Subscribe Us

header ads

June 14 - Day of Special (Dinvishesh)

June 14 - Day of Special (Dinvishesh)

जुन 14 : दिनविशेष






महत्त्वाच्या घटना

14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो.

14 जून या दिवशी गुरु अर्जुन देव शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.

१७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

१७७५: अमेरिकन सैन्य दलाची स्थापना करण्यात आली.
XX

१७७७: अमेरिकेने ’स्टार्स अँड स्ट्राइप्स’ या ध्वजाचा स्वीकार केला.

१७८९: मक्यापासुन पहिल्यांदाच "व्हिस्की" तयार करण्यात आली. तिला ’बोर्बोन’ असे नाव देण्यात आले कारण तयार करणारा रेव्हरंड क्रेग हा केंटुकी प्रांतातील ’बोर्बोन’ येथील रहिवासी होता.


१८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी "अनाथ बालिकाश्रम" ही संस्था स्थापन केली. यातुनच पुढे कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. विद्यापीठ असे मोठमोठे उपक्रम सुरू झाले.

XX
१९०१: पहिल्यांदा गोल्फ खेळाची प्रतियोगिता अमेरिकेत आयोजित करण्यात आली.

१९०७: नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

१९२६: ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर पडला.

१९३४: ऑस्ट्रिया देशाची राजधानी वियना येथे जर्मन शासक हिटलर आणि मुसोलिनी यांची भेट झाली.

१९३८: सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली.

१९४०: जर्मनीने पॅरिस ताब्यात घेतल्यामुळे दोस्त राष्ट्रांनी तिथुन माघार घेतली.

१९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली.


१९५२: अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
XX
१९६२: पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली. नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.

१९६७: चीनने पहिल्या ’हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.

१९६७: मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित केले.

१९७२: डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

१९९९: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.

XX
२००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१३९८: संत कबीर पवित्र जलवाहिनी गंगा नदीच्या काठी, आजपासून सुमारे 602 वर्षां पूर्वी (इतिहासकारांनी इ. सन. 1456 ते 1575 च्या दरम्यानचा काळ मानला आहे) वाराणसीच्या पवित्र भूमीवर लहरतारा गावाच्या सरोवराच्याजवळ कबीरदासांचे प्रकटीकरण झाले असे मानले जाते. अशी किंवदन्ती आहे की, एका विणकराने सरोवराच्या काठावर आक्रोश करणाऱ्या ज्या लहान बालकाचे पालनपोषण केले, तोच पुढे आपल्या दोह्यांच्या द्वारे समाजाला झटका देणारा कबीर बनला आणि संत कबीर या नांवाने जग प्रसिद्ध झाला.

१४४४: भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म झाला.

१७३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम याचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 ऑगस्ट 1806 मध्ये झाला.


XX
१८६४: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 19 डिसेंबर 1915 मध्ये झाला.


१८६८: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 26 जून 1943 मध्ये झाला.


१८९९: महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी ब्रिगेडियर राजिंदर सिंह यांचा जन्म झाला.

१९००: भारतीय निबंध लेखक आणि मल्याळम साहित्यांचे साहित्यिक समीक्षक कारिककट्ट मराठू कुट्टिकृष्ण मरार यांचा जन्म झाला.

१९१६: माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवान प्रेम चंद यांचा जन्म झाला.
XX
१९२०: प्रख्यात जैन धर्मीय स्वेतंबर तेरापंथ आदेशाचे दहावे प्रमुख, संत, योगी, अध्यात्मिक नेते, तत्वज्ञ, लेखक, वक्ते आणि कवी आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा जन्म झाला.

१९२२: हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक के. असिफ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मार्च 1971 मध्ये झाला.


१९४६: अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प(Donald Trump) यांचा जन्म झाला.


१९५५: सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका अभिनेत्री, गायक, मनोरंजन निर्माता, टीव्ही टॉक शो होस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या किरण अनुपम खेर यांचा जन्म झाला.

१९५९: लोकप्रिय भारतीय तेलगु भाषिक वक्ता व सनातन धर्मीय भाष्यकार चगंती कोटेश्वरा राव यांचा जन्म झाला.
XX
१९६७: प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्म झाला.

१९६८: प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन राजकारणी तसचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्म झाला.

१९६९: साली प्रसिद्ध जर्मन माजी व्यावसायिक टेनिसपटू स्टेफनी मारिया(Stephanie Maria) यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 22 ग्रँड स्लॅम एकेरीचे जेतेपद जिंकले आहे.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८२५: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1754 मध्ये झाला होता.

XX
१९१६: आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन झाले. त्यांनी स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1855 मध्ये झाला होता.


१९२०: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर याचे निधन झाले. त्याचा जन्म 21 एप्रिल 1864 मध्ये झाला होता.

१९४६: ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दुरचि त्रवाणी संशोधक जॉन लोगीबेअर्ड याचे निधन झाले.

१९६१: प्रसिद्ध भारतीय नोबल पारितोषिक वेजेते भौतिकशास्त्रज्ञ सी. वी. रमण यांचे शिष्य भौतिकशास्त्रज्ञ सर करिमानीक्कम श्रीनिवास कृष्णन यांचे निधन झाले.

१९८९: अभिनेत्री व संस्कृत पंडित सुहासिनी मुळगांवकर यांचा जन्म झाला . मराठी रंगभूमीवरील एकपात्री नाट्यप्रयोगांची सुरुवात त्यांनी केली. 31 जानेवारी 1960 रोजी "सौभद्र" नाटकाचा पहिला एकपात्री प्रयोग त्यांनी केला. या नाटकाचे त्यांनी विक्रमी 500 प्रयोग केले.

XX
२००७: संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 डिसेंबर 1918 मध्ये झाला होता.

२०११: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रुद्र्विणा वादक भारतीय संगीतकार असद अली खान यांचे निधन झाले.

२०२०: बॉलीवूड एक्टर सुशांत सिंग राजपुत यांच निधन झाले.

XX

👆
June 13 - Day of Special (Dinvishesh)

जुन 13 : दिनविशेष

XX

 https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html👆

10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

XX

👆
Sant Kabirdas
संत कबीरदास

संत कबीर ज्ञानामृत- (संत कबीरांचे दोहे)
1. उपदेश (गुरु ज्ञानाचे महत्त्व )





XX









View, Comments and share 

Post a Comment

0 Comments