Modern History of India -3
आधुनिक भारताचा इतिहास -3
युरोपीयनांचे भारतात आगमन व ब्रिटिश साम्राज्याची स्थापना
1. वास्को-द-गामा पोर्तुगालमधील होता.
2. वास्को-द-गामाने इ. स. 1498 साली भारताकडे येण्याचा नवीन जलमार्ग शोधून काढला.
3. वास्को-द-गामा भारतात कालीकत येथे उतरला.
4. कालीकतच्या झामोरीन राजाने कालीकत येथे वास्को-द-गामाचे स्वागत केले.
5. पोर्तुगाल या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले.
6. भारतात सर्वप्रथम पोर्तुगीज या युरोपीयनांची सत्ता स्थापन झाली.
7. फ्रांसिस्को-डी- अलमेडा हा भारतातील पोर्तुगीजांच्या वसाहतीचा पहिला व्हॉईसरॉय होता.
8. इंग्लंडचा राजा चार्लस् दुसरा यास पोर्तुगीजांकडून मुंबई बेट आंदण मिळाले.
9. यूनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना हॉलंडमध्ये झाली.
10. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इ. स. 1600 साली झाली.
11. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राणी एलीझाबेथच्या प्रेरणेने इंग्लंडमध्ये स्थापन झाली.
12. थॉमस स्टीव्हन्सन या इंग्रजाने भारतात सर्वप्रथम पाऊल ठेवले.
13. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली वखार सुरत येथे स्थापन झाली.
14. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची इ. स. 1664 साली फ्रान्समध्ये स्थापना झाली.
15. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी प्रामुख्याने फ्रान्सच्या सरकारवर अवलंबून होती.
16. ब्रिटिशांना भारतात पाय रोवताना फ्रेंचांकडून अत्यंत कडवा प्रतिकार झाला.
17. स्विडिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना स्विडनमध्ये झाली.
18. बंगालचा नवाब अलिवर्दीखानने इंग्रज, फ्रेंच व डचांच्या बखारींना आश्रय दिला होता.
19. अलिवर्दीखानच्या मृत्युनंतर इ. स. 1756 साली सिराजउद्दौला बंगालचा नबाव झाला.
20. बंगालचा नवाब सिराजउद्दौला हा अलिवर्दीखानचा नातू होता.
21. बादशहा फरूखसियार यांच्याकडून परवाना मिळाल्याने इंग्रजांनी बंगालमध्ये मन मानेल तसा व्यापार सुरू केला आणि बंगालमध्ये वर्चस्व वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले या कारणामुळे सिराजउद्दौला ब इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला.
22. रॉबर्ट क्लाईव्हने सिराजउद्दौला विरूद्ध रचलेल्या कटात मीरजाफर, जगतशेठ व रायदुर्लभ सामील होते.
23. आपला कट उघड करू नये म्हणून क्लाईव्हने जगतशेठ या लोभी व्यापाऱ्यास खोटे करारपत्र तयार करून मुर्ख बनविले.
24. कंपनीची मालमत्ता चोरणाऱ्यांसाठी इंग्रज वापरत असलेल्या तुरूंगास ब्लॅक होल किंबा अंधार कोठडी संबोधले जात असे.
25. अंधार कोठडीची दुर्घटना (ब्लॅक होल ट्रॅजेडी) कलकत्ता येथे जून, 1756 साली घडली.
26. सिराजउद्दौलाने कलकत्त्यावरील हल्ल्यात हाती आलेल्या इंग्रजांना एका छोट्या कोठडीत 123 कैदी डांबून ठेवले.
27. ब्लॅक होल ट्रॅजेडीतील अंधारकोठडीत डांबलेले 30 लोक प्राणवायू अभावी मरण पावले.
28. कलकत्याचा इंग्रज गव्हर्नर ड्रेक सिराजउद्दौलाकडून पराभूत होऊन अंधारकोठडीची दुर्घटना घटण्यापूर्वी पळून गेला.
29. प्लासीची लढाई 17 जून, 1757 साली झाली.
30. प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव झाला.
31. लॉर्ड क्लाईव्हने प्लासीचे युद्ध जिंकून भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला.
32. भारतात खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्ता इ. स. 1757 साली सुरू झाली.
33. प्लासीच्या लढाईमुळे कंपनीस आठ लाख पौंड इतकी रक्कम मिळाली.
34. रॉबर्ट क्लाईव्हला भारतातील ब्रिटीश सत्तेचा संस्थापक म्हणतात.
35. रॉबर्ट क्लाईव्हने व्यापारी कंपनीचे रूपांतर एका राजकीय सत्तेत केले.
36. रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्यपद्धती इ. स. 1764 साली प्रस्थापित केली.
