Social reformers in Maharashtra-1
महाराष्ट्रातील समाजसुधारक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती-1
1. मुंबईत पहिली इंग्रजी शाळा 1824 मध्ये स्थापन झाली.
2. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना 1834 मध्ये झाली.
3. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1852 मध्ये झाली .
4. मुंबई प्रांतातील शिक्षण विभाग 1855 मध्ये सुरू झाले.
5. जगन्नाथ शंकरशेठ हे 'बॉम्बे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटी' चे संस्थापक होते.
6. जगन्नाथ शंकरशेठ 1838 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली.
7. नानांनी सन 1857 साली मुंबईत मराठी नाटकांसाठी पहिले नाट्यगृह बांधले.
8. इंग्रज सरकारने 'जस्टीस ऑफ पीस' ही पदवी देऊन नानांचा गौरव केला होता.
9. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना इ. स. 1880 साली करण्यात आली.
10. नानांनी दादाभाई नौरोजींच्या सहाय्याने मुंबईत पहिली मुलींची शाळा स्थापन केली.
11. औद्योगिक कामगार सहकार हे दादाभाई नौरोजींचे सामाजिक धोरण होते.
12. मुंबईचे पहिले महापौर सर फिरोजशहा मेहता होते.
13. सर फिरोजशहा मेहतांना 'कमांडर ऑफ इंपिरियल इंडिया' ही पदवी मिळाली.
14. सर फिरोजशहा मेहतांना 'मुंबईचा सिंह' असे संबोधले जाते.
15. बाळशास्त्री जांभेकरांना आद्य इतिहास संशोधक असे संबोधले जाते.
16. बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात.
17. मराठीतील पहिले संपादक बाळशास्त्री जांभेकर होते.
18. 'दर्पण' हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे.
19. 'दर्पण' हे वर्तमानपत्र इ. स. 1832 साली सुरू करण्यात आले.
20. बाळशास्त्री जांभेकरांनी शुन्यलब्धीवर मराठीतील पहिले पुस्तक लिहिले.
21. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेत सर्वप्रथम पाठ्यपुस्तके लिहिली.
22. श्रीपाद शेषाद्री परळीकर प्रकरणाशी बाळशास्त्री जांभेकर संबंधित होते.
23. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले.
24. मानवी धर्म समानतेची स्थापना 1844 साली झाली.
25. दादोबा पांडुरंगांनी मानवधर्म सभा स्थापन केली.
26. परमहंस मंडळी ही जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी स्थापन झालेली पहिली संस्था होय.
27. दादोबा पांडुरंगांनी परमहंस सभेची स्थापना केली.
28. मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ दादोबा पांडुरंगांनी लिहिला.
29. दादोबा पांडुरंगांनी शिक्षण प्रसारासाठी ज्ञानप्रकाश सभेची स्थापना केली.
30. दादोबा पांडुरंगांना मराठी भाषेचे पाणिनी असे संबोधले जाते.
X X
31. 'ज्ञानप्रकाश' हे मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र होय.
32. 'ज्ञानप्रकाश' वृत्तपत्राचे संपादक दा. वि. गोखले व सिताराम हरी चिपळूणकर हे होते.
33. 'ज्ञानप्रकाश' हे वृत्तपत्र पुणे येथून प्रसिद्ध होत असे.
34. ज्ञानप्रकाश सभेची स्थापना इ. स. 1848 साली करण्यात आली.
35. बाबा पद्मजींनी 'यमुना पर्यटन' ही मराठीतील पहिली कादंबरी लिहिली.
36. 'नवा करार' हे पुस्तक बाबा पद्मनजी या समाजसुधारकाने लिहिले.
37. 'अरुणोदय' हे बाबा पद्मजींचे आत्मचरित्र आहे.
38. 'प्रभाकर' हे पहिले मराठी वृत्तपत्र मुंबईतून प्रकाशित होत असे.
39. 'प्रभाकर' साप्ताहिक भाऊ महाजन चालवित होते.
