Subscribe Us

header ads

April 15 - Day of Special (Dinvishesh)

April 15 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 15 : दिनविशेष




महत्त्वाच्या घटना

15 एप्रिल 1973 रोजी मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

15 एप्रिल 1892 रोजी जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

15 एप्रिल 1858 रोजी फ्रान्समधील एपिनल याठिकाणी अत्यंत हुशार असे समाजशास्त्रज्ञ "डरखाईम" चा जन्म झाला. त्यांनी सामाजिक तथ्य, सामाजिक ऐक्य, सामूहिक प्रतिनिधित्व असे समाजशास्त्रीय सिद्धांत मांडले. त्यांनी " द स्युसाईड" या ग्रंथात आत्महत्येचे विस्तृत असे विवेचन केलेले आहे. आत्महत्या हे एक सामाजिक तथ्य आहे. असे त्यांचे मत होते.
X X
19 एप्रिल 1969 मध्ये भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले.

15 एप्रिल 1895 रोजी स्वातंत्र्यपूर्व भारतातील थोर समाजसुधारक व क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम कोकणातील रायगड किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती साजरी केली.

15 एप्रिल 1912 रोजी आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

15 एप्रिल 1923 रोजी मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.

15 एप्रिल 1940 रोजी दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
X X
15 एप्रिल 1994 रोजी भारताने गॅट करारास मान्यता दिली.

15 एप्रिल 1997 रोजी मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान 300 जण मृत्युमुखी पडले.

15 एप्रिल 1998 रोजी थम्पी गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले फ्रेडरिक लेंज यांचे निधन.


15 एप्रिल 1452 रोजी लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार यांचा जन्म झाला. हा पंधराव्या शतकात रेनेसांस (प्रबोधन) काळात झालेला एक महान चित्रकारांनी संशोधक होता. इतिहासात केलेल्या संशोधन वृत्तीमुळे त्याचे योगदान नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये योगदान दिले. इतिहासामध्ये त्याचे नाव चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. मोनालिसा, द लास्ट सफर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. त्याच्या वेगवेगळ्या चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून झाला. तत्कालीन सामाजिक राजकीय आणि धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रावरून वेगवेगळ्या संदेशाच्या कल्पना करत. डॅन ब्राऊन या लेखकाने "दा वांची कोड" या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळी गुण भूमिका मांडली आहे. ते त्याच्या वडीलाचे अनौरस आपत्य होते. त्याच्या आईने त्याचा पाच वर्षे सांभाळ केला. त्याचे वडील सधन होते.त्याने त्याच्या शिक्षणाकडे आणि देखभालीकडे योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला व्हेरोशियो या प्रसिद्ध चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. त्याने त्या ठिकाणी चित्रकला, शिल्पकला इत्यादीशास्त्रांचा अभ्यास केला. प्रबोधन युगात त्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मानले जात होते. तो अनेक कला आणि शास्त्रामध्ये निपून होता. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र इत्यादी विषयावर त्याचे प्रभुत्व होते. तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्यांनी त्याची चित्रे वास्तववादी बनवली. त्यासाठी त्याने शरीर शास्त्राचा अभ्यास केला होता. त्याचे मोनालिसा आणि द लास्ट सफर ह्या चित्रकत्री जगप्रसिद्ध झाल्या. त्याची प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचे चित्र तिच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही मोठमोठ्या कोड्यात टाकते. मोनालिसा उर्फ मॅडोना लिसा या 24 वर्षाच्या महिलेचे चित्र ते होते. ती महिला फ्रान्सिसको दि बतोरलो मिओ डेल गिओकोंडो नावाच्या व्यापाऱ्याची बायको होती. मॅडोना ऑफ द रॉक्स हे त्याने दुसरे चित्र काढले. त्याचे पहिले चित्र फ्रान्सच्या पॅरिस येथील लुव्र संग्रहालयात आहे. आणि दुसरे चित्र लंडन येथील म्युझियम मध्ये आहे. पहिल्या चित्राला मॅडम ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जेन) आणि दुसऱ्या चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन) म्हणतात. लिओनार्दो यांचा मृत्यू 2 मे 1519 मध्ये फ्रान्समधील इंद्र एलवार आंबास या ठिकाणी झाला. लिओनार्दो यांचा जन्मदिवस 15 एप्रिल हा जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जातो.



