Social reformer in Maharashtra-2
महाराष्ट्रातील समाजसुधारक -स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती-2
1. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जुलै १८७४ रोजी कागल येथे झाला.
2. वी.रा.शिंदे राजर्षी शाहू महाराजांना "सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष" असे म्हणत असत.
3. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांनी बडोद्याच्या गायकवाडांचे सहकार्य मागितले होते.
4. वेदोक्त प्रकरणाशी राजर्षि शाहू महाराज संबंधित होते.
5. कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा इ. स. 1911 साली स्थापन झाली.
6. कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा राजर्षि शाहू महाराजांनी स्थापन केली.
7. कोल्हापूरचे राधानगरी धरण राजर्षि शाहू महाराजांनी बांधले.
8. छत्रपती मेळावा किंवा छत्रपती सेवा प्रतिष्ठान राजर्षि शाहू महाराजांनी स्थापन केले.
9. महाराष्ट्रात छात्र जगद्गुरू पीठ स्थापून शाहू महाराजांनी सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला.
10. विविध जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे राजर्षि शाहू महाराजांनी काढली.
11. शाहू मिलची स्थापना इ. स. 1906 साली झाली.
12. कोल्हापूरला शाहू मिलची स्थापना राजर्षि शाहू महाराजांनी केली.
13. जातीसंस्थेवर आघात करून राजर्षि शाहू महाराजांनी दलितांच्या विकासाचे कार्य केले.
14. अभिनव भारत ही संघटना मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात कार्यरत होती.
15. अभिनव भारत ही संघटना नाशिक येथे स्थापन झाली.
16. अभिनव भारत ही संघटना स्वा. वि. दा. सावरकरांनी स्थापन केली.
17. जोसेफ मॅझिनीस स्वा. वि. दा. सावरकर गुरू मानत होते.
18. स्वा. वि. दा. सावरकरांनी 'जयो स्तुते श्री महन्मंगले' ह्या गीताची रचना केली.
19. स्वा. वि. दा. सावरकरांनी रत्नागिरीचे पतितपावन मंदिर बांधले.
20. 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो।' ही कविता वि. दा. सावरकरांची आहे.
21. ‘पन्नास वर्षे ! ब्रिटिश राज्य तोबर टिकेल तर ना ?" असे उद्गार स्वा. सावरकरांनी काढले.
22. रामोशांच्या बंडाचे नेतृत्व वासुदेव बळवंत फडके यांनी केले होते.
23. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतीकारक असे म्हटले जाते.
24. रैंड हा जुलमी इंग्रज अधिकारी पुण्याचा प्लेग कमिशनर होता.
25. रैंड या उन्मत अधिकाऱ्याचा खून चाफेकर बंधुंनी केला.
X X
26. चाफेकर बंधुंनी रैंड साहेबांबरोबरच लेफ्टनंट आयर्स्टचा खून केला.
27. सोलापूरात हॉटसन यांच्यावर वासुदेव गोगटेंनी गोळ्या झाडल्या होत्या.
28. नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात अनंत कान्हेरेंनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला.
29. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापटांनी केले.
30. अरविंद घोषांच्या डिव्हाईन लाईफचा मराठी अनुवाद सेनापती बापटांनी केला.
31. कुंभोज (कोल्हापूर) हे भाऊराव पाटलांचे जन्मस्थळ आहे.
32. भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ असे संबोधले जाते.
33. भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
34. 'कमवा व शिका' ह्या योजनेचे जनक-भाऊराव पाटील
35. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय सातारा येथे आहे.
36. प्रत्येक खेड्याला शाळा व प्रत्येक शाळेला प्रशिक्षित शिक्षक ध्येयवादाने भाऊराव पाटील प्रेरित झाले होते.
37. रयत शिक्षण संस्थेचे चिन्ह वटवृक्ष आहे.
38. दुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना इ. स. 1910 साली करण्यात आली.
39. दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना भाऊराव पाटलांनी केली.
40. दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना इ.स. 1911 साली करण्यात आली.
41. साताऱ्याच्या छत्रपती शाहू बोर्डिंग ची स्थापना भाऊराव पाटलांनी केली.
42. कर्मवीर भाऊराव पाटीलांची पुण्यतिथी 9 मे रोजी साजरी करतात.