40. गोपाळ हरि देशमुख हे लोकहितवादी या नावाने लिखाण करीत.
41. शतपत्रे हे लोकहितवादींचे सामाजिक हितैषी पुस्तक होते.
42. गोपाळ हरि देशमुखांनी इ. स. 1882 साली लोकहितवादी नावाचे मासिक सुरू केले.
43. गो. ह. देशमुखांनी ब्रिटिशांना ग्रामीण दारिद्र्याला दोष देणारा ग्रामरचना हा ग्रंथ लिहिला.
44. लोकहितवादींची शतपत्रे प्रभाकर साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली.
45. हिंदुस्तानासाठी पार्लमेंटची मागणी गोपाळ हरि देशमुखांनी केली होती.
46. भाऊदाजी लाड यांनी स्टुडंटस् लिटररी ॲण्ड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली.
47. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म पुणे येथे झाला.
48. महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव ज्योतिबा गोविंद फुले होते.
49. महात्मा ज्योतिबा फुलेंचे मूळचे आडनाव गोरे होते.
50. इंग्रजांचे राज्य हा दैवी संकेत वाटणाऱ्या समाजसुधारकांमध्ये महात्मा फुले हे प्रमुख होते.
51. 'गुलामगिरी' या पुस्तकाचे लेखक- महात्मा फुले
52. 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथाचे लेखक-ज्योतिबा फुले
53. महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाला.
54. 'ज्योतीने ज्योत लावा, एक निरक्षर साक्षर करा' असे महात्मा फुलेंनी म्हटले आहे.
55. महात्मा फुलेंनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा इ. स. 1852 साली काढली.
56. महात्मा फुलेंनी हरिजनांसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली.
57. महात्मा फुलेंनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली.
58. महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा ऑगस्ट 1848 मध्ये काढली.
59. ज्योतीबा फुले यांनी 24 सप्टे. 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
60. सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे झाली.
61. बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुलेंनी सुरू केले.
62. दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी महात्मा फुले संबंधित होते.
63. सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याची चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केली.
64. इ. स. 1864 साली पुण्यात पहिला पुनर्विवाह महात्मा फुलेंनी घडवून आणला.
65. महाराष्ट्रात जातीव्यवस्था नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न महात्मा फुलेंनी केला.
X X
66. शिक्षण प्रसारानंतर राष्ट्र उभारणीच्या कार्यास वेग येईल असे म. फुलेंचे ठाम मत होते.
67. दिनबंधू वृत्तपत्राचे संपादक श्री कृष्णराव भालेकर हे होते.
68. मुंबईत पहिली कापड गिरणी इ. स. 1884 साली सुरू झाली.
69. भारतातील गिरणी कामगार संघटना इ. स. 1880 साली स्थापन झाली.
70. गिरणी कामगारांची भारतातील पहिली संघटना मुंबईत स्थापन झाली.
71. गणेश वासुदेव जोशींनी सार्वजनिक सभेची स्थापना केली.
72. गणेश वासुदेव जोशींनी बासुदेव बळवंत फडक्यांचे वकीलपत्र घेण्याचे धैर्य दाखविले होते.
73. गणेश वासुदेव जोशींना 'पब्लिक काका' म्हणत आहेत.
74. पुणे येथे जाहीर सभेची स्थापना इ.स. 1870 मध्ये होते.
75. देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना गणेश बासुदेव जोशींनी केली.
76. सार्वजनिक काकांचा व्यवसाय वकिली होता.
77. सावित्रीबाई फुले हवा पहिल्या स्त्री शिक्षण प्रसारक / शिक्षिका होत्या.
78. सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिला.
79. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड (नाशिक) येथे झाला.
80. प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत झाली.
81. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये झाली.
82. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत न्यायमूर्ती रानडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
83. औद्योगिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली.
84. सामाजिक परिषदेची स्थापना 1887 मध्ये झाली.
