Subscribe Us

header ads

January 31 - Day of Special (Dinvishesh)

January 31 - Day of Special (Dinvishesh)

जानेवारी 31: दिनविशेष

महत्त्वाच्या घटना:

31 जानेवारी 1893 रोजी म्हणजे आजच्या दिवशी कोका कोला चे ट्रेडमार्क कंपनीने पेटंट स्वतःच्या नावावर केले.


31 जानेवारी 1896 रोजी कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा "अंबिकातनयदत्त" यांचा जन्म झाला. हे कन्नड कवी होतो पण त्यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी. त्यांच्या 1932 मध्ये नरबळी या कवितेमुळे त्यांना तुरुंगावास व अज्ञातवास भोगाव लागला. त्यांचे मराठी इंग्रजी कन्नड आणि संस्कृत मध्ये अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहे तसेच त्यांनी नाटक संग्रह सुद्धा तयार केलेले आहेत. अनेक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री (1968) पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या "नाकु तंती" या काव्यसंग्रहास 1973 मधे "ज्ञानपीठ पुरस्कार" मिळाला. या काव्यात एकूण 44 कविता आहेत . 1943 मध्ये शिमोगा येथे भरलेल्या 27व्या कन्नड तत्वचतुशअताई संमेलनाचे अध्यक्ष व त्यांना बहाल करण्यात आले. यांचा मृत्यू 21 आक्टोबर 1981 रोजी झाला.

              दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे

31 जानेवारी 1911 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

X X

31 जानेवारी 1915 रोजी जर्मनी ने सर्वात आधी रशिया च्या विरुद्ध घातक वायू चा प्रयोग केला होता.


31 जानेवारी 1920 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "मूकनायक" या पाक्षिकावी सुरूवात झाली. समाजाच्या वेदना व विद्रोह प्रगट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. 31 जानेवारी 1920 रोजी या पक्षाचा पहिला अंक प्रकाशित झाला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. या पाक्षिकाच्या संपादक पांडुरंग नंदराम भटकर हा महार जातीचा शिक्षित तरुण होता. मूकनायक पाक्षिकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2500 रुपयाची आर्थिक मदत दिली होती. हे पाक्षिक एप्रिल 1923 मध्ये बंद पडले.



31 जानेवारी 1929 रोजी सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.


31 जानेवारी 1939 रोजी हैदराबाद संस्थानात आर्य समाजाच्या वतीने सत्याग्रह करण्यात आला. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातून करण्यात आला.


31 जानेवारी 1945 रोजी युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात युद्धातुन पळून गेलेल्या एकूण 49 सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र फक्त स्लोव्हिकच्याच शिक्षेची अंमलबजावणी झाली.


31 जानेवारी 1949 रोजी बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.

X X

31 जानेवारी 1950 रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली. हायड्रोजन बॉम्ब हा एक प्रकारचा अनुभव आहे. तो अधिक शक्तिशाली अनुभव आहे. त्यासाठी हायड्रोजन समस्थानिक ड्युटेरियम आणि ट्रीटियम आवश्यकता आहे. अणूंचे फ्युज झाल्यावर बॉम्बचा स्फोट होतो. याचे तापमान सूर्याच्या सर्वात उष्ण भागाच्या तापमानापेक्षाही खूप जास्त असते. अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि भारत यांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. हायड्रोजन आणून च्या स्फोटाने भरपूर उष्णता ऊर्जा निर्माण होऊ शकते हे प्रथम 1922 मध्ये शोधल्या गेले. 1932 मध्ये ड्युटीरियम नावाच्या जड हायड्रोजनचा शोध लागला आणि 1934 मध्ये ट्रीटीयम नावाच्या जड हायड्रोजनचा शोध लागला . त्यामुळे 1950 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी बॉम्ब तयार करण्याचे आदेश दिले.  यासाठी 1951 मध्ये दक्षिण कॅरोलिन मध्ये एक मोठा कारखाना सुरू करण्यात आला.

              हायड्रोजन बॉम्ब

31 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.



