June 7 - Day of Special (Dinvishesh)
जुन 7 : दिनविशेषजागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day): जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी 7 जून रोजी अन्नजन्य धोके टाळण्यासाठी, शोधणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी आणि मानवी आरोग्य सुधारण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आणि कृती करण्यासाठी एकत्रितपणे साजरा केला जातो.
7 जून 1539 रोजी बक्सर च्या जवळ चौसा या ठिकाणी अफगाण शासक शेरशाह सुरी आणि मुघल शासक बादशाहा हुमायू यांच्यात झालेल्या लढाईत बादशाहा हुमायू यांचा पराभव झाला.
7 जून 1893 रोजी महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.
7 जून 1938 रोजी डी. सी. -4 प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण केले.
X X
7 जून 1965 रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
7 जून 1975 रोजी क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.
7 जून 1979 रोजी रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-1 उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
7 जून 1981 रोजी इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.
7 जून 1985 रोजी विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद 17 व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
X X
7 जून 1991 रोजी फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
7 जून 1994 रोजी आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
7 जून 2001 रोजी युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत प्राप्त झाले.
7 जून 2004 रोजी शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली.
7 जून 2006 रोजी अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.
X X
7 जून 1837 रोजी अलोइस हिटलर एडॉल्फ हिटलरचे वडील यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 जानेवारी 1903 मध्ये झाला.
7 जून 1913 रोजी लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 एप्रिल 2010 मध्ये झाला.
7 जून 1914 रोजी दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 जून 1987 मध्ये झाला.
X X
7 जून 1917 रोजी अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 डिसेंबर 1995 मध्ये झाला.
7 जून 1942 रोजी लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 ऑक्टोबर 2011 मध्ये झाला.
7 जून 1949 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुरिंदरसिंग निज्जर यांचा जन्म झाला.
7 जून 1957 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश व भारतीय सशस्त्र सैन्य न्यायाधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांचा जन्म झाला.
X X
7 जून 1959 रोजी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा जन्म झाला.
7 जून 1974 रोजी महेश भूपती, भारतीय टेनिसपटू याचा जन्म झाला.
7 जून 1975 रोजी पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व टेलीव्हिजन मालिका निर्माता आणि दिग्दर्शिका एकता कपूर यांचा जन्म झाला.
7 जून 1821 रोजी रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन झाले.
7 जून 1954 रोजी ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 23 जून 1912 मध्ये झाला.
X X
7 जून 1970 रोजी ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक जानेवारी 1879 मध्ये झाला.
7 जून 1978 रोजी रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश (चित्रित), ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता यांचे निधन झाले.
7 जून 1992 रोजी डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक यांचा मृत्यू झाला.
7 जून 1992 रोजी नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1909 मध्ये झाला.
7 जून 1998 रोजी शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष यांचा मृत्यू झाला.
7 जून 2000 रोजी बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला.
X X
7 जून 2002 रोजी बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती यांचे निधन झाले.
7 जून 2020 रोजी चिरंजीवी सर्जा भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते यांचे निधन झाले. त्यांचा जन्म एक ऑक्टोबर 1984 मध्ये झाला होता.
X
X
👆
June 6 - Day of Special (Dinvishesh)
जुन 6 : दिनविशेष
X
X
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆 10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधीX
X
X
X
View, Comments and share
0 Comments