37. दुहेरी राज्यव्यवस्थेचा मुख्य हेतु बंगालमध्ये अद्यापि नवाबाचीच सत्ता कायम आहे असे भास होता.
38. डेरामुळे बंगाली जनतेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होऊ लागली.
X X
39. रॉबर्ट क्लाईव्हने स्वतःवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने २ नोव्हेंबर 1774 रोजी आत्महत्या केली.
40. रॉबर्ट क्लाईव्ह इंग्लंडला परत गेल्यावर त्याच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली.
41. रॉबर्ट क्लाईड विरुद्ध 10 मे 1773 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ठराव आणला गेला.
42. रॉबर्ट क्लाईव्हने आत्महत्त्या केली त्यावेळी त्याचे वय फक्त 49 वर्षे इतके होते.
43. सरदार पण्णीकरांच्या मते रॉबर्ट क्लाईव्हने भारतात दरोडेखोरांचे राज्य निर्माण केले.
44. मीर कासीमने कंपनी नोकरांच्या खाजगी व्यापारास प्रतिशह म्हणून एतद्देशीय व्यापाऱ्यांनाही करमुक्त व्यापाराचा परवाना दिला होता.
45. मीर कासीमने मुर्शीदाबादहून आपली राजधानी मोंगीरला हलविली.
46. ब्रिटिश व फ्रेंचांत इ. स. 1760 साली बांदीवॉशचे युद्ध झाले.
47. फ्रेंचांची भारतातील सत्तेकरिता ब्रिटिशांशी सुरू असलेली सत्ता स्पर्धा बांदीवॉशच्या युद्धानिशी संपुष्टात आली.
48. रक्ताचा थेंब न सांडता इंग्रजांनी नको असलेल्या मीर जाफरला पदच्युत केले व इंग्रजांच्या मताने राज्यकारभार करण्याचे वचन दिलेल्या मीर कासीमला त्यांनी बंगालच्या नबाब पदावर बसविले 20 ऑक्टोबर 1760 रोजी घडलेली ही घटना बंगालची रक्तहीन क्रांती ह्या नावाने ओळखली जाते.
49. प्रसिध्द बक्सार लढाई 22 ऑक्टोबर 1764 रोजी झाली.
50. बक्सारच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व मेजर मुन्रोने केले होते.
51. बक्सारच्या लढाईत मीर कासिम व शुजा उद्दौलाचा पराभव झाला.
52. बक्सारच्या लढाईत मोगल बादशहा शहा आलम इंग्रजांना शरण गेला.
53. बक्सारच्या लढाईनंतर उत्तर भारतात इंग्रजांना आव्हान देऊ शकणारी सत्ता उरली नाही.
54. बक्सारच्या लढाई नंतर इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले गेले.
55. अलाहाबादच्या तहात युद्धखर्च म्हणून शुजा उद्यौलाने इंग्रजांस 50 लाख रूपये द्यावेत असे ठरले व ओरिसा या प्रांताची दिवाणी द्यावयाचे ठरले.
56. अलाहाबादच्या तहात कुन्हा आणि अलाहाबाद जिल्हे उर्वरित अयोध्या प्रांतावरील नवाबाचा हक्क मान्य करण्यात आला.
57. शाह आलम तर्फे ईस्ट इंडिया कंपनीला बिहार, बंगाल व ओरिसा प्रांताची दिवाणी देण्यात आली.
58. ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार व ओरिसाची दिवाणी इ. स. 1765 साली मिळाली.
59. रेग्युलेटिंग ॲक्ट अन्वये बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला.
60. कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटींग ॲक्ट संमत करण्यात आला .
61. 1703 च्या रेग्युलेटिंग ॲक्ट किंवा नियामक कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर दर्जा मिळाला बॉरन हेस्टिंग्ज भारताचा पहिला गव्हर्नर जनरल .
62. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कलकत्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
63. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश पार्लमेंटचे अंशतः नियंत्रण निर्माण झाले.
64. वॉरन हेस्टिंग्जने इ. स. 1772 साली बंगालमधील दुहेरी राज्यपद्धती बंद केली.
65. मीर कासीमचा इ. स. 1777 साली दुर्दैवी अंत झाला.
66. वॉरन हेस्टिंग्जच्या काळात चार्लस विल्कीन्सने भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले.
67. भारतातील पहिले वृत्तपत्र 'दि बेंगॉल गॅझेट' वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिर्दीत सुरू झाले.
68. 9 ऑगस्ट 1784 रोजी पिटस् इंडिया ॲक्ट हा कायदा पास झाला. पॉरन हेस्टिंग्जला भारतातील राज्यकारभाराचा आणि शासनव्यवस्थेचा संस्थापक म्हणतात.
69. सालबाईचा तह 17 मे 1782 रोजी झाला.
70. सालबाईच्या तहाच्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज होता.
