Subscribe Us

header ads

Panjabrao Deshmukh: Social activist and Farmers leader

Panjabrao Shamrao Deshmukh or Bhausaheb Deshmukh: Social activist and leader of farmers in India. 

डॉ. पंजाबराव देशमुख ऊर्फ भाऊसाहेब देशमुख: भारताचे प्रथम कृषिमंत्री, कृषिरत्न, शिक्षण महर्षी

27 डिसेंबर: जयंती

10 एप्रिल: स्मृति दिन 


बालपण आणि शिक्षण:

स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे शैक्षणिक संस्था काढून उभे करणारे शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव शामराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी विदर्भ राज्यातील अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. त्यांचे मूळ आडनाव कदम हे होते.

भाऊसाहेबांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव बापू व आईचे नाव राधाबाई हे होते. भाऊसाहेबांनी तिसरीपर्यंतचे शिक्षण पापळ गावातील शाळेत घेतले. 

चौथीच्या शिक्षणासाठी त्यांना चांदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. 

 त्यांचे माध्यमिक शिक्षण कारंजा (लाड) येथे झाले. त्यांनी अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमधून मॅट्रिकच्या प्रमाणपत्रासह पदवी प्राप्त केली. मध्यंतरी शिक्षणासाठी भाऊसाहेब पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गेले होते.

 पुढे शिक्षण घेण्यासाठी ते 1920 मध्ये इंग्लंडला गेले. "वैदिक साहित्य: त्याची सुरुवात आणि उत्क्रांती " (वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' ) त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएच.डी. (डॉक्टरेट) प्राप्त केली आणि हा ग्रंथ पण लिहिला. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी बार- ॲट- लॉ पदवी  संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1926 मध्ये ते भारतात परत आले भारतात आल्यावर अमरावती या ठिकाणी त्यांनी वकील प्रारंभ केला. त्याच काळात मुंबईतील सोनार समाजातील विमलाबाई सोबत त्यांचा विवाह झाला.

X X

शिक्षण संस्था स्थापन:

ब्रीदवाक्य:

'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' 

हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.

X X

श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती:

विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून भाऊसाहेबांनी 1932 मध्ये श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. 

या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे 1000 च्या वर शाळा आहेत. तसेच महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे.

1926 मध्ये त्यांनी मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.या छत्रालयाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय त्यांनी केली होती.प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली. 1946 मध्ये भारताची घटना समिती अस्तित्वात आली होती. त्या घटना समितीचे सभासद म्हणून पंजाबरावांनी काम केले.

1950 मध्ये भाऊसाहेबांनी लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे) केली नंतर त्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.ग्रामोद्धार मंडळाची स्थापना केली.

X X

हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक:

भाऊसाहेब यांनी शेतकऱ्याच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली. सर्व प्रथम शेतकर्‍यांना संघटित करण्याचे मौलिक कार्य केले. 

शेतकर्‍यांना संघटित करुन भाऊसाहेबांनी शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून तो एक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिला.

भाऊसाहेबांनी 1927 मध्ये शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले. वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी मांडत होते.

शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा 1933 मध्ये पारiत करण्यात भाऊसाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना "हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक" म्हणतात. 

डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी 7 फेब्रुवारी 1955 रोजी "भारत कृषक समाजाची स्थापना" करून संपूर्ण शेतकरी समाजाला राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ निर्माण करून दिले व त्याच्याच विद्यमाने "राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना " करण्यात आली होती.

 X X

भारताचे पहिले कृषिमंत्री व कृषी विषयक विचार:

प्रांतिक कायदे मंडळावर 1930 मध्ये निवड झाली. त्यावेळेस शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

भाऊसाहेब लोकसभेवर 1952, 1957, 1962 तीन वेळा निवड झाली होती. त्यांना 1952 ते 62 या कालावधीत भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. 

भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाऊसाहेबांवर जबाबदारी दिली भाऊसाहेबांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून अतिशय उत्कृष्टपणे शेतकऱ्यांसाठी कार्य केले.

 शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले व भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतातला शेतकरी हा उपाशी राहिला नाही पाहिजे. त्याच्या शेतीच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे अशी भूमिका भाऊसाहेबांची नेहमीच राहिलेली आहे.

