June 8 - Day of Special (Dinvishesh)
जुन 8 : दिनविशेषजागतिक मेंदूचा ट्यूमर दिन (World Brain Tumor Day)
International Day Of Action For Elephants In zoos
जागतिक समुद्र दिन (World Oceans Day)
8 जून 1908 रोजी मिऱ्या जि. रत्नागिरी येथे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री परशुराम कृष्णाजी सावंत यांचा जन्म झाला.
8 जून 2014 रोजी मुंबईत पहिली मेट्रो ट्रेन वर्सोवा ते घाटकोपर या दरम्यान धावली.
8 जून रोजी जागतिक महासागर दिन जगभर पाळला जातो. 2008 सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविण्यात आले. त्यापूर्वी 1982 सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात.
X X
8 जून 1624 रोजी पेरू येथे भूकंप झाला.
8 जून 1658 रोजी मुघल शासक औरंगजेब यांनी आग्र्याचा किल्ला काबीज केला.
8 जून 1670 रोजी पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
8 जून 1707 रोजी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
8 जून 1713 रोजी मुघलांनी 1689 मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
X X
8 जून 1783 रोजी आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार लोक ठार.
8 जून 1912 रोजी कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.
8 जून 1915 रोजी टिळकांनी मंडाले तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून पुर्ण केला.
8 जून 1915 रोजी लो. टिळक यांचे मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली.
8 जून 1918 रोजी नोव्हा अॅक्विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला.
8 जून 1941 रोजी दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
8 जून 1948 रोजी भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान एअर-इंडियाची हवाई सेवा सुरु झाली.
8 जून 1948 रोजी जॉर्ज ऑर्वेलची 1984 या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.
X X
8 जून 1953 रोजी कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
8 जून 1968 रोजी बर्मोडा देशाने संविधान अंगिकारले.
8 जून 1969 रोजी लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती करण्यात आली.
8 जून 1992 रोजी पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.
8 जून 2004 रोजी आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण 1882 या वर्षी झाले होते.
X
X
8 जून 1906 रोजी भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली यांचा जन्म झाला.
8 जून 1910 रोजी दिनकर केशव बेडेकर, तत्त्वचिंतक, समीक्षक, लेखक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 मे 1973 रोजी झाला.
8 जून 1915 रोजी भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 ऑगस्ट 2015 मध्ये झाला.
8 जून 1917 रोजी गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 एप्रिल 2009 रोजी झाला.
8 जून 1921 रोजी इंडोनेशिया देशाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो (Suharto) यांचा जन्म झाला.
X X
8 जून 1925 रोजी बार्बरा बुश, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुशची आई हिचा जन्म झाला.
8 जून 1936 रोजी नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म झाला.
8 जून ई.पुर्व 632 रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांचे निधन झाले.
X X
8 जून 1795 रोजी फ्रान्सचा राजा लुई 17 वा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 मार्च 1785 रोजी झाला.
8 जून 1809 रोजी अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 जानेवारी 1737 रोजी झाला.
8 जून 1845 रोजी अमेरिकेचे 7वे राष्ट्राध्यक्ष ॲन्ड्रयू जॅक्सन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 17 मार्च 1767 मध्ये झाला.
8 जून 1995 रोजी रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन झाले.
8 जून 1998 रोजी नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन झाले.
8 जून 2009 रोजी लोकप्रिय भारतीय उर्दू-हिंदी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि अभिनेता हबीब तनवीर यांचे निधन झाले.
आठ जून 2022 रोजी महिला क्रिकेट मध्ये जागतिक आघाडीची फलंदाज मिताली राज यांनी निवृत्ती जाहीर केली. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी एकदिवशीय कारकीर्द असलेले क्रिकेटपटू आहे. 22 वर्ष 274 दिवस. त्यांना भारताची लेडी तेंडुलकर म्हणूनही ओळखले जाते. 2005 मध्ये भारताच्या कर्णधार होत्या. 2005 आणि 2017 मध्ये दोनदा आयसीसी एकदिवशीय विश्वचषक फायनल मध्ये भारताचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरली. दोनशे एकदिवशी सामने खेळणारी पहिली महिला म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांना 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2015 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, 2017 मध्ये जागतिक आघाडीची महिला क्रिकेटपटू पुरस्कार आणि 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिताली राज वरील बायोपिक मध्ये तापसी पन्नू या अभिनेत्रीने मुख्य भूमिका केली.
X
X
👆
June 7 - Day of Special (Dinvishesh)
जुन 7 : दिनविशेष
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
X
X
👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी
X
X
X
X
View, Comments and share
0 Comments