Chandikadas Amritrao Deshmukh (Nanaji Deshmukh): social reformer and politician
चंडिकादास अमृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख : समाज सुधारक राजकीय नेते
11 ऑक्टोबर: जन्मदिन
27 फेब्रुवारी: स्मृतिदीन
बालपण आणि शिक्षण:
चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर, 1916 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी झाला. घरची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांना भाजी विकून अन्य कामे करून आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. त्यांचे शिक्षण बिर्ला तंत्रज्ञान संस्था विधान राजस्थान मध्ये पूर्ण केले. नानाजी देशमुख यांना मरणोत्तर 2021 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'भारतरत्न' पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
XX
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नाते व कार्यकर्ता:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या संपर्कात आल्यानंतर नानाजी संघाशी कायम जोडले गेले. त्यांनी अनेक वर्ष देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका पार पाडली. राजकारण आणि सत्ताकारण्यच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेर त्यांनी देशाचा शाश्वत विकास करण्यासाठी त्यांनी समाजकार्य हाती घेतले. भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो हा विचार घेऊन रचनात्मक कार्य करण्याचे संपूर्ण देशभरात त्यांनी ठरवले.
नानाजी देशमुख सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि त्यानंतर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते होते. उत्तर प्रदेशातील गोरखपुर या ठिकाणी ते पूर्णवेळ प्रचारक म्हणून गेले आणि त्यांनी अतिशय छान पद्धतीने आपली कार्यप्रणाली राबवली. गोरखपुर या ठिकाणी पूर्ण वेळ प्रचारक असताना त्यांनी त्या ठिकाणी 250 संघाच्या शाखा स्थापन केल्या आणि त्या ठिकाणी पहिले 1950 मध्ये सरस्वती शिशु मंदिर ची स्थापना केली.
त्यानंतर नानाजींनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. नानाजी वर उत्तर प्रदेश मधील भारतीय जनसंघाचे सचिव म्हणून जबाबदारी प्रदेशाची दिली. त्यांनी 1957 मध्ये जनसंघाच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक ठिकाणी स्थापन केल्या. पक्षाच्या प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये उत्तर प्रदेश मधील सर्वात मोठे योगदान हे नानाजीं ना जाते.
नानाजी डॉक्टर राम मनोहर यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे भारतीय राजकारणाची दिशा बदलून दिली राम मनोहर लोहिया यांनी बीजेएस कार्यकर्ता संमेलनात नानाजींना निमंत्रित केले. ज्या ठिकाणी उपाध्याय यांना भेटले आणि या संघटनेने बीजेएसला इतर समाजवादी पक्षाच्या जवळ आणले. राम मनोहर लोहिया आणि नानाजी देशमुख यांच्या सहकार्यामुळे 1967 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये निवडणुका झाल्या आणि पहिले बिगर काँग्रेस आघाडी सरकार स्थापन केले.
दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. त्यानंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. स्वदेशी नियतकालिकाचे संपादकाची जबाबदारी अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वीकारली आणि मार्गदर्शक म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय होते आणि नानाजी त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केले. त्यादरम्यानच्या काळामध्ये आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळी ते सक्रिय सहभागी होते. दोन ते तीन महिने विनोबाजी सोबत त्यांनी देशात प्रवास केला. देशामध्ये संपूर्ण क्रांति ची जयप्रकाश नारायण यांनी त्यावेळी नानाजी देशमुख यांनी या चळवळीला संपूर्ण पाठिंबा आणि प्रतिसाद दिला.
त्यानंतर ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचा एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. ज्यामुळे मनुष्य विकास व सामाजिक विकास साची ध्येय आपण साध्य करू शकतो. समाजामध्ये विधायक व रचनात्मक काम करण्यासाठी त्यांनी जो ध्यास घेतला त्यामुळे त्यांनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न केला पण मंत्रिपद मिळालेले असतानाही ते त्यांनी नाकारले. आणि राजकारणातून संन्यास घेऊन आपल्या विचारांच्या बांधिलकीला जोपासत त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली. ही संस्था मध्य प्रदेशामध्ये चित्रकूट या ठिकाणी स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले 40 हजार कुपनलिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न स्वयंपूर्ण केला. चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान राहिलेले आहे.
