Subscribe Us

header ads

March 7 - Day of Special (Dinvishesh) मार्च 7 : दिनविशेष

March 7 - Day of Special (Dinvishesh)

मार्च 7 : दिनविशेष

 



महत्त्वाच्या घटना

आल्बेनिया देशाचा शिक्षक दिन

7 मार्च 1771 रोजी हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.


7 मार्च 1835 रोजी गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल पुढे विल्यम बेंटिंगच्या काळात भारतीयांना शिक्षण हे इंग्रजीतूनच देण्यात यावे.असा प्रस्ताव मांडला व तो मंजूर झाला. हा प्रस्ताव लॉर्ड मेकॉले यांनी मांडला होता. सर विल्यम्स यांच्या मते भारतीयांना पौर्वात्य शिक्षण द्यावे तर सर चार्ल्स ट्रॅव्हलियान यांच्यामते भारतीयांना पाश्चात्त्य शिक्षण द्यावे असा सूर निघाला होता.पण शेवटी भारतीयांना पाश्चात्त्य शिक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला.

X X

7 मार्च 1876 रोजी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.3 मार्च 1847 रोजी टेलिफोन चा जनक स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याचा जन्म झाला. ग्रहणबेलने दूरध्वनी यंत्राचा शोध 1875 मध्ये लावला आणि अमेरिकन टेलिफोन कंपनीचे सहसंस्थापक म्हणून त्यांनी कंपनी स्थापन केली. बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दोन जून 1875 या दिवशी सहकारी वाटसन यांच्यासह काम करीत असताना दुसऱ्या खोलीतील वाटसन यांच्या हाताच्या धक्क्याने ट्रान्समीटर थरथरला. तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटर चा उपयोग करून सहकारी वाटसन यांना आपल्या खोलीत येणे विषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश वाटसन यांना ऐकू आला. आणि त्यांनी प्रतिसाद दिला वर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल त्यांची खात्री पटली. त्यांनी आणखी प्रयोग केले. 15 फेब्रुवारी 1876 दिव्या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना पेटंट मिळाले. बेल यांनी तयार केलेल्या या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले जाऊ लागले. नोव्हेंबर 877 मध्ये बेल यांनी बर्लिन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. आणि एक 1885 वर्षी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचा मृत्यू 2 ऑगस्ट 1922 मध्ये झाला. ते नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स चे सदस्य होते. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे ते मानत सदस्य होते.

             अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल 

7 मार्च 1936 रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.


7 मार्च 1983 रोजी नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली.


7 मार्च 2006 रोजी लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.


7 मार्च 2009 रोजी केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. ही अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन नासाची अवकाशातील वेधशाळा आहे. सूर्यमालेच्या बाहेर सूर्यासारख्या इतर ताऱ्याभोवती फिरणारे पृथ्वीशी मिळते जुळते परग्रह शोधणे हा या दुर्बिणीचा मुख्य हेतू आहे. जुलै 2016 पर्यंत केपलर दुर्बिणी ने 2453 परग्रहाचा शोध लावला आहे.




7 मार्च 1765 रोजी फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म झाला . त्यांचा मृत्यू 5 जुलै 1833 रोजी झाला.