43. विनोबा भावेंचे जन्मगाव पेणजवळील गागोदे हे रायगड जिल्हयात आहे.
44. पवनार येथील परमधाम आश्रम वर्धा जिल्हयात आहे.
45. गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका विनोबा भावेंनी लिहिली.
46. भारतातील भूदान चळवळीचे जनक -विनोबा भावे
47. ग्रामदान व श्रमदान यांच्याशी विनोवा भावे संबंधित होते.
48. भूमी गोपाल की' असे विनोवा भावेंनी म्हटले आहे.
49. विनोबांची भूदान चळवळ प्रथम आंध्रप्रदेशात सुरू झाली.
50. 'महाराष्ट्र धर्म' हे मासिक विनोबा भावेंनी सुरू केले.
X X
51. विनोबा भावेंनी प्रायोप्रवेशन करून प्राणार्पण केले.
52. डॉ. आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला.
53. भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. आंबेडकर होते.
54. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. आंबेडकरांकडे होते.
55. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉ. आंबेडकरांनी केली.
56. अस्पृश्यतेचे समर्थन या कारणास्तव डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती.
57. कास्ट फेडरेशनची स्थापना डॉ. आंबेडकरांनी केली.
58. डॉ. आंबेडकरांनी महाडचा चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च, 1927 रोजी केला.
59. इ.स. 1927 साली 'बहिष्कृत भारत' हे नियतकालीक डॉ. आंबेडकरांनी सुरू केले होते.
60. मानुस्मृतीस अस्पृश्यांच्या गुलामगिरीची सनद मानून 25 डिसेंबर 1920 रोजी दहन केले.
61. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह 2 मार्च 1930 रोजी झाला.
62. मंदिर प्रवेशाचे नेतृत्व डॉ. आंबेडकरांनी केले होते.
63. ''पाक्षिक डॉ. आंबेडकरांनी 'वेअर व शुद्राज ?' व 'बुद्ध ॲण्ड हिज धम्म' हे ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी लिहिले.
64. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉ. आंबेडकरांनी केली.
65. रिडल्स इन हिंदुईजम ह्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
66. इतिहासप्रसिद्ध पुणे करार इ. स. 1932 साली झाला.
67. 'द अनटचेबल्स' हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी लिहिला.
68. औरंगाबादचे मिलिंद कॉलेज डॉ. आंबेडकरांनी स्थापन केले.
69. मुंबईचे सिद्धार्थ कॉलेज डॉ. आंबेडकरांनी स्थापन केले.
70. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.
71. डॉ. आंबेडकरांनी 14 ऑक्टो. 1956 रोजी हजारो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला.
72. डॉ. आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडांनी परकीय शिक्षणासाठी मदत केली.
73. डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी इ. स. 1950 मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना केली.
74. अमरावतीजवळील तपोवन येथे कुष्ठनिवासाची स्थापना डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी केली.
75. आळंदीजवळ डुडुळगाव येथे कुष्ठ रोग्यांसाठी आनंदग्राम इंदूताई पटवर्धनांनी स्थापन केले.
X X
76. डॉ. इंदूताई पटवर्धन ह्या कुष्ठरोग निर्मूलन कार्याशी संबंधित आहेत.
77. विदर्भात शिक्षणप्रसार करणारे प्रमुख प्रसारक-डॉ. पंजाबराव देशमुख
78. 'महाराष्ट्र केसरी' या वृत्तपत्राशी संबंधित व्यक्ति- डॉ. पंजाबराव देशमुख
79. भारत कृषक समाजाची स्थापना डॉ. पंजाबराव देशमुखांनी केली.
80. पंजाबराव देशमुखांनी अमरावती येथे श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले.
81. अखिल भारतीय मागास जाती संघाची स्थापना डॉ. पंजाबराव देशमुखांनी केली.
82. नाना पाटलांनी प्रतिसरकारची (पत्री सरकारची) स्थापना केली.
83. माधवराव बागलांना महाराष्ट्र शासनाने दलितमित्र ही पदवी दिली.
84. र. धों. कर्वेनी संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला.
85. र. धों. कर्वे लैंगिक शिक्षणाशी संबंधित होते.
86. काळकर्ते म्हणून शिवरामपंत परांजपे यांना संबोधले जाते.
