Subscribe Us

header ads

February 16 - Day of Special (Dinvishesh)

February 16 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 16: दिनविशेष


महत्त्वाच्या घटना


लिथुएनियाचा स्वातंत्र्य दिन

16 फेब्रुवारी 1659 रोजी पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.

16 फेब्रुवारी 1704 रोजी मोगल सम्राट औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबीशाहगड असे ठेवले.

16 फेब्रुवारी 1918 रोजी लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.
X X
16 फेब्रुवारी 1959 रोजी फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

16 फेब्रुवारी 1960 रोजी अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.

16 फेब्रुवारी 1969 रोजी सुप्रसिद्ध उर्दू शायर यांच्या नावे शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त भारत सरकारच्या डाक विभागाने तिकीट जारी केले.

16 फेब्रुवारी 1985 रोजी लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना करण्यात आली.

16 फेब्रुवारी 1982 रोजी भारतातील पश्चिम बंगालमधील राजधानीचे शहर असलेल्या कोलकत्ता येथे जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
X X
16 फेब्रुवारी 2008 मध्ये भारतातील सुप्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांना मध्य प्रदेश सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

16 फेब्रुवारी 2008 मध्ये भारतातील राज्य बिहार राज्याच्या मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेचे उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली.


16 फेब्रुवारी 1222 मध्ये जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1282 मध्ये झाला.

16 फेब्रुवारी 1745 मध्ये मराठा साम्राज्यातील 4 था पेशवा, 16 व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ "थोरले" माधवराव पेशवे यांचा जन्म त्यांनी पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली. त्यांचा मृत्यू 18 नोव्हेंबर 1772 मध्ये झाला.


16 फेब्रुवारी 1822 मध्ये बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म झाला.
X X
16 फेब्रुवारी 1876 मध्ये भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्‍चायुक्त रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. एक 894 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बीएससी पदवी प्राप्त केली. हिंदुस्तान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन ते इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यामध्ये त्यांनी गणित विषय घेऊन सर्वात कठीण परीक्षा ते प्रथम श्रेणीत पास होऊन ते प्रथम आले . त्यामुळे त्यांना सीनियर
रँग्लर असे म्हणतात. रँग्लर परांजपे हे 1902 ते 1927 या काळात फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यानंतर ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. त्यानंतर 1921 साली तत्कालीन मुंबई सरकारने रँग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. 1927 मध्ये लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू पद रँग्लर यांनी सहा वर्ष भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या वकील भारतीय वकिलातीत उच्चयुक्त म्हणून 1944 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. 1956 मध्ये ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांचा मृत्यू 6 मे 1966 रोजी झाला.


16 फेब्रुवारी 1909 मध्ये मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 14 जुलै 1998 रोजी झाला.

16 फेब्रुवारी 1937 रोजी भारतातील सुप्रसिद्ध चित्रकार गुलाम मोहम्मद शेख यांचा जन्म झाला.

16 फेब्रुवारी 1954 रोजी वेस्ट इंडिजचा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांचा जन्म झाला.

16 फेब्रुवारी 1961 रोजी भारतातील सुप्रसिद्ध गायक शेखर सेन यांचा जन्म झाला भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
X X
16 फेब्रुवारी 1964 रोजी ब्राझीलचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू बेबेटो यांचा जन्म झाला.

16 फेब्रुवारी 1997 रोजी भारतातील सुप्रसिद्ध कबड्डी प्लेयर परदीप नरवाल यांचा जन्म झाला.

16 फेब्रुवारी 1944 रोजी भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक धुंडिराज गोविंद ऊर्फ 'दादासाहेब' फाळके यांचे निधन झाले. अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत. यांच्या नावे चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ते चित्रपट निर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते त्यांना भारतीय चित्रपटाचा जनक मानले जाते. 1913 साली त्यांनी तयार केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होईल. 1937 पर्यंतच्या आपल्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 95 चित्रपटांची व 26 लघुपटांची निर्मिती केली. 1885 मध्ये सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई येथे त्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथले शिक्षण पूर्ण करून ते 1890 मध्ये बडोदा येथे कला भवन या ठिकाणी शिल्पकला तंत्रज्ञान रेखाटन चित्रकला छायाचित्रण कला इत्यादी गोष्टी शिकले. आणि त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेसाठी ड्राफ्ट्समन म्हणून काम केले .त्यानंतर त्यांनी राजा रविवर्मा सोबत काम केले. नंतर स्वतःचा छापखाना काढला. छपाईची नवी तंत्र आणि यंत्रे अभ्यासायला ते जर्मनीची वारी केली. त्यांनी "लाईफ ऑफ ख्रिस्त" हा पहिला मूकपट पाहिला आणि त्यांनी त्यांचे लक्ष चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले. 1912 मध्ये त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला तो 3 मे 1913 या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपट गृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला. दादासाहेबांच्या पत्नी सरस्वती बाई यांनी पहिला चित्रपट बनवण्यात खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्यांनी आपले स्वतःचे सर्व दागिने विकून दादासाहेबांना मदत केली तसेच त्या 60 ते 70 लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धूत असत. त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 30 एप्रिल 1870 मध्ये झाला. दादासाहेब फाळके यांच्या नावे चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो.