X X

7 मार्च 1792 रोजी ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक सर जॉन विल्यम हर्शेल यांचा जन्म झाला. त्याने जगात पहिल्यांदा ब्लूप्रिंट चा शोध लावला. त्याने खगोलशास्त्रात पहिल्यांदा जुलियन डे सिस्टीमचा वापर केला त्याने शनीच्या सात चंद्रांना आणि युरेनसच्या चार चंद्रांना नाव दिले. त्याचे वडील सर विल्यम हर्शेल यांनी शोधलेला सातवा ग्रह. त्याने फोटोग्राफीच्या विज्ञानात बरेच योगदान दिले . रंग अंधत्व अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या रासायनिक शक्तीचा त्याने अभ्यास केला. त्यांचा मृत्यू 11 मे 1871 रोजी झाला. हर्शेल चा जन्म सलॉग बँकिंगहमशायर येथे झाला. त्यांनी सेंट जॉन्स कॉलेजमध्ये केंब्रिज या ठिकाणी शिक्षण घेतले आणि 1813 मध्ये त्यांना वरिष्ठ रंगलर ही पदवी प्राप्त झाली. 816 मध्ये केंब्रिज सोडल्यानंतर वडिलांसोबत खगोलशास्त्राचे काम करायला त्यांनी सुरुवात केली. त्याने 18 इंच व्यासाचा आरसा आणि 20 फूट फोकलांबी असलेली परावर्तित दुर्बीण तयार केली. 1821 ते 1823 या कालखंडात जेम्स ने साऊथ सह त्याच्या वडिलांनी कॅटलॉग केलेल्या दुहेरी तारे पुन्हा तपासले. त्याने वडिलांसोबत केलेल्या कामाबद्दल त्याला 1826 मध्ये रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्यानंतर लालंडे पदक देऊन त्याला सन्मानित केले. फ्रेंच अकादमी ऑफ सायन्सेस ने आणि 1821 मध्ये रॉयल सोसायटीने त्याला गणितातील योगदानाबद्दल कोपली पदक बहाल केले. 1831 मध्ये हर्शेल ला नाईट ऑफ द रॉयल गोल्फिक ऑर्डर बनवण्यात आले. हर्शेल यांना प्रेसिडेंट ऑफ द रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे तीनदा पदक प्राप्त झाले. हर्शेल अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे 1854 मध्ये सदस्य म्हणून निवडून आले. त्याचे फोटोग्राफीमध्ये विशेष योगदान आहे. त्यात सायनोटाईप प्रक्रियेचा शोध लावण्यात ज्याला ब्ल्यूप्रिंट आणि क्रिसोटाइप सारख्या भिन्नता म्हणून ओळखल्या जाऊ लागली. त्याने याचा वापर करून 1839 मध्ये काचेवर एक छायाचित्र बनवले जे अजूनही अस्तित्वात आहे. हर्शेल ने प्लॅटिनम क्षारांच्या प्रकाश संवेदनशीलतेच्या आधारे प्लॅटिनम प्रक्रियेचा शोध लावला. नंतर विल्यम विलीसने तो पुढे विकसित केला. फोटोग्राफी हा शब्द हर्षलने 1839 मध्ये पहिल्यांदा वापरला. हर्शेलने 1819 मध्ये सिल्वर हालाइट्सचे सॉल्व्हेंट म्हणून सोडियम फाईव्ह सल्फेट शोधून काढली. हर्शेल 

 

           सर जॉन विल्यम हर्शेल

7 मार्च 849 रोजी महान वनस्पतीतज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू अकरा एप्रिल 1926 रोजी झाला.


7 मार्च 1911 रोजी ज्ञानपीठ पारितोषिक (1978) व साहित्य अकादमी पुरस्कार (1964) विजेते कवी , हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा "अज्ञेय" यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कसाया या ठिकाणी झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय क्रांतिकारकांसोबत सहभाग होता त्यावेळेस बॉम्ब तयार करत असताना 1930 मध्ये त्यांना पकडण्यात आले होते. जपानी हायकू कविता हिंदी मध्ये त्यांनी अनुवादित केले आहेत. त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये बीएससी ची पदवी 1927 मध्ये पूर्ण केली. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी 1930 ते 1936 मध्ये वेगवेगळ्या जेलमध्ये त्यांना राहावे लागले. त्यांनी सैनिक आणि विशाल भारत या दोन पत्रिकांचे संपादन केले. 1943 ते 1946 मध्ये ब्रिटिश सेना मध्ये ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी इलाहाबाद नावाची पत्र सुरू केले. ऑल इंडिया रेडिओ मध्ये नोकरी केली. दिल्लीमध्ये असताना त्यांनी '' साप्ताहिक, नवभारत टाइम्स, अंग्रेजी पत्र वाक आणि एवरीमॅनस यांचे संपादन केले. 1964 मध्ये "अंगण के पार द्वार" या त्यांच्या साहित्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1978 मध्ये 'कितनी नाव में कितनी बार' या त्यांच्या साहित्यकृतीस भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.  त्यांचा मृत्यू चार एप्रिल 1987 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी झाला.



