Subscribe Us

header ads

June 15 - Day of Special (Dinvishesh)

June 15 - Day of Special (Dinvishesh)

जुन 15 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस / जागतिक वृद्धजन अवमान विरोध दिन

जागतिक वारा दिन: पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.


15 जून हा दिवस ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो.

15 जून 2005 मध्ये भारत सरकारने राज्यांसाठी जम्मू कश्मीर राज्य वगळून माहितीचा अधिकार 2005 या अधिनियमातील कलम 4 (1 ) कलम 5 (11 ) कलम 12, 13, 15, 16, 27 व 28 मधील तरतुदी लागू केल्या.


15 जून 1967 रोजी वैद्यकीय इतिहासात प्रथम रक्तदान करण्यात आले. जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने 15 वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असले रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झाले.
XX
15 जून 1762 रोजी ऑस्ट्रिया देशांत कागदी नोटाचे चलन सुरु करण्यात आले.

15 जून 1775 रोजी अमेरिकन क्रांती – जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक.

15 जून 1844 रोजी चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.


15 जून 1969 रोजी महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.

15 जून 1908 रोजी साला कलकत्ता शेअर बाजाराची माहिती देण्यात आली

15 जून 1919 रोजी कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
XX
15 जून 1947 रोजी अखिल भारीय कॉंग्रेस दिल्ली येथे भारताचे विभाजन करण्यासाठी ब्रिटीश योजनेचा स्वीकार केला.


15 जून 1970 रोजी बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

15 जून 1993 रोजी संपूर्ण देशी बनावटीच्या सहा "अर्जुन" रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त करण्यात आली.


15 जून 1994 रोजी इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

15 जून 1997 रोजी अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी होऊन आरोप चुकवत असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्‍च न्यायालयाने दिला.
XX

15 जून 2001 रोजी प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ पटू ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी नॅशनल ‘ए’ विस्डम स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकून विश्वविक्रम रचला.

15 जून 2002 रोजी नियर अर्थ ऍस्टेरॉइड 2002 एम.एन. पृथ्वीपासून फक्त 1,20,000 कि.मी. (75,000 मैल) दूरून गेला.


15 जून 2008 रोजी "लेहमन ब्रदर्स" या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.


15 जून 1878 रोजी भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट ॲबॉट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 जून 1955 रोजी झाला.

15 जून 1984 रोजी स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटीशविरोधी बंगाली भारतीय क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीयतावादी विद्वान तारकनाथ दास यांचा जन्म झाला.


15 जून 1898 रोजी पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 ऑगस्ट 1986 रोजी झाला.

XX
15 जून 1899 रोजी भारतीय सैन्य दलाचे माजी सैन्य प्रमुख जनरल महाराज श्री राजेंद्रसिंह जडेजा यांचा जन्म झाला.

15 जून 1899 रोजी साल पद्मभूषण पुरस्कार प्रसिद्ध भारतीय चित्रकार, शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष देवी प्रसाद राय चौधरी यांचा जन्म झाला.


15 जून 1907 रोजी स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 मे 1993 रोजी झाला.

15 जून 1912 रोजी प्रसिद्ध उत्तर भारतीय साहित्यकार श्रीमन्नारायण अग्रवाल यांचा जन्म झाला.


15 जून 1917 रोजी संगीतकार मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 जुलै 1995 रोजी माहीम, मुंबई या ठिकाणी झाला.

15 जून 1923 रोजी साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म झाला.
XX
15 जून 1927 रोजी भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्न-ए-इनशा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 जानेवारी 1978 रोजी झाला.

15 जून 1928 रोजी प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, समिक्षक, शिक्षक. ललित लेखक, उत्तम वक्ता व सूत्रसंचालक साहित्यकार शंकर वैद्य यांचा जन्म झाला.

15 जून 1929 रोजी गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 31 जानेवारी 2004 रोजी झाला.

15 जून 1932 रोजी झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक त्यांचा मृत्यू ८ मे २०१३ रोजी झाला.

15 जून 1933 रोजी महाराष्ट्रीयन मराठी लेखिका, समिक्षक, ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा साहित्याच्या साहित्यकार तसचं, महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालक सरोजिनी वैद्य यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 ऑगस्ट 2007 मध्ये झाला.

