Subscribe Us

header ads

Ramakrishna Gopal Bhandarkar: Sanskrit Pandit and Great Orientalist

Ramakrishna Gopal Bhandarkar: Sanskrit Pandit and Great Orientalist

रामकृष्ण गोपाळ भांडारकर:संस्कृत पंडित व थोर प्राच्यविद्यातज्ञ

6 जुलै :जन्मदिन

24 ऑगस्ट:स्मृतिदिन

बालपण आणि शिक्षण:

रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी झाला. त्यांचे कुटुंब हे मालवण येथे पत्की या नावाने परिचित होते. रामकृष्ण भांडारकरांचे पूर्वज खजिनदार असल्याने भांडारकर हे नाव त्यांना पडले. रामकृष्ण भांडारकरांच्या वडिलांचे नाव गोपाळ लाडको भांडारकर असे होते.

रामकृष्ण भांडारकर यांचे प्राथमिक शिक्षण हे रत्नागिरी येथेच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण मुंबईतील एलफिस्टन्स इन्स्टिट्यूट मध्ये घेतले. त्यांची शैक्षणिक प्रगती पाहून विश्वनाथ मंडलिक, एम बर्वे, जी.डी.परांजपे, नागेश बापट व फिरोजशहा हे प्रभावित झाले.

त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून 1847 पासून सुरू झाले. रामकृष्ण भांडारकर 1861 मध्ये इंटर परीक्षा पास झाले. त्यानंतर 1862 मध्ये बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले, तसेच एम. ए.संस्कृत मध्ये शिक्षण पूर्ण केले. संस्कृत ही दुय्यम भाषा म्हणून त्यांनी निवडलेली होती.

X X

संस्कृत पंडित व थोर प्राच्यविद्यातज्ञ रा. गो.भांडारकर :

रामकृष्ण भांडारकरांनी येण्याचे शिक्षण पूर्ण संस्कृत मध्ये केल्यानंतर त्यांनी मोरोपंतांच्या 'सभापर्व' या ग्रंथा व्यतिरिक्त रोमन लॉ, ज्युलियस सिजर, लॉजिक या ग्रंथांचा सुद्धा अभ्यास केला. गोविंद शास्त्री लेले व अप्पा शास्त्री खाडीलकर या पंडितांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला जे. हॉवर्ड हे रा. गो. भांडारकरांचे गुरु होते. 

भांडारकरांना पौरात्य विद्येच्या अभ्यासासाठी शिक्षण संचालक हॉवर्ड यांनी सर्व तरी त्यावेळी मदत केली. भांडारकरांचा गणित हा विषय अत्यंत आवडीचा होता. त्यांचे अत्यंत आवडते व अत्यंत आदरणीय प्राध्यापक दादाभाई हे होते. 

अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून भांडाळकर आपली शेंडी खुंटीला बांधून ठेवत असत.

निर्भीडपणा व सत्यप्रियता या दोन गुणांसाठी भांडारकर अतिशय प्रसिद्ध होते परदेशी शिक्षण घेत असताना युरोपियन अध्यापका समोर त्यांनी आपले परखड मत मांडले ते त्यांच्या सरांना म्हणाले "सर माझे गणिताचे ज्ञान अधिक वाढावे म्हणून मी या संस्थेत नाव घातले पण आपण माझी निराशा केली."

शिडणे ओबेन या अध्यापकाच्या प्रभावाने ते अधिक प्रभावित झाले होते तसेच त्यांचे आदर्श म्हणून रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक हे सुद्धा होते . शिक्षण पूर्ण केल्यानंतर रा. गो. भांडारकरांनी काही काळ सिंध प्रांतातील हैदराबाद व रत्नागिरी येथील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले व त्यानंतर पुढे मुंबईच्या एल्फिन्सेंस कॉलेजला व नंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक व संस्कृत पंडित म्हणून नोकरीस सुरुवात केली.

मुंबई विद्यापीठाने भांडारकरांना 1866 मध्ये संस्कृतचे परीक्षक म्हणून नेमणूक दिली होती. रामकृष्ण भांडारकर हे थोर प्राच्यविद्या तज्ञ होते.