31 जानेवारी 1954 रोजी एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग (एडविन हावर्ड आर्मस्ट्रॉंग) यांचा मृत्यु  अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील चेन्सी मॅन हॉटल या ठिकाणी झाला. हा एक अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि संशोधन याने एफ एम (फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन) रेडिओ आणि सुपर हिटरोडीन सिस्टीम विकसित केले. त्याचा आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या महान संशोधनकर्त्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. त्याला 1917 मध्ये मेडल ऑफ ओनर चे पहिले मेडल मिळाले. रेडिओवरील युद्धकाळातील कामासाठी फ्रेंच सरकारने 1919 मध्ये लीजन ऑफ ऑनर हा किताब दिला. 1942 मध्ये एडिसन पदक बहाल करण्यात आले. त्यांचा जन्म 18 डिसेंबर 1890 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला होता.

            एडविन हावर्ड आर्मस्ट्रॉंग

31 जानेवारी 1958 रोजी अमेरीकेने अवकाशात पाठवलेला पहिला उपग्रह एक्सप्लोरर-1 हा होता. आणि आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्ष मध्ये अमेरिकेच्या सहभागाचा तो एक भाग होता. एक्सप्लोरर एक ची रचना कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या जे पी एल ने डॉ. विल्यम पिक्रिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मिशन पेलोड वाहून नेणारा हा दुसरा उपग्रह होता. या उपग्रहाचे वस्तुमान 13.97kg होते. यामध्ये एकूण 20 ट्रांजिस्टर वापरण्यात आलेले आहेत. विद्युत ऊर्जा पारा रासायनिक बॅटरी द्वारे प्रदान केली गेली.

                       एक्सप्लोरर-1

31 जानेवारी 1969 रोजी आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, अवतार मेहेरबाबा यांचे निधन झाले.त्यांनी सलग 44 वर्षे मौनव्रत पाळले होते. त्यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1894 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला होता.


31 जानेवारी 1983 पर्यंत भारतात एच आय व्ही एड्स रोग आणि रोगांची संख्या 307 होती. ह्युमन  इमिनो डेफिसिएनसी व्हायरस (human immuno deficiency virus) हा विषाणूचा एक प्रकार असून हे विषाणू एड्स (acquired imino deficiency syndrome) या रोगास कारणीभूत असतात. या एचआयव्हीचा शोध डॉ. मोंतेनियेर आणि डॉयगायो यांनी लावला. हा विषाणू मानवी रोगप्रतिकारक कमी करणारा या विषाणूची एच आय व्ही तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत केली जाते. त्याबरोबर मोफत सल्ला आणि मार्गदर्शनही केले जाते.पहिला रुग्ण 1982 मध्येच मुंबईत सापडला. हा विषाणू सामान्यपणे लैंगिक संबंधातून, शरीरात तील द्रव्यांच्या आदान प्रदानाने ,संक्रमित सुईद्वारे रक्तामार्फत किंवा एखाद्या संक्रमित गरोदर आईकडून बाळामध्ये पसरतो. या विषयाचे दोन प्रकार आहेत एच आय व्ही -1, एच आय व्ही -2. या आजारावर काहीच उपचार नाहीत. पण अँटी रेट्रो व्हायरल थेरपीने हा आजार नियंत्रणात आणता येतो. या रोगाची औषधे बहुतांश इनव्हीबिटर असतात. ज्यामध्ये विशेष करून विषाणू व त्यांचे कार्य आटोक्यात आणण्यासाठीच्या विविध औषधांचे समायोजन असते. त्यासाठी नॉन न्यूक्लिओ साईड रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्टेशन इनव्हीटर्स अशी औषधे असतात. जे काही प्रथिनांचे उत्पादन नाहीसे करण्यासाठी  सहाय्य करतात. 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एडस दिन म्हणून साजरा केला जातो.