XX
15 जून 1934 रोजी भारतीय राजकारणी व राज्यसभेचे सदस्य देवदास आपटे यांचा जन्म झाला.

15 जून 1940 रोजी आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक किसन बाबूराव तथा "अण्णा" हजारे यांचा जन्म झाला.
अण्णा हजारे यांचे संपूर्ण नाव किसन बाबूराव हजारे होय. त्यांचा जन्म भिंगार येथे झाला. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी होय. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण राळेगण सिद्धीत व सातवीपर्यंतचे शिक्षण मुंबईमध्ये घेतले. गरिबी परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी काही काळ फुलांच्या विक्रीचा व्यवसाय केला. पुढे 1960 मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. 1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धात तसेच 1965 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात त्यांनी भाग घेतला होता. 1975 मध्ये अण्णा हजारे सैन्य दलातून निवृत्त झाले. अण्णा हजारे हे निवृत्त झाल्यानंतर आपल्या राळेगण सिद्धी या गावी परत आले. गावातील दैन्यावस्था पाहून त्यांच्यातील समाजसेवक जागा झाला. त्यांनी गावाचा सामाजिक, कृषी, शैक्षणिक विकास करून गावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे ठरविले. गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अण्णांनी अनेक विधायक उपक्रम हाती घेतले आणि त्यामध्ये त्यांना यश मिळाले. अण्णा हजारे यांनी सामाजिक, शैक्षणिक व शेतीविषयक उपक्रम राळेगण सिद्धीत राबविले. एक आदर्श ग्राम बनविण्यात अण्णांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी राळेगण सिद्धीत खालील उपक्रम राबविले.त्यांच्या सामाजिक उपक्रम उपक्रमाबद्दल सांगायचे झाले तर ग्रामविकास म्हणजे केवळ भौतिक सुधारणा करणे नव्हे तर गावातील माणसाला आचारशील व विचारशील बनविणे होय, असे त्यांचे ग्रामविकासासंबंधी मत आहे. म्हणून त्यांनी प्रथम खालील उपक्रमांना प्राधान्य दिले. दारूबंदी, अस्पृश्यतानिवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबंदी, सामुदायिक विवाह, ग्रामसफाई, व्यसनमुक्ती अशा विधायक उपक्रमांत लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अण्णांनी पुष्कळ प्रयत्न केले. अण्णांनी कृषि विकास मध्ये पुढाकार घेऊन श्रमदानाने सामुदायिक विहिरी खोदल्या.'पाणी अडवा - पाणी जिरवा' ही मोहीम राबविली. त्यामुळे गावातील शेतजमिनी ओलिताखाली आल्या. अण्णांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले. याशिवाय शेतीमाल विक्रीची व्यवस्था, धान्य बँक, पर्यावरण रक्षण यांसारखी अनेक विधायक कामे अण्णांनी आपल्या गावात केली आहेत. सोबत शैक्षणिक व आरोग्य विकास केला. लोकांनी आपल्या मुलांना शाळेत घातलेच पाहिजे, अशी सक्ती त्यांच्यावर करण्यात आली. गावात बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, वसतिगृह, वाचनालय यांच्यासाठी सार्वजनिक इमारती अण्णांच्या पुढाकाराने उभ्या राहिल्या. गावात आरोग्य केंद्र सुरू करून कुटुंबनियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी केली.सूर्यशक्तीचा वापर करणारा सोलर हिटर, गोबरगॅस प्लँट या सोयी केल्यामुळे इंधनाची समस्या सुटण्यास मदत झाली. अशा प्रकारे अण्णा हजारे यांनी गावाचा सामाजिक, कृषी, आरोग्य व शैक्षणिक विकास केला. त्यामुळे गावात आर्थिक सुबत्ता आली.अण्णा हजारे यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. 1987 मध्ये 'प्रियदर्शनी इंदिरा गांधी वृक्षमित्र पुरस्कार', महाराष्ट्र शासनातर्फे 'कृषिभूषण पुरस्कार',भारत सरकारतर्फे ' पद्मश्री' व 'पद्मविभूषण' हे किताब त्यांना देण्यात आले. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष म्हणून सतत सक्रिय राहिल्याबद्दल ट्रान्सफरन्सी इंटरनॅशनल या जर्मनीतील संस्थेच्या वतीने इंटग्रिटी पुरस्काराने सन्मानित.






