Subscribe Us

header ads

Vitthal Ramji Shinde: Social and Religious Reformers

Vitthal Ramji Shinde: Social and Religious Reformers in Maharashtra

महर्षी वि. रा. शिंदे ऊर्फ विठ्ठल रामजी शिंदे : थोर विचारवंत व कृतिशील समाजसुधारक

23 एप्रिल: जयंती 

2 जानेवारी : स्मृतिदिन



बालपण आणि शिक्षण:

एक थोर विचारवंत व कृतिशील समाजसुधारक महर्षी वि. रा. शिंदे ऊर्फ विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी येथे 23 एप्रिल 1873 रोजी झाला. 

त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव यमुनाबाई असे होते. त्यांचे पाळण्यातील नाव तुकाराम असे होते. पण रामजी शिंदे हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांनी आपल्या या मुलाचे नाव विठ्ठल असेही ठेवले व पुढे तेच नाव रूढ झाले. 

विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखिंडीतच झाले. शाळेत तं एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. 

मॅट्रिकची परीक्षा 1891 मध्ये ते उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 

उच्च शिक्षणासाठी पुढे 1893 मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 

पुण्यातील शिक्षणक्रमात त्यांना मराठा एज्युकेशन सोसायटीचे व बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांचे साहाय्य मिळाले. 

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून 1898 मध्ये त्यांनी बी.ए. ची पदवी संपादन केली.

इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे 1901-03 मध्ये मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास, पाली आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केला.

X X

प्रार्थना समाजाची दीक्षा:

महर्षी विठ्ठल शिंदे यांनी 1898 मध्ये प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. 1901 मध्ये विठ्ठल शिंदे यांनी प्रार्थना समाजाच्या साहाय्याने युनिटेरियन धर्मपंथाची शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्डला गेले व तेथील मॅचेस्टर कॉलेजात त्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. इंग्लंडहून मायदेशी परत येत असताना ॲमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेमध्ये त्यांनी 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा प्रबंध वाचला. 1903 मध्ये ते मायदेशी परत आले.

 एकेश्वरवादी धर्माचे प्रचारक या नात्याने त्यांनी मुंबईच्या प्रार्थना समाजाचे काम 1910 सालापर्यंत केले. या काळात त्यांनी तरुण ब्राह्मसंघ काढला. एकेश्वरी धर्मपरिषद भरविण्यात पुढाकार घेतला व 'सुबोधपत्रिका' साप्ताहिकात त्यांनी अनेक लेख लिहिले.

1918 मध्ये त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद मुंबई येथे भरविली. मुंबईच्या प्रार्थना समाजाला त्यांचे हे कार्य न रुचल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. 

X X

ब्राह्मो समाजाचे आचार्य:

महर्षी शिंदे 1923-24 मध्ये ते कलकत्त्याच्या ब्राह्मो समाजात गेले. ते ब्राह्म समाजाचे उपासक व प्रचारक होते. 1924-25 मंगळूर येथील साधारण ब्राह्मो समाजाचे आचार्यपद स्वीकारले. ब्राह्मो समाजाचे मंगळूर येथील आचार्य म्हणून काही काळ त्यांनी काम केले. 

1927 मध्ये ब्रह्मदेशचा प्रवास केला. 1928 ब्रह्मसमाज शतसांवत्सरिक महोत्सवासाठी कलकत्त्यास प्रयाण केले. नंतर उत्तर भारताचा दौरा.

1928 मध्ये पुणे येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करून त्यांनी येथील शेतकन्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या आणि त्यांचे निवारण करण्यासंबंधी सरकारकडे आग्रह धरला. 

अशाच प्रकारच्या परिषदा मुंबई, तेरदाळ, बोरगाव, चांदवड इत्यादी ठिकाणी आयोजित केल्या.

X X

डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्था स्थापन:

महर्षी शिंदे एक थोर विचारवंत व कृतिशील समाजसुधारक होत. ते ब्राह्म समाजाचे उपासक व प्रचारक होते आणि जगातील सर्व धर्माचा त्यांचा प्रगाढ अभ्यास होता. 

त्यांनी आपले सर्व जीवन दलित, पतितांच्या उद्धारासाठी खर्ची घातले होते. 

"अस्पृश्यांसाठी शाळा वसतिगृहे, उद्योगशाळा व दवाखाने उभारणे अस्पृश्यांमध्ये शिक्षणाविषयी आस्था उत्पन्न करून त्यांना सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्याची दीक्षा देणे" या उच्च हेतूने प्रेरित होऊन 1906 मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी मुंबई येथे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' (निराश्रित साहाय्यकारी मंडळ) ही संस्था स्थापन केली.

पुणे येथे या मिशनचे 'अहिल्याश्रम' नावाचे प्रमुख केंद्र निर्माण झाले. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वतीने महर्षी विठ्ठल शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. 

अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा, वसतिगृहे उघडणे, अस्पृश्यांच्या वस्तीत शिवणकामाचे वर्ग चालविणे, त्यांच्या प्रबोधनासाठी व्याख्याने, कीर्तने आयोजित करणे, आजारी माणसांची शुश्रूषा करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. त्यांनी या संस्थेच्या शाखा मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, कोल्हापूर, अकोला इत्यादी ठिकाणी उघडल्या.