85. सामाजिक न्यायमूर्ती गोपाळ कृष्ण गोखले यांनी न्यायमूर्ती रानडे यांना गुरुस्थानी मानत परिषदेची स्थापना केली.
86. न्यायमूर्ती रानडे 'इंदूप्रकाश' नावाचे दैनिक चालवत.
87. भारतातील गिरणी कामगारांची पहिली संघटना नारायणराव लोखंडे यांनी स्थापन केली.
88. न्यायमूर्ती रानडे यांनी " एसेज रामसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स' हा ग्रंथ लिहिता
89. 'मराठी सत्तेचा उदय' हे पुस्तक न्यायमूर्ती रानडेंनी लिहिले.
90. डॉ. आत्माराम पांडूरंग यांचा प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सहभाग होता.
91. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू एम. आर. जयकर होते.
92. विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचा जन्म पुणे येथेझाला.
93. विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचे कार्य समाज सुधारणा क्षेत्राशी निगडीत आहे.
94. ''मी मराठी भाषेचा शिवाजी आहे' असे विष्णुशास्त्री चिपळुणकर म्हणत असे.
95. विष्णुशास्त्री चिपळुणकरांनी निबंधमाला सुरू करून राष्ट्रवादी विचारांचा पाठपुरावा केला.
96. गोपाळ गणेश आगरकर यांचे टेंभू हे जन्मगाव सातारा जिल्ह्यात आहे.
97. आगरकरांनी समाजातील उणिवांवर हल्ला करण्यासाठी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले.
98. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते.
99. गोपाळ गणेश आगरकर सुधारक या वृतपत्रातून लिखाण करीत असत.
100. गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक इ. स. 1888 साली सुरू केले.
X X
101. 'गुलामांचे राष्ट्र' हा लेख गोपाळ गणेश आगरकरांनी लिहिला होता.
102. लोकमान्य टिळकांचा जन्म इ. स. 1856 साली झाला.
103. बाळ गंगाधर टिळक यांना 'लोकमान्य' नावाने संबोधले जाई.
104. लोकमान्य टिळकांना 'महाराष्ट्र केसरी' ही उपाधी दिली होती.
105. स्वदेशीचे आद्य प्रवर्तक म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखले जाते.
106. व्हॅलेंटिन चिरोल लोकमान्य टिळकांना भारतीय 'असंतोषाचे जनक' म्हणत.
107. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' ही घोषणा लोकमान्य टिळकांनी दिली.
108. 'पुढारी' असे लोकमान्य टिळकांना संबोधत असत.
109. बेहरावानी बालविवाहाला प्रभावीपणे प्रतिबंधासाठी संमतीय विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला.
110. संमती वय विधेयकास लोकमान्य टिळकांनी विरोध केला.
111. लो. टिळकांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे 1881 स्थापन केली.
112. 'मराठा' वृत्तपत्राचे पहिले संपादक लोकमान्य टिळक होते.
113. इ. स. 1920 च्या सुमारास 'केसरी' हे मराठी वृत्तपत्र गाजत होते.
114. 'ओरायन' हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला.
115. ज्ञानेश्वर, वामन पंडित व लोकमान्य टिळक हे भगवद्गीतेचा अन्वयार्थ मांडणारे तीन प्रमुख टीकाकार होता.
116. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 मध्ये झाली .
117. सार्वजनिक गणेशोत्सव सर्वप्रथम इ. स. 1884 साली सुरू करण्यात आला.
118. लोकमान्य टिळकांकडे जहाल गटाचे नेतृत्व होते.
119. नारायण श्रीपाद राजहंस यांना 'बालगंधर्व' नावाने संबोधले जाई.
120. अमरावतीचे अंबादेवी देऊळाच्या प्रवेशमुक्तीसाठी (अस्पृश्यांना) पंजाबराव देशमुखांनी सत्याग्रह केला होता.
121. नारायण श्रीपाद राजहंसांना 'बालगंधर्व' ही पदवी लोकमान्य टिळकांनी दिली होती.