7 मार्च 1952 रोजी वेस्ट इंडिजचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्‌स यांचा जन्म झाला.


7 मार्च 1955 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म हिमाचल राज्यातील सिमला या ठिकाणी झाला. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे आणि शंभरहून अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलेले आहे. महाराष्ट्रातील पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिमला या ठिकाणी झाले. त्यानंतर महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे ते 1978 सालचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे फिल्म सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद होते. 2001 ते 2004 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेचे ते प्रमुख व त्यांच्याकडे होते. ऑक्टोबर 2000 पासून पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर पद त्यांच्याकडे आहे. त्यांचे "आप खुद ही बेस्ट है" हे हिंदी  मध्ये लिहिलेले त्यांचे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. त्यांचा विवाह 1985 मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सध्या विद्यमान राज्यसभेच्या खासदार किरण खेर यांच्याशी झाला. त्यांना भारत सरकारने उत्कृष्ट कलांमध्ये पद्मश्री सन पुरस्काराने सन्मानित केले. 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने त्यांना पुरस्कार प्रदान केला. 1990 व 2007 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 1985 1989 1991 1993 1994 1996 मध्ये फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. एस एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून आय आय एफ ए चा पुरस्कार त्यांना 2017 मध्ये प्रदान करण्यात आला. 1999 मध्ये बॉलीवुड मूवी पुरस्कार आणि त्यांना सन्मानित करण्यात आले. 2017 चा प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

                  अनुपम खेर


X X

7 मार्च 1922 रोजी रंगभूमीवरील असामान्य अभिनेते गणपतराव जोशी यांचे निधन झाले. त्यांनी शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1867 रोजी झाला. ते महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गद्य नाटकात काम करणारे मराठी नट होते. मराठी संगीत नाटकाच्या भरभराटीच्या काळ असताना त्यावेळी केवळ गद्य नाटकासाठी त्यांनी 1881 मध्ये "शाहूनगरवासी नाटक मंडळी" या नाटक संस्थेची स्थापना केली. त्यांची प्रमुख नाटके ज्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या भूमिका साकारल्या त्यात आथेलो (झुंजारराव), त्राटीका (प्रतापराव), मॅकबेथ (मानाजीराव), राणा भीमदेव (राणा भीमदेव), रामदास (रामदास), संत तुकाराम (तुकाराम), हॅम्लेट (हॅम्लेट) इत्यादी. शेक्सपियरच्या नाटकातील नायकांच्या भूमिकांचे रहस्य व्यक्त करण्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण गणपतरावांना वासुदेव बाळकृष्ण केळकर आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्याकडून प्राप्त झाले.



7 मार्च 1952 रोजी भारतातील सुप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ परमहंस योगानंद यांचा मृत्यू झाला.