               दादासाहेब फाळके


16 फेब्रुवारी 1956 रोजी भारतातील सुप्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य मेघनाद साहा यांचे निधन झाले. तार्‍यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले. त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1893 रोजी झाला होता.


X X
16 फेब्रुवारी 1968 रोजी भारतातील सुप्रसिद्ध कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन झाले. पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. 1933 मध्ये त्यांना 'रावसाहेब' तर 1946 मध्ये त्यांना 'रावबहादूर' हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1892 मध्ये झाला होता.


16 फेब्रुवारी 1994 रोजी भारतातील राजस्थान राज्यातील जयपूर-अत्रौली घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन झाले त्यांचा जन्म 4 जुलै 1912 रोजी झाला होता.

16 फेब्रुवारी 1996 रोजी भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती तथा थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन झाले.

16 फेब्रुवारी 2000 रोजी भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, "इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर" चे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन यांचे निधन झाले. ते स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रीय ग्रंथपाल होते त्यांचा कार्यकाल 1947 ते 1962. त्यांना भारतीय राष्ट्रीय संदर्भ ग्रंथांचे जनकही म्हणून ओळखले जाते. 1958 नंतर नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय वैज्ञानिक दस्तऐवजीकरण केंद्र चे पहिले संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली ती 1963 ते 1969 या कालखंडात. त्यांच्या सेवेची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून पदवी प्राप्त करून इंग्लंड साठी ते शिक्षणासाठी गेले त्यांचे शिक्षण लंडन विद्यापीठातून इंग्रजी साहित्याने ग्रंथालय विज्ञान हा पदव्युत्तर पदवी त्यांनी पूर्ण केली. मैसूर विद्यापीठात इंग्रजीचे शिक्षक म्हणून सुरुवातीला सेवा केली त्यानंतर त्यांनी कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च सहाय्यक सचिव आणि सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशन मध्ये क्युरेटर म्हणून त्यांनी काम केले त्यांनी राष्ट्रीय ग्रंथ पाल म्हणून ग्रंथालयाची उभारणी करणे भारतीय राष्ट्रीय ग्रंथ सूची तयार करणे इत्यादी कामे केली. इंडियन लायब्ररी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामे केली. त्यांनी अनेक प्रकाशानांचे श्रेय त्यांच्याकडे आहे त्या तीन खंडांमध्ये भारतातील मुद्रण आणि प्रकाशनाचा इतिहास आणि द बुक इन इंडिया, हे प्रमुख आहेत. त्यांच्या स्मरणार्थ सिकंदराबाद येथे केशव वन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड नॉलेज मॅनेजमेंट या धर्मदाय ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
             बेल्लारी शामण्णा केशवन


X X
16 फेब्रुवारी 2001 रोजी सुप्रसिद्ध मराठी चित्रपट ‘पिंजरा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’ आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन झाले. त्यांनी 175 मराठी चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले. त्याचे मूळ नाव रंगराव साळवी मूळचा नगर जिल्ह्यातील राहणारा त्याला भावगीत गायक दत्ता वाळवेकरांनी रंजन हे नाव दिले. 1945 ते 75 या काळात मराठी चित्रपटांची कथा नक्की तमाशा या विषयावर असायचे 1950 च्या आसपासच्या काळातल्या मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन रंजन साळवी यांचे असायचे. त्यांनी उषा नाईक जयश्री गडकर जयश्री टी मधू कांबीकर माया जाधव लीला गांधी व सला देशमुख सरला येवलेकर अशासारख्या सुमारे दीडशे नाईकांना नृत्याचे धडे दिले.
                  रंजन साळवी






https://www.insearchofknowledge.org/2023/12/30.html
👆
Dhundiraj Govind Phalke (Dadasaheb Phalke): Indian producer-director-screenwriter, known as "The Father of Indian cinema". 
दादासाहेब फाळके : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक
स्मृतीदिन:16 फेब्रुवारी


https://www.insearchofknowledge.org/2023/10/dadasaheb-phalke-award-best-award-in.html
👆
Open link 

Dadasaheb Phalke Award: Best award in Indian cinema

दादासाहेब फाळके पारितोषिक: भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोत्कृष्ट पुरस्कार-स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती


XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-15-day-of-special-dinvishesh.html
👆
February 15 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 15 : दिनविशेष
XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2024/02/february-17-day-of-special-dinvishesh.html
👆
February 17- Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 17: दिनविशेष

X
X

https://gyaaniinfo.blogspot.com/2023/12/30.html
👆
Dhundiraj Govind Phalke (Dadasaheb Phalke): Indian producer-director-screenwriter, known as "The Father of Indian cinema". 

दादासाहेब फाळके : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक

स्मृतीदिन:16  फेब्रुवारी


View, Comments and share....

Post a Comment

0 Comments