Subscribe Us

header ads

Geography 7/7: Maharashtra State

Geography 7: Maharashtra State

महाराष्ट्राचा भूगोल: भाग 7/7



महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादन:


★ महाराष्ट्रातील सर्वाधिक मासेमारी खाऱ्या पाण्यातून होते.

★ महाराष्ट्राचा मासेमारीत भारतात पहिला क्रमांक लागतो.

★ महाराष्ट्रातील एकूण मासे उत्पादनापैकी ५० टक्के मासे सुकविले जातात.

★महाराष्ट्रात मे, १९६३ मध्ये मत्स्य व्यवसाय सुरू झाला.

★ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते.

★ रत्नागिरीच्या किनाऱ्याजवळ कोळंबी या जातीचे मासे सापडतात. 

★महाराष्ट्रात मत्स्यबीज व्यवसाय मे, १९६३ मध्ये सुरू झाला.

★ अप्पर वर्धा हे केंद्रशासनाच्या मदतीने उभारलेले मत्स्यबीज केंद्र आहे. 

★ महाराष्ट्रातील मासेमारीच्या एकूण उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन खाऱ्यापाण्यातील मासेमारीपासून मिळते.

★ महाराष्ट्रातील मासेमारीच्या एकूण उत्पादनापैकी १० टक्के उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीपासून मिळते.


X X

महाराष्ट्रातील दुग्धउत्पादन:


★महाराष्ट्राचा दुग्ध व्यवसायात पहिला क्रमांक लागतो.

★महाराष्ट्रात दुधाचा महापूर योजना इ. स. १९७१ पासून राबविली जात आहे. 

★ महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादनात सहकारी क्षेत्राचा वाटा ८५ टक्के आहे.

★ महाराष्ट्रातील दरडोई दुधाचा वापर ६७ ग्रॅम आहे. 

★ महाराष्ट्रातील दुधदुभत्या जनावरांचे सरासरी दुग्ध उत्पादन १.२५ लिटर आहे.

★ धवलक्रांती, महानंदा व दुधाचा महापूर हवा महाराष्ट्राच्या दुग्ध योजना आहेत.



महाराष्ट्राचे अर्थकारण:


★ शुन्याधारीत अर्थसंकल्प प्रथम महाराष्ट्र राज्यात मांडला गेला.

★ नाफेड ही महाराष्ट्रातील कांदा खरेदी करणारी संस्था आहे.

★ मराठवाडा हा महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग आहे.

★ महाराष्ट्रात बॉम्बे मनी लँडर्स ॲक्ट इ. स. १९४६ साली अस्तित्वात आला.

★ भारतातील अव्वल शेअर बाजार दलाल स्ट्रीट मुंबई येथे आहे.

★ मुंबईच्या स्टॉक एक्सचेंज मार्केटची स्थापना इ. स. १८७५ साली झाली. 

★महाराष्ट्रात ३० जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.

★महाराष्ट्रात २० व्या शतकात व्यापारी बँकांचा प्रारंभ झाला. 

★ महाराष्ट्रात पुणे येथे सर्वप्रथम नागरी सहकारी पतसंस्था स्थापन झाल्या.

★ महाराष्ट्रातील शिखर बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 

★ महाराष्ट्रातील व्यापारी बँकांच्या सर्वात जास्त शाखा प. महाराष्ट्र येथे आहेत.

★ रोजगार हमी योजनेसाठी सहा मार्गांनी पैसा गोळा करतात.


X X

महाराष्ट्राच्या विकास योजना:


★ महाराष्ट्रात कापूस एकाधिकार खरेदी योजना इ. स. १९७१ साली सुरू करण्यात आली.

★ महाराष्ट्रात अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम इ. स. १९७४-७५ साली सुरू झाला.

★ रोजगार हमी योजना सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात राबविण्यात आली.

★ रोजगार हमी योजना सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात सुरू झाली. 

★ रोजगार हमी योजनेसाठी वि. स. पागे समिती नेमली होती.

★ श्रमजीवी कुटुंबकल्याण योजना १ ऑगस्ट, १९८० रोजी सुरू करण्यात आली.

★ संजय गांधी स्वावलंबन योजना २ ऑक्टोबर, १९८० रोजी सुरू करण्यात आली.

★महाराष्ट्रात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम २ ऑक्टोबर, १९८० रोजी लागू झाला. 

★महाराष्ट्रात एकात्मिक ग्रामीण ऊर्जा कार्यक्रम इ. स. १९८१-८२ साली सुरू झाला.

★संजय गांधी निराधार योजना २ ऑक्टोबर, १९८२ रोजी सुरू करण्यात आली.

★ बायोगॅस विकास योजना इ. स. १९८२-८३ साली सुरू करण्यात आली.

★महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले योजना इ. स. १९८३-८४ पासून राबविली जात आहे. 

