Modern History of India -10
आधुनिक भारताचा इतिहास-10
Highlights of Modern India
आधुनिक भारतातील ठळक बाबी
1. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना फिरोजशहा मेहता यांनी केली.
2. लो. टिळक, लाला लजपतराय व बिपिनचंद्र पाल हे कॉंग्रेसमधील जहाल गटाचे नेते होते.
3. फिरोजशहा मेहता व गोपाळ कृष्ण गोखले हे काँग्रेसमधील मवाळ गटाचे नेते होते.
4. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशी प्रचारिणी सभा स्थापन केली.
5. विरेंद्रघोष व पुनित विहारीदास यांनी अनुशीलन समितीची स्थापना केली.
6. चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे होते.
7. महात्मा गांधींनी इ. स. 1918 साली खेडा येथे साराबंदी चळवळ केली.
8. मायकेल ओडवायर जालियनवाला बाग हत्त्याकांडाच्या वेळी पंजाबचा गव्हर्नर होता.
9. जालियनवाला बाग हत्त्याकांडाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड चेम्सफोर्ड होता.
10. रविंद्रनाथ टागोरांनी जालियनवाला बाग हत्त्याकांडानिषेधार्थ सर पदवीचा त्याग केला.
11. उधमसिंगांनी ओडवायरचा खून करून जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा बदला घेतला.
12. महात्मा गांधींनी जालियनवाला बाग हत्त्याकांडानिषेधार्थ 'कैसर-इ-हिंद' पदवी परत केली.
13. 'यंग इंडिया' व 'हरिजन' ही वृत्तपत्रे महात्मा गांधींनी सुरु केली होती.
14. जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. लुटला.
15. अरुणा असफ अली यांनी चले जाव आंदोलनात भूमिगत राहून नेतृत्व केले.
16. सरदार पटेल यांनी भारतीय सैन्य पाठवून हैद्राबाद संस्थान भारतात विलिन केले.
17. पंडित नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र नीतिचे शिल्पकार मानले जाते.
18. पुणे जिल्ह्यातील विष्णु गणेश पिंगळे हे गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते.
19. सचिंद्रनाथ संन्याल हे रिव्होल्युशनरी वृत्तपत्र चालवित होते.
20. अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा खून केला.
21. मोतीलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताच्या घटनेसाठी गोलमेज परिषदेची मागणी केली होती.
22. देशबंधु चित्तरंजन दास यांच्या निधनानंतर स्वराज्य पक्षात फूट पडली.
23. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रयत्नाने देशात कम्युनिस्ट गट उभा राहिला.
24. चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी स्टेशनजवळ रेल्वेतील सरकारी खजिना लुटला.
25. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक हवा पुरोगामी पक्षाची स्थापना केली.
26. नाना पाटील यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली.
27. सेनापती बापट यांनी इ. स. 1924 साली मुळशी सत्याग्रह केला.
28. कॅ. लक्ष्मीनाथन यांच्याकडे आझाद हिंद सेनेच्या झाशी राणी फलटणीचे नेतृत्व होते.
29. जमशेटजी टाटा यांना भारताचे आद्य उद्योजक म्हणतात.
30. इ.स. 1950 च्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते.
31. लाल बहादूर शास्त्रींनी ताश्कंद येथे पाकिस्तानशी ताश्कंद करार केला.
32. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या प्रेरणेने भारतातील पोर्तुगीज सत्तेविरूद्ध चळवळ झाली.
X X
33. भारत व पाकिस्तान यांचे विभाजन इ. स. 1947 साली झाले.
34. ब्रिटिशांच्या 'फोडा व झोडा' या राजनितीतून निघालेला जातीयवाद महात्मा गांधींना मान्य नव्हता.
35. आर्य समाजाची स्थापना इ. स. 1875 साली झाली.
36. 'सुधारक' हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकरांनी काढले.
37. जनरल डायर हा इंग्रज अधिकारी जालियनवाला बाग हत्त्याकांडास जबाबदार होता.
