March 8 - Day of Special (Dinvishesh)
मार्च 8 : दिनविशेष
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.......💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
महत्त्वाच्या घटना
8 मार्च 1975 जागतिक महिला दिन याची सुरुवात.
8 मार्च 1817 रोजी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.
8 मार्च 1910 रोजी जागतीक महीला परिषदेत असे ठरविले की, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कामगार महिलांनी आपल्या मूलभूत हक्कासाठी मोर्चा काढला त्यामूळे जागतिक महिला दिन साजरा केला जातो.अमेरिकेत सोशालिस्ट पार्टीच्या आवाहनावर हा दिवस पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर तो फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जाऊ लागला. 1910 मध्ये सोशलिस्ट इंटरनॅशनलच्या कोपनहेगन परिषदेत याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. त्या वेळी, स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते, कारण त्या वेळी बहुतेक देशांमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1917 मध्ये रशियन महिलांनी महिला दिनी अन्न आणि कपड्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. हा संपही ऐतिहासिक होता. झारने सत्ता सोडली, अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर प्रचलित होते आणि उर्वरित जगामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर प्रचलित होते. या दोन तारखांमध्ये काही फरक आहे. ज्युलियन कॅलेंडरनुसार, फेब्रुवारी 1917 चा शेवटचा रविवार 23 फेब्रुवारी होता, तर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार तो दिवस 8 मार्च होता. यावेळी ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरात चालते (अगदी रशियामध्येही). त्यामुळे 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. प्रसिद्ध जर्मन कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांच्या जोरदार प्रयत्नांमुळे, आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने 1910 मध्ये महिला दिनाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाला आणि त्याला सार्वजनिक सुट्टी म्हणून मान्यता दिली. परिणामी, 19 मार्च 1911 रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये पहिली IWD आयोजित करण्यात आली. मात्र, 1921 मध्ये महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली. तेव्हापासून जगभरात 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो.
X X
8 मार्च 1911 रोजी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
8 मार्च 1942 रोजी जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.
8 मार्च 1948 रोजी सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.
8 मार्च 1948 रोजी फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
8 मार्च 1957 रोजी घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
8 मार्च 1974 रोजी चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस
8 मार्च 1979 रोजी फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.
कॉम्पॅक्ट डिस्क
X X
8 मार्च 1993 रोजी दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला "स्पिरीट ऑफ जे. आर. डी." असे नाव देण्याचे ठरविले.
8 मार्च 1998 रोजी भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
8 मार्च 2009 रोजी भारतीय गोल्फ खेळाडू यांनी थायलंड ओपन खिताब स्वतःच्या नावावर केला.
8 मार्च 2016 रोजी पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.
सूर्यग्रहण
8 मार्च 1864 रोजी मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 मार्च 1919 रोजी झाला.
X X
8 मार्च 1879 रोजी नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 जुलै 1968 रोजी झाला.
जर्मन शात्रज्ञ ऑटो हान
8 मार्च 1886 रोजी जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म झाला.
8 मार्च 1989 रोजी भारतातील ओडीसा राज्याचे माजी मुख्यमंत्री विश्वनाथ दास यांचा जन्म झाला.
8 मार्च 1921 रोजी रोजी भारतातील सुप्रसिद्ध शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ "साहिर लुधियानवी" यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 25 ऑक्टोबर 1980 मध्ये झाला.
8 मार्च 1928 रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म झाला.
8 मार्च 1930 रोजी भारतातील सुप्रसिद्ध साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ 'आरती प्रभू' साहित्यिक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 एप्रिल 1976 रोजी झाला.
8 मार्च 1931 रोजी भारतातील पट्टीचे सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 जुलै 2010 रोजी झाला.
मनोहारी सिंगX X
8 मार्च 1953 रोजी भारतातील राजस्थान राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचा जन्म झाला.
वसुंधरा राजे सिंधिया8 मार्च 1954 रोजी भारतातील गोवा या राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा जन्म झाला.
दिगंबर कामत
8 मार्च 1969 रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता उपेंद्र लिमये यांचा जन्म झाला.
8 मार्च 1989 रोजी भारतीय महिला क्रिकेटर हर्मंप्रीत कौर यांचा जन्म झाला.
8 मार्च 1535 रोजी भारतातील मेवाडची महाराणी कर्णावती यांचे निधन झाले.
महाराणी कर्णावती8 मार्च 1702 रोजी इंग्लंडचा राजा विल्यम -तिसरा याचे निधन झाले. त्याचा जन्म 14 नोव्हेंबर 1650 मध्ये झाला होता.
8 मार्च 1942 रोजी क्युबाचा बुद्धिबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका याचा मृत्यू झाला. त्याचा जन्म 19 नोव्हेंबर 1888 मध्ये झाला होता.
X X
8 मार्च 1957 रोजी स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1888 मध्ये झाला होता.
बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर8 मार्च 2009 रोजी लोकसभेचे माजी सदस्य गिरधारीलाल भार्गव यांचे निधन झाले.
8 मार्च 2015 रोजी भारतातील सुप्रसिद्ध पत्रकार तसेच आऊट लुक चे संपादक विनोद मेहता यांचे निधन झाले.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/01/12.html
👆
राजमाता, जिजामाता, जिजाऊ, मॉंसाहेब, वीरमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले :
मराठा साम्राज्याचे (स्वराज्य) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/01/blog-post_2.html
👆
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, ज्ञानज्योती
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/blog-post_24.html
👆
महाराष्ट्रातील प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/blog-post_26.html
👆
मदर टेरेसा(अगनेस गोंझा बोयाजिजू ) - महान समाज सेविका
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/09/blog-post_12.html
👆
आइरिन ज्युलिएट क्युरी: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेती
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/02/blog-post_28.html
👆
मेरी क्यूरी ( मान्या स्क्लोडोव्हस्का )
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/11/indira-gandhi-female-prime-minister-of.html
👆
इंदिरा गांधी :भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/05/ahilyadevi-holkar.html
👆
पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/kalpana-chawla-indian-born-american.html
👆
कल्पना चावला: भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/03/sarojini-naidu-indian-political.html
👆
सरोजिनी नायडू : भारताची कोकिळा, प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/1.html
👆
Mangte Chungneijang Mary Kom: Indian olympic-style boxer, politician, and former Member of Parliament, Rajya Sabha.
एम सी मेरी कोम
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/09/blog-post_20.html
👆
ॲनी बेझंट (Annie Besant): थिऑसॉफिस्ट, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक ब्रिटिश महिला
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/23.html
👆
Pandita Ramabai Sarasvati: Indian social reformer
पंडिता रमाबाई
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/28.html
👆
Sister Nivedita: Irish teacher, author, social activist
भगिनी निवेदिता उर्फ मागरिट एलिजाबेथ सॅम्युअल नोबल
X X
View, Comments and share






































0 Comments