71. मध्ये वॉरन हेस्टिंग्जच्या अन्यायी कारवायांमुळे त्याच्यावर खटला भरला गेला.
72. वॉरन हेस्टिंग्जला इंग्लंडच्या पार्लमेंटपुढे आरोपी म्हणून उभे रहावे लागले.
73. विल्यम जोन्सने शैक्षणिक सुधारणांसाठी बंगाल एशियाटीक सोसायटीची स्थापना केली.
74. एशियाटीक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना इ. स. 1783 साली कलकत्ता येथे झाली.
75. वॉरन हेस्टिंग्जच्या काळात एशियाटीक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना झाली.
76. एशियाटीक सोसायटी ऑफ बंगालचे अध्यक्ष सर विल्यम जोन्स होते.
77. ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले सरन्यायाधीश सर विल्यम जोन्स होते.
78. सर विल्यम जोन्स कलकत्ता हायकोर्टाचे न्यायाधीश होते.
79. भारतात पहिले सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे स्थापन झाले.
80. लॉर्ड कॉर्नवालीसने बंगालमध्ये कायमधारा पद्धती सुरू केली.
X X
81. भारतात कायमधारा पद्धती सुरू करतेवेळी विल्यम पीटर हा ब्रिटीश पंतप्रधान होता.
82. कायमधारा पद्धती ही लॉर्ड कॉर्नवालीसने केलेली सर्वात महत्वाची सुधारणा होती.
83. ब्रिटिश राजवटीमध्ये कायमधारा पद्धतीद्वारे जमीनदारांना जमिनीची कायमची मालकी देण्यात आली.
84. लॉर्ड कॉर्नवालीसने भारतात नोकरशाहीची स्थापना केली.
85. लॉर्ड कॉर्नवालीसच्या कारकिर्दीत तिसरे म्हैसूर युद्ध झाले.
86. लॉर्ड कॉर्नवालीसने जमीनदारी पद्धती लागू केली.
87. हैदर अली 7 डिसेंबर, 1782 रोजी मरण पावला.
88. टिपू सुलतान हा हैदर अलीचा मुलगा होता.
89. टिपू सुलतान मैसूर प्रांताचा राजा होता.
90. टिपू सुलतानच्या काळात म्हैसूरची राजधानी श्रीरंगपट्टणम्ला होती.
91. श्रीरंगपट्टणचा तह मार्च 1792 मध्ये झाला.
92. टिपू सुलतान व लॉर्ड कॉर्नवालीसमध्ये श्रीरंगपट्टणचा तह मार्च 1792 मध्ये झाला होता.
93. टिपू सुलतान पास हैसूरचा वाघ असे संबोधले जाते.
94. टिपू सुलतान फ्रान्सच्या जॅकोबीन क्लब ह्या राजकिय पक्षाचा सदस्य बनला होता.
95. इंग्रजांचे भारतातून उच्चाटनासाठी टिपू सुलतानने नेपोलियनला पाचारण केले होते.
96. टिपू सुलतानने मॉरीशसमधून फ्रेंच फीज भारतात बोलावली होती.
97. टिपू सुलतान 4 मे 1799 रोजी श्रीरंगपट्टणम् येथे चौथ्या अँग्लो-म्हैसुर युद्धात ठार झाला.
98. अर्काट ही कर्नाटक राज्याची राजधानी होती.
99. लॉर्ड वेलस्लीने ब्रिटिश राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले.
100. लॉर्ड वेलस्ली यास भारतातील ब्रिटीश साम्राज्याचा संस्थापक संबोधले जाते.
101. लॉर्ड वेलस्लीने भारतात तैनाती फौजेची पद्धती सुरु केली.
102. हैद्राबादच्या निजामाने तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्विकार केला.
103. दुसऱ्या बाजीरावाने इ. स. 1802 च्या वसई तहानुसार तैनाती फौजेचा स्विकार केला.
104. इंग्रज-शिखांमधील चिरकाल मैत्री तह 25 एप्रिल 1809 रोजी झाला.
105. महाराणा रणजितसिंह व इंग्रजांत चिरकाल मैत्रीचा तह अमृतसर येथे झाला.
106. एलफिन्स्टनने मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसुल व्यवस्था निर्माण केली.
107. मद्रास प्रांताचा गव्हर्नर सर थॉमस मुन्रोने मद्रासमध्ये रयतवारी पद्धती सुरू केली.
108. मद्रासमध्ये इ. स. 1820 साली रयतवारी पद्धत सुरू झाली.
109. माविस ऑफ हेस्टिंग्जने इ. स. 1822 साली बंगालचा कुळ कायदा पास केला.
110. माक्विस ऑफ हेस्टिंग्जने पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोवस्त केला.