"मदभक्त यंत्र गायंती" ( जेथे माझे भक्त गात असतात) हा त्यांचा आवडता श्लोक होता.

X X

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था:

1917 मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. रामकृष्ण भांडारकर हे थोर प्राच्यविद्यातज्ञ (भांडारकर प्रणाली प्रसिद्ध होती.) होते व त्यांनी पहिल्या प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले.




प्रार्थना समाज व कार्य:

रामकृष्ण भांडारकर यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेत न्यायमूर्ती रानडे यांच्याबरोबर सहभाग ही झाले होते. प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत 867 मध्ये करण्यात आली. प्रार्थना समाजाचे ते एक कट्टर पुरस्कर्ते होते . त्यांनी प्रार्थना समाजाची तत्वे उद्दिष्ट व प्रतिज्ञा तयार करण्याचे कार्य केले म्हणून त्यांना प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असेही म्हटले जाते. 1912 मध्ये भरलेल्या अस्पृश्य समाजाच्या परिषदेचे ते अध्यक्ष राहिले. 


महत्वपूर्ण सामाजिक कामगिरी:

1891 मध्ये रा. गो. भांडारकरांनी आपली कन्या शांताबाई हिचा पुनर्विवाह श्री पानंदी करांबरोबर करण्यास परवानगी दिली . स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणल्याने समाजाचा रोष रा. गो. भांडारकरांना पत्करावा लागला. पण त्यांनी उक्ती आणि कृती यामधील एक वाक्यता स्वत: सिद्ध केली.

 पुनर्विवाह व स्त्री शिक्षणाचे ते कट्टर पुरस्कार होते. ऋग्वेद संहितेत सतीच्या चालीचा उल्लेख नाही हे अभ्यासांती त्यांनी दाखवून दिले. भारतीय धर्म व तत्वज्ञानाचे सखोल अभ्यासक म्हणून रामकृष्ण भांडारकर यांचा नामनिर्देश केला जातो. पुण्याच्या फीमेल हायस्कूलशी संबंधित होते. रामकृष्ण भांडारकर हे बालविवाहाच्या विरोधात होते.

"हिंदू धर्मशास्त्राने ऋतुप्राप्तीनंतर विवाह होण्यास विरोध न करता समितीत दिली आहे." असे रा. गो. भांडारकर यांचे म्हणणे होते.

राजकीय प्रगतीपूर्वी भारतात सामाजिक, धार्मिक व आर्थिक सुधारणा झाल्या पाहिजेत यावर रा. गो. भांडारकरांचा विश्वास होता.

डब्ल्यू. एस. केन यांच्या मद्यपान विरोधक चळवळीला पाठिंबा व सहकार्य रा. गो. भांडारकर यांनी दिले.


महत्वपूर्ण शैक्षणिक कामगिरी:

न्यायमूर्ती तेलंग या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठ कार्यकारी मंडळाच्या सभासदत्वाचा त्याग रा. गो. भांडारकरांनी केला होता. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना न्हाऊ या गुजराती शब्दाच्या उत्पत्ती बाबत दिवेतीया या विद्यार्थ्याने सुचवलेली दुरुस्ती कृतज्ञतापूर्वक भांडारकरांनी स्वीकारली हे त्यांचे खूप मोठे योगदान आहे. रामचंद्र विठोबा धामणस्कर हा ब्राह्मणेतरापैकी रा. गो. भांडारकरांचा आवडता विद्यार्थी होता.

मुंबई विद्यापीठाने 1877 मध्ये सुरू केलेल्या विल्सन भाषाशास्त्रीय व्याख्यानमालेत पहिले व्याख्यान देण्याचा मान हा रा. गो.भांडारकरांना मिळाला त्यांनी "संस्कृत व त्यापासून उत्पन्न झालेली प्राकृत भाषा" हा विषय निवडून याच्यावर अतिशय प्रभावीपणे व्याख्यान दिले.