38. दांडीयात्रा महात्मा गांधींनी काढली होती.
39. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते होते.
40. स्थानिक स्वराज्याचा कायदा लॉर्ड रिपनने केला.
41. हिंदुस्थानातील पहिली कामगार संघटना नरे, लोखंडे व केळकर यांनी काढली.
42. रस्कीन यांच्या 'अन टु द लास्ट' या पुस्तकाचा गांधीजींवर विलक्षण परिणाम झाला,
43. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यु 18 जून 1859 रोजी झाला.
44. स्वातंत्र्य मिळावे म्हणून लो. टिळकांनी होमरूल चळवळ करण्याचे ठरविले.
45. शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेत विवेकानंद यांच्या भाषणाने सर्व प्रभावित झाले.
46. कालिकतचा हिंदू राजा झामोरीनने बास्को-द-गामास व्यापारी सवलती दिल्या.
47. ब्रिटीशपूर्व काळातील ग्रामसंस्था हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होता.
48. स्वामी विवेकानंदांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना केली.
49. 'भारत छोडो' ही घोषणा महात्मा गांधींनी दिली.
50. रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापन केला.
51. शक्तीस्थळ हे शांतीवनातील इंदिरा गांधींच्या समाधीचे नाव आहे.
52. सर एडवर्ड ल्युटेन्स यांनी दिल्लीची रचना केली.
53. पंडित नेहरूंनी देशाच्या प्रगतीसाठी औद्योगीकरणाचा मार्ग अवलंबिला.
54. हुंडाविरोधी चळवळीची भुहूर्तमेढ राजा राममोहन रॉय यांनी रोवली.
55. स्त्री शिक्षणासाठी विविध शैक्षणिक संस्थांची निर्मिती महर्षि कर्वे यांनी केली.
56. राष्ट्रीय सभेची स्थापना इ. स. 1885 साली झाली.
57. स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना इ. स. 1882 साली झाली.
58. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसाचे शिष्य होत.
59. महर्षि कर्वे यांनी भाऊबीज निधी गोळा केला.
60. प्लासी लढाईमुळे भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.
X X
61. इ. स. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धास डलहौसी हा गव्हर्नर जनरल कारणीभूत झाला.
62. डी. अलमेडा हा पोर्तुगीजांचा हिंदुस्थानातील पहिला गव्हर्नर होता.
63. ब्रिटिशांच्यापूर्वी भारतीय खेडी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती.
64. खेड्यांमधले विविध कारागीर गावचे बलुतेदार म्हणून ओळखले जात.
65. जयप्रकाश नारायणांनी 'आझाद दस्ता' ही संघटना स्थापन केली.
66. भारतात इंग्रजी भाषा व युरोपियन शास्त्रे शिकविण्याच्या महत्त्वावर लॉर्ड बेंटिकने भर दिला.
67. पंडित नेहरूंना स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून संबोधण्यात येते.
68. "विठोबाला स्मरून स्वदेशीची शपथ घ्या.' हे उद्गार लोकमान्यांनी काढले.
69. 'हिंदुस्थानातील भावी क्रांतीची ही बीजे आहेत.' हे उद्गार लेनिनने काढले.
70. 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा।' हे उद्गार नेताजींनी काढले.
71. 'आज नवा तारा उदयास आला.' हे उद्गार पंडित नेहरूंनी काढले.
72. 'हा पहा कायदेभंग !' हे उद्गार सरोजिनी नायडूंनी काढले.
73. 'मी इंग्रजांचा नोकर नाही त्यामुळे मी बंडखोर ठरू शकत नाही.' हे उद्गार तात्या टोपे यांनी काढले.
74. गो. ग. आगरकरांनी 'सुधारक' नावाचे साप्ताहिक काढले.
75. एकामागून एक देशी संस्थाने लॉर्ड डलहौसीने खालसा केली.
76. इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला.