122. करनदास मुळजींनी मुंबईमध्ये बुवाबाजीविरूद्ध लढा दिला.
123. शारदा सदनची स्थापना अनंतशास्त्री डोंगरेंच्या कन्येने केली.
124. शारदा, प्रीति, मुक्ती व कृपासदन पंडिता रमाबाईशी संबंधित आहे.
125. शारदा सदन ही संस्था मुंबई येथे आहे.
126. केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना पंडिता रमाबाईनी केली.
127. पुण्यातील आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाईंनी केली.
128. "THE HIGH CASTE IN HINDU WOMEN' हा ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला.
129. 'स्त्री नीति' हे पुस्तक पडिला रमाबाईनी लिहिले.
130. शूद्र व अतिशूद्रांसाठी सावित्रीबाई फुले शाळेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली.
131. ग्राम शिक्षण मंडळाची स्थापना महर्षी धोंडो केशव करबे यांनी केली.
132. निष्काम कर्ममठाची स्थापना महर्षि धोंडो केशव कर्वेनी केली.
133. समता संघाची स्थापना महर्षि धोंडो केशव कर्वेनी केली.
134. महर्षि धोंडो केशव कर्वेनी पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
135. SNDT विद्यापीठाची स्थापना 1916 मध्ये झाली.
X X
136. महर्षी कर्वेनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाची स्थापना केली.
137. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली.
138. हिंगणे वुमेन्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1907 मध्ये केली होती.
139. भारत सरकारने इ. स. 1958 साली म.घो. केशव कर्वेना 'भारतरल' हा किताब दिला.
140. महर्षि कर्वेना 'भारतरत्न' हा किताब महिला शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल दिला गेला.
141. म. धोंडो केशव कर्वे यांनी इ. स. 1883 साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली.
142. विधवा आणि त्यांच्या मुलांचे संगोपन व शिक्षणाच्या उद्देशाने विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली.
143. म. धों. केशव कर्वे यांनी उक्तीप्रमाणे कृति या न्यायाने स्वतः विधवा स्त्रीशी विवाह केला.
144. सयाजीराव गायकवाडांना पुरोगामी राजा असे संबोधले जाते.
145. बडोदा संस्थान हे प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य होते.
146. गोपाळ कृष्ण गोखले यांनी मवाळवादी तत्वांचा पुरस्कार केला.
147. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू होते.
148. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली.
149. राजकारणाच्या अध्यात्मिकरणाचा विचार गोपाळ कृष्ण गोखलेंनी मांडला.
150. गोपाळ कृष्ण गोखल्यांनी 'हितवाद' हे दैनिक सुरू केले होते.
151. भारत सेवक समाजाची स्थापना इ. स. 1905 साली करण्यात आली.
152. गोपाळ कृष्ण गोखले सुधारक वर्तमानपत्रात इंग्रजी लिखाण करीत होते.
153. काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोपाळ कृष्ण गोखले होते.
154. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकात जमखिंडी येथे झाला.
155. महर्षि विठ्ठल रामजी शिंदेंनी ॲमस्टरडॅम येथे 'हिंदुस्थानातील उदार धर्म' हा प्रबंध वाचला.
156. राष्ट्रीय मराठा संघ विठ्ठल रामजी शिंदेंनी स्थापन केला.
157. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे लेखक विठ्ठल रामजी शिंदे आहेत.
158. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर, 1906 रोजी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना मुंबई येथे केली.
159. महर्षि विठ्ठल रामजी शिंदेंनी पुरी येथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.
160. 'सेवाग्राम आश्रमाची' स्थापना महात्मा गांधींनी केली.
161. ''हरिजन' हे मुखपत्र महात्मा गांधींनी चालविले होते.
162. 'यंग इंडिया' हे वर्तमानपत्र महात्मा गांधींनी सुरू केले.
www.insearchofknowledge.org
View, Comments and share.....
X X
2 Comments
Nice 👍
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete