Subscribe Us

header ads

April 22 - Day of Special (Dinvishesh)

April 22 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 22 : दिनविशेष

  


महत्त्वाच्या घटना

जागतिक वसुंधरा दिन World Earth Day. प्रत्येक वर्षी 22 एप्रिल रोजी लोक  जंगलतोड आणि प्रदूषण यांसारख्या विरोधकांपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक पृथ्वी दिन साजरा करतात. पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा दिवस जगभर पाळला जातो. 4.50 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी व त्याची शिक्षण या हेतूने अमेरिकेचे सिनेटर गेलाड नेल्सन यांनी 22 एप्रिल 1970 मध्ये पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. हा दिन पहिल्यांदा सनफ्रान्सिस को येथे पाळला गेला. या कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक टेनिस हेस यांनी स्थापन केलेल्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून 1990 मध्ये 141 राष्ट्रात या दिनाचे आयोजन करून पृथ्वी दिन म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. 1909 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन पाळण्याची घोषणा केली. या दिनाचे अवचित्य साधने किंवा राखणे यासाठी नद्यांचे जल स्वच्छ ठेवणे ही भूमिका घेणे महत्त्वाचे आहे त्याबरोबर वृक्षारोपण करणे आणि वृक्षतोड कमी करणे यावर जास्त भर देणे. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराच्या सभोवतालचे पर्यावरण चे संतुलन राखून त्याची स्वच्छता नियमित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अन्न घटकांचा मनुष्याच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खतांचा वापर अधिक करावा ज्यामुळे मानवी आरोग्य साधता येईल.




22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो.


22 एप्रिल 1056 रोजी क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट


22 एप्रिल 1500 रोजी पोर्तुगाल नाविक पेड्रो अल्वेयेर कैब्राल यांनी ब्राझील देशाचा शोध लावला.


22 एप्रिल 1906 रोजी अरविंद घोष यांचे बंधू बरेंद्र घोष यांनी आपल्या "युगांतर" या बंगाली साप्ताहिकात ब्रिटीशांच्या जुलमी दडपशाहीविरुद्ध प्रखर क्रांतिकारी तरुणांनी सशस्त्र क्रांतिकारी चळवळ उभी करण्याचा तपशीलवार कार्यक्रम सुचवला होता. तोच महाराष्ट्र व पंजाब मधील क्रांतिकारकांचा कार्यक्रम होता.

X X

22 एप्रिल 1915 रोजी  पहिल्या विश्वयुद्धा दरम्यान जर्मन सेनांनी पहिल्याचा विषारी वायूचा वापर केला.


22 एप्रिल 1921 रोजी  नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी प्रशासकीय सेवेतून आपल्या पदाचा राजीनामा दिला.


22 एप्रिल 1948 रोजी अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.


22 एप्रिल 1970 रोजी पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.


22 एप्रिल 1977 रोजी  टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.


22 एप्रिल 1979 रोजी  आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले.

X X

22 एप्रिल 1997 रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील "ओमप्रकाश भसीन पुरस्कार" जाहीर

                       डॉ. कल्याण बॅनर्जी 

22 एप्रिल 2006 रोजी प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातुन गोळ्या झाडल्या.


22 एप्रिल 2006 मध्ये अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स च्या सन्मानाचे मानकरी डॉ. रघुनाथ माशेलकर आणि विश्वविख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. अविनाश दीक्षित हे होते, यांना सन्मानित केले.


22 एप्रिल 1698 रोजी (वैशाख व. 7 शके 1620) शिवदिननाथ हे नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष यांचा जन्म झाला. 


22 एप्रिल 1724 रोजी एमॅन्युएल कांट हे जर्मन तत्त्ववेत्ता यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 फेब्रुवारी 1804 मध्ये झाला. 


X X

22 एप्रिल 1760 रोजी मुघल शासक शाहाआलम यांचे द्वितीय पुत्र व भारतातील शेवटचे मुघल शासक बहादूर शहा द्वितीय यांचा जन्म झाला.