77. होमरुल चळवळ ही टिळक युगातील अत्यंत महत्वाची चळवळ होती.
78. कर्झनने लोकमत हाणून पाडण्यासाठी दडपशाही प्रकारचे कायदे केले.
79. गोलमेज परिषदांचे निर्णय म्हणून 'शुभ्र पत्रिका' प्रसिद्ध होत.
80. अली बंधुली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली खिलाफत आंदोलन सुरू केले.
81. विल्यम बेटिंकने सतीबंदीचा कायदा संमत केला.
82. विल्यम बेटिंक हा उदारमतवादी प्रकारचा गव्हर्नर जनरल होता.
83. चले जाव चळवळीमुळे सारा भारत देश पेटून उठला होता.
84. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्याचे पुनरुज्जीवन केले.
85. विधवा विवाहाचा कायदा इ. स. 1856 साली पास झाला.
86. इंग्लंडच्या राणीचे राज्य भारतात इ. स. 1858 सालापासून सुरू झाले.
87. इ. स. 1909 साली सुधारणांचा एक हप्ता हिंदी जनतेस बहाल केला गेला.
88. आधुनिक भारताच्या इतिहास इ. स. 1920 साली कलाटणी मिळाली.
89. माँटेग्यू चेल्मस्फोर्ड सुधारणा म्हणजे केवळ राखीव व सोपीव खात्यांच्या सुधारणा होत.
X X
90. सारामुक्त जमिनी सरकारी मालकीच्या करण्याचे विल्यम बेंटिकचे धोरण वतनदार, इनामदारांना भोवले.
91. 'असे महापुरूष मरत नसतात, त्यांच्या कार्यानि ते अमर झालेले असतात.' हे उद्गार महात्मा गांधींनी काढले.
92. 'मी भाकरी मागायला आलो आणि माझ्या पदरात दगड टाकण्यात आला.' हे उद्गार म. गांधींनी काढले.
93. 'ज्या सूर्यानि आपल्याला प्रकाश आणि उष्णता दिली तो आता मावळला आहे, आपण अंधारात चाचपडत आहोत.' हे उद्गार पंडित नेहरूंनी काढले.
94. भारताच्या इतिहासात 10 मे, 1857 रोजी पहिले स्वातंत्र्य समर ही घटना घडली.
95. भारत छोडो आंदोलनाची घोषणा मुंबई येथे करण्यात आली.
96. भारतावर लडाख आणि नेफा क्षेत्रात 20 ऑक्टोबर, 1962 रोजी चीनने अक्रमण केले.
97. 'Glimpses of India' हे पुस्तक हुमायून कबीरने लिहिले.
98. स्वराज्य मिळविणे हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मुख्य वेष आहे, असे दादाभाई नौरोज अध्यक्षीय भाषणात प्रथम सांगितले.
99. अण्णासाहेब कर्वेच्या सामाजिक कार्याबद्दल डॉ. राजेंद्र प्रसाद सरल व पद्मभूषण हा बहुमान देऊन त्यांचा सन्मान केला .
100. जनतेच्या गरजा जाणून घेऊन त्या सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी सार्वजनिक सभा पुण्यात स्थापन करण्यात आली होती.
101. राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे, 1772 रोजी बंगालमधील राधानगर येथे सनातनी ब्राह्मण कुटुंबात झाला.
102. मूर्तिपूजा आर्य समाजास मान्य नव्हती.
103. महात्मा गांधींना भारताचे 'राष्ट्रपिता' असे म्हणतात.
104. दादाभाई नौरोजींना भारतीय 'अर्थशास्त्राचा जनक' असे संबोधले जाते.
105. 'मी ही सतीची दृष्ट चाल बंद करीन.' हे उद्गार राजा राममोहन रॉय यांनी काढले.
106. गो बॅक गांधी ( गांधी परत जा ) हे उद्गागार आफ्रिकेतील गोऱ्या निदर्शकांनी काढले.
View, Comments and share.........
1 Comments
👍👍
ReplyDelete