                    अण्णा हजारे


15 जून 1943 रोजी भारतीय क्रिकेट संघातील माजी भारतीय क्रिकेटपटू तपन बॅनर्जी यांचा जन्म झाला.

15 जून 1947 रोजी साहित्यिक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा जन्म झाला. ‘किरवंत’ हे प्रसिद्ध नाटक, 11 एकांकिका, 13 नाटके, 2 लघुकथासंग्रह, 1 कादंबरी, 1 कवितासंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘घोटभर पाणी’ (1977) या त्यांच्या एकांकिकेचे 3000 हुन अधिक प्रयोग झाले आहेत. 2003 मध्ये त्यांनी ‘बोधी नाट्य परिषदेची’ स्थापना केली.

15 जून 1950 रोजी भारतीय स्टील उद्योग सम्राट व जगातील सर्वात मोठ्या स्टीलमेकिंग कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांचा जन्म झाला.
XX


15 जून 1534 रोजी योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1486 मध्ये झाला होता. 18 फेब्रुवारी 1486 रोजी भारतातील बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभुंचा जन्म बंगालमधील नवद्वीपधाम ना दिया सध्याचे मायापूर येथे झाला. त्यांना गौरांग या नावानेही ओळखले जाते त्यांनी बंगालमध्ये गौरीय वैष्णव सांप्रदाय स्थापन केला भगवान श्रीकृष्णाचे उत्साही ते भक्त होते. जगन्नाथाची भक्ती आणि उपासना करण्यासाठी निलाचल येथे ते गेले 18 वर्षे तेथे राहिले आणि अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी गृहस्थांचा आश्रम सोडला. संन्यास दीक्षा केशव भारती कडून पंधराशे नऊ मध्ये घेतली त्यानंतर त्यांना श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू असे नाव धारण केले. त्यांनी वृंदावन मध्ये सात वैष्णव मंदिराची स्थापना केली त्यास सप्त देवालय म्हणतात. त्यांचे शिष्य कृष्णदास कविराज यांनी चैतन्य चरितामृत हा ग्रंथ लिहिला त्यानंतर वृंदावन दासणे चैतन्य भागवत लिहिले लोचनदासने चैतन्यमंगलची रचना केली. चैतन्य महाप्रभूंचा मृत्यू 14 जून पंधराशे 34 मध्ये पुरी या ठिकाणी ओडिसा राज्यात झाला.


15 जून 1878 रोजी भारतातील "राधा स्वामी सत्संग" पंताचे संस्थापक शिव द्याल साहब यांचे निधन झाले.

15 जून 1931 रोजी अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन झाले.

15 जून 1971 रोजी अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता वेंडेल मेरेडिथ स्टॅनले यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1879 मध्ये झाला होता.


15 जून 1979 रोजी कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन झाले त्यांचा जन्म 2 एप्रिल 1926 मध्ये झाला होता.


15 जून 1983 रोजी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ "श्री श्री" यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1910 मध्ये झाला होता.

XX
15 जून 1996 रोजी पतियाळा घराण्याच्या ठुमरी व दादरा गायिका आणि चित्रपट अभिनेत्री निर्मलादेवी त्यांचे निधन झाले. बॉम्बे सिनेटोन या कंपनीतून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीस सुरुवात केली. सवेरा (1942), कानून (1943), गाली (1944), चालीस करोड (1946), अनमोल रतन (1950), चक्रम (1968), सती अनसूया (1974) हे त्यांचे काही चित्रपट आहेत. सवेरा, कानून, शमा परवाना, बावर्ची, राम तेरी गंगा मैली इत्यादी चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. 90 च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा हा त्यांचा मुलगा आहे. त्यांचा जन्म 7 जून 1927 मध्ये झाला होता.

15 जून 2006 रोजी प्रसिद्ध भारतीय गायिका व गीतकार तसचं, पंजाबी लोकगीत गायक, व हिंदी चित्रपट पार्श्वगायिका सुरिंदर कौर यांचे निधन झाले.

XX
👆
June 14 - Day of Special (Dinvishesh)

जुन 14 : दिनविशेष


XX

 https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html👆

10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html 👆 12 बारावी विज्ञान शाखा 12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html 👆 Career path finder: 12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html 👆 Career path finder: 12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

XX






XX

View, Comments and share 

Post a Comment

0 Comments