★ सावित्रीबाई फुले योजना स्त्री शिक्षणाशी संबंधित आहे.

★ मुलींना १२ वी पर्यंत मोफत शिक्षण मिळते. 

★ पशुसंवर्धनाच्या सर्वांगीण विकासासाठी गोकुळग्राम योजना इ. स. १९८४-८५ साली सुरू झाली.

★महाराष्ट्रात सर्वकष पीक विमा योजना इ. स. १९८५-८६ साली सुरू करण्यात आली.

★ महाराष्ट्रातील विविध विभागातील मागासलेपणाच्या अभ्यासासाठी दांडेकर समिती नेमली.



महाराष्ट्राची सहकारी चळवळ:


★ सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. 

★ भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन झाला.

★ पुणे जिल्हयात सर्वात जास्त सहकारी संस्था आहेत. 

★ महाराष्ट्रातील एकूण रोजगारात सहकारी क्षेत्राचा १२.५ टक्के वाटा आहे.

★ देशातील साधारणपणे ५० टक्के सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.



महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रे:


★ तरूण भारत हे वृत्तपत्र नागपूर, सोलापूर व मुंबई या ठिकाणांहून प्रसिद्ध होते. 


महाराष्ट्र टाईम्स हे वृत्तपत्र मुंबई येथून प्रसिद्ध होते.

★ लोकसत्ता हे वृत्तपत्र मुंबई येथून प्रसिद्ध होते.

★ प्रभात हे वृत्तपत्र पुणे येथून प्रसिद्ध होते.

★ केसरी हे वृत्तपत्र पुणे येथून प्रसिद्ध होते. 

★ इकॉनॉमिक्स टाईम्स हे वर्तमानपत्र मुंबई येथून प्रसिद्ध होते.

★ इंडियन एक्सप्रेस हे वृत्तपत्र मुंबई येथून प्रसिद्ध होते.

★ टाईम्स ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र मुंबई येथून प्रसिद्ध होते.

★महाराष्ट्र हेरॉल्ड हे वृत्तपत्र मुंबई येथून प्रसिद्ध होते. 

★ नवभारत हे हिंदी वृत्तपत्र नागपूर येथून प्रसिद्ध होते,

★ नवभारत टाईम्स हे वृत्तपत्र मुंबई येथून प्रसिद्ध होते. 

★ रामभूमी हे वर्तमानपत्र नाशिक येथून प्रसिद्ध होते.

★ देवगिरी तरूण भारत हे वृत्तपत्र औरंगाबाद येथून प्रसिद्ध होते.

★ नागपूर पत्रिका हे नियतकालिक नागपूर येथून प्रसिद्ध होते. 

★ ऐक्य हे नियतकालिक सातारा येथून प्रसिद्ध होते.

★ पुढारी हे नियतकालिक कोल्हापूर येथून प्रसिद्ध होते..

★ सोलापूर येथून संचार नियतकालिक प्रसिद्ध होते. 

★ फ्री प्रेस जर्नल हे इंग्रजी वृत्तपत्र मुंबई येथून प्रसिद्ध होते.

★ नागपूर येथून नागपूर टाईम्स हे इंग्रजी वृत्तपत्र प्रसिद्ध होते. 

★ मुंबईहून प्रसिद्ध होणारे गुजराती वर्तमानपत्र : मुंबई समाचार

★ जनशक्ती हे वर्तमानपत्र धुळे व जळगाव येथून प्रसिद्ध होते.

★ पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व औरंगाबाद या ठिकाणाहून सकाळ हे दैनिक वृत्तपत्र प्रसिद्ध होते.

★ औरंगाबाद, जळगाव, नागपूर व अहमदनगर या ठिकाणाहून लोकमत हे दैनिक वृत्तपत्र प्रसिद्ध होते.


X X

महाराष्ट्रातील पुस्तके व लेखक:


★ 'गारंबीचा बापू' या पुस्तकाचे लेखक श्री. ना. पेंडसे होत.

★ 'युगांत' इरावती कर्वे यांनी लिहिले. 

★ 'ययाति' कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिली.

★ 'गीतारहस्य' लो. टिळक यांनी लिहिले.

★ 'मृत्युंजय' शिवाजी सावंत यांनी लिहिले. 

★ 'स्वामी' ही कादंबरी रणजीत देसाई यांनी लिहिली.


★ '१८५७ चे स्वातंत्र्य समर' स्वा. सावरकर यांनी लिहिले.

★ 'शेतकऱ्यांचा आसूड' म. फुलेंनी लिहिला.

★ 'हू वेअर द शुद्राज ?' हे पुस्तक डॉ. आंबेडकर यांनी लिहिले. 

★ 'दि अर्टिक्ट होम इन वेदाज्' हे पुस्तक लो. टिळकांनी लिहिले.

★ 'अरूणोदय' हे बाबा पद्मनजी यांचे आत्मचरित्र आहे.





View, Comments and share.......




Post a Comment

1 Comments