XX
नानाजींची राजकीय कार्य:
आणीबाणीनंतरच्या काळात 1977 मध्ये नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य 1977 ते 1980 या काळात होते. तर 1999 मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 22 नोव्हेंबर 1999 ते 21 नोव्हेंबर 2005 पर्यंत असा होता.
नानाजी देशमुख यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादी विचारसरणीचा खूप मोठा प्रभाव होता. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याही विचारांचा प्रभाव नानाजींवर होता. याच गोष्टींमुळे नानाजी संघात येण्याचे मुख्य माध्यम बनले. नानाजी संघप्रचारक म्हणून आग्रा येथे असताना त्यांची पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्याशी भेट झाली. त्यावेळी पंडित जी एम.ए. चा अभ्यास करत होते. शिक्षणाबरोबरच संघकार्य हेही त्यांच्या जीवनात अग्रस्थानी होते. जास्तीत जास्त वेळ ते संघकार्यासाठी देत. पंडितजींची सेवावृत्ती पाहून नानाजी खूपच प्रभावित झाले. बारिक-सारीक गोष्टींपासून ते देशाच्या कल्यणापर्यंतच्या अनेक मूल्यांचे संस्कार पंडिजींकडून नानाजींवर होत गेले.
1948 ते 1951 या काळात लखनौ स्थित राष्ट्रधर्म प्रकाशनचे व्यवस्थापक म्हणून नानाजींनी काम पाहिले. या संस्थेतर्फे "राष्ट्रधर्म" मासिक, "पात्रजन्य" साप्ताहिक आणि "स्वदेश" दैनिक लखनौहून प्रकाशित होत होते. यावेळी यांचे पंडित दिनदयाळ उपाध्याय सोबत नानाजी ही काम करत होते. त्या दोघांनी हिंदू संघटनेचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. भारतीय जनसंघ देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन एक राजकीय पक्ष स्थापन करावा, असे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना वाटले. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पु.श्री. गोळवलकर गुरुजींजवळ हा विषय काढला. संघाच्या एकमताने 21 आक्टोबर, 1951 रोजी दिल्ली येथे श्री. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली "अखिल भारतीय जनसंघ" ची स्थापना झाली. या अधिवेशनात अध्यक्ष म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, तर महामंत्री या नात्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर संघटनेची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती.
त्यावेळी गुरुजींनी जनसंघासाठी पं. दीनदयाळ उपाध्यय, श्री. सुंदरसिंह भंडारी, ॲड. ठाकूर प्रसाद आणि भाई महावीर हे सदस्य दिले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले निकटवर्तीय म्हणून नानाजींना कायम आपल्या सानिध्यात ठेवले. अशाप्रकारे नानाजी भारतीय जनसंघाचे संस्थापकीय सदस्य झाले. पुढे त्यांनी या संघटनेतील संघटन सचिव आणि कोषाध्यक्ष ही पदेही भूषविली. नानाजी देशमुख बरीच वर्षे संघटनमंत्रीही होते. नानाजी देशमुख यांच्यामुळे उत्तरप्रदेशात 1957 पर्यंत सर्व जिल्ह्यांत भारतीय जनसंघाची मुळे रोवली गेली. भारतीय जनसंघाला उत्तरप्रदेशातील प्रमुख राजकीय केंद्रबिंदू बनविण्याचे श्रेय नानाजींनाच जाते. जनता पक्ष