             लियोनार्दो दा व्हिंची
                   मोनालिसा

15 एप्रिल 1469 रोजी गुरू नानक देव शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1539 मध्ये झाला.


15 एप्रिल 1563 रोजी शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देव यांचा जन्म झाला.
X X
15 एप्रिल 1707 रोजी स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म झाला. त्यांच्याबद्दल मृत्यू 18 सप्टेंबर 1783 मध्ये झाला.


15 एप्रिल 1741 रोजी चार्ल्स विल्सन पील अमेरिकन चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक याचा जन्म झाला त्याचा मृत्यू 22 फेब्रुवारी 1827 मध्ये झाला.


15 एप्रिल 1893 रोजी नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक होते.
यांचा जन्म भोर संस्थान मधील जांभळी या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ गाव कोकणातील कमोद हे होते. त्यांचे पूर्वज भोर संस्थानात आले. त्यांचे आजोबा भोर संस्थान मधील कारभारी होते. तर वडील सरकारी नोकरीत त्यामुळे त्यांचे शिक्षण भोर, अबू, ग्वाल्हेर, अजमेर वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. 1915 मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बीए पदवी प्राप्त केली. त्यानंतर पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. बीए झाल्यानंतर त्यांनी भंडारा येथील सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. तसेच त्यांनी काही काळ विविध ज्ञानविस्तार, इंदुप्रकाश , नवाकाळ या नियतकालिकांच्या संपादन कार्यात भाग घेतला. सत्यानवेशी आणि फरिश्ता या टोपण नावाने त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लिखाण केले. ते एक निर्भीड पत्रकार होते. 1935 ते 37 या काळात त्यांनी श्रीमती नथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि त्यानंतर 1935 मध्ये मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आणि 1957 मध्ये सेवानिवृत्त झाले. मुंबईच्या इंदुप्रकाश या प्रसिद्ध दैनिकात वृत्त संपादन करण्यासाठी त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर 1923 मध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नवाकाळ सुरू केला. त्यातही त्यांनी संपादकीय काम केले. त्यांनी वर्तमानपत्रात अंतरभेदी या टोपण नावाने व्यक्तिचित्रेही लिहिली. 1924 मध्ये फाटकांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे चरित्र लेखनात सुरुवात केली. मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाळा मंडळ मुंबई, मराठी ग्रंथ संग्रहालय मुंबई, मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा वेगवेगळ्या संस्थेचे ते सदस्य आणि पदाधिकारी होते. 1937 मध्ये विदर्भ साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते. 1947 मध्ये हैदराबाद येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ही अध्यक्ष होते. त्यांना 1970 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या गोपाळकृष्ण गोखले चरित्रासाठी आदर्श भारत सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी लिहिलेले काही साहित्य त्यात अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष, 1857 ची शिपाई गर्दी, आदर्श भारत सेवक गोपाळकृष्ण गोखले यांचे चरित्र, कलावती टोपण नावाने लिहिलेली कादंबरी, पानिपतचा संग्राम भाग- एक/ दोन, मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, यशवंतराव होळकर यांचे चरित्र, श्री समर्थ चरित्र, समुद्रमंथन, ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वर वांग्मय आणि कार्य इत्यादी प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्यांचा मृत्यू 21 डिसेंबर 1979 मध्ये महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला.
                 नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक 

15 एप्रिल 1894 रोजी निकिता क्रूश्चेव्ह सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 11 सप्टेंबर 1971 मध्ये झाला.

X X

15 एप्रिल 1992 रोजी मल्हार सदाशिव तथा "बाबूराव" पारखे भारतातील येशू प्रसिद्ध उद्योजक व वेदाभ्यासक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 जानेवारी 1997 मध्ये झाला.

15 एप्रिल 1912 रोजी किम सुंग (दुसरे) उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 जुलै 1994 मध्ये झाला.


15 एप्रिल 1922 रोजी गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म झाला . त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 1999 मध्ये झाला.