22 एप्रिल 1812 रोजी लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (1848-1856) यांचा जन्म ब्रिटन मधील मिडलटण येथील डलहौसी कॅसल या ठिकाणी झाला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे 3400 किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार -इलेक्ट्रिक टेलिग्राफ यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. ज्याचे वर्णन तो सामाजिक सुधारण्याचे तीन महान इंजिन असे म्हणायचे. हा एक स्कॉटिश राजकारणी आणि प्रशासक होता. भारतामध्ये उच्च शिक्षणासोबत त्याने सर्वसामान्य लोकांना शिक्षण सुरू करून भारतातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा पाया रचला. त्याने ईस्ट इंडिया कंपनीची राजवट भारतामध्ये मजबूत केली आणि प्रशासनाचा पाया घातला. 857 च्या उठावाची चिन्हे लक्षात घेण्यात तो यशस्वी झाला होता. त्यामुळे ब्रिटन मधील बऱ्याच लोकांनी त्याचा निषेध केला होता. लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये 1848 मध्ये आला. त्यावेळेस हिंदुस्थानात छोटे-मोठे संस्थानिक राजे स्वतंत्र कारभार त्यांचा असे. पण याच्या कारकिर्दीमध्ये याने बरीचशी संस्थाने इंग्रजी राजवटीत ब्रिटिश अंमलाखाली आणली. त्याने सर्व संस्थानिकांचे दत्तक विधान नाकारले. ज्या संस्थानिकाला मूलबाळ नव्हते त्याला दत्तक वारसा घेण्याचा अधिकार नव्हता. डलहौसीच्या नीतीने तो हक्क नाकारला जात असे. त्याने अनेक संस्थाने खालसा केली. भारताचा व्हाईसरॉय असताना भारतात पहिले पोस्टाचे तिकीट त्याने छापले. त्याच्या ह्या संपूर्ण ब्रिटिशनतीला डॉक्ट्रीन ऑफ लॅपस असे म्हणले जात असत.त्यांचा मृत्यू 19 डिसेंबर 1860 मध्ये युनायटेड किंगडम येथे झाला होता. 

लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे-डलहौसी

22 एप्रिल 1870 रोजी व्लादिमीर लेनिन हे रशिया मधले सुप्रसिद्ध रशियन क्रांतिकारक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 जानेवारी 1924 मध्ये झाला होता. 


            व्लादिमीर लेनिन

22 एप्रिल 1904 रोजी जे. रॉबर्ट ओपेनहायमर हे सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक यांचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान वापरल्या गेलेल्या अणुबॉम्बचे जनक यांना म्हणतात.अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ ज्यांनी मॅनहॅटन प्रकल्पाच्या माध्यमातून आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करून उद्दिष्ट पूर्ण केले. त्यांचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क या ठिकाणी त्यांच्या जन्म गावी केले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना रसायनशास्त्रामध्ये विशेष गोडी निर्माण झाली. त्यामुळे हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्राची पदवी संपादन केली आणि त्यानंतर पुढील शिक्षणाला युरोपमध्ये गेले. केंब्रिज या ठिकाणी रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांच्या सोबत आणि गटिंगेंन मध्ये मॅक्स बॉर्न यांच्यासोबत संशोधन करण्याची त्यांना संधी मिळाली. गटिंगेन विद्यापीठाने त्यांना मॅक्स बोर्न यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी ही पदवी प्रदान केली. विश्वकिरण, सिद्धांतिक खगोलशास्त्र, केंद्रकीय भौतिकी पुंज, विद्युतगतीकी, पुंज क्षेत्रीय सिद्धांत, वर्णपंक्तीदर्शन या शाखांमध्ये त्यांनी संशोधन केले. त्याने प्रसिद्ध केलेल्या संशोधन निबंधातून अनेक वर्तवलेले अंदाज हे पुढच्या काळात खरे ठरले. ज्यामध्ये न्यूट्रॉन, मेसोन आणि न्यूटन तारा त्यापैकी आहेत.त्यांचा मृत्यू 18 फेब्रुवारी 1967 मध्ये झाला. 


         जे. रॉबर्ट ओपेनहायमर 

22 एप्रिल 1914 रोजी भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 नोव्हेंबर 2008 मध्ये झाला.


22 एप्रिल 1916 रोजी यहुदी मेन्युहीन सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 मार्च 1999 मध्ये झाला. 