    human immuno deficiency virus


X X

31 जानेवारी 1992 रोजी भारतात "राष्ट्रीय महिला आयोगा" (National commission for women ) ची स्थापना करण्यात आली. ही एक भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार 1992 मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. 1990 च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली. भारतीय महिला आयोगाने विविध पक्षांची ज्यामध्ये अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत कक्ष, महिला कल्याण कक्ष, महिला सुरक्षा कक्ष स्थापन केले. या आयोगामध्ये एक चेअरपर्सन आणि उर्वरित पाच सदस्य पाच वर्षासाठी केंद्र सरकार नियुक्त करत असते. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे श्रीमती रेखा शर्मा या आयोगाचे अध्यक्ष 2018 पासून आहेत. 2014 पासून ललिता कुमार मंगलम ह्या अध्यक्ष होत्या. राष्ट्रीय महिला आयोग "राष्ट्र महिला" नावाची वृत्तपत्रिका दर महिन्याला हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये प्रसिद्ध करत असते. पहिल्या अध्यक्षा म्हणून जयंती पटनायक यांनी काम पाहिले.



31 जानेवारी 1995 रोजी बँकिंग तज्ञ, "रोखे बाजार नियामक मंडळाचे" (SEBI) चे अध्यक्ष, पद्मभूषण सुरेश शंकर नाडकर्णी यांचे निधन झाले. 


31 जानेवारी 2000 रोजी हवाला केस मधील सर्व आरोपींची सुटका करण्यात आली.


31 जानेवारी 2001 रोजी नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन झाले. कानेटकर हे नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी महाविद्यालयात सध्याचे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालय येथे प्राध्यापक होते. कानिटकरांनी एकूण 43 नाटके आणि चार कादंबऱ्या लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते, मास्तर एके मास्तर, प्रेमा तुझा रंग कसा, प्रेमाच्या गावा जावे, नल दमयंती, जिथे गाव तास भले फुटतात, गाठ आहे माझ्याशी, कस्तुरी मृग, इथे ओशाळला मृत्यू, अखेरचा सवाल, अश्रूंची झाली फुले, इत्यादी त्यांचे सुप्रसिद्ध नाटके आहेत. कनेक्ट करांच्या नाटकांचे अनुवाद हिंदी गुजराती कानडी भाषेमध्ये झालेले आहेत. त्यांनी महत्त्वाच्या व्यक्तीवर जीवन नाट्य लिहिलेली आहे त्यात हिराबाई पेडणेकर वर कस्तुरी मृग, बाबा आमटे यांच्या जीवनावर वादळ माणसाळतय, इतिहासाचार्य वि का राजवाडे यांच्या जीवनावर जीवनावर विषवृक्षांची छाया आणि महर्षी कर्वे आणि बायो यांच्या जीवनावर हिमालयाची सावली ही नाटके लिहिलेली आहे. कानेटकर हे 1988 मध्ये पार पाडलेल्या ठाणे या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना 1966 साली सर्व उत्कृष्ट कथा मूळ नाटक अश्रूंची झाली फुले साठीचा हिंदी चित्रपट तयार करण्यात आला. असू बन गये फुल त्यासाठीचा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत सरकारने 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.त्यांचा जन्म 20 मार्च 1920 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या ठिकाणी झाला होता.



31 जानेवारी 2004 रोजी गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 15 जून 1929 रोजी झाला होता.


31 जानेवारी 2005 रोजी म्हणजे आजच्या दिवशी जोगिंदर जसवंत सिंह यांची सेनाप्रमुख म्हणून निवड झाली.


31 जानेवारी 2010 रोजी हॉलीवूड चित्रपट अवतार ने 2 बिलियन डॉलर रुपयांची कमाई करून सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला होता.

X X

31 जानेवारी 2020 शुक्रवार च्या मध्यरात्री युनायटेड किंग्डम नि उपचारीक रित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले या प्रक्रियेला "ब्रेक्झिट "असे नाव दिले गेले. ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे.