87. रघुनाथ परांजपेंना रँग्लर परांजपे म्हणतात.
88. निझामाच्या हैद्राबाद राज्यातून मराठवाडा महाराष्ट्रात रामानंद तीर्थानी आणला.
89. दिनकर शंकर जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित आहेत.
90. म्हैसाळ प्रकल्प सांगली जिल्हयात आहे.
91. आदिवासी कल्याणाशी अनुताई वाघ संबंधित आहे.
92. कोसबाडच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याशी अनुताई वाघ संबंधित होत्या.
93. बाबा आमटे समाजसेवा क्षेत्राशी संबंधित आहे.
94. बाबा आमटे हे विदर्भातील आनंदवन संकल्पनेचे प्रवर्तक आहेत.
95. महारोगी सेवा समितीची स्थापना बाबा आमटेंनी केली.
96. भारत जोडो आंदोलनाशी बाबा आमटे संबंधित आहे.
97. तपोवन ही कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारी संस्था अमरावती येथे आहे.
98. महाराष्ट्रात कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाबाबत बाबा आमटेंचे कार्य मोलाचे आहे.
99. एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे नेतृत्व बाबा आढावांनी केले.
100. बाबा आढावांनी कष्टाची भाकर केंद्रे सुरू केली.
X X
101. 'शेटजी, भटजी व त्यांचे आधुनिक दास' हे पुस्तक बाबा आढावांनी लिहिले.
102. पुण्यातील हमाल पंचायतीची स्थापना बाबा आढावांनी केली.
103. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे जनक-श्री विखे पाटील
104. 'उपेक्षितांचे अंतरंग' ह्या ग्रंथाचे लेखक - श्री. म. माटे
105. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसमयी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर होते.
106. मुंबई राज्याच्या विधानसभेचे पहिले सभापती ग. वा. मावळणकर होते.
107. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
108. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉ. होमी भाभा
109. 'रिडल्स इन रामायण' हा ग्रंथ चिंतामणी वैद्य यांनी लिहिला आहे.
110. प्रभात कंपनीचा पहिला चित्रपट- अयोध्येचा राजा
111. 'माणूस जेव्हा जागा होतो' या पुस्तकाचे लेखक-गोदावरी परूळेकर
112. आत्मकथनातून सामाजिक व्यथा मांडण्याची प्रथा दया पवारांनी सुरू केली.
113. दया पवारांनी 'बलुतं' हे पुस्तक लिहिले.
114. मंद बुद्धीच्या मुलांसाठी शाळा कमलालाई होस्पेटांनी सुरू केली.
115. मातृसेवा संघाची स्थापना कमलाताई होस्पेटांनी केली.
116. वृद्ध सेवाश्रमाची स्थापना कमलाताई होस्पेटांनी केली.
117. इ.स. 1922 साली मिल सेवा मंडळाची स्थापना ठक्कर बाप्पांनी केली.
118. ठक्करबाप्पा यांनी आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
119. सुबोध पत्रिकेचे संपादक डी. जी. वैद्य होते.
120. मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना हमीद दलवाईंनी केली.
121. रत्नाप्पा कुंभारांना पुणे विद्यापीठाने डी लीट्. ही पदवी दिली.
122. मराठी काव्याच्या नव्या युगाचे प्रवर्तक-केशवसुत
123. केशवसुतांनी धार्मिक रूढी नष्ट करून समता व बंधुत्वासाठी संघर्षाची तुतारी फुंकली .
124. 'जालीयनवाला बाग' ही केशवसुतांची कविता एकेकाळी अत्यंत गाजली होती.
125. 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' ही लोकप्रिय कविता कुसुमाग्रजांनी लिहिली.
126. कालिदास सन्मान प्राप्त झालेला मराठी साहित्यिक पु. ल. देशपांड
127. ज्ञानपीठ पारितोषिकाचा बहुमान मिळविणारा दुसरा मराठी साहित्यिक-वि. वा. शिरवाडकर
128. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृशांना खुले व्हावे यासाठी साने गुरूजींनी सत्याग्रह केला.
129.'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ अहमदनगर जेलमध्ये लिहिला गेला.
View, Comments and share......
4 Comments
Nice 👍
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice information sirji 👌
ReplyDeleteNice information sir
ReplyDelete👍