April 21 - Day of Special (Dinvishesh)
एप्रिल 21 : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
21 एप्रिल हा दिवस प्रशासकीय सेवा दिन/ नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो.
21 एप्रिल 753 रोजी रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)
21 एप्रिल 1526 रोजी मुघल साम्राज्याचे शासक सम्राट अकबर व सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतचे पहिले युद्ध होऊन त्यांत सुलतान इब्राहिम लोदी यांच्या पराभवानंतर दिल्ली येथील सुलतान शाहीचा अंत झाला.
21 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात झाली. या युद्धात मुघल शासक बाबरच्या सैन्याने लोदी साम्राज्याच्या सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव केला. ही लढाई मुघल साम्राज्याची सुरुवात आणि दिल्ली सल्तनतचा शेवट दर्शवते. ही सर्वात सुरुवातीची लढाई होती ज्यात गनपावडर, बंदुक आणि तोफखाना वापरला जात असे. बाबरच्या सैन्यात, ज्याची संख्या सुमारे 15,000 होती, त्यांच्याकडे 20 ते 24 तोफखान्या होत्या, तर लोदीच्या सैन्यात अंदाजे 30,000 ते 40,000 सैनिक आणि किमान 1,000 युद्ध हत्ती होते. बाबरच्या तोफांचा वापर युद्धात अनेकदा निर्णायक मानला जातो, कारण लोदीच्या सैन्याकडे तोफखाना नव्हता आणि तोफांच्या आवाजाने लोदीच्या हत्तींना घाबरवले, ज्यामुळे ते स्वतःच्या सैनिकांना पायदळी तुडवू लागले. तथापि, समकालीन सूत्रांनी असे सुचवले आहे की बाबरचे डावपेच, जसे की सैन्याची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी करणे आणि गाड्या आणि तोफांचा वापर करणे, विजय मिळविण्यासाठी तितकेच महत्त्वाचे होते.
X X
21 एप्रिल 1669 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची भेट घेतली.
21 एप्रिल 1720 रोजी पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी बनले
21 एप्रिल 1932 रोजी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
21 एप्रिल 1941 रोजी दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ग्रीस देश जर्मनी देशाला शरण गेला.
21 एप्रिल 1960 रोजी रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.
21 एप्रिल 1972 रोजी "अपोलो 16" या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
21 एप्रिल 1996 रोजी भारतीय वायू सेनेचे अधिकारी संजय थापर पॅराशूट च्या साह्याने उत्तर ध्रुवावर उतरले.
X X
21 एप्रिल 1997 रोजी भारताचे 12 वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय 78 वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली. गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनी 81 व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली होती.
21 एप्रिल 2000 रोजी आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.
21 एप्रिल 2007 रोजी वेस्ट इंडीज देशातील क्रिकेट संघाचे महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी एकदिवसीय क्रिकेट खेळातून निवृत्ती घेतली.