भाऊसाहेब देशमुख केंद्रीय कृषिमंत्री असताना डॉ. पंजाबरावांनी भव्य दिव्य अशा "जागतिक कृषी प्रदर्शना"चे नवी दिल्ली येथे 11 डिसेंबर 1959 ते फेब्रुवारी 1960 या दरम्यान आयोजन केले होते. 

अंदाजे 100 एकर जागेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे कृषी प्रदर्शन भारताच्या कृषी क्रांतीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरले. 

यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतरांनी 1959 मध्ये दिल्ली येथे “जागतिक कृषी प्रदर्शना” ला हजेरी लावली होती.त्यांनी या काळात कृषी आणि शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी कार्य केले. 

पंजाबी शेतकरी भाऊसाहेबांचा उल्लेख ‘पंजाबराव पंजाब’ असा करू लागले होते.

देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने 1932 मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल भाऊसाहेबांनी संसदेत मांडले.

X X

आधुनिक आणि तांत्रिक शेती: 

भारतीय शेतकर्‍यांची दैववादी, निराशवादी मानसिकता बदलून त्यांना जागतिकीकरणातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांची जाण करुन देणे काळाची गरज झाली आहे. 

कारण जोपर्यंत शेतीकडे पाहण्याचा सामान्य शेतकर्‍यांचा दृष्टिकोन बदलत नाही तो पर्यंत शेतकर्‍यांचा आर्थिक विकास घडून येणे शक्य नाही. 

त्यासाठी भाऊसाहेबा डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेती करताना आधुनिक आणि तांत्रिक शेतीचा वापर करावा असे म्हटले आहे. 

 भाऊसाहेबांनी कोलंबो प्लॅन प्रमाणे निरनिराळ्या देशात शेतकरी पाठविण्याची योजना आखली, तसे इंटर नॅशनल फार्म यूथ एक्सचेंज कार्यक्रम भरतात सुरु करुन बर्‍याच शेतकर्‍यांना दुसर्‍या देशातील शेतीची लागवड पद्घती पाहण्याची व प्रात्याक्षिक करण्याची संधी मिळवून दिली. (उदा. जपानी भात शेतीचा प्रयोग)

 आधुनिक आणि तांत्रिक शेती करताना अशा प्रकारच्या योजनांची आज अमंलबजावणी करण्याची नितांत गरज आहे. अशा प्रात्याक्षिकांमधून शेतकरी आधुनिक यंत्रे, उपकरणे यांचा कसा वापर करावा हे शिकतील व त्यातून शेतीसाठी लागणारे नियोजन ते करतील आणि त्यामाध्यामातून त्यांच्या वेळेची व श्रमाची बचत होईल. हा दृष्टिकोन भाऊसाहेबांचा आधुनिक शेतीसंबंधी होता.

X X

शेती व्यवसायाला प्रशिक्षणाची गरज :

भाऊसाहेब नेहमी म्हणत "तुम्हला शेती जरी करावयाची असली तरी तुम्ही एम.ए. होऊन करा किंवा ऍग्रीकल्चर होऊन करा. जेणे करुन तुम्हाला कुणी फसवणार नाही आणि तुम्ही उत्तम शेती करु शकाल" मला असे वाटते. 

भाऊसाहेबांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. कारण आज शेतकर्‍याला शिक्षणाची गरज नाही आणि कोणीही ऐरागैरा योग्य रितीने शेती करु शकतो हा सर्वदूर पसरलेला चुकीचा समज आहे. हा दृष्टिकोन बदलवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. 

कारण या चुकीच्या समजुतीमधूनच समाजात नैराश्य आणि वैफल्य पसरते आणि त्यातूनच मग सगळीकडे असफल झालेले लोक निराशेने उदासिनतेकडे वळताना दिसतात किंवा आजच्या घडीला ते आत्महत्या करताना दिसतात. 

त्याचे कारण त्यांच्याजवळ ना शारीरिक क्षमता असते ना बौद्घीक कुवत, त्यामुळे इतर व्यावसायिक शिक्षाप्रमाणेच शेती व्यवसायाशी संबधित असणार्‍या सर्व सोयी सुविधा नवनवीन पद्घती आणि अवजाराची माहिती असणे आवश्यक आहे. 