111. विल्यम बेटिंकने सर्वप्रथम भारतीयांना शासनामध्ये स्थान देण्याचे धोरण स्विकारले.
112. विल्यम बेंटिकने भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली.
113. विल्यम बेंटिंकने ठगांचा बंदोबस्त केला.
114. बेटिंकच्या काळात इ. स. 1835 साली कलकत्त्यास मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले.
115. भारतात मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला.
116. भारतात पहिली रेल्वेगाडी इ. स. 1853 साली मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली.
117. लॉर्ड डलहौसीच्या गव्हर्नर जनरलशिपमध्ये भारतात रेल्वे व तारायंत्रे आली.
118. संपूर्ण भारतात एकाच प्रकारची पोस्टाची यंत्रणा लॉर्ड डलहौसीने सुरू केली.
119. भारतात लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत प्रथमच पोस्टाची तिकिटे छापण्यात आली.
120. लॉर्ड डलहौसीने इ. स. 1854 साली नवा पोस्ट ऑफिस कायदा संमत केला.
121. लॉर्ड डलहौसीने प्रशासनातील गैरकारभार ह्या सबबीखाली औंधचे राज्य खालसा केले.
122. डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण स्विकारले.
123. लॉर्ड डलहौसीने 13 फेब्रुवारी, 1856 रोजी अयोध्येचे राज्य खालसा केले, त्यावेळी बाजिद अली शहा हा अयोध्येचा नवाब होता.
124. भारतातील न्यायाधिशांना भारतात इंग्रजांचे खटले चालविण्याचा अधिकार इल्बर्ट बिलाद्वारे देण्यात आला होता.
X X
ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक धोरणे
125. ब्रिटिशांनी पहिली वखार सुरत येथे स्थापन केली.
126. इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणामुळे भारत शेतीप्रधान बनला.
127. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत चहा, कॉफी व निळ या वस्तुंच्या निर्यातीत वाढ झाली.
128. ब्रिटिश राजवटीमध्ये कूळ या वर्गासच खऱ्या अर्थानि करांचे ओझे सोसावे लागले.
129. ब्रिटिश राजवटीमध्ये कुळांची परिस्थिती अधिकच हलाखीची बनली.
130. ईस्ट इंडिया कंपनीच्या शेतीविषयक धोरणाच्या भयंकर परीणामाने सावकारांचे प्रस्थ वाढले.
131. लॉर्ड कॅनिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल होता.
132. भारतीय हस्तव्यवसायांचा न्हास झाल्यामुळे ब्रिटिश काळात लोकसंख्येचा शेती व्यवसायावरील ताण वाढला.
133. भारतावर पूर्वी अंमल करणाऱ्या निरनिराळ्या राजवटीपेक्षा ईस्ट इंडिया कंपनीची राजवट होती कारण त्यांनी त्यांच्या भारतातील साम्राज्याचा वापर इंग्लंडच्या आर्थिक संपूर्णपणे भिन्न
134. शेतीव्यवसायात स्थिरता निर्माण करण्यासाठी व विशेषतः कंपनीस दरवर्षी ठराविक उत्पन निश्चिती करण्यासाठी कॉर्नवॉलीसने बंगाल व बिहार केलेल्या पद्धतीमुळे जमिनदार हे जमिनीचे मालक बनले. ते सरकारला जमीन महसुलाची ठराविक रक्कम देण्यास जबाबदार धरले जाऊ लागले. कंपनीच्या महसुल व्यवस्थेत असलेला गोंधळ चा संपुष्टात आला जमीनदार आपल्या कुळांची पिळवणुक करू लागले.
135. ब्रिटिश राजवटीने महसुलाच्या एकूण रकमेपैकी अगदी नगण्य रक्कम शेती व्यवसायाच्या प्रगती साठी
136. ब्रिटिश अमदानीत भारतातील हस्तोद्योगांचा -हास झाला कारण भारतातील राजघराणी नष्ट झाल्याने उपयोगात आणली. ह्या हस्तोद्योगांना असलेला राजाश्रय संपुष्टात आला, ब्रिटिशांची स्वार्थी व्यापारी नीती व इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंपेक्षा भारतीय वस्तू तुलनेने महाग पडत.
137. ब्रिटिशांनी भारतात वापरलेल्या नीतीनुसार भारतीय पक्षाचा मालावर प्रचंड निर्यातकर भारतीय पक्का माल इंग्लंडला जाणार नाही याची दक्षता घेतली, ब्रिटिश पक्या मालावर कर माफ करण्यात आला किंवा त्यावर अत्यल्प कर बसविण्यात आला व भारतातील कच्या मालाच्या उत्पादनास व निर्यातीस प्रोत्साहन देण्यात आले.
View, Comments and share.........
2 Comments
Useful information
ReplyDelete👍
ReplyDelete