31 जानेवारी 1923 रोजी सैन्य दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच "परमवीर चक्र" मिळणारे प्रथम भारतीय सैनिक सोमनाथ शर्मा यांचा जन्म हिमाचल प्रदेशातील दाढ या ठिकाणी झाला. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षामध्ये 1947 साली यांनी मुख्य भूमिका बजावली. त्यामुळे भारत सरकारने त्यांना परमवीर चक्र देऊन सत्कार केला. मेजर सोमनाथ शर्मा आहे कुमाऊ रेजिमेंटच्या चौथ्या बटालियन कंपनीचे कंपनी कमांडर होते. यांनी बर्मा मध्ये द्वितीय विश्व युद्ध च्या दरम्यान आराखडा अभियान मध्ये जपानी सेनेच्या विरुद्ध लढा दिला होत. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 100 सैनिकाच्या मदतीने कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या 700 सैनिकांचा पराभव मेजर सोमनाथ शर्मा यांनी खूप चातुरयांनी केला. आणि ही लढाई जिंकली. पाकिस्तानी सैन्यांनी टाकलेले ग्रेनेड त्यांच्यावर येऊन पडल्यामुळे आपण त्यांना गमावले. त्यांना वीर मरण आले.



31 जानेवारी 1932 रोजी पंजाब राज्यातील सुप्रसिद्ध पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक विजय कुमार चोप्रा यांचा जन्म झाला.


31 जानेवारी 1954 मध्ये एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 18 डिसेंबर 1890 रोजी झाला होता.


31 जानेवारी 1961 रोजी भारतातील बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिन्हा यांचे निधन झाले.

X X

31 जानेवारी 1969 रोजी भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत अवतार मेहेरबाबा यांचे निधन झाले. त्यांनी सलग 44 वर्षे मौनव्रत पाळले होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी 25 फेब्रुवारी 1894 रोजी झाला होता.


31 जानेवारी 1972 रोजी नेपाळचे राजे नेपाळ नरेश महेंद्र यांचा मृत्यू झाला.


31 जानेवारी 1994 रोजी भारतातील व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचा मृत्यू झाला.


31 जानेवारी 1995 रोजी सुप्रसिद्ध बँकिंग तज्ञ, "रोखे बाजार नियामक मंडळाचे" (SEBI) चे अध्यक्ष, पद्मभूषण सुरेश शंकर नाडकर्णी यांचा मृत्यू झाला. सेबी मध्ये येण्यापूर्वी ते इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया चे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी 1993 पासून भारतीय आयुर्विमा महामंडळाचे संचालक म्हणूनही काम पाहिलेले आहेत. भारतीय रोखे बाजार सुव्यवस्थित करण्यासाठी आणि स्टॉकचा अवैध व्यापार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यासाठी त्यांना श्रेय जाते. 1992 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड साठी ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1934 मध्ये मुंबईत झाला होता. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने 1989 मध्ये सन्मानित केले.



31 जानेवारी 2000 रोजी भारतातील हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1908 रोजी उत्तराखंड राज्यातील डेहराडून या ठिकाणी झाला होता.


31 जानेवारी 2004 रोजी भारतातील सुप्रसिद्ध हिंदी सिनेमातील गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या हिचा मृत्यू झाला. तिचा जन्म 15 जून 1929 रोजी झाला होता.


31 जानेवारी 2004 रोजी भारतातील सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1922 रोजी झाला होता.


31 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.  महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्राताई यांनी शपथ घेतली. 18 ऑक्टोबर 1963 रोजी महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी जन्म झाला. त्यांचे वडील बाजीराव पाटील आणि भाऊ पद्मसिंह पाटील हे दोघेही राजकारणात होते. 1983 कॉमर्समधून पदवीधर शिक्षण पूर्ण केले. 1983 मध्ये अजित पवार यांच्याशी लग्न, लग्नानंतर 1985 काटेवाडीत सामाजिक कार्याला सुरुवात. 2006 राज्यातील 86 गावांमध्ये निर्मलग्राम मोहिमेचे नेतृत्व, निर्मलग्राम पुरस्कारानं गौरव. बारामतीमध्ये टेक्सटाईल पार्कची सुरुवात 2008 करून 15 हजार महिलांना रोजगार दिला. 2010 पर्यावरणीय जागरुकतेसाठी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेची स्थापना केली. 2011 जागतिक उद्योजकता मंच (फ्रान्स) च्या थिंक टँक सदस्यपदी निवड. 2017 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती. महाराष्ट्र स्टेट ॲग्री अँड रुरल टुरिझम फेडरेशनच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या त्या विश्वस्त आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळावर त्या सदस्य म्हणून काम करतात. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे माजी व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे.  2024 लोकसभा निवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश, नणंद सुप्रिया सुळे कडून पराभव. 2024 राज्यसभा निवडणुकीत 18 जून रोजी खासदारकीची शपथ घेतली. 31 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत बनल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला.