X X

22 एप्रिल 1916 रोजी काननदेवी ह्या भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका यांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रेसिडेन्सी मधील हावडा या ठिकाणी झाला. भारतीय चित्रपट सृष्टी सुरुवातीला ती गायक म्हणून उदयास आली आणि त्यानंतर बंगाल चित्रपट सृष्टीची पहिली महिला स्टार झाली. तिचे शालेय शिक्षण हावडा येथील सेंट ॲगनेस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पूर्ण झाले. तिला रतनचंद्र दास आणि राजोबा यांनी दत्तक घेतले होते. तुलसी बॅनर्जी नामक एक तिचा शुभचिंतक याने तिला 1926 मध्ये मदन थेटर्स येथील जयदेव या स्टुडिओमध्ये छोटासा रोल दिला. त्यानंतर 1927 मध्ये शंकराचार्य यांनी तिला कानन बाला म्हणून ओळखले. काननने मदन थिएटर्स प्रोडक्शन अंतर्गत ऋषिरप्रेम 1931 जो रेबरात 1931 आणि विष्णू माया व प्रल्हद हे पाच चित्रपटात केले. राधा फेमस मध्ये 1933 ते 1937 या काळात तिने काम केले. त्यानंतर एमपी प्रोडक्शन आणि शेवटी श्रीमती पिक्चर्स 1939 ते 65 असे अनेक चित्रपटात भूमिका केल्या. बालकलाकार म्हणून मूक चित्रपटात तिने अतिशय चांगल्या भूमिका केल्या. त्यानंतर जोरबारात, खूनी कौन आणि मां या चित्रपटात कामामुळे तिची दखल घेण्यात आली. विरेन सरकारच्या न्यू चीटर च्या चित्रपटांनी तिला एक सुपरहिट गायिका म्हणून नावारूपास आणले आणि थेटर चित्रपटाचे खचाखच भरू लागले. तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 1937 मध्ये न्यू थिएटर्स कोलकत्ता यामध्ये बरोवाच्या मुक्ती मध्ये तिने  मुख्य भूमिका केली. तिचीही सर्वोत्तम कामगिरी होते. त्यामुळे ती स्टुडिओची सुपरस्टार बनली. त्यानंतर तिचे सलग चित्रपट सुपर हिट झाले आणि तिथून तिला कानन देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. रायचंद्र बोराल सुप्रसिद्ध संगीतकार यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी तिला हिंदी उच्चारांचे प्रशिक्षण आणि संगीतातील अनेक शास्त्रीय पाश्चात्य आणि भारतीय प्रयोग करून दाखवले. अल्लारखा आणि भीष्मदेव चटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्रशिक्षण घेऊन मेगा फोन, ग्रामोफोन कंपनीत ती गायिका म्हणून कार्यरत झाली. काननने के एल सैगल पंकज मलिक त्रिलोक कपूर आणि अशोक कुमार यांच्यासोबत भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्या सोबत काम केले. एमपी प्रोडक्शन चा जावाब हा तिचा सर्वात मोठा हिट चित्रपट होता. त्यातील दुनिया ये दुनिया है तुफान मेल हे गाणे हिट झाले. कानन देवी हिचा 1948 मध्ये अशोक कुमार सोबत चा चंद्रशेखर हा चित्रपट 1948 मध्ये प्रसिद्ध झाला. 1940 मध्ये तिने अशोक मैत्र यांच्याशी विवाह केला ते ब्रह्म समाज शिक्षणतज्ञ हेरंबचंद्र यांचे पुत्र होते. काही कालावधीत त्यांचे लग्न मोडले आणि 1949 मध्ये हरिदास भट्टाचारजी यांच्याशी तिने लग्न केले. त्यांनी ज्येष्ठ महिला कलाकारांना आणि सामुदायिक कारणासाठी बंगाली चित्रपटांच्या सुधारणेसह काम करण्यासाठी महिला शिल्पी महल नावची संस्था स्थापन केली. बंगाली पडद्यावरची पहिली महिला कानन देवी तिचे भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अनेक सन्मान मिळाले. तिला विश्वभारतीची मानद पदवी प्रदान करण्यात आली. 1968 मध्ये भारत सरकारने तिला पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले. चित्रपटसष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके हा तिला 1976 मध्ये प्रदान करण्यात आला. 1942 मध्ये BFJA पुरस्कार परिचय या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला प्रदान करण्यात आला. 1943 मध्ये BFJA पुरस्कार शेष उत्तरासाठी या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री साठी तिला प्रदान करण्यात आला. 2011 फेब्रुवारी महिन्यात भारत सरकारच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तिच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट जारी केले. तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये काम केले.त्यांचा मृत्यू 17 जुलै 1992 मध्ये पश्चिम बंगालमधील कोलकत्ता या ठिकाणी झाला.