नानाजींनी उत्तर प्रदेशामध्ये प्रत्येक जिल्यात "जनसंघा" ची मजबूत बांधणी केली होती. त्यामुळे तिथल्या राजकारणात "जनसंघ" हा एक प्रमुख पक्षाच्या रुपात उदयास आला. या राज्यात 1967 साली 'चौधरी चरणसिंग' यांच्या नेतृत्वाखाली सर्वांत पहिले गैरकाँग्रेसी सरकार सत्तेत आणण्याचे श्रेय नानाजींनाच दिले जाते. नानाजींचे चौधरी चरणसिंह आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्याशी खूप चांगले संबंध होते. पुढे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत जनसंघात सक्रीय असताना नानाजींनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक आंदोलने केली. अनेक पक्षांचा एकत्रित विलय करुन "जनता पक्ष" स्थापन करण्यातही त्यांचा सिंहाचा बाटा होता. 1977 च्या मोरारजी देसाई सरकारमध्ये नानाजी बलरामपुर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते, उसेब 1999 च्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्येही राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी कर्तव्य पूर्ण केले. या कार्यकाळात त्यांनी अनेक विदेश दौरही केले. याचा फायदा त्यांना पुढे सामाजिक कार्य करताना झाला. अशाप्रकारे नानाजी देशमुख हे आपल्या भारताला लाभलेले एक आदर्श राजकीय नेतृत्व आहे.
नानाजी देशमुख यांनी 1999 साली 'देणं' संस्थेची स्थापना केली ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांना मदत करणे हा होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली.
नानाजी देशमुख यांचे सामाजिक कार्येः
दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले.
सुमारे 40 हजार कूपनलिकांच्या माध्यामातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं काम केले.
पाणी अडवा-पाणी जिरवा या माध्यमातून सिंचनक्षेत्रात वाढ केली.
चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले.
आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी 'चित्रकूट'मध्ये उभारली.
1990 दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी सुमारे 250 गावं दत्तक घेऊन त्यांचा विकास केला.
नानाजी देशमुख यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे दीनदयाल शोध संस्थानची स्थापना केली. त्याच संस्थेच्या माध्यमातून विधायक, रचनात्मक कार्याला प्रारंभ केला. ह्यानंतर प्रसिद्ध असलेले आणि ज्यांनी नानाजी देशमुख यांची विशेष प्रसिद्धी झाली असे गोंडा, बीड व चित्रकूट हे तीन प्रकल्प निर्माण झाले. या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी दीन, दलित, पीडित, निर्धन, गरीब आणि उपेक्षितांसाठी सामाजिक कार्य केले. अशा सर्व प्रकल्पांतून त्यांनी ग्रामविकास, ग्राम आरोग्य-शिक्षण आणि स्वावलंबन यावर भर दिला. एका अर्थाने गांधीजींचा 'खेड्याकडे चला, तिथे काम करा' हा संदेशच त्यांनी प्रत्यक्ष राबविला होता.
गोंडा जिल्ह्यात नानाजींनी लोकसहभागातून कुप नलिकेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. तत्कालीन सरकारने सुद्धा या प्रकल्पाचे कौतुक केले. यासाठी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने एक समिती गठित करून 1981 मध्ये त्यांच्या समितीच्या रिपोर्ट द्वारे त्यांनी असे स्पष्ट केले की, ही योजना मागास ग्रामीण क्षेत्रात सिंचन आणि कृषी क्षेत्र वाढवून गरिबी कमी करण्यासाठी अत्यंत कमी काळात शासनाकडून कोणतीही मदत न घेता केलेला हा एक उत्कृष्ट प्रकल्प आहे. केवळ दोन वर्षाच्या काळात गोंडा जिल्ह्यात 25 ब्लॉकमधून 2800 गावातील 95 हजार शेतकऱ्यांची साधारण दोन लाख 50 हजार एकर जमिनीच्या सिंचनासाठी नानाजींनी 27 हजार पेक्षा अधिक ट्युबवेल शेतकऱ्यांच्या सहकार्याने घेतल्या आणि शेती सुजलाम सुफलाम झाली. हा एक चमत्कारच होता. रचनात्मक कामात समाजातील व्यक्तींवर संस्कार होण्यासाठी विविध कार्यक्रम संस्कार वर्गाचे नित्य आयोजन केले.