विविध राज्यांच्या महिला मुख्यमंत्री
नाव : राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री कार्यकाळ

1. सुचेता कृपलानी: उत्तर प्रदेश। 
2 ऑक्टोबर 1963 ते 14 मार्च 1967

2. नंदिनी सत्पथी : ओडिशा। 
14 जून 1972 ते 16 डिसेंबर 1976

3. शशिकला काकोडकर : गोवा। 
12 ऑगस्ट 1973 ते 27 एप्रिल 1979

4. अन्वरा तैमूर : आसाम । 
6 डिसेंबर 1980 ते 30 जून 1981

5. व्ही. एन. जानकी रामचंद्रन :
तामिळनाडू। 
7 जानेवारी 1988 ते 30 जानेवारी 1988

6. जे. जयललिता : तामिळनाडू।
अनेक कार्यकाळ (1991-1996, 2001, 2002-2006, 2011-2016)

7. मायावती: उत्तर प्रदेश। 
विविध कार्यकाळ जून ते ऑक्टोबर 1995, मार्च ते सप्टेंबर 1997, मे 2002 ते ऑगस्ट 2003, मे 2007 ते मार्च 2012

8. राजिंदर कौर भट्टल : पंजाब। फेब्रुवारी 1997 ते मे 1997

9. राबड़ी देवी : बिहार। 
1997 ते 1999, 1999 ते 2000, 2000 ते 2005

10. सुषमा स्वराज : दिल्ली। 
13 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998

11. शीला दीक्षित : दिल्ली। 
3 डिसेंबर 1998 ते 28 डिसेंबर 2013

12. उमा भारती : मध्य प्रदेश। 
8 डिसेंबर 2003 ते 23 ऑगस्ट 2004

13. वसुंधरा राजे : भारतीय जनता पार्टी, राजस्थान। 
8 डिसेंबर 2003 ते 11 डिसेंबर 2008, 13 डिसेंबर 2013 ते 2018

14. आनंदीबेन पटेल : गुजरात। 
22 मे 2014 ते 7 ऑगस्ट 2016

15. ममता बॅनर्जी : तृणमूल काँग्रेस पक्ष, पश्चिम बंगाल । 
20 मे 2011 ते आतापर्यंत

16. महबुबा मुफ्ती : जम्मू आणि काश्मीर। 
4 एप्रिल 2016 ते 19 जून 2018

17. आतिशी मार्लेना सिंह: दिल्ली। 
15 सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025

18. रेखा गुप्ता: दिल्ली। 
20 फेब्रुवारी 2025 ते आतापर्यंत


विविध राज्यांच्या महिला उपमुख्यमंत्री
नाव : राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या उपमुख्यमंत्री कार्यकाळ

1. राजिंदर कौर भट्टल : पंजाब। 
6 ऑगस्ट 1996 ते 21 नोव्हेंबर 1996

2. जमुना देवी: मध्य प्रदेश।
1 डिसेंबर 1998 ते 8 डिसेंबर 2003

3. कमला बेनीवाल : राजस्थान। 
25 जानेवारी 2003 ते 8 डिसेंबर 2003

4. पामुला पुष्पा श्रीवाणी: आंध्र प्रदेश। 8 जून 2011 ते 7 एप्रिल 2022

5. रेणू देवी : बिहार।
16 नोव्हेंबर 2020 ते 9 ऑगस्ट 2022

6. दिया कुमारी : राजस्थान। 
15 डिसेंबर 2023 ते आतापर्यंत

7. प्रवती परिदा : ओडिशा। 
12 जून 2024 ते आतापर्यंत

8. श्रीमती सुनेत्राताई अजित पवार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र राज्य। 
31 जानेवारी 2026 पासून


X X





View, Comments and share....

Post a Comment

0 Comments