनाडू राज्यात डॉल्फिन सिटीचे उद्घाटन करण्यात आले.
5 जुलै 1998 रोजी भारतीय लष्कर दलाने स्वदेश निर्मित रणगाडाविरोधी नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
5 जुलै 1999 रोजीसंयुक्त राष्ट्र अमेरिकेने तालिबान राष्ट्रावर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली.
5 जुलै 2004 रोजी FRBM कायदा 2003 अमलात आणला.
5 जुलै 2004 रोजी इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्यात आली.
5 जुलै 2009 रोजी अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी 15 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
5 जुलै 2012 रोजी 310 मीटर (1020 फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
5 जुलै 2017 रोजी राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात झाली.
5 जुलै 1882 रोजी हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 फेब्रुवारी 1927 मध्ये झाला.
5 जुलै 1918 रोजी के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 डिसेंबर 2010 मध्ये झाला.
X X
5 जुलै 1920 रोजी आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 1996 मध्ये झाला.
5 जुलै 1925 रोजी नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 2012 मध्ये झाला.
5 जुलै 1946 रोजी राम विलास पासवान – केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म मृत्यू 8 ऑक्टोबर 2020 मध्ये झाला.
5 जुलै 1952 रोजी रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 आगस्ट 2000 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला होता.
5 जुलै 1954 रोजी जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म झाला.
5 जुलै 1968 रोजी युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म झाला.
5 जुलै 1995 रोजी पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधु उर्फ पी. वी. सिंधु यांचा जन्म झाला.
5 जुलै 1826 रोजी सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म सहा जुलै 1781 मध्ये झाला होता.
5 जुलै 1833 रोजी जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 मार्च 1765 मध्ये झाला होता.
X X
5 जुलै 1945 रोजी ऑस्ट्रेलियाचे 14 वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन झाले.
5 जुलै 1957 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 जून 1887 मध्ये झाला होता.
5 जुलै 1996 रोजी चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – रहस्यकथाकार यांचे निधन झाले.
4 जुलै 1999 रोजी विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा मृत्यु झाला. यांचा जन्म 14 मे 1990 रोजी झाला होता.
5 जुलै 2005 रोजी बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1934 मध्ये झाला होता.
5 जुलै 2006 रोजी भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1924 मध्ये झाला होता.
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/06/july-4-day-of-special-dinvishesh-4.html 👆 July 4 - Day of Special (Dinvishesh) जुलै 4 : दिनविशेष
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html 👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X X
View, Comments and share


1 Comments
Nice information
ReplyDelete