नानाजींनी रचनात्मक कामाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी प्रकल्प उभे केले.
1) महाराष्ट्र- बीड, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
2) उत्तर प्रदेश- गोंडा जिल्हा
3) ओरिसा-सुंदरगड
4) बिहार- सिंह भूम
5) गुजरात- अहमदाबाद
6) मध्य प्रदेश- चित्रकूट
या प्रकल्पामधून कृषी विज्ञान केंद्र, ग्रामोदय विद्यालय तसेच विश्वविद्यालय, ग्रामीण आरोग्य, रस शाळा, चलचिकित्सालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गुरुकुल, वाचनालय, आश्रम शाळा, गोशाळा, उध्यमिता विद्यापीठ, जन शिक्षण संस्था, अशा अनेक प्रकल्पांची उभारणी केली.
नानाजींनी विकसित केलेली ग्रामविकासाचे प्रारूपेः
1. चित्रकूट प्रारूप (उत्तर प्रदेश मध्यप्रदेश सीमेवरील जिल्हे) संकल्पनाः समग्र आणि स्वयंपूर्ण ग्रामीण विकास. ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, जलसंवर्धन, ग्रामोद्योग, शेती सुधारणा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा. शाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण करण्यावर भर. "एक गाव एक उत्पादन" संकल्पना,
2. बहराइच आणि सीतापूर प्रारूप (उत्तर प्रदेश) संकल्पनाः कृषी आणि जलसंवर्धन. येथील दुष्काळप्रवण भागात पाणी व्यवस्थापन आणि जैविक शेती यावर भर दिला. लघु सिंचन प्रकल्प आणि जलसंधारणासाठी तळी बांधली. शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती याला चालना दिली.
3. बीड प्रारूप (महाराष्ट्र) संकल्पनाः ग्रामीण शिक्षण आणि उद्योजकता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण, स्थानिक शेतकरी आणि महिलांसाठी स्वयंरोजगार योजना. शेतीपूरक उद्योग जसे की दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन आदींना चालना.
4. छत्तीसगड आणि झारखंड प्रारूप, संकल्पनाः आदिवासी विकास आणि स्वयंरोजगार, आदिवासी भागातील लोकांसाठी शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगारनिर्मिती, वनउत्पादनांवर आधारित स्थानीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सहकारी संस्था, जंगलसंवर्धन आणि आदिवासी लोकांचे पारंपरिक ज्ञान जपण्यासाठी विशेष योजना.
5. राजस्थान प्रारूप (डांग जिल्हा, भरतपूर) संकल्पनाः जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक शेती. पर्जन्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जलसंवर्धन प्रकल्प राबवले. वाळवंटी भागात ग्रामोद्योग आणि हस्तकला उद्योगांना चालना. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यासाठी मदत.
6. "समर्थ भारत ग्राम"प्रारूप. (Self-Reliant Village Model) ठिकाणः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थानसंकल्पनाः ग्रामस्वावलंबन आणि सर्वसमावेशक विकास. गावांनी बाह्य मदतीवर अवलंबून न राहता स्वतः सक्षम होण्याची संकल्पना. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, शेती सुधारणा आणि कौशल्य विकास या सर्व क्षेत्रांचा विकास. "गावातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे" हे ध्येय.
