Subscribe Us

header ads

May 7 - Day of Special (Dinvishesh)

May 7 - Day of Special (Dinvishesh)
मे 7 : दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

रेडियो दिन : रशिया

7 मे 1849 रोजी जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.

7 मे 1878 रोजी पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन म्हणजे आताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले.

7 मे 1907 रोजी मुंबईमध्ये विजेच्या शक्तीवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु झाली.


                         ट्रॅम


7 मे 1928 रोजी ब्रिटन देशातील मतदाराची वयोमर्यादा ही 30 वर्षावरून कमी करून 21 वर्ष करण्यात आली.

7 मे 1940 रोजी विन्सटन चर्चिलन यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली.

              विन्सटन चर्चिलन

X X
7 मे 1946 रोजी सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.

7 मे 1955 रोजी एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा सुरू झाली.

7 मे 1976 रोजी होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.

7 मे 1990 रोजी लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.


7 मे 1992 रोजी एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.

                    एन्डेव्हर

7 मे 1998 रोजी मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी 40 अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
X X
7 मे 2000 रोजी व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.

              व्लादिमीर पुतिन 

7 मे 2004 रोजी नेपालचे तत्कालीन पंतप्रधान सूर्य बहादूर थापा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

7 मे 2000 रोजी कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.


7 मे 2012 रोजी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी तिसऱ्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली.
X X

7 मे 1792 रोजी युगोस्लाव्हिया सोशलिस्ट फेडरल रिपब्लिकचे माजी अध्यक्ष व क्रांतिकारक जोसेफ टिटो यांचा जन्म झाला.
                  जोसेफ टिटो


7 मे 1861 रोजी पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला. त्यांचा मृत्यू सात ऑगस्ट 1941 मध्ये झाला.


7 मे 1880 रोजी भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 एप्रिल 1972 मध्ये झाला. 18 एप्रिल 1972 रोजी महाहोपाध्याय डॉ. पांडूरंग वामन काणे यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 मे 1880 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम या ठिकाणी झाला. त्यांच्याबद्दल उल्लेखनीय बाब म्हणजे भारतशास्त्रज्ञ, संस्कृत विद्वान, भारतीय कायदे पंडित आणि धर्मशास्त्राचे ते अभ्यासक होते. भारत सरकारने त्यांना 1963 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या एकंदरीत संपूर्ण अभ्यासपूर्ण कार्यासाठी 40 पेक्षा जास्त सक्रिय शैक्षणिक संशोधन ज्यांचा परिणाम धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या सहा हजार पाचशे पृष्ठावर झाला. विसाव्या शतकात पाच खंडामध्ये त्यांनी धर्मशास्त्राचा इतिहास हे खंड प्रकाशित केले. कोकणातील वेदशास्त्र पारंगत व विद्वत्तेची परंपरा असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा उत्तम वैदिक पंडित होते. त्यांचे वडील सुद्धा वेदसंपन्न ,भगवद्गीता यांचे सखोल ज्ञान असलेले होते. त्यांनी लहान वयातूनच नियतकालिका मधून मराठीतून आणि इंग्रजी मधून लेखन सुरू केले. बीए आणि संस्कृत मधून एम ए करताना त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन केले. मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांबरोबर त्यांनी फ्रेंच आणि जर्मन भाषावर प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते एलएलबी झाले. वेदांत पारितोषिकसह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एमए झाले. त्यानंतर "हिंदू मुसलमान कायदा" घेऊन त्यांनी एलएलएम पूर्ण केले. काने यांनी 1904 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून काम केले.त्यानंतर एलफिस्टन्स हायस्कूल मुंबई येथे नोकरी केली. मुंबईच्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी शिकवले. मुंबई विद्यापीठाचे ते 1947 ते 1949 या कालखंडात कुलगुरू होते. "धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास" नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी 1941 मध्ये प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला आणि 1942 मध्ये त्यांना "महामहोपाध्याय" ही पदवी मिळाली. "हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स" हा त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर "भारतरामायणकालीन समाज स्थिती" हा 1911 मध्ये ग्रंथ प्रकाशित झाला. त्यानंतर 1935 मध्ये महत्त्वाचा मराठी ग्रंथ "धर्मशास्त्रविचार" हा प्रसिद्ध केला. त्यांनी असे एकूण 40 ग्रंथ चे लिखाण केले. त्यानंतर 115 लेख नियतकालिकातून प्रसिद्ध केले आणि 44 पुस्तक परिचय आणि परीक्षाने लिहून त्यांनी एक प्रचंड ज्ञानाचा विस्तार केला. "भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास" त्यांनी युरोपीय देशांना कळावे म्हणून इंग्रजीत लिहिला. ते सुमारे 7000 पाने आणि 5 खंडांमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही जागतिक पातळीवर अचूक आणि प्रमाण म्हणून मानला जातो. काने यांची राज्यसभेवर नियुक्ती 1943 ते 1959 या काळामध्ये राष्ट्रपती द्वारे झाली. "हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र" यातील पाच खंडापैकी चौथ्या खंडाला 1965 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काने यांना 1963 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने सन्मानित केले. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काही काळ काम केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे त फेलो होते.



7 मे 1892 रोजी क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 मे 1980 मध्ये झाला.


7 मे 1909 रोजी पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन एच. भूमी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू एक मार्च 1991 मध्ये झाला होता.

X X
7 मे 1912 रोजी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी सहा एप्रिल 1989 मध्ये झाला.
पन्नालाल पटेल


7 मे 1923 रोजी आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक यांचा जन्म झाला.

7 मे 1948 रोजी मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म झाला.

7 मे 1969 रोजी उत्तरप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे सदस्य केशव प्रसाद मौर्य यांचा जन्म झाला.

             केशव प्रसाद मौर्य

7 मे 1924 रोजी भारतीय कार्यकर्ते अलायरी सीताराम राजू यांचे निधन झाले.

7 मे 1991 रोजी लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1911 मध्ये झाला होता.

X X

7 मे 1994 रोजी ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन झाले.

7 मे 1999 रोजी भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे निधन झाले.

7 मे 2001 रोजी लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 मार्च 1905 मध्ये झाला होता.


7 मे 2001 रोजी गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 जून 1923 मध्ये पंजाब मधील अंबाला या ठिकाणी झाला होता.
प्रेम धवन


7 मे 2002 रोजी दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या यांचे निधन झाले.



X
X

https://www.insearchofknowledge.org/2024/04/may-6-day-of-special-dinvishesh.html
👆
मे 6 : दिनविशेष

May 6 - Day of Special (Dinvishesh)



XX

https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

X X
https://www.insearchofknowledge.org/2023/07/rabindranath-tagore-bengali-poet-writer.html
👆
7 मे: जन्मदिन

Rabindranath Tagore : Bengali Poet, Writer, Philosopher and Social reformer

रवींद्रनाथ टागोर: गुरुदेव ,कादंबरीकार, बंगाली कवी, आणि समाजसुधारक, नोबेल पुरस्कार प्राप्त



https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

----------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

Career path finder:       

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

------------------------------------------

https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

Career path finder:

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी








X X

View, Comments and share  

Post a Comment

1 Comments