शेती व्यवसाय हा स्थितीशील व्यवसाय आहे. याची जाणीव करुन देण्याची गरज आज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. 

तसेच आजच्या शिक्षणाची गंगा संशोधकाच्या प्रयोगशाळेतून थेट शेतात राबणार्‍या शेतकर्‍यांच्या पर्यंत पोहचली पाहिजे. तरच तो शेतकरी उत्तम व आधुनिक शेती चांगल्याप्रकारे करु शकतो. 

X X

संपत्ती करावरील विधेयक :

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी 6 एप्रिल 1949 रोजी केलेल्या भाषणात शेतकर्‍यांच्या मालाला कमी भाव देण्याचे समर्थन करणार्‍यांवर सडकून टीका केली.

भाऊसाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

 "शेतकर्‍यांनी उत्पन्न केलेल्या वस्तूंचे जास्त भाव दिले तर त्यामुळे पैशाची किंमत कमी होते म्हणून शेतकर्‍यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी होते म्हणून शेतकर्‍यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी करणे हाच चलनवाढ रोखण्याचा मार्ग आहे, असे बेजबाबदार विधान पण ते योग्य नाही. वास्तविक भारतीय शेतकरी पूर्वी कधीही नव्हता इतका आज दरिद्री झाला आहे. त्यांच्या हाती जो काही पैसा येतो तो सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यावर खर्च होऊन जातो. पुष्कळदा तर त्याला आपल्या कुटुंबाच्या सर्व साधारण गरजादेखील भागवता येत नाहीत. उलट ज्यांची संख्या संपूर्ण देशात दोन हजारापेक्षाही कमी आहे, अशा गर्भश्रीमंत माणसाच्या हातात देशातील शेकडा 75 टक्कापेक्षा अधिक संपत्ती या मूठभर लोकांच्या हातात जनतेची अधिक पिळवणूक करण्याकरिता राहू न देता, जर देशाच्या औद्यागिक विकासार्थ उपयोगात आणली तर देशाची अधिक प्रगती साधून लोक कल्याण होऊ शकेल. असे अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिपादन भाऊसाहेबांनी या विधेयकाबाबत मांडले."

 त्यातून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर व त्यांच्यावर झालेल्या अन्यायावर डॉ.पंजाबराव देशमुख किती जागरुक असत व शेतकर्‍यांच्या समग्र विकासाचा त्यांनी कसा ध्यास घेतला होता याची प्रचीती येते.

X X

महाराष्ट्रातील पहिला मंदिरप्रवेश सत्याग्रह:

भाऊसाहेब इव्हेंट कौन्सिलवर 1946 मध्ये निवडून आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले होते . त्यांनी शिक्षण, कृषी, सहकार, अस्पृश्यता निर्मूलन आणि जातिभेद निर्मूलन यासह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भारतातील दलित समाजावर व अस्पृश्य अस्पृश्यांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये त्यासाठी भाऊसाहेबांनी 1956 मध्ये अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केली. 

दलितांना न्याय मिळावा त्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी 13 आणि 14 नोव्हेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आणि भाऊसाहेबांनी अमरावती येथील अंबाबाई मंदिर प्रवेशासाठी परिषद बोलावली. 

मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. हा महाराष्ट्रातील पहिला मंदिरप्रवेश सत्याग्रह होता. 

1928 मध्ये अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना भाऊसाहेबांनी प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे केले होते तसेच त्यांनी सार्वजनिक विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या सुद्धा केल्या होत्या.

X X

सन्मान:

विदर्भातील अकोला येथे असलेल्या कृषी विद्यापीठाला डाॅ. पंजाबराव देशमुखांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

X X

निधन:

डॉ. पंजाबराव शामराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचा मृत्यू 10 एप्रिल 1965 रोजी विलिंग्डन हॉस्पिटल दिल्ली या ठिकाणी झाला.






https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/april-10-day-of-special-dinvishesh.html

👆

April 10 - Day of Special (Dinvishesh)


एप्रिल 10 : दिनविशेष





X X

View, Comments and share......






 

Post a Comment

4 Comments