21 एप्रिल 1864 रोजी जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्सीमिलियन कार्ल एमील वेबर उर्फ वेबर यांचा जन्म प्रशियाचे राज्य सैक्सनी प्रांतामधील इयरफर्ट येथे झाला. त्याचा मृत्यू 14 जून 1920 मध्ये रिपब्लिक वेमर बेव्हेरिया मधील म्युनिक या ठिकाणी झाला. वेबरने बर्लिन गॉन्टीगेन आणि हेडलबर्ग या ठिकाणी कायदा आणि इतिहासाचा अभ्यास केला 1889 मध्ये त्याने कायद्याची डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्याने पहिल्यांदा "प्रोटेस्टंट एथिक अँड स्पिरीट ऑफ कॅपिटलइसम" ह ग्रंथ लिहिला. सुरुवातीला पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी जन्मलेला पाठिंबा दिला. पण त्यानंतर त्याने टीका करून लोकशाहीच्या समर्थन केले. त्या काळात त्यांनी विज्ञान म्हणून एक व्यवसाय आणि त्यानंतर व्यवसाय म्हणून राजकारण अशा अनेक विषयावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने दिली. पहिला युद्धानंतर वेबरने जर्मन डेमोक्रॅटिक पक्षाची सहस्थापना केली. पण राजकारणाला कंटाळून त्याने ही यांना आणि युनिक मध्ये पुन्हा शिकवण्यासाठी सुरुवात केली. त्या काळात अर्थव्यवस्था आणि समाज हे त्यांनी पुस्तक लिहिताना ते अपूर्ण राहिले कारण वयाच्या 56 व्या वर्षी निमोनियामुळे त्याचा मृत्यू झाला. पेपरच्या बौद्धिक चिंतनांपैकी चे मुख्य विषय म्हणजे तर्कशुद्धीकरण धर्मनिरपेक्षकरण आणि मोहबंगाच्या प्रक्रिया समजून घेणे. अशा प्रक्रिया भांडवलशाही आणि आधुनिकतेच्या उदयाशी संबंधित आहेत. असा युक्तिवाद करून त्यांनी एक प्रबंध तयार केला. वेबरने आर्थिक समाजशास्त्र राजकीय समाजशास्त्र आणि धर्माचे समाजशास्त्र इत्यादी विविध प्रकारच्या कार्यामध्ये योगदान दिले. कार्ल मार्क्स आणि एम एल डार्कहोम यांच्यासोबत त्याला समाजशास्त्राचे संस्थापक जनक म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यानंतर वेबर यांना सामाजिक विज्ञानाच्या विकासातील एक केंद्रीय व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्याने जर्मन मध्ये असताना नॅशनल लिबर पार्टीसाठी त्याने वकील म्हणून काम केले त्यानंतर नागरी सेवा आणि संसद सदस्य म्हणून त्यांनी पद भूषवली. समाजशास्त्र त्यासाठी एक असे विज्ञान होते जे सामाजिक क्रियेचे व्याख्यात्मक आकलन करण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे त्याचा मार्ग आणि परिणामांचे कारणात्मक स्पष्टीकरण प्राप्त होते. आर्थिक व्यवस्थेचा विकास कसा झाला यावर धर्माचा कसा परिणाम झाला यावरील त्याच्या संशोधनाची ही सुरुवात होती. वेबरने असा युक्तिवाद केला होता की आधुनिक भांडवलशाहीचा उगम सुधारणांच्या धार्मिक कल्पनांमध्ये आहे. राजकीय समाजशास्त्रात त्याने सर्वात प्रभावशाली योगदानापैकी पॉलिटिक्स ऍज ए व्होकेशन राज्यांची व्याख्या शक्तीच्या कायदेशीर वापरावर आधारित अशी संस्था आहे. त्यांनी असे मानले की राजकारण हे विविध गटांमध्ये राज्य सत्तेची वाटणी आहे तर राजकीय नेते हे सत्ता चालवणारे होते. बर हा त्याचा अर्थशास्त्र आणि प्राध्यापक म्हणून आहे हा विषय क्रमांकाचा संस्थापक मणून त्याची भूमिका आणि त्याचे योगदान खूप मोठे आहे.
X X
21 एप्रिल 1909 रोजी ज.द. गोंधळेकर (जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर), मराठी चित्रकार यांचा जन्म झाला.
21 एप्रिल 1922 रोजी अॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1987 मध्ये झाला.
21 एप्रिल 1926 रोजी एलिझाबेथ (दुसरी) – इंग्लंडची राणी तिचा जन्म झाला. प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो.
21 एप्रिल 1934 रोजी डॉ. गुंथर सोन्थायमर महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचा जन्म झाला.
21 एप्रिल 1945 रोजी भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म झाला.
21 एप्रिल 1950 रोजी भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते तथा टेलिव्हिजन वरील अनेक मालिकातील सुप्रसिद्ध कलाकार शिवाजी साठे यांचा जन्म झाला.