7 मार्च 1961 रोजी स्वातंत्र्यसैनिक, भारताचे चौथे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न गोविंद वल्लभ पंत यांचे निधन झाले. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1887 रोजी शामली पर्वतात तील खुंट या गावी अलमोडा जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे मूळचे गाव हे महाराष्ट्रातील कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबातील होते. त्यांचे मूळ घराणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील होते. तालुका राजापूर कोत्तापूर गाव. त्यांचे पूर्वीचे आडनाव पराडकर असे होते. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबर काँग्रेस स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले. गांधीजींच्या आव्हानामुळे त्यांनी डिसेंबर 1921 मध्ये अह सहकार चळवळीच्या माध्यमातून राजकीय व स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. ते उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले आणि भारताचे दुसरे गृहमंत्री म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. भारत सरकारने त्यांना 1957 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले. त्यांचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून 26 जानेवारी 1950 ते 27 डिसेंबर 1954 या दरम्यान कालावधी होता. भारताचे दुसरे गृहमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाल 10 जानेवारी 1955 ते 7 मार्च 1961 असा होता. ते उत्तर प्रदेशातील संयुक्त प्रांताचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 17 जुलै 1937 ते 2 नोव्हेंबर 1939 या दरम्यान पदभार सांभाळला. पुन्हा 1 एप्रिल 1946 ते 25 जानेवारी 1950 दरम्यान सुद्धा त्यांनी पदभार स्वीकारला होता. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधामध्ये आंदोलन नाथ सक्रिय सहभाग आणि 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहांमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला होता. त्यामुळे त्यांना मे 1930 मध्ये देहरादून येथील जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला.7 मार्च 1957 रोजी मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली. 




7 मार्च 1974 रोजी भारतातील माजी अर्थमंत्री टी टी कृष्णमाचारी यांचे निधन झाले.


7 मार्च 1993 रोजी माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर 1900 रोजी झाला होता.


7 मार्च 2000 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक व पटकथा लेखक प्रभाकर ताम्हणे यांचे निधन झाले त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. प्रभाकर तामणे लोकप्रिय झाले त्यांच्या विनोदी शैलीतल्या कथांमुळे. पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये मराठीचे ते प्राध्यापक होते त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या. अशीच एक रात्र येते हे त्यांचं फ्लॅशबॅक तंत्रातलं नाटक चांगलंच गाजलं होतं आणि त्यांचे हिंदी गुजराती पंजाबी आणि कोकणी भाषांमध्ये अनुवादही झाले होते. त्यांनी चित्रपटासाठी कथा पटकथा लिहिल्या त्यांनी लिहिलेले "एक धागा सुखाचा", मधुचंद्र, रात्र वादळी काळोखाची, यासारखे मराठी चित्रपट गाजले. तसेच त्यांच्या कथेवर निर्माते दिग्दर्शक अभिनेते राज कपूर ने काढलेला "बीबी ओ बिवी" हा हिंदी  विनोदी सिनेमा खूप गाजला.ज्यांच्या कथावर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट निघाले त्यानंतर त्यांनी पुनर्मिलन रात्र कधी संपू नये जीवनचक्र इत्यादी कादंबरी लिहिल्या.



X X

7 मार्च 2012 रोजी भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार रवीशंकर शर्मा  उर्फ रवी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 3 मार्च 1926 रोजी झाला होता.3 मार्च 1926 रोजी भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार रविशंकर शर्मा उर्फ रवी यांचा जन्म दिल्ली या ठिकाणी झाला. ते एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे संगीतकार होते ते 1950 मध्ये मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांना सुरुवातीला हेमंत कुमार यांनी आनंदमठ मध्ये वंदे मातरम या गाण्यात कोरस म्हणून गाण्याची संधी दिली. नंतर ते संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांचे सहाय्यक बनले सहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटात पैकी नागिन हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट. देवेंद्र गोयल यांनी बनवलेल्या वचन या हिंदी चित्रपटाला त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिले आणि संगीताच्या जोरावर एकाच चित्रपटगृहात 25 आठवडे हा चित्रपट राहण्याचा विक्रम झाला. त्यांनी संगीतबद्ध केलेले काही चित्रपट अनामात, आखे ,आदमी सडक का, कौन अपना कौन पराया, खानदान, घराणा, चायना टाऊन, चौधवी का चांद, दो बदन, निकाह, प्यार किया तो डरना क्या, मेहरबान, शहनाई, हमराज इत्यादी. त्यांचा मृत्यू 7 मार्च 2012 रोजी झाला.


7 मार्च 2015 रोजी भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 20 जानेवारी 1949 रोजी झाला होता.












X X

View, Comments and share.....

Post a Comment

0 Comments