February 25 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 25: दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
25 फेब्रुवारी 1510 रोजी पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
पणजीचा किल्ला
25 फेब्रुवारी 1568 रोजी सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.
चित्तोडगड
25 फेब्रुवारी 1728 रोजी दक्षिणेतील मराठ्यांचा सर्वात मोठा विरोधक निजामाने औरंगाबाद प्रदेशावर स्वारी केली त्यावेळेस पालखेड या ठिकाणी पेशवा पहिला बाजीराव याने त्याला पेचात आणले .चारी बाजूंनी सैन्याचा कोंडमारा केला व त्याला शरण येण्यास भाग पाडले व त्याने शेवटी मराठ्यांशी तह करून त्याचा दक्षिणेतील चौथा सरदेशमुखीचा हक्क मान्य करावा लागला. पालखेड चा विजय हा पेशवे पहिल्या बाजीरावांचा पहिला मोठा विजय होता.
X X
25 फेब्रुवारी 1818 रोजी ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
25 फेब्रुवारी 1863 रोजी अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहमन लिंकन यांनी अमेरिकेतील चलन कायद्यावर सही केली.
अब्राहमन लिंकन
25 फेब्रुवारी 1935 रोजी "फॉक्स मॉथ" विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
25 फेब्रुवारी 1945 रोजी दुसरे महायुद्ध चालू असताना तुर्कस्तानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
25 फेब्रुवारी 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
X X
25 फेब्रुवारी 1952 रोजी नार्वे ची राजधानी ओस्लो मध्ये आजच्या दिवशी हिवाळी ऑलिम्पिक समारोह पार पडला.
25 फेब्रुवारी 1962 रोजी भारतात सार्वत्रिक निवडणुका ह्या झाल्या आणि त्या संपूर्ण निवडणुका काँग्रेस पक्षाने जिंकल्या.
25 फेब्रुवारी 1968 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे 11 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश मुस्लिम समाजाचे होते. भारताचे सहावे उपराष्ट्रपती हा पदभारही त्यांनी स्वीकारला. उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ त्यांचा 31 ऑगस्ट 1979 ते 30 ऑगस्ट 1984 हा होता. भारताचे काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून त्यांनी 20 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969 या कालावधीमध्ये कार्य केले. भारताचे 11 वे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी 25 फेब्रुवारी 1968 ते 16 डिसेंबर 1970 या कालावधीमध्ये काम केले होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बैतुल या ठिकाणी 17 डिसेंबर 1905 रोजी झाला आणि मृत्यू 18 सप्टेंबर 1992 रोजी झाला. रायपूर येथील विद्यापीठात त्यांचे नाव दिलेले आहे हिदायतुल्ला राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय असे आहे.