7. “एकात्मिक ग्रामीण विकास" प्रारूप. (Integrated Rural Development Model) ठिकाण: उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसंकल्पनाः बहुक्षेत्रीय विकासाचा एकत्रित दृष्टिकोन, शेती, जलव्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक उद्योग यांना एकत्रित करून विकास. जलसंवर्धनासाठी पाणलोट व्यवस्थापन (Watershed Management) उपक्रम राबवले. गावोगाव गौशाळा आणि सेंद्रिय शेती संकल्पना विकसित केल्या. महिला सक्षमीकरणासाठी स्वयं-सहायता गट (SHG) आणि सूक्ष्म वित्तयोजना,
8. "संपन्न भारत" प्रारूप. (Prosperous Village Model) ठिकाणः महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसंकल्पनाः कृषी आणि ग्रामीण उद्योग. "एक गाव - एक उत्पादन" संकल्पना राबवली, ज्यामुळे गावांना विशिष्ट उत्पादनावर भर देता आला. कृषीपूरक व्यवसाय जसे की गुरेपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन इत्यादींना चालना दिली. जैविक शेतीला महत्त्व देऊन रासायनिक मुक्त उत्पादनावर भर. गावांमध्ये लघुउद्योग आणि ग्रामोद्योग सुरू करण्यास प्रेरणा
9. "ग्रामोदय ते राष्ट्रोदय" प्रारूप. (Village Upliftment to National Development) ठिकाणः संपूर्ण भारतसंकल्पनाः मॉडेल. सुशिक्षित तरुणांना ग्रामविकासात सक्रिय सहभागी करून "युवक ग्रामोदय अभियान" "गाव स्तरावर रोजगार निर्मिती" राष्ट्र उभारणीसाठी ग्रामविकास. "गावांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल" या विचारातून संपूर्ण देशासाठी लागू होणारे हा महत्त्वाचा घटक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल ग्रामविकास
10. "ग्राम समृद्धी अभियान"प्रारूप (Village Prosperity Campaign) ठिकाण: झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेशसंकल्पनाः महिला आणि कषी सक्षमीकरण शेती सुधारण्यासाठी सिंचन, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि नवीन तंत्रज्ञान महिलांना स्वयंसहायता गट आणि कुटीर उद्योगात सामील करून रोजगारनिर्मिती गावातील संसाधनांचा योग्य वापर करून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करणे.
नानाजी देशमुख यांचे शैक्षणिक कार्यः
जे शिक्षण माणसाला ख-या अर्थाने जगण्याचे भान देते, तेच खरे शिक्षण, केवळ पुस्तकी पाठांतरावर भर देणारे शिक्षण माणूस घडवू शकत नाही. स्वावलंबन हा शिक्षणाचा खरा मूलभूत हेतू असायला हवा, असे नानाजी देशमुख आग्रहाने प्रतिपादन करायचे. जिवनाच्या पहिल्या भागात नानाजींनी संघकार्य केले. दुस-या भागात राजकीय कार्य केले, तिसऱ्या भागात सामाजिक कार्याला सुरुवात केली. बाकी वैयक्तिक जीवन असे त्यांना नव्हतेच. स्वतः अंगीकारलेल्या विधायक कार्याच्या निमित्ताने नानाजींनी 14-15 देशांना भेटी दिल्या. त्या सर्व अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये सामाजिक, शैक्षणिक विकासाकडे आपले लक्ष घातले.
चित्रकूट प्रकल्पः आदर्श ग्राम विकासाचे मॉडेल
चित्रकूट प्रकल्प हा ग्रामीण विकासासाठी नानाजी देशमुख यांनी उभारलेला एक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा आदर्श आहे. या प्रकल्पाची रचना स्वावलंबन, सामुदायिक सहभाग, आणि सर्वांगीण विकास यावर आधारित होती. हा प्रकल्प ग्रामीण भारतासाठी एक प्रेरणादायी मॉडेल बनला आहे. या प्रकल्पाची स्थापना 1978 साली नानाजी देशमुख यांनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरील चित्रकूट येथे या प्रकल्पाची सुरुवात केली. या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला स्वावलंबी बनवून आत्मनिर्भर ग्रामविकास साध्य करणे. प्रमुख तत्त्व "हर हाथ को काम, हर खेत को पानी, हर घर को सम्मान."