X X
21 एप्रिल 1950 रोजी भारतातील प्राख्यात किराणा घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गायक पंडित उपेंद्र भट यांचा जन्म झाला.
21 एप्रिल 1509 रोजी हेन्री (सातवा) – इंग्लंडचा राजा यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1457 मध्ये झाला होता.
21 एप्रिल 1910 रोजी मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार यांचे निधन झाले त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1835 मध्ये झाला होता.
21 एप्रिल 1938 रोजी सर मुहम्मद इक्बाल पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते यांचे निधन झाले त्यांचा जन्म नऊ नोव्हेंबर 1877 मध्ये झाला.
21 एप्रिल 1946 रोजी जॉन मायनार्ड केन्स सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 5 जून 1883 मध्ये झाला.
21 एप्रिल 1952 रोजी सर स्टॅफोर्ड क्रिप्स इंग्लिश राजकारणी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 एप्रिल 889 मध्ये झाला.
21 एप्रिल 1964 रोजी द्रविड चळवळीला चालना देणारे महान भारतीय तमिळ कवी भारतीदासन यांचे निधन तामिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी झाले. त्यांचा जन्म 29 एप्रिल 1891 मध्ये पांडिचेरी या ठिकाणी झाला होता. त्यांचे मूळ नाव कणका सुब्बुराथिनम हे होते. हे एक तर्कवादी सामाजिक राजकीय समस्या हाताळले जाणारे आणि तामिळ कवी सुब्रमनीया भारती यांच्यावर खूप प्रभावित झाले. ते स्वतःला त्यांनी भारती दासन हे नाव दिले. म्हणजे भारताचे अनुयायी. त्यांच्यावर रामस्वामी पेरिया आणि स्वाभिमान चळवळीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या साहित्य लेखनाने स्वाभिमान चळवळीच्या वाढीसाठी प्रेरणा मिळाली होती. कवितेव्यतिरिक्त त्यांनी नाटके चित्रपट पटकथा लघुकथा आणि निबंध इत्यादी स्वरूपाचे साहित्य निर्माण केले. त पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाची त्यांनी राज्य गीत "तामिळ थाई वॉल्थू "लिहिले. भारती दासान यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवल होता. त्याने ब्रिटिश राज्य आणि फ्रेंच वसाहती सरकार या दोन्हीचाही कडाडून विरोध केला होता. पांडेचेरीवर राज्य करणाऱ्या फ्रेंच सरकारच्या विरोधात त्यांचे मत मांडल्याबद्दल त्यांना तुरुंगात जावे लागले होते. ते कमी होते पण त्यांनी सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर बरेच लेखन केले स्त्री मुक्ती विवेक वाद आणि जातिभेदाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. पेरियार रामास्वामी यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. भारती दासन हे द्रविडयंत्रवादी चळवळीतील एक प्रमुख नेत्यांपकी होते. तामिळ भाषेतील लिहिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कवितेबद्दल त्यांना "पुराची कवींजर" (क्रांतिकारक कवी) आणि "पा वेंधर" (कवितेचा राजा) अशी उपाधी देण्यात आली होती. 1991 मध्ये तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी त्यांचे कार्य सामाजिक डोमेन मध्ये आणले. त्यांनी लिहिलेले तामिळनाटक "पीसीरांधैयार" या साहित्यकृतीसाठी त्यांना अकादमीचा पुरस्कार 1964 मध्ये प्रदान करण्यात आला. या क्रांतिकारक कवीच्या नावाने तिरुचिरापल्ली येथे भारतीदासान विद्यापीठाची स्थापना 1982 मध्ये मद्रास विद्यापीठाची शाखा म्हणून करण्यात आली. या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य होते "आम्ही एक धाडसी नवीन जग निर्माण करू."त्यांच्या तामिळ भाषेतील लिहिलेल्या कविता तामिळ आणि इतर चित्रपटांमध्ये गीत म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी 1946 मध्ये त्यांना अमैती -ओमाई (शांतता आणि मुक ) नाटकासाठी गोल्डन पोपत पारितोषिक प्रदान करण्यात आले. पेरियार रामास्वामी यांनी त्यांना पुराची कवींगयार म्हणजे क्रांतिकारक कवी ही पदवी बहाल केली. भारती दासन यांच्या स्मरणार्थ तामिळनाडू राज्य सरकार दरवर्षी एका तामिळ कवीला भारतीय दासन पुरस्कार देते. त्यांच्या स्मरणार्थ भारतीय दासन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे भारतातील सर्वोच्च 20 स्कूल पैकी एक तिरुचिरापल्ली येथे स्थापन करण्यात आले. पॉंडिचेरीस केंद्रशासित प्रदेश सरकारने भारतीय दासन यांचे पांडिचेरीचे राज्य गीत म्हणून तामिळ मातेला आव्हान करणारे गीत स्वीकारले आहे.