25 फेब्रुवारी 1986 रोजी जनआंदोलनाच्या रेट्यामुळे 20 वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
25 फेब्रुवारी 1988 रोजी भारतात भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. पृथ्वी हे भारतीय सैन्याचे पृष्ठभागते पृष्ठभाग निम्न पल्ला क्षेपणास्त्र आहे भारतीय सैन्य दलात 1994 पासून ते सेवेत दाखल झाले याचे वजन 4400 किलोग्राम आहे लांबी नऊ मीटर आहे. भारत सरकारने वेगवेगळी युद्ध क्षेपणास्त्रे व पृष्ठभाग ते आकाश या मालिकेतील क्षेपणास्त्रावरील स्वावलंबनासाठी 1983 मध्ये एकीकृत मार्गदर्शन क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरू केला. त्या अंतर्गत पृथ्वी हे पहिले क्षेपणास्त्र आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी प्रोजेक्ट डेव्हिल अंतर्गत सोवियत रशियाच्या पृष्ठभाग ते आकाश या क्षेपणास्त्राची उलट अभियांत्रिकी केली होती. पृथ्वी क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये भारतीय सेना नौसेना व वायुसेना या तीनही दलासाठी ही प्रारूपे अंतर्भूत करण्यात आलेली आहे. पृथ्वी -1 एस एस -150, भारतीय सेनेसाठी-1000 किलोच्या स्फोटा का सह शीर्षासह 150 किलोमीटर लांबीचा पल्ला. पृथ्वी-2 एस एस -250, भारतीय वायुसेनेसाठी-500 किलोच्या स्फोटक शिर्षासह 250 किलोमीटर लांबीचा पल्ला, पृथ्वी -3 एस एस -350 भारतीय नौसेनेसाठी-पाचशे किलोच्या स्फोटक शीर्षासह 350 किलोमीटर लांबीचा पल्ला.
X X
25 फेब्रुवारी 1996 रोजी "स्वर्गदारा"तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील "इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री" या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्याचे "कुसुमाग्रज तारा" असे नामकरण केले.
25 फेब्रुवारी 2008 रोजी "नो कंट्री फ़ॉर ओल्ड मॅन" या चित्रपटाला 80 व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
25 फेब्रुवारी 2009 रोजी माजी सैन्य अधिकारी धीरज मल्होत्रा यांना इंडियन प्रेमियर लीगचे अध्यक्ष करण्यात आले.
25 फेब्रुवारी 2013 रोजी रशियन सरकार ने रस्त्यांवर आणि शाळेच्या जवळपास धूम्रपान न करण्याचा नवीन कायदा बनवला.
25 फेब्रुवारी 1840 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यातील बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म झाला. मुलांसाठी "बालबोध" हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा मृत्यू 9 ऑक्टोबर 1914 रोजी झाला.
X X
25 फेब्रुवारी 1894 रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत अवतार मेहेरबाबा यांचा जन्म झाला. त्यांनी सलग 44 वर्षे मौनव्रत पाळले होते. त्यांचा मृत्यू 31 जानेवारी 1969 रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील मेहराझाद, पिंपळगाव या ठिकाणी झाला.
25 फेब्रुवारी 1899 रोजी भारतातील पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री गुरुनाम सिंह यांचा जन्म झाला. पंजाबचे ते सावे मुख्यमंत्री म्हणून 8 मार्च 1967 ते 25 नोव्हेंबर 1967 या कालावधीमध्ये होते. त्यानंतर 17 फेब्रुवारी 1969 ते 27 मार्च 1970 या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी कार्य केले. त्यांचा जन्म लुधियाना पंजाब येथे 25 फेब्रुवारी 1899 रोजी झाला. जात कुटुंब या मध्ये त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी पंजाब विद्यापीठाच्या हॉकी संघाचे नेतृत्व केले होते. त्यांनी कायद्याची पदवी घेऊन लायलपूर सध्याचे पाकिस्तान मध्ये असलेले या ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात काम केले. त्यावेळेस ते बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. त्यानंतर त्यांना 1950 मध्ये पेप्सू आणि पंजाब उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले होते. 1959 मध्ये त्यांनी शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला. त्यांनी कॅनबेरा ऑस्ट्रेलिया येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून सुद्धा काम केले. 31 मे 1973 रोजी दिल्लीत झालेल्या विमान अपघातात सिंग यांचे निधन झाले.
गुरुनाम सिंह
25 फेब्रुवारी 1938 रोजी भारतीय क्रिकेट संघातील भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनियर यांचा जन्म झाला.
25 फेब्रुवारी 1943 रोजी 'बीटल्स'चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन याचा जन्म झाला. त्याचा मृत्यू 29 नोव्हेंबर 2001 मध्ये झाला.
25 फेब्रुवारी 1948 रोजी भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते तथा खलनायक डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म झाला.
25 फेब्रुवारी 1974 रोजी भारतातील हिंदी तामिळ आणि तेलुगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती हिचा जन्म झाला. तिने सर्वप्रथम तेलगू भाषेतील साहसी प्रणय पट बोबिली राजा 1990 मध्ये वेंकटेश सोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 1992 मध्ये तिने हिंदी चित्रपट सृष्टीतील हिंदी साहसपट विश्वात्मा या चित्रपटा द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिचा मृत्यू पाच एप्रिल 1993 रोजी झाला.
X
X
25 फेब्रुवारी 1599 रोजी महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक सुप्रसिद्ध भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी घेतली. त्यांचा जन्म 1533 मध्ये झाला होता. एकनाथी भारुड हा त्यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात गोदावरीच्या काठावर त्यांची समाधी आहे. संत एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड येथे दरबारी अधिपती होते. ते मूळचे चाळीसगावचे ते दत्तोपासक होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. त्यांचा एक मुलगा हरीपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरी पंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ मुळात एकूण 1367 श्लोक आहेत. एकनाथ हे संत कवी पंत कवी व तंत कवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात एका जनार्दनी ही त्यांची नाममूद्रा आहे. एकनाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40 हजार ओव्या आहेत. रुक्मिणी स्वयंवर हे काव्य त्यांनीच लिहिलेले आहे. दत्ताची आरती ही त्यांनीच लिहिली आहे. त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. फाल्गुन वद्य हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

25 फेब्रुवारी 1886 रोजी गुजरात राज्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा गुजराती कवी नर्मदा शंकर दवे यांचे निधन झाले.
नर्मदा शंकर दवे
25 फेब्रुवारी 1924 रोजी महाराष्ट्रातील जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पूना कॉलेजचे नाव "एस. पी. कॉलेज" असे करण्यात आले.
सर परशुरामभाऊ पटवर्धन
25 फेब्रुवारी 1964 रोजी भारतातील हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन झाले.
25 फेब्रुवारी 1999 रोजी अमेरिकेतील सुप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते तथा रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1912 रोजी झाला होता.

25 फेब्रुवारी 2001 रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन याचे निधन झाले. 1949 मध्ये त्यांना "सर" हा किताब देण्यात आला. त्याचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी झाला होता.
डोनाल्ड ब्रॅडमन
25 फेब्रुवारी 2007 रोजी भारतातील दक्षिण भागातील मल्याळम साहित्यातील सुप्रसिद्ध कवी पी . भास्कर यांचे निधन झाले.
25 फेब्रुवारी 2016 रोजी भारतातील सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन झाले . त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1937 रोजी झाला होता.
X X
View, comments and share.....

भवरलाल जैन
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-24-day-of-special-dinvishesh.html
🙏
February 24 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 24: दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-26-day-of-special-dinvishesh.html
👆
February 26 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 26: दिनविशेष
View, comments and share.....

0 Comments