प्रकल्पामधील प्रमुख उद्दिष्टे व उपक्रम:
1. शिक्षण आणि सक्षमीकरण
2. आरोग्य आणि स्वच्छता
3. कृषी सुधारणा
4. जल आणि पर्यावरण व्यवस्थापन
5. स्वावलंबी उद्योग
6. सामुदायिक सहभाग
नानाजींची ग्रामोदय संकल्पना :
खेड्याच्या विकास म्हणजेच भारताचा विकास हे महात्मा गांधींनी रुजविलेले तत्व नानाजींनी अंगिकारले व प्रत्यक्ष रचनात्मक कार्य करून समाजासमोर आदर्श ठेवला. जोपर्यंत खेड्यातील लोकांचे जीवनमान उंचावणार नाही आणि जोपर्यंत खेडी आत्मनिर्भर होणार नाहीत. तोपर्यंत राष्ट्राचा विकास खऱ्या अर्थाने होऊ शकत नाही याच भूमिकेतून त्यांनी 26 जानेवारी 2005 पासून ग्राम स्वावलंबन अभियान राबवण्यास सुरुवात केली. गावाचा विकास करायचा असेल तर गावाची संपूर्ण संरचनाच मुळातून बदलावी लागेल, काही उद्दिष्टे आणि ध्येय गावातील लोकांसमोर ठेवावी लागतील, आणि सर्वांना सोबत घेऊन जागृती अभियान राबवावे लागेल. त्यासाठी काही ठळक उद्दिष्टे त्यांनी ग्रामवासियांसमोर ठेवली. 1) गावात एकही भुकेला माणूस राहणार नाही 2) गावात एकही व्यक्ती बेरोजगार राहणार नाही 3) आरोग्याकडे लक्ष दिल्यास आजार नियंत्रणात येतील 4) सर्व स्त्री पुरुष साक्षर होतौल 5) भांडणे न्यायालयाबाहेर मिटवून समेट घडवून तंटामुक्त गाव निर्माण होईल. 6) गाव सुजलम सुफलम करण्यासाठी वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान या बाबीकडे लक्ष पुरवले जाईल.
नानाजींची "समाजाशिल्पी दाम्पत्य संकल्पना:
नानाजी देशमुख यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाठी अनेक उपक्रम राबविले. त्यापैकी "समाजशिल्पी दाम्पत्य" हा एक अनोखा व यशस्वी प्रयोग होय. समाजशिल्पी म्हणजे समाजाला घडवणारा जसा शिल्पकार दगडाच्या शिल्पातून अप्रतिम कलाकृती तयार करतो, त्याचप्रमाणे हे समाजशिल्पी दाम्पत्य (पती-पत्नी) समाजाचे अभिनव शिल्प उभारण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले आणि सामाजिक जाण असलेले असतात. समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तळमळीने काम करणारी सुशिक्षित आणि तरुण जोडपी अधिक प्रभावी ठरतील असे वाटल्याने समाजशिल्पी दाम्पत्याची संकल्पना पुढे आली. पंडित दिनदयाळ शोध संस्थानने नानाजींच्या विचारावंर खेड्यांचा विकास करण्यासाठी प्रत्येक पाच खेडयांचा एक समूह निश्चित केला, त्यानुसार गावकारी आणि पंडित दीनदयाळ शोध संस्थान यांत परस्पर समन्वय साधण्यासाठी समाजशिल्पी दाम्पत्याची नेमणूक केली.समाजशिल्पी दांपत्य योजना 1996 मध्ये 11 नवविवाहित जोडप्यांच्या सहभागाने सुरू झाली आणि या योजनेत आजपर्यंत 102 हून अधिक जोडप्यांनी सहभाग घेतला आहे. काही गावांपासून सुरू झालेल्या जोडप्यांच्या कार्यामुळे स्वावलंबन मोहिमेच्या 500 पेक्षा जास्त गावांमध्य दिनदयाळ शोध संस्थान चे प्रकल्प यशस्वी झाले आहेत
समाजशिल्पी दाम्पत्यांव्दारे करण्यात येणारी काही महत्वाची कार्य :
1. गावाचे सर्वेक्षण करणे व त्यात अशा काही बाबींचा समावेश असावा
अ) गावात कोण-कोणते उद्योगधंदे, कुटिरोद्योग चालतात? अगोदर कोणते चालत होते? ते का बंद पडले? बेरोजगार कारागीर सध्या काय करतात? आदीबाचत माहिती मिळवणे,
ब) गावात कोणता कच्चामाल उपलब्ध आहे? त्यावर आधारित कोणते उद्योग अभे राहू शकतात? तयार पक्क्यामालाची विक्री कोठे होऊ शकते? आदीबाबत शोध घेणे,
क) गाव स्वच्छ आणि सुंदर कसे राहील, त्याचा आरखडा तयार करणे.