बळवंत गार्गी22 एप्रिल 2003 रोजी बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, "थिएटर ऑफ इंडिया" आणि "फोक थिएटर ऑफ इंडिया" या पुस्तकांचे लेखक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म भारतीय संघराज्यातील पंजाब राज्यातील भटिंडा या गावी 4 डिसेंबर 1916 मध्ये झाला.
21 एप्रिल 2013 रोजी शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला त्यांचे निधन कर्नाटक मधील बेंगलोर या ठिकाणी झाले. त्यांना ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील सर्कस मध्ये काम करत होते. तिला पत्त्यांचे खेळ शिकवत असताना तिच्या स्मरणशक्तीचे ज्ञान त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी झपाट्याने गुणाकार भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख त्यांची पटली. सर्कशीतली नोकरी सोडून आपल्या मुलिचे रोड शो करत असत. वयाच्या सहाव्या वर्षी शकुंतलाने मैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले. शकुंतलादेवी 1944 मध्ये लंडनला गेल्या त्या पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगळे चमत्कार दाखवून त्यांनी साऱ्या जगाला चक्राहून सोडले. त्यांनी 1976 मधील अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकासमोर अचूक सादर केली. त्यामुळे त्यांचे खूपच कौतुक झाले. डलास विद्यापीठात 1977 मध्ये त्यांचा मुकाबला जलद कॉम्पुटर युनिव्हाक झाला. तिथे शंकुतला देवीने एका 201 अंकी संख्येचे 23 वे मूळ 50 सेकंदात सांगितले आणि फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला कम्प्युटरला 62 सेकंद लागले. 18 जून 1980 मध्ये त्यांना 7686369774870 आणि 2465099745779 ह्या दोन संख्या गुणाकारासाठी दिल्या. हे आकडे इंग्लंडच्या इम्पेरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते. शकुंतलादेवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत 28 सेकंदामध्ये 18947668177995426462773730 हे उत्तर दिले. तेरा आकडे दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी 28 सेकंदात केला. त्यांच्या या कामगिरीमध्ये त्यांना ह्युमन कम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्याच वेळेस शकुंतलादेवी यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आले. शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अद्भुत प्रतिभा होती. अख्ख्या भारतात त्यांची दखल घ्यावी लागली. गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 19 29 मध्ये बंगलोर या ठिकाणी झाला होता. त्यांचा विवाह 1964 मध्ये परितोष बॅनर्जी यांच्या सोबत झाला.
X X
https://www.insearchofknowledge.org/2024/04/april-20-day-of-special-dinvishesh.html
👆
April 20 - Day of Special (Dinvishesh)
एप्रिल 20 : दिनविशेष
👆
Visit
https://gyaaniinfo.blogspot.com/2021/09/career-path-finder-after-12th-science.html
👆
12 बारावी विज्ञान शाखा
12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी
https://gyaaniinfo.blogspot.com/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html
👆
Career path finder:
12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी
https://gyaaniinfo.blogspot.com/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html
👆
Career path finder:
12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/04/10-ssc.html
👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी
X X
View, Comments and share..




0 Comments