22 एप्रिल 1929 रोजी प्रा. अशोक केळकर हे भारतातील प्रसिद्ध विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक यांचा जन्म झाला.


22 एप्रिल 1929 रोजी उषा मराठे-खेर ऊर्फ "उषा किरण" भारतातील महाराष्ट्रातील मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध तसेच शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अभिनेत्री, मुंबईच्या 1996 ते 97 मध्ये नगरपाल यांचा जन्म आंध्र प्रदेशातील हैदराबाद या ठिकाणी झाला. आशीर्वाद या एम जी रांगणेकर यांच्या मराठी नाटकातून तिने आपल्या अभिनयाला सुरुवात केली. तिने उदय शंकर यांच्या नृत्य नाटक चित्रपट कल्पना 1948 मध्ये छोट्या भूमिकेतून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर तिने नजराना डाग या लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. यासाठी तिला 1955 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पहिला फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्याने कबुली वाला चुपके चुपके बावरची या चित्रपटात काम केले. शिकलेली बायको जशास तसे दूध भाकर कन्यादान या मराठी चित्रपटात तिने काम केले त्यासाठी तिला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिने किशोर कुमार, राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूमिका केल्या. तिचा जन्म एका मराठी कुटुंबामध्ये झाला. मुंबईतील सायन हॉस्पिटलचे दिन डॉक्टर मनोहर खेर यांच्या शेतीचा विवाह झाला.त्यांचा मृत्यू 9 मार्च 2000 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी झाला. 

                             उषा किरण

22 एप्रिल 1935 रोजी भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म भारतातील मद्रास या ठिकाणी झाला. तिथे शालेय शिक्षण मद्रास या ठिकाणी झाले पदवीचे शिक्षण तिने मद्रास विद्यापीठांमध्ये 1954 मध्ये कला शाखेची पदवी घेऊन पूर्ण केले. त्यानंतर 1955 मध्ये विज्ञानात पदव्युत्तर पदवी तिने प्राप्त केली. डॉक्टर पदवी घेण्यासाठी ती इंग्लंडला गेली. 1959 मध्ये मँचेस्टर विद्यापीठात जे ए ग्रीन अंतर्गत मॉड्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ फिनाईट ग्रुप वर प्रॉब्लेम्स या प्रबंधासह तिने पीएचडी पदवी प्राप्त केली. 1960 ते 64 या काळात किले विद्यापीठात तिने गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले आणि ती इंग्लंडमध्ये राहिली. 1966 ते 70 या कालावधीत मद्रास विद्यापीठाच्या रामानुजन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स मध्ये ती शिकवण्यासाठी भारतात परत आली. ती पुन्हा युनायटेड स्टेट मध्ये स्थायिक झाली 1970 पर्यंत ती नैसर्गिक नागरिक झाली. ब्रिस्टन न्यू जर्सी येथील इन्स्टिट्यूट फॉर एडवांसड स्टडी सदस्य होती. तिने अनेक संशोधन पत्रिकेचे संपादक म्हणून काम केले. 2012 मध्ये अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीची ती फेलो आहे. 2017 मध्ये तिची गणितातील महिला असोसिएशनची फेलो म्हणून निवड झाली. तिच्या संशोधनाचा विषय शुद्ध गणितीय संशोधन असा आहे.




22 एप्रिल 1945 रोजी भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म झाला.


22 एप्रिल 1974 रोजी प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार व लेखक चेतन भगत यांचा जन्म झाला.