रामकृष्ण भांडारकरांनी अनेक व्याख्याने दिली त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासंबंधीची कल्पना "दि एम्स् ॲण्ड एन्डस् ऑफ कॉलेज एज्युकेशन" या व्याख्यानातून अतिशय प्रभावीपणे शिक्षणासंबंधीचे विचार प्रगट केले.

1902 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या कर्झनने नेमलेल्या विद्यापीठ मंडळाच्या सभासदांच्या पद्धती विरोध रा. गो. भांडारकर यांनी विरोधी पत्र दिले होते.

X X

रा. गो.भांडारकर यांची ग्रंथसंपदा:

1. रा. गो.भांडारकर यांनी 1864 मध्ये संस्कृत विषयावर पहिले पुस्तक प्रकाशित केले.

2. 869 साली संस्कृत हस्तलिखितांच्या संशोधनाचा पहिला भाग प्रकाशित केला.

3. सातवाहन राजाच्या पुरानातील नामावलीच्या आधारे कालनिर्णय तयार केले.

4. "दख्खनचा प्राचीन इतिहास" हा ग्रंथ भांडारकरांनी लिहिला.

5. "प्राचीन भारतीय इतिहासात एक दृष्टिक्षेप " हा मौलिक निबंध भांडारकरांनी लिहिला.

6. प्राचीन भारतीय विद्येच्या अभ्यासासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करणारा "चिकित्सक, तुलनात्मक व ऐतिहासिक संशोधनपद्धती " हा महत्त्वपूर्ण लेख लिहिला.

7. "वेदाज इन इंडिया" "पतंजलीच्या महाभाष्यातील कृष्णाचे उल्लेख" हे लेख लिहिले.

8. "नाशिक केव इंस्क्रीप्शन" ( नाशिकच्या लेण्यातील शिलालेख) हा लेख लिहिला.



सन्मान व पुरस्कार:

1. रामकृष्ण भांडारकर हे थोर प्राच्यविद्यातज्ञ व संस्कृत पंडित होते व त्यांनी पहिल्या प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले.

2. रा. गो. भांडारकरांनी 1866 व्हिएन्ना मध्ये संपन्न झालेल्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळाला.

3. रा. गो.भांडारकर यांनी 1893 ते 95 या काळात मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून त्यांनी काम केले.

4. 1916 मध्ये रामकृष्ण भांडारकर यांनी महर्षी कर्वे यांच्या महिला विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम केले.

5. 1974 मध्ये रा. गो. भांडारकर यांना लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासदत्व मिळाले होते.

6. रा. गो. भांडारकर यांना 887 मध्ये जर्मन व अमेरिकन ओरिएंटल सोसायटीचे सभासदत्व प्राप्त झाले होते.

7. रा. गो. भांडारकर यांनी 1865 ते 70 या काळात "स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी" चे सरचिटणीस पद भूषविले.

8. दक्षिणा फेलो म्हणून साडेपाच वर्ष रा. गो. भांडारकर यांनी काम केले.

9. भांडारकर मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव कौन्सिलचे सदस्य होते तसेच ते केंद्रीय लेजिस्लेटिव सदस्य म्हणूनही त्यांचे नियुक्ती झाली होती.

10. 1911 मध्ये भांडारकर यांना सर हा किताब देऊन सरकारने त्यांचा गौरव केला होता.

11. भांडारकर यांना जर्मनीमधील गटिंगटन विद्यापीठाने त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांना पीएच.डी. हे मानाची पदवी बहाल केली होती.


निधन:

रा. गो. भांडारकर त्यांचे निधन 24 ऑगस्ट 1925 रोजी मुंबई येथे झाले.

"वशिष्ठ विश्व मित्रासारख्या पूज्य अशा पूर्वकालीन ऋषीच्या जात कुळातील भांडारकर हे एक महर्षी होते." असे उद्गागार दामोदर गणेश पाध्ये यांनी रा. गो. भांडारकर बद्दल काढले होते.

"आधुनिक काळात भारतात जन्माला आलेल्या सर्वश्रेष्ठ पंडितापैकी होते." असे उद्गार प्रा. किलहॉर्न यांनी भांडारकरणबद्दल काढले होते.


 



Post a Comment

4 Comments