2) नोडल सेंटर चित्रकूट येथून जनशिक्षण संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, उद्यमिता विद्यापीठ यांच्या सहकायनि गरजू व्यक्तींना त्यांच्या आवश्यकतेनुसार शेतीव्यवसाय व त्यास पूरक व्यवसाय बाचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे. प्रत्येकाला काम मिळेल, कोणी बेकार राहणार नाही, अशी व्यवस्था करणे.
3) अंगणवाडी, बालवाडी, पौढ साक्षरता वर्ग आणि संस्कार वर्ग घेऊन सर्वंकश साक्षरतेसाठी प्रयत्न करणे आणि त्यातून सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे,
4) गाव तंटामुक्त करणे हा त्यांच्या कार्यामधील महत्वाचा मुद्दा आहे. गावकन्यांचे प्रबोधन करून भांडणामुळे कोणाचे फावते आणि कोणाचे नुकसान होते याची जाणीव करून देणे आणि गावातच सर्वमान्य पंच नेमून त्यांच्यामार्फत तट्याचा निवाडा करणे.
5) चित्रकूट येथिल आरोग्यधाममधील डॉक्टरांच्या मदतीने गावांगावात आरोग्य शिबीरे भरवणे आणि सर्वांचेच आरोग्य चांगले राहील याकडे लक्ष पुरविणे.
6) गावात स्वयंरोजगार आणि स्वावलंबन अभियान नियमितपणे घेण्यात यावे, जेणेकरून याव्दारे गावातून एकही बरोजगार राहणार नाही, हे उद्दिष्ट साध्य होईल.
7) दीनदयाळ संशोधन संस्थेने आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नातून पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक गावांमध्ये लोकांना 5 ते 6 किमी अंतरावरून पिण्याचे पाणी न्यावे लागत आहे. प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती (सामान्यतः एक महिला) पूर्णवेळ पिण्याचे पाणी आणण्यात गुंतलेली असते. या 19 गावांमध्ये राजीव गांधी बल बंधन योजना राबविण्याची जबाबदारी दीनदयाळ संशोधन संस्थेला देण्यात आली होती. कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गावक-यांनी पावसाचे बाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी त्यांच्या प्रदेशात चेक बंधारे बांधण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमात महिला, पुरुष, लहान मुले यांनी मनापासून सहभाग घेतला,
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021:
महाराष्ट्र सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 साठी 4000 कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. ही योजना राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांच्या लागवडीवर भर देईल आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या अडचणींमध्ये शेतकऱ्यांना मदत होईल. महाराष्ट्रातील 15 जिल्हयातील 5142 खेड्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 सुरू झालेली आहे.