                  चेतन भगत

X X

22 एप्रिल 1933 रोजी रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 मार्च 1863 मध्ये झाला होता. 15 मार्च 1906 रोजी रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली. ब्रिटन मधली ही कंपनी आहे. कंपनीचे नोंदणी करत कार्यालय लंडनमधील किंग्स क्रॉस जवळ किंग्स प्लेस येथे आहे. 1884 मध्ये हेन्री रॉयस या अभियंत्याने अभियांत्रिकी व्यवसायातून रोल्स राईस ची वाढ केली. दहा वर्षानंतर त्याने डायनामो आणि इलेक्ट्रिक क्रेन तयार करण्यास सुरुवात केली. 1904 च्या नंतर त्याने वेगवेगळ्या कार विकसित केल्या आणि 1906 मध्ये कंपनीचे नाव रोल्स राईस लिमिटेड या नावाने स्थापन झाले. सध्या ब्रिटिश मधील ही एक बहुराष्ट्रीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. ही कंपनी आज विमान वाहतूक आणि इतर उद्योगांसाठी पावर सिस्टीमची रचना निर्मिती आणि वितरण करते. रोल्स राईस ही विमान इंजिनची जगातली जनरल इलेक्ट्रिक नंतरची सर्वात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.


                 हेन्री रॉयस

22 एप्रिल 1980 रोजी फ्रिट्झ स्ट्रासमान प्रसिद्ध जर्मन भौतिकशात्रज्ञ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1902 मध्ये झाला होता. 