15 एप्रिल 1932 रोजी कवी सुरेश भट यांचा जन्म रोजी महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी झाला होता.
14 मार्च 2003 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी सुरेश श्रीधर भट यांचे निधन महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी झाले.  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी असून त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना गझल सम्राट असे ही म्हणतात. त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. लहानपणी अडीच वर्षाच्या असताना त्यांना पोलिओची बाधा झाली. त्यामुळे त्यांचा उजवा पाय आयुष्यभरासाठी अधू झाला. शालेय जीवनापासून त्यांना संगीताची आवड होती लहानपणापासून हार्मोनियम वाजवत असत. त्यांना शाळेच्या बँड पथकामध्ये ते बासुरी वाजवत असत. यांच्या वडिलांनी त्यांना संगीत विषयाचे शिक्षण द्यायचे ठरवले. त्यामुळे त्यांना प्रल्हाद बुवा या संगीत शिक्षकांनी घरी येऊन संगीत शिकवले. त्यांचा पहिला कार्यक्रम अमरावतीमध्ये 20 फेब्रुवारी 1984 मध्ये झाला. त्यावेळेस त्यांना पेटीवर साथ देण्यासाठी हृदयनाथ मंगेशकर होते. अमरावती येथे 1955 साली ते बीए परीक्षा पास झाले . ते शिक्षकी पेशात आले. ते ग्रामीण भागात नोकरी करत असत. तिथूनच त्यांनी आपल्या कविता लेखनात सुरुवात केली. त्यांनी लिहिलेल्या गझल आणि कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी गायले आहेत. 39 व्या विदर्भ साहित्य संमेलन गडचिरोली येथे भरलेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आयुष्याच्या शेवटच्या पर्वात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 1963 मधील एल्गार, काफला, झंजावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंध, सप्तरंग, हिंडणारा सूर्य हे त्यांचे कवितासंग्रह.

15 एप्रिल 1940 रोजी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शिखर घराण्यातील शास्त्रीय गायक व सारंगी वादक उस्ताद सुलतान खान यांचा जन्म झाला.

15 एप्रिल 1963 रोजी भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म झाला.

15 एप्रिल 1972 रोजी प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्या, क्रिकेट ग्लॅमर, फॅशन मूर्ती मंदिरा बेदी यांचा जन्म झाला.
X X


15 एप्रिल 1794 रोजी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ "मोरोपंत" सुप्रसिद्ध पंडीतकवी [चैत्र शु. 15] यांचे निधन महाराष्ट्रातील बारामती येथे झाले. त्यांचा जन्म 1729 मध्ये पन्हाळगडावर झाला.


15 एप्रिल 1865 रोजी अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाले.

15 एप्रिल 1912 रोजी जगप्रसिध्द टायटॅनिक बोटीला धक्का लागून जलसमाधी मिळाल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला.

15 एप्रिल 1912 रोजी एडवर्ड जे. स्मिथ आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान याचे निधन झाले. त्याचा जन्म 27 जानेवारी 1850 मध्ये झाला होता.


15 एप्रिल 1980 रोजी जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 जून 1905 मध्ये झाला होता.


15 एप्रिल 1990 रोजी ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ "ग्रेटा गार्बो" हॉलिवूड अभिनेत्री तिचे निधन झाले. तिचा जन्म 18 सप्टेंबर 1905 मध्ये झाला होता.

X X
15 एप्रिल 1995 रोजी पंडित लीलाधर जोशी तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांच्या निधन झाले.


15 एप्रिल 1998 रोजी पॉल पॉट कंबोडियातील 20 लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा "ख्मेर रुज" चा नेता त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 मे 1925 मध्ये झाला होता.


15 एप्रिल 2013 रोजी वि. रा. करंदीकर संत साहित्याचे अभ्यासक यांचे निधन झाले त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 मध्ये झाला होता.

X
X


https://www.insearchofknowledge.org/2024/04/april-14-day-of-special-dinvishesh.html
👆
April 14 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 14 : दिनविशेष

👆
Visit 







X
X
View, Comments and share....

Post a Comment

1 Comments