नानाजींना मिळालेले सन्मान/पुरस्कार:
1. आंतरराष्ट्रीय फेडरेशन फॉर वूमन ॲग्रीकल्चरल अवॉर्ड हा 1995 मध्ये श्री. एस. एस. स्वामिनाथन प्रेसिडेंट आंतरराष्ट्रीय फेडरेशन फॉर वूमन इन ॲग्रीकल्चरल यांच्या हस्ते देण्यात आला होता.
2. "पर्सन ऑफ दि ईअर" 1996-97 हा पुरस्कार रोटरी इंटर नॅशनल आणि डीस्ट्रीक्ट 3190, दिल्ली यांच्याकडून देण्यात आला.
3. राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार हा आर. जी. फौंडेशन, मुंबई यांच्याकडून 1997 मध्ये देण्यात आला.
4. ग्रामीण क्षेत्रातील विशेष सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारद्वारा 26 जानेवारी 1999 प्रजासत्ताकदिनी नानाजी देशमुख यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रापतींच्या हस्ते 23 मार्च 1999 रोजी देण्यात आला.
5. डी. लिट हि पदवी खालील विद्यापीठाकडून देण्यात आली.
1997 पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र आणि अजमेर विद्यापीठ, राजस्थान, 1998 महर्षी दयानंद सरस्वती विश्वविद्यालय, 2000 छत्रपती शहाजी महाराज विद्यापीठ, कानपूर-उत्तर प्रदेश, 2001 - बुंदेलखंड विद्यापीठ, झाशी, 2001 बडोदा विश्वविद्यालय, गुजरात, 2008 - करवीर विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र.
6. नानाजी देशमुख यांनी केलेल्या नॅशनल इंटग्रेशन ॲन्ड ट्रायबल वेल्फेअर या कामासाठी चेअरमन ऑफ युनो ह्युमन राईटस ॲन्ड कमीशन (राष्ट्रसंघ) यांसकडून जस्टीस पी. एन. भगवती यांच्या हस्ते नॅशनल सिटीझन अवॉर्ड नॅशनल सिटीझन कमिटी, दिल्ली 2001 मध्ये देण्यात आला होता.
7. समाज कार्यासाठी स्वतःचे आयुष्य निरपेक्षपणे झोकून देऊन समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर घालण्याच्या महात्कार्याबद्दल डॉ. अभय बंग यांच्या हस्ते नानाजी देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार चतुरंग प्रतिष्ठान मुंबई यांच्याकडून 2003 मध्ये देण्यात आला.
8. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे आणि संशोधन करुन उल्लेखनिय योगदानाबद्दल नानाजी देशमुख यांना संत ज्ञानेश्वर विद्यापीठ, पुणे या संस्थेच्या रजत जयंती महोत्सवनिमित्ताने संत ज्ञानेश्वर पुरस्कार देण्यात आला होता.
9. ग्रामीण विकासाच्या योगदानासाठी साहित्य वाचस्पती ही मानद पदवी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. मंगलराय यांच्या हस्ते नानाजी देशमुख यांना 2008 मध्ये साहित्य वाचस्पती हि पदवी देण्यात आली होती.
10. भारत सरकारकडून 2019 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नानांच्या केलेल्या कार्यांचा गौरव म्हणून नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने (Bharat Ratna Award) सन्मानित करण्यात आले. त्यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
XX
निधन:
27 फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांचे मध्य प्रदेश मधील त्यांनी स्थापन केलेल्या चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाच्या आवारात वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. शेवटच्या कालखंडात विचार घेण्यास त्यांनी नकार दिला आणि नवी दिल्ली येथील दधिची देहदान संस्थेला आपला देह त्यांनी दान दिला. जो स्वीकारण्यात आला. त्यांचा मृतदेह वैद्यकीय संशोधनासाठी ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये ठेवण्यात आला.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-27-day-of-special-dinvishesh.html
👆
February 27 - Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 27: दिनविशेष
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html
👆
Bharat Ratna: India's highest honor award
भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार
View, comments and share...



0 Comments