             फ्रिट्झ स्ट्रासमान


22 एप्रिल 1994 रोजी आचार्य सुशीलमुनी महाराज भारतातील थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य यांचे निधन झाले. एक आत्मसाक्षात्कार गुरु होते अहिंसा शांती आणि स्वतःच्या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ समाजास प्रति समर्पित केला. त्यांचा जन्म 15 जून 1926 मध्ये हरियाणातील शिखोपुर या ठिकाणी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. एक जैन भिक्षू म्हणून त्यांनी हजारो मैलाचा भारतभर प्रवास पायी केला. त्यांनी जैनासाठी केंद्रस्थानी असलेल्या नमोकार मंत्र मागील ध्वनीचे रहस्य शोधून त्यावर प्रभुत्व मिळवले आणि सॉंग ऑफ द सोल या विषयावर एक ग्रंथ लिहिला. त्यांना लोक गुरुजी म्हणत आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावाचे नाव नंतर सुशीलगड ठेवण्यात आले. लहानपणी त्यांनी घर सोडले श्री छोटेलालजी महाराज यांच्या यांच्याकडे ज्ञानार्जन करून ते नंतर धर्मगुरू बनले. जेव्हा ते पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी श्वेतांबर संप्रदायातील जैन मुनि (भिक्षु) बनले. त्यांनी शैक्षणिक कारकीर्दीतील शास्त्रीय आचार्य, साहित्यरत्न, विद्यारत्न अशा अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि योग विषयक शास्त्रीय अभ्यास करून प्रभुत्व मिळवले. तसेच भारतीय धार्मिक अभ्यास त्यांनी केला. उत्तर अमेरिकेतील त्यांचा प्राथमिक आश्रम न्यू जर्सी येथील ब्लेअर स्टाउन, येथील स्थित सिद्धचलम 1983 मध्ये स्थापन झाला. अमेरिकेतील जैन धर्माच्या संस्थापकापैकी ते एक होते. स्थानक वाशी जैन परंपरेतील त्यांना संन्यासी म्हणून नियुक्त केले. पण ते स्वतःला गैर- सांप्रदायिक म्हणत होते. त्यांनी 1979 मध्ये जैन धर्मातील अरहत संघ एक समक्रमित गैरसप्रदायिक गट स्थापन केला. त्यांनी अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय महावीर जैन मिशन ही संस्था स्थापन केली. न्यू जर्सी येथे सिद्धचलम हे भारताबाहेरील जैनांचे तीर्थक्षेत्र मानले जाते. एक मार्च 1980 मध्ये सुशील कुमार यांना जैन चर्चच्या अर्थ संघाचे आचार्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यांना त्यांच्या शिकवणीच्या पद्धतीला जैन धर्मामध्ये अहोर्म म्हणतात. पोप जॉन पॉल यांच्या भारत भेटीला विरोध होत असताना त्यांनी पोपच्या दौऱ्याच्या बाजूने आपले म्हणणे मांडले आणि तो विरोध मावळला. पंजाब मधील संघर्षासाठी त्यांनी राजीव- लोगोवाल कराराद्वारे पंजाब मध्ये शांतता प्रस्थापित करण्यास मदत झाली. 1992 मध्ये आयोध्या वादाच्या वेळी हिंदू-मुस्लिम गटातील संवाद वाढविण्यास सक्रिय सहभाग त्यांनी घेतला. 1957 मध्ये त्यांनी 27 देशातील 1200 अधिक प्रतिनधी आणि 500,000 लोक उपस्थित असलेली धार्मिक सलोखा निर्माण करणारी जागतिक धर्म परिषद भरवली. या परिषदेत त्यांनी प्राणी आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या बाबतीत अग्रगण्य कार्य केले. 1982 मध्ये गुरुजींनी आठ राष्ट्रांच्या नेत्यांना संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना अहिंसेद्वारे शांततेची मागणी करणारे निवेदन सादर केले. तसेच प्राणी जीवन आणि पर्यावरणाचे संरक्षण करेल यावर त्यांनी भर दिला आणि या निवेदनाच्या समर्थनार्थ न्यूयॉर्क शहरात दहा लाख लोकांची रॅली काढली. 1993 मध्ये गुरुजींनी जागतिक धर्म परिषदेत च्या संसदेच्या परिषदेला मुख्य भाषण केले. 1982 मध्ये स्थापन केलेले आंतरराष्ट्रीय महावीर जैन मिशन संयुक्त राष्ट्र अशी त्यांनी संलग्न केले. 1992 च्या पृथ्वी शिखर परिषदेत सेक्रेड अर्थ मेळाव्यात रिओ मध्ये शांती आणि पर्यावरणासाठी अहिंसेची जागतिक चळवळ गुरुजींनी डॉक्टर रॉबर्ट मुलं यांच्यासोबत संस्थापक अध्यक्ष म्हणून सुरू केली. 1992 मध्ये न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात जैन अभ्यास विभाग सुरू करण्यात आला. आणि त्यांच्याच प्रेरणेने कॅनडातील टोरंटो विद्यापीठात यांचे स्थापना करण्यात आली. हिंदू विश्वकोशात जैन विश्वकोशाचाही समावेश करण्यात आला. सुशील कुमार यांनी वर्ड फेलोशिप ऑफ रिलिजन 1957 आणि विश्व अहिंसा संघ 1957 या अध्यात्मिक संस्थांच्या स्थापनेला प्रेरणा दिली. त्यांनी 1977 मध्ये आंतरराष्ट्रीय महावीर मिशन 1981 मध्ये वर्ड जैन काँग्रेस आणि वर्ड सेंटर ऑफ अहिंसा या संस्थांची स्थापना केली. वर्ड कॉन्फरन्स ऑफ रिलिजन्स फॉर पीस चे ते मानत अध्यक्ष होते. विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य आणि जन्मभूमी बाबरी मशीद समाधान समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. सुशील कुमार यांनी 22 एप्रिल 1994 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी समाधी घेतली.


        आचार्य सुशीलमुनी महाराज


22 एप्रिल 1994 रोजी रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे 37 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1913 मध्ये झाला होता. 


               रिचर्ड निक्सन

X X

22 एप्रिल 2013 रोजी लालगुडी जयरामन प्रसिद्ध भारतीय व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक यांचे निधन झाले. हे एक कर्नाटक शैलीमध्ये गाणारे गायक त्यांना 2001 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1930 मध्ये झाला. 


22 एप्रिल 2013 रोजी जगदीश शरण वर्मा भारताचे 27 वे सरन्यायाधीश यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1933 मध्ये झाला. 


X X


https://www.insearchofknowledge.org/2024/04/april-21-day-of-special-dinvishesh.html

👆

April 21 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 21 : दिनविशेष


www.insearchofknowledge.org 

👆

Visit



https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी


https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी


https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी



https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html

👆

10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी




X X

View, Comments and share...

Post a Comment

0 Comments