1912 पर्यंत देशात 24 शाळा व 2 वसतिगृहे काढून ती चांगली चालविण्यात मिशनने यश मिळविले होते.

X X

राष्ट्रीय सभेतील सहभाग:

राष्ट्रीय सभेतील मुख्य राजकीय नेत्यांशीही म. शिंद्यांचा परिचय वाढत होता. या नेत्यांचे आपल्या कार्यात सहकार्य मिळविण्याच्या कामीही ते यशस्वी झाले.

ॲनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली 1917 साली जे राष्ट्रीय सुभेचे अधिवेशन भरले होते, त्यामध्ये महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता-निवारणाचा ठराव आणला. राष्ट्रीय सभेने तो एकमताने संमत केला. त्या ठरावात म्हटले होते, 

'अस्पृश्यांवरील सर्व धार्मिक निर्बंध रद्द करून त्यांना माणुसकीचे सर्व हक्क स्पृश्यांप्रमाणेच प्राप्त व्हावेत व सर्व उद्योगधंद्यात समान स्थान मिळावे.' 

महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नाला राष्ट्रीय व्यासपीठावरच अशी वाचा फोडली.

X X

विशेष उल्लेखनीय कार्य:

मुंबई येथे 1906 साली भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाची स्थापना.

प्रार्थना समाजाचा अधिकृत संबंध 1910 साली तुटला. जेजुरी येथे 1910 मध्ये त्यांनी मुरळी प्रतिबंधक सभा भरवून मुरळ्यांकडे समाजाचे लक्ष वेधले. 

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या पुणे शाखेसाठी पुण्यास 1912 मध्ये वास्तव्य केले होते.

कलकत्ता कांग्रेस अधिवेशनात 1917 साली अस्पृश्यता निवारणाचा ठराव संमत करण्यात आला होता.

मुंबईस सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या अध्यक्ष तेने 1918 वर्षी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद संपन्न झाली होती.

मुंबई कौन्सिलच्या निवडणुकीसाठी 1920 उभे होते पण पराभूत झाले.

1923 मध्ये निराश्रीत साह्यकारी मंडळीशी प्रत्यक्ष चालकत्वाचा संबंध तुटला.

1930 मध्ये महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीत दाखल झाले व कायदेभंगाबद्दल त्यांना 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. 


X X

सन्मान व पुरस्कार:

1. महर्षी विठ्ठल शिंदे अहमदनगरजवळ असलेल्या भिंगार या गावी 1905 मध्ये अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रित म्हणून गेले होते.

2. 1933 मध्ये श्रीमत सयाजीराव गायकवाड पारितोषिक प्राप्त.

3. 1934 मध्ये मुंबई येथे 41 संस्थांतर्फे भव्य सत्कार .

4. 1934 मध्ये बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचे वेळी भरलेल्या 'तत्त्वज्ञान व समाजज्ञान' या शाखासंमेलनाचे ते अध्यक्ष होते.

5. 1935 मध्ये बडोदे येथील मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र ' या शाखासंमेलनाचे अध्यक्ष.

X X

लेखन:

महर्षी विठ्ठल शिंदे यांनी खूप लेखन केले. त्यांच्या लेखनाचे विषय धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, मराठ्यांचा इतिहास, समाजशास्त्र असे विविध होते. 

त्यांचा या विषयांचा अभ्यास सखोल होता. त्यांच्या लेखनामधून त्यांची तत्त्वचिंतकाची व संशोधकाची दृष्टी वारंवार दृष्टीस पडते. 

अस्पृश्यता ही आर्यपूर्व हिंदी समाजात असावी व ती आग्नेय आशियातील देशांतून आपल्याकडे आली असावी, असा समाजशास्त्रीय सिद्धांत त्यांनी मांडला आहे. 

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पूर्वी वसती करून राहणारे महारच होते, असे प्रतिपादन त्यांनी महारांची अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न केला.

"ब्राह्मण, मराठे व अस्पृश्य या तीन मोठ्या जातींत ऐक्य झाल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही' असे त्यांनी स्पष्ट बजावले आहे. 

ते म्हणतात, "ही एकी अजून म्हणण्यासारखी न झाल्याने महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, धर्मकारण ही सर्वच अडून राहिली आहेत. "

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य केले. त्यामुळे द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी त्यांचा 'आधुनिक काळातील महान कलिपुरूष' असा निषेध केला होता.

X X

ग्रंथसंपदा:

1. माझ्या आठवणी व अनुभव (आत्मचरित्र/Autobiography)

2. 1933 मध्ये त्यांनी 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हे पुस्तक लिहिले.

3. Untouchable of India

4. History of Parihars

5. भागवत धर्माचा विकास (लेख)

6. मराठ्यांची पूर्वपीठिका (लेख)

7. कानडी - मराठी संबंध (लेख)

8. कोकणी - मराठी संबंध (लेख)

9. Thiestic directory

X X

निधन:

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे 1935-44 दरम्यान पुणे येथेच त्यांचा मुक्काम होता.ते आजारी पडले आणि 2 जानेवारी 11944 रोजी निधन झाले.









X X

View, Comments